[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। द्वाविंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लक्ष्मणं प्रबोधयता श्रीरामेण स्वीये वनवासे दैवमेव कारणमिति प्रतिपादनमभिषेक-सामग्रीमपसारयितुं आदेशदानं च - श्रीरामांनी लक्ष्मणाला समजावितांना आपल्या वनवासात दैवालाच कारण ठरविणे आणि अभिषेकाची सामग्री हटविण्यासाठी आदेश देणे -
अथ तं व्यथया दीनं सविशेषममर्षितम् ।
सरोषमिव नागेन्द्रं रोषविस्फारितेक्षणम् ॥ १ ॥

आसाद्य रामः सौमित्रिं सुहृदं भ्रातरं प्रियम् ।
उवाचेदं स धैर्येण धारयन् सत्त्वमात्मवान् ॥ २ ॥
लक्ष्मण मानसिक व्यथेमुळे फार दुःखी झाले होते. त्यांच्या मनात विशेष अमर्ष भरलेला होता. ते रोषाने भरलेल्या गजराजाप्रमाणे क्रोधाने डोळे फाड-फाडून पहात होते. आपल्या मनाला वश ठेवणारे श्रीराम धैर्यपूर्वक चित्ताला निर्विकार रूपाने काबूत ठेवून आपले हितैषी सुहृद प्रिय भाऊ लक्ष्मण यांच्याजवळ जाऊन याप्रमाणे बोलले - ॥ १-२ ॥
निगृह्य रोषं शोकं च धैर्यमाश्रित्य केवलम् ।
अवमानं निरस्यैनं गृहीत्वा हर्षमुत्तमम् ॥ ३ ॥

उपक्लृप्तं यदेतन्मे अभिषेकार्थमुत्तम् ।
सर्वं निवर्तय क्षिप्रं कुरु कार्यं निरव्ययम् ॥ ४ ॥
'लक्ष्मणा ! केवळ धैर्याचा आश्रय घेऊन आपल्या मनांतील क्रोध आणि शोकाला दूर सार. चित्तातून अपमानाची भावना काढून टाक आणि हृदयात उत्तमप्रकारे हर्ष भरून माझ्या अभिषेकासाठी ही जी उत्तम सामग्री एकत्रित केली गेली आहे तिला शीघ्र दूर सार आणि असे कार्य कर की ज्यायोगे माझ्या वनगमनात बाधा उपस्थित होणार नाही. ॥ ३-४ ॥
सौमित्रे योऽभिषेकार्थे मम सम्भारसम्भ्रमः ।
अभिषेकनिवृत्त्यर्थे सोऽस्तु सम्भारसम्भ्रमः ॥ ५ ॥
सौमित्र ! आत्तापर्यंत अभिषेकासाठी सामग्री जमविण्यात तुझा जो उत्साह होता, तोच त्याला रोखण्यात आणि माझी वनात जाण्याची तयारी करण्यात असावयास हवा. ॥५॥
तस्या मदभिषेकार्थे मानसं परितप्यते ।
माता न सा यथा न स्यात् सविशङ्‌‍का तथा कुरु ॥ ६ ॥
माझ्या अभिषेकामुळे जिच्या चित्तात संताप होत आहे, ती आपली माता कैकेयी हिला कुठल्याही प्रकारे कसलीही शंका राहाणार नाही तेच काम कर. ॥६॥
तस्याः शङ्‌‍कामयं दुःखं मुहूर्तमपि नोत्सहे ।
मनसि प्रतिसंजातं सौमित्रेऽहमुपेक्षितुम् ॥ ७ ॥
'लक्ष्मणा ! तिच्या मनात संदेहामुळे दुःख उत्पन्न झाले तर ही गोष्ट मी मुहूर्तभरही सहन करू शकत नाही; आणि तिची उपेक्षाही मी करू शकत नाही. ॥७॥
न बुद्धिपूर्वं नाबुद्धं स्मरामीह कदाचन ।
मातॄणां वा पितुर्वाहं कृतमल्पं च विप्रियम् ॥ ८ ॥
मी येथे कधी जाणून- बुजून अथवा अजाणता मातांचा अथवा पित्याचा एखादा लहानसाही अपराध केला असेल असे आठवत नाही. ॥८॥
सत्यः सत्याभिसंधश्च नित्यं सत्यपराक्रमः ।
परलोकभयाद् भीतो निर्भयोऽस्तु पिता मम ॥ ९ ॥
पिता सदा सत्यवादी आणि सत्यपराक्रमी राहिलेले आहेत. ते परलोकाच्या भयाने सदा घाबरून राहात असत; म्हणून मला असेच काम केले पाहिजे की ज्यायोगे माझ्या पित्याचे पारलौकिक भय दूर होईल. ॥९॥
तस्यापि हि भवेदस्मिन् कर्मण्यप्रतिसंहृते ।
सत्यं नेति मनस्तापस्तस्य तापस्तपेच्च माम् ॥ १० ॥
जर या अभिषेका संबंधी कार्यास रोखले गेले नाही तर पित्यालाही मनांतल्या मनांत माझे बोलणे खरे झाले नाही असा विचार करून संताप (त्रास) होईल. आणि त्यांचा मनस्ताप मला सदा संतप्त करीत राहील. ॥१०॥
अभिषेकविधानं तु तस्मात् संहृत्य लक्ष्मण ।
अन्वगेवाहमिच्छामि वनं गन्तुमितः पुरः ॥ ११ ॥
'लक्ष्मणा ! या सर्व कारणांमुळे मी आपल्या अभिषेकाचे कार्य थांबवून शीघ्र या नगरातून वनात निघून जाण्याची इच्छा करीत आहे. ॥११॥
मम प्रव्राजनादद्य कृतकृत्या नृपात्मजा ।
सुतं भरतमव्यग्रमभिषेचयतां ततः ॥ १२ ॥
आज माझ्या निघून जाण्याने कृतकृत्य झालेली राजकुमारी कैकेयी आपला पुत्र भरत याचा निर्भय आणि निश्चिन्त होऊन अभिषेक करून घेवो. ॥१२॥
मयि चीराजिनधरे जटामण्डलधारिणि ।
गतेऽरण्यं च कैकेय्या भविष्यति मनः सुखम् ॥ १३ ॥
मी वल्कल आणि मृगचर्म धारण करून मस्तकावर जटा बांधून, जेव्हा वनात निघून जाईन तेव्हाच कैकेयीच्या मनाला सुख होईल. ॥१३॥
बुद्धिः प्रणीता येनेयं मनश्च सुसमाहितम् ।
तं तु नार्हामि सङ्‌‍क्लेष्टुं प्रव्रजिष्यामि मा चिरम् ॥ १४ ॥
ज्या विधात्याने कैकेयीला अशी बुद्धी प्रदान केली आहे तथा ज्याच्या प्रेरणेने तिचे मन मला वनात पाठवण्यासंबंधी अत्यंत दृढ झालेले आहे त्याला विफल मनोरथ करणे माझ्यासाठी उचित नाही. ॥१४॥
कृतान्त एव सौमित्रे द्रष्टव्यो मत्प्रवासने ।
राज्यस्य च वितीर्णस्य पुनरेव निवर्तने ॥ १५ ॥
'सौ-मित्र ! माझ्या या प्रवासात तथा पिताद्वारा दिले गेलेले राज्य परत हातातून निघून जाण्यात दैवलाच कारण समजले पाहिजे. ॥१५॥
कैकेय्याः प्रतिपत्तिर्हि कथं स्यान्मम वेदने ।
यदि तस्या न भावोऽयं कृतान्तविहितो भवेत् ॥ १६ ॥
माझ्या समजुती प्रमाणे कैकेयीचा हा विपरीत मनोभाव दैवाचेच विधान आहे. जर असे नसते तर तिने मला वनात पाठवून पीडा देण्याचा विचार का केला असता ? ॥१६॥
जानासि हि यथा सौम्य न मातृषु ममान्तरम् ।
भूतपूर्वं विशेषो वा तस्या मयि सुतेऽपि वा ॥ १७ ॥
'सौम्य ! तू तर जाणतोस की माझ्या मनात पूर्वीही कधी मातांच्या प्रति भेदभाव उत्पन्न झाला नाही आणि कैकेयीही पूर्वी माझ्यात अथवा आपला पुत्र यात काहीही अंतर समजत नव्हती. ॥१७॥
सोऽभिषेकनिवृत्त्यर्थैः प्रवासार्थैश्च दुर्वचैः ।
उग्रैर्वाक्यैरहं तस्या नान्यद् दैवात् समर्थये ॥ १८ ॥
माझा अभिषेक रोखून आणि मला वनात धाडण्यासाठी तिने राजांना प्रेरित करण्याच्या निमित्ताने ज्या भयंकर आणि कटुवचनांचा प्रयोग केला आहे, ती वचने साधारण मनुष्यासाठी तोंडातून काढणेही कठीण आहे. तिच्या या वागण्यात मी दैवाशिवाय दुसर्‍या कुठल्याही कारणाचे समर्थन करीत नाही. ॥१८॥
कथं प्रकृतिसम्पन्ना राजपुत्री तथागुणा ।
ब्रूयात् सा प्राकृतेव स्त्री मत्पीड्यं भर्तृसंनिधौ ॥ १९ ॥
जर अशी गोष्ट नसती तर तशी उत्तम स्वभावाची आणि श्रेष्ठ गुणांनी युक्त राजकुमारी कैकेयी एखाद्या साधारण स्त्री प्रमाणे आपल्या पति समीप मला पीडा देणारी गोष्ट कशी बोलली असती -मला कष्ट देण्यासाठी रामाला वनात धाडण्याचा प्रस्ताव कशी उपस्थित करती ? ॥१९॥
यदचिन्त्यं तु तद् दैवं भूतेष्वपि न हन्यते ।
व्यक्तं मयि च तस्यां च पतितो हि विपर्ययः ॥ २० ॥
ज्याच्या विषयी मनात कधी विचारही आलेला नसतो तेच दैवाचे विधान असते. प्राण्यांच्या मध्ये किंवा अधिष्ठाता दैवतातही असे कोणीही नाही की जो दैवाचे विधान टाळू शकतो, म्हणून निश्चितच दैवाच्या प्रेरणेनेच माझ्यात आणि कैकेयीतही फार मोठी उलटापालट (फेरबदल) झाली आहे (माझ्या मनात आलेले राज्य निघून गेले आहे आणि कैकेयीची बुद्धि पालटली आहे). ॥२०॥
कश्च दैवेन सौमित्रे योद्धुमुत्सहते पुमान् ।
यस्य न ग्रहणं किंचित् कर्मणोऽन्यन्न दृश्यते ॥ २१ ॥
'सौमित्र ! कर्मांच्या सुख-दुःखादि रूपाने फल प्राप्त झाल्यवरच ज्याचे ज्ञान होते, कर्मफलाहून अन्यत्र कोठेही ज्याच्या पत्ता लागत नाही, त्या दैवाबरोबर कोण पुरुष युद्ध करू शकेल ? ॥२१॥
सुखदुःखे भयक्रोधौ लाभालाभौ भवाभवौ ।
यच्च किंचित् तथाभूतं ननु दैवस्य कर्म तत् ॥ २२ ॥
'सुख-दुःख, भय- क्रोध (क्षोभ), लाभ- हानि, उत्पत्ति आणि विनाश तथा या प्रकारचे आणखीही जितके परिणाम प्राप्त होतात, की ज्यांचे काही कारण समजून येत नाही, ती सर्व दैवाचीच कर्मे आहेत. ॥२२॥
ऋषयोऽप्युग्रतपसो दैवेनाभिप्रचोदिताः ।
उत्सृज्य नियमांस्तीव्रान् भ्रश्यन्ते काममन्युभिः ॥ २३ ॥
उग्र तपस्वी ॠषिही दैवाने प्रेरित होऊन आपल्या तीव्र नियमांना सोडून बसतात आणि काम- क्रोधाच्या द्वारा विवश होऊन मर्यादेपासून भ्रष्ट होऊन जातात. ॥२३॥
असङ्‌‍कल्पितमेवेह यदकस्मात् प्रवर्तते ।
निवर्त्यारब्धमारम्भैर्ननु दैवस्य कर्म तत् ॥ २४ ॥
जी गोष्ट ध्यानी, मनी नसतांना (कुठल्याही विचाराशिवाय) अकस्मात मस्तकावर येऊन पडते आणि प्रयत्‍नांच्या द्वारा आरंभ केलेल्या कार्याला रोखून एक नवीनच काण्ड उपस्थित करते, ती अवश्य दैवाचेच विधान असते. ॥२४॥
एतया तत्त्वया बुद्ध्या संस्तभ्यात्मानमात्मना ।
व्याहतेऽप्यभिषेके मे परितापो न विद्यते ॥ २५ ॥
'या सात्विक बुद्धिच्या द्वारे स्वयं (स्वतचः) मनाला स्थिर करून घेण्यामुळे मला आपल्या अभिषेकात विघ्न आल्यावरही दुःख अथवा संताप होत नाही आहे. ॥२५॥
तस्मादपरितापः संस्त्वमप्यनुविधाय माम् ।
प्रतिसंहारय क्षिप्रमभिषेचनिकीं क्रियाम् ॥ २६ ॥
'याप्रकारे तूही माझ्या विचाराचे अनुसरण करून संतापशून्य होऊन राज्याभिषेकाच्या या आयोजनाला शीघ्र बंद करून टाक. ॥२६॥
एभिरेव घटैः सर्वैरभिषेचनसम्भृतैः ।
मम लक्ष्मण तापस्ये व्रतस्नानं भविष्यति ॥ २७ ॥
'लक्ष्मणा ! राज्याभिषेकासाठी (सजवून) जमवून ठेवलेल्या या सर्व कलशांच्या द्वारा मला तापसव्रताच्या संकल्पासाठी आवश्यक असणारे स्नान होईल. ॥२७॥
अथवा किं मयैतेन राजद्रव्यमयेन तु ।
उद्धृतं मे स्वयं तोयं व्रतादेशं करिष्यति ॥ २८ ॥
अथवा राज्याभिषेक संबंधी मंगल द्रव्यमय कलशजलाची मला काय आवश्यकता आहे ? स्वयं माझ्याकडून आपल्या हाताने काढलेले जलच माझ्या व्रतादेशाचे साधक होईल. ॥२८॥
मा च लक्ष्मण संतापं कार्षिर्लक्ष्म्या विपर्यये ।
राज्यं वा वनवासो वा वनवासो महोदयः ॥ २९ ॥
'लक्ष्मणा ! लक्ष्मीच्या या फेरबदला बद्दल तू काही चिन्ता करू नको. माझ्यासाठी राज्य अथवा वनवास दोन्ही समान आहे. एवढेच नव्हे तर विशेष विचार केल्यावर वनवासच महान अभ्युदयकारी प्रतीत होत आहे. ॥२९॥
न लक्ष्मणास्मिन् मम राज्यविघ्ने
     माता यवीयस्यभिशङ्‌कितव्या ।
दैवाभिपन्ना न पिता कथंचि-
     ज्जानासि दैवं च तथाप्रभावम् ॥ ३० ॥
'लक्ष्मणा ! माझ्या राज्याभिषेकात जे विघ्न आलेले आहे यास माझी सर्वात लहान माता कारण आहे अशी शंका करता कामा नये कारण की ती दैवाच्या अधीन होती. याच प्रकारे पिताही कुठल्याही प्रकारे यास कारण नाहीत. तू तर दैव आणि त्याच्या अद्‍भुत प्रभावास जाणतस आहेस, तेच कारण आहे.' ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे द्वाविंशः सर्गः ॥ २२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा बाविसावा सर्व पूरा झाला. ॥२२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP