श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ अष्टाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भ्रातृभिः कपिभिः ऋक्षैश्च सह परमधाम गन्तुं श्रीरामस्य निश्चयो, विभीषणं हनुमन्तं जाम्बवन्तं मैन्दं द्विविदं च प्रति भूतल एव स्थातुं तस्यादेशः -
श्रीरामचंद्रांचा भाऊ, सुग्रीवादि वानर तसेच अस्वले यांच्यासह परमधामास जाण्याचा निश्चय आणि विभीषण, हनुमान्‌, जाम्बवान्‌, मैंद तसेच द्विविद यांना या भूतलावरच राहाण्याचा आदेश देणे -
ते दूता रामवाक्येन चोदिता लघुविक्रमाः ।
प्रजग्मुर्मधुरां शीघ्रं चक्रुर्वासं न चाध्वनि ॥ १ ॥
श्रीरामांची आज्ञा मिळताच शीघ्रगामी दूत शीघ्रच मधुरापुरीला निघाले. त्यांनी मार्गात कोठेही मुक्काम केला नाही. ॥१॥
ते तु त्रिभिरहोरात्रैः सम्प्राप्य मधुरामथ ।
शत्रुघ्नाय यथातत्त्वं आचख्युः सर्वमेव तत् ॥ २ ॥
निरंतर तीन दिवस आणि तीन रात्री चालून ते मधुरेस पोहोचले आणि अयोध्येतील सारी हकिगत त्यांनी यथावत्‌ शत्रुघ्नांना ऐकविली. ॥२॥
लक्ष्मणस्य परित्यागं प्रतिज्ञां राघवस्य च ।
पुत्रयोरभिषेकं च पौरानुगमनं तथा ॥ ३ ॥

कुशस्य नगरी रम्या विन्ध्यपर्वतरोधसि ।
कुशावतीति नाम्ना सा कृता रामेण धीमता ।
श्रावस्तीति पुरी रम्या श्राविता च लवस्य ह ॥ ४ ॥
श्रीरामांची प्रतिज्ञा, लक्ष्मणांचा परित्याग, श्रीरामांच्या दोन्ही पुत्रांचा अभिषेक आणि पुरवासी लोकांचा श्रीरामांच्या बरोबर जाण्याचा निश्चय आदि सर्व गोष्टी सांगून दूतांनी हेही सांगितले की परम बुद्धिमान्‌ भगवान्‌ श्रीरामांनी कुशासाठी विंध्यपर्वताच्या किनार्‍याला कुशावती नामक रमणीय नगरीची निर्मिति केली आहे. ॥३-४॥
अयोध्यां विजनां कृत्वा राघवो भरतस्तथा ।
स्वर्गस्य गमनोद्योगं कृतवन्तौ महारथौ ॥ ५ ॥

एवं सर्वं निवेद्याशु शत्रुघ्नाय महात्मने ।
विरेमुस्ते ततो दूताः त्वर राजेति चाब्रुवन् ॥ ६ ॥

तच्छ्रुत्वा घोरसङ्‌काशं कुलक्षयमुपस्थितम् ।
याप्रकारे लवासाठी श्रावस्ती नामाने प्रसिद्ध सुंदर पुरी वसविली आहे. राघवांनी तसेच भरतांनी, दोघा महारथी वीरांनी अयोध्येला शून्य करून साकेतधामास जाण्याचा उद्योग करण्यास सुरूवात केली आहे. याप्रकारे महात्मा शत्रुघ्नांना शीघ्रतापूर्वक सर्व गोष्टी सांगून दूतांनी सांगितले - राजन्‌ ! शीघ्रता करा. इतके बोलून ते गप्प राहिले. ॥५-६ १/२॥
प्रकृतीस्तु समानीय काञ्चनं च पुरोधसम् ॥ ७ ॥

तेषां सर्वं यथावृत्तं अब्रवीद्रघनन्दनः ।
आत्मनश्च विपर्यासं भविष्यं भ्रातृभिः सह ॥ ८ ॥
आपल्या कुळाचा भयंकर संहार उपस्थित झालेला ऐकून रघुनंदन शत्रुघ्नांनी समस्त प्रजा तसेच काञ्चन नामक पुरोहित यांना बोलावले आणि त्यांना सर्व गोष्टी यथावत्‌ ऐकविल्या. ॥७-८॥
ततः पुत्रद्वयं वीरः सोऽभ्यषिञ्चन् नराधिपः ।
सुबाहुर्मधुरां लेभे शत्रुघाती च वैदिशम् ॥ ९ ॥
त्यांनी हेही सांगितले की भावांच्या बरोबर माझ्याही शरीराचा वियोग होणार आहे. यानंतर वीर राजा शत्रुघ्नांनी आपल्या दोन्ही पुत्रांचा राज्याभिषेक केला. ॥९॥
द्विधा कृत्वा तु तां सेनां माधुरीं पुत्रयोर्द्वयोः ।
धनं च युक्तं कृत्वा वै स्थापयामास पार्थिवः ॥ १० ॥
सुबाहुला मधुरेचे राज्य मिळाले आणि शत्रुघातीला विदिशाचे मिळाले. मधुरेच्या सेनेचे दोन भाग करून राजा शत्रुघ्नांनी दोन्ही पुत्रांना वाटून दिले तसेच वाटण्यायोग्य धनाचेही विभाजन करून दोघांना देऊन टाकले आणि त्यांना आपापल्या राजधानीत स्थापित केले. ॥१०॥
सुबाहुं मधुरायां च वैदेशे शत्रुघातिनम् ।
ययौ स्थाप्य तदाऽयोध्यां रथेनैकेन राघवः ॥ ११ ॥
याप्रकारे सुबाहुला मधुरेत आणि शत्रुघातीला विदिशेत स्थापित करून रघुकुळनंदन (राघव) शत्रुघ्न एकामात्र रथद्वारा अयोध्येसाठी प्रस्थित झाले. ॥११॥
स ददर्श महात्मानं ज्वलन्तमिव पावकम् ।
सूक्ष्मक्षौमाम्बरधरं मुनिभिः सार्धमक्षयैः ॥ १२ ॥
तेथे पोहोचून त्यांनी पाहिले की महात्मा श्रीराम आपल्या तेजाने प्रज्वलित अग्निसमान उद्दीप्त होत आहेत. त्यांच्या शरीरावर तलम रेशमी वस्त्र शोभत आहे तसेच ते अविनाशी महर्षिंच्या समवेत विराजमान आहेत. ॥१२॥
सोऽभिवाद्य ततो रामं प्राञ्जलिः प्रयतेन्द्रियः ।
उवाच वाक्यं धर्मज्ञं धर्ममेवानुचिन्तयन् ॥ १३ ॥
निकट जाऊन हात जोडून त्यांनी श्रीरामांना प्रणाम केला आणि धर्माचे चिंतन करीत इंद्रियांना स्वाधीन ठेवत धर्माचे ज्ञाते श्रीराम यांना म्हणाले - ॥१३॥
कृत्वाभिषेकं सुतयोः द्वयो राघवनन्दन ।
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम् ॥ १४ ॥
राघवनंदन ! मी आपल्या दोन्ही पुत्रांचा राज्याभिषेक करून आलो आहे. राजन्‌ ! आपण मलाही आपल्या बरोबर चलण्याच्या दृढ निश्चयाने युक्त समजा. ॥१४॥
न चान्यदपि वक्तव्यं अतो वीर न शासनम् ।
विलोक्यमानमिच्छामि मद्विधेन विशेषतः ॥ १५ ॥
वीरा ! आज याच्या विपरीत आपण मला आणखी काही सांगू नये कारण की याहून अधिक (कठोर) दण्ड माझ्यासाठी दुसरा कुठलाही नसेल. माझी अशी इच्छा नाही की कुणाकडूनही विशेषतः माझ्या सारख्या सेवकाकडून आपल्या आज्ञेचे उल्लंघन व्हावे. ॥१५॥
तस्य तां बुद्धिमक्लीबां विज्ञाय रघुनन्दनः ।
बाढमित्येव शत्रुघ्नं रामो वाक्यमुवाच ह ॥ १६ ॥
शत्रुघ्नाचा हा दृढ विचार जाणून श्रीरामांनी (रघुनंदनांनी) त्यांना म्हटले - फार चांगले. ॥१६॥
तस्य वाक्यस्य वाक्यान्ते वानराः कामरूपिणः ।
ऋक्षराक्षससङ्‌घाश्च समापेतुरनेकशः ॥ १७ ॥
त्यांचे हे बोलणे पुरे होताच इच्छानुसार रूप धारण करणारे वानर, अस्वले आणि राक्षसांचे समुदाय फार मोठ्‍या संख्येने तेथे येऊन पोहोचले. ॥१७॥
सुग्रीवं ते पुरस्कृत्य सर्व एव समागताः ।
तं रामं द्रष्टुमनसः स्वर्गायाभिमुखं स्थितम् ॥ १८ ॥
साकेतधामास जाण्यासाठी उद्यत झालेल्या श्रीरामांच्या दर्शनाची इच्छा मनात ठेवून ते सर्व वानर सुग्रीवाला पुढे करून तेथे आले होते. ॥१८॥
देवपुत्रा ऋषिसुता गन्धर्वाणां सुतास्तथा ।
रामक्षयं विदित्वा ते सर्व एव समागताः ॥ १९ ॥

ते राममभिवाद्योचुः सर्वे वानरराक्षसाः ।
त्यांतील कित्येक तर देवतांचे पुत्र होते, कित्येक ऋषिंचे बालक होते आणि कित्येक गंधर्वांपासून उत्पन्न झालेले होते. श्रीरामांच्या लीलासंवरणाचा समय जाणून ते सर्वच्या सर्व तेथे आले होते. उक्त सर्व वानर आणि राक्षस श्रीरामांना प्रणाम करून बोलले - ॥१९ १/२॥
तवानुगमने राजन् सम्प्राप्ताः स्म समागताः ॥ २० ॥

यदि राम विनास्माभिः गच्छेस्त्वं पुरुषोत्तम ।
यमदण्डमिवोद्यम्य त्वया स्म विनिपातिताः ॥ २१ ॥
राजन्‌ ! आम्ही ही आपल्या बरोबर येण्याचा निश्चय करून येथे आलो आहोत. पुरूषोत्तम श्रीरामा ! जर आपण आम्हाला बरोबर न घेता निघून जाल तर आम्ही असे समजू की आपण यमदण्ड उचलून आम्हाला ठार मारून टाकले आहे. ॥२०-२१॥
एतस्मिन्नन्तरे रामं सुग्रीवोऽपि महाबलः ।
प्रणम्य विधिवद् वीरं विज्ञापयितुमुद्यतः ॥ २२ ॥
इतक्यात महाबली सुग्रीवही वीर श्रीरामांना विधिपूर्वक प्रणाम करून आपला अभिप्राय निवेदन करण्यासाठी उद्यत होऊन बोलले - ॥२२॥
अभिषिच्याङ्‌गदं वीरं आगतोऽस्मि नरेश्वर ।
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम् ॥ २३ ॥
नरेश्वर ! मी वीर अंगदाचा राज्याभिषेक करून आलो आहे. आपण समजून घ्यावे की माझाही आपल्या बरोबर येण्याचा दृढ निश्चय आहे. ॥२३॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा रामो रमयतां वरः ।
वानरेन्द्रमथोवाचं मैत्रं तस्यानुचिन्तयन् ॥ २४ ॥
त्यांचे ते वचन ऐकून मनाला रमविण्यार्‍या पुरूषांमध्ये श्रेष्ठ श्रीराम वानरराज सुग्रीवाच्या मैत्रीचा विचार करून त्यांना म्हणाले - ॥२४॥
सखे शृणुष्व सुग्रीव न त्वयाऽहं विनाकृतः ।
गच्छेयं देवलोकं वा परमं वा पदं महत् ॥ २५ ॥
सखे सुग्रीव ! माझे म्हणणे ऐका. मी तुमच्या शिवाय देवलोकात आणि महान्‌ परमपद अथवा परमधामांमध्येही जाऊ शकत नाही. ॥२५॥
तैरेवमुक्तः काकुत्स्थो बाडमित्यब्रवीत् स्म्यन् ।
बिभीषणमथोवाच राक्षसेन्द्रं महायशाः ॥ २६ ॥
पूर्वोक्त वानर आणि राक्षसांचे म्हणणे ऐकून महायशस्वी काकुत्स्थ राम फार चांगले म्हणून हसले आणि राक्षसराज विभीषणांना म्हणले - ॥२६॥
यावत्प्रजा धरिष्यन्ति तावत् त्वं वै बिभीषण ।
राक्षसेन्द्र महावीर्य लङ्‌कास्थः स्वं धरिष्यसि ॥ २७ ॥
महापराक्रमी राक्षसराज विभीषणा ! जो पर्यंत संसारांतील प्रजा जीवन धारण करील तो पर्यंत तुम्हीही लंकेत राहून आपले शरीर धारण कराल. ॥२७॥
यावच्चन्द्रश्च सूर्यश्च यावत् तिष्ठति मेदिनी ।
यावच्च मत्कथा लोके तावद्राज्यं तवास्त्विह ॥ २८ ॥
जो पर्यंत चंद्रमा आणि सूर्य राहातील, जो पर्यंत पृथ्वी राहील आणि जो पर्यंत संसारात माझी कथा प्रचलित राहील तो पर्यंत या भूतलावर तुमचे राज्य टिकून राहील. ॥२८॥
शासितस्त्वं सखित्वेन कार्यं ते मम शासनम् ।
प्रजाः संरक्ष धर्मेण नोत्तरं वक्तुमर्हसि ॥ २९ ॥
मी मित्रभावाने या गोष्टी तुम्हांला सांगितल्या आहेत. तू माझ्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. तू धर्मपूर्वक प्रजेचे रक्षण कर. यासमयी मी जे काही सांगितले आहे त्याचा तू प्रतिवाद करता कामा नये. ॥२९॥
किञ्चान्यद् वक्तुमिच्छामि राक्षसेन्द्र महाबल ।
आराधय जगन्नाथं इक्ष्वाकुकुलदैवतम् ॥ ३० ॥

आराधनीयमनिशं देवैरपि सवासवैः ।
महाबली राक्षसराज ! याशिवाय मी तुम्हांला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. आमच्या इक्ष्वाकुकुळाची देवता आहे भगवान्‌ जगन्नाथ (श्रीशेषशायी भगवान्‌ विष्णु). इंद्र आदि देवता ही त्यांची निरंतर आराधना करत रहातात. तुम्ही ही सदा त्यांची पूजा करत राहा. ॥३० १/२॥
तथेति प्रतिजग्राह रामवाक्यं विभीषणः ॥ ३१ ॥

राजा राक्षसमुख्यानां राघवाज्ञामनुस्मरन् ।
राक्षसराज विभीषणांनी श्रीरामांचे हे वाक्य आपल्या हृदयात धारण केले आणि फार चांगले म्हणून त्याच्या पालनाचा स्वीकार केला. ॥३१ १/२॥
तमेवमुक्त्वा काकुत्स्थो हनूमन्तमथाब्रवीत् ॥ ३२ ॥

जीविते कृतबुद्धिस्त्वं मा प्रतिज्ञां वृथा कृथाः ।
विभीषणाला असे सांगून काकुत्स्थ राम हनुमानास म्हणाले - तुम्ही दीर्घकाळ पर्यंत जीवित राहाण्याचा निश्चय केला आहे. आपली ही प्रतिज्ञा व्यर्थ करू नका. ॥३२ १/२॥
मत्कथाः प्रचरिष्यन्ति यावल्लोके हरीश्वर ॥ ३३ ॥

तावद् रमस्व सुप्रीतो मद्वाक्यं अनुपालयन् ।
हरिश्वर ! जो पर्यंत संसारात माझ्या कथेचा प्रचार राहील तो पर्यंत तूही माझ्या आज्ञेचे पालन करत प्रसन्नतापूर्वक विचरत राहा. ॥३३ १/२॥
एवमुक्तस्तु हनुमान् राघवेण महात्मना ॥ ३४ ॥

वाक्यं विज्ञापयामास परं हर्षमवाप्य च ।
महात्मा राघवांनी असे म्हटल्यावर हनुमानास फार हर्ष झाला आणि ते याप्रकारे बोलले - ॥३४ १/२॥
यावत् तव कथा लोके विचरिष्यति पावनी ॥ ३५ ॥

तावत् स्थास्यामि मेदिन्यां तवाज्ञां अनुपालयन् ।
भगवन्‌ ! संसारात जो पर्यंत आपल्या पावन कथेचा प्रचार राहील तो पर्यंत आपल्या आदेशाचे पालन करत मी या पृथ्वीवरच राहीन. ॥३५ १/२॥
जाम्बवन्तं तथोक्त्वा तु वृद्धं ब्रह्मसुतं तदा ॥ ३६ ॥

मैन्दं च द्विविदं चैव पञ्च जाम्बवता सह ।
यावत्कलिश्च सम्प्राप्तः तावज्जीवत सर्वदा ॥ ३७ ॥
यानंतर भगवंतांनी ब्रह्मदेवांचे पुत्र वृद्ध जाम्बवान्‌ तसेच मैंद आणि द्विविद यांना ही म्हटले - जाम्बवानासह तुम्ही पाच(जण) व्यक्ती (जाम्बवान्‌, विभीषण, मैंद आणि द्विविद) तो पर्यंत जीवित रहा की जो पर्यंत प्रलय तसेच कलियुग आलेले नसेल. ( यापैकी हनुमान्‌ आणि विभीषण तर प्रलयकालापर्यंत राहाणार आहेत आणि शेष तीन व्यक्ति कलि आणि द्वापरच्या संधिमध्ये श्रीकृष्णावताराच्या समयी मारले गेले अथवा मेले.) ॥३६-३७॥
तानेवमुक्त्वा काकुत्स्थः सर्वांस्तान् ऋक्षवानरान् ।
उवाच बाढं गच्छध्वं मया सार्धं यथोदितम् ॥ ३८ ॥
त्या सर्वांना असे सांगून काकुत्स्थ रामांनी शेष सर्व अस्वले आणि वानरांना सांगितले - फार चांगले. तुम्हा लोकांचे म्हणणे मला स्वीकार आहे. तुम्ही सर्व आपल्या कथनानुसार माझ्या बरोबर चला. ॥३८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टोतरशततमः सर्गः ॥ १०८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशे आठवा सर्ग पूरा झाला. ॥१०८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP