[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। सप्तविंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
आत्मानमपि सहैव नेतुं सीतायाः श्रीरामं प्रति प्रार्थना - सीतेची श्रीरामाला आपल्यालाही बरोबर घेऊन जाण्याविषयी प्रार्थना -
एवमुक्ता तु वैदेही प्रियार्हा प्रियवादिनी ।
प्रणयादेव सङ्‌‍क्रुद्धा भर्तारमिदमब्रवीत् ॥ १ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर प्रियवादिनी वैदेही जी सर्व प्रकारानी आपल्या स्वामीचे प्रेम प्राप्त करण्यास योग्य होती, प्रेमानेच थोडीशी रागावून पतिला याप्रमाणे म्हणाली- ॥१॥
किमिदं भाषसे राम वाक्यं लघुतया ध्रुवम् ।
त्वया यदपहास्यं मे श्रुत्वा नरवरोत्तम ॥ २ ॥
'नरश्रेष्ठ राम ! आपण मला क्षुद्र (तुच्छ) समजून हे काय सांगत आहांत ? आपले हे बोलणे ऐकून मला फार हसू येत आहे. ॥२॥
वीराणां राजपुत्राणां शस्त्रास्त्रविदुषां नृप ।
अनर्हमयशस्यं च न श्रोतव्यं त्वयेरितम् ॥ ३ ॥
'राजन ! आपण जे काही सांगितले आहे ते अस्त्रशस्त्रांच्या ज्ञाता वीर राजकुमाराला शोभण्यायोग्य नाही आहे. ते अपयशाचा टिळा (कलंक) लावणारे असल्या कारणाने ऐकण्यास योग्य नाही. ॥३॥
आर्यपुत्र पिता माता भ्राता पुत्रस्तथा स्नुषा ।
स्वानि पुण्यानि भुञ्जानाः स्वं स्वं भाग्यमुपासते ॥ ४ ॥
'आर्यपुत्र ! पिता, माता, भाऊ, पुत्र आणि पुत्रवधू-ही सर्व पुण्यादि कर्मांचे फळ भोगत असता आपापल्या शुभाशुभ कर्मरूप भाग्यानुसार जीवन -निर्वाह करतात. ॥४॥
भर्तुर्भाग्यं तु नार्येका प्राप्नोति पुरुषर्षभ ।
अतश्चैवाहमादिष्टा वने वस्तव्यमित्यपि ॥ ५ ॥
'पुरुषश्रेष्ठ ! केवळ पत्‍नीच आपल्या पतिच्या भाग्याचे अनुसरण करीत असते म्हणून आपल्या बरोबरच मलाही वनात राहाण्याची आज्ञा मिळाली आहे. ॥५॥
न पिता नात्मजो राम न माता न सखीजनः ।
इह प्रेत्य च नारीणां पतिरेको गतिः सदा ॥ ६ ॥
'स्त्रियांसाठी या लोकात आणि परलोकात एकमात्र पतिच सदा आश्रय देणारा आहे. पिता, पुत्र, माता, सख्या तसेच आपले हे शरीरही तिचे खरे सहाय्यक नाही आहे. ॥६॥
यदि त्वं प्रस्थितो दुर्गं वनमद्यैव राघव ।
अग्रतस्ते गमिष्यामि मृद्‌गन्ती कुशकण्टकान् ॥ ७ ॥
'राघव ! जर आपण आजच दुर्गम वनाकडे प्रस्थान करीत आहात तर मी रस्त्यांतील कुश आणि कांटे यांना तुडवीत आपल्या पुढे पुढे चालेन. ॥७॥
ईर्ष्यां रोषं बहिष्कृत्य भुक्तशेषमिवोदकम् ।
नय मां वीर विस्रब्धः पापं मयि न विद्यते ॥ ८ ॥
'म्हणून वीर ! आपण ईर्षा आणि रोष यांना दूर सारून, पिऊन शिल्लक राहिलेल्या जला प्रमाणे मला निःशंक होऊन बरोबर घेऊन चलावे. माझ्या ठिकाणी, ज्याकारणाने आपण माझा येथे त्याग करावा असे कुठलेही पाप अथवा अपराध नाही आहे.' ॥८॥
प्रासादाग्रे विमानैर्वा वैहायसगतेन वा ।
सर्वावस्थागता भर्तुः पादच्छाया विशिष्यते ॥ ९ ॥
'उंच उंच महालात राहाणे, विमानांत चढून फिरणे अथवा अणिमा आदि सिद्धिंच्या द्वारे आकाशात विचरण करणे- या सर्वांपेक्षा स्त्रीसाठी सर्व अवस्थांमध्ये पतिच्या चरणांच्या छायेत राहाणे विशेष महत्वाचे आहे. ॥९॥
अनुशिष्टास्मि मात्रा च पित्रा च विविधाश्रयम् ।
नास्मि सम्प्रति वक्तव्या वर्तितव्यं यथा मया ॥ १० ॥
'मी कुणा बरोबर कसे वर्तन केले पाहिजे, या विषयी माझ्या मातेने आणि पित्याने मला अनेक प्रकारे शिक्षण दिलेले आहे. या समयी या विषयात मला कुठलाही उपदेश देण्याची आवश्यकता नाही आहे. ॥१०॥
अहं दुर्गं गमिष्यामि वनं पुरुषवर्जितम् ।
नानामृगगणाकीर्णं शार्दूलगणसेवितम् ॥ ११ ॥
'म्हणून नाना प्रकारच्या वन्य पशुंनी व्याप्त सिंह आणि व्याघ्रांनी सेवित त्या निर्जन आणि दुर्गम वनात मी अवश्य येईन. ॥११॥
सुखं वने निवत्स्यामि यथैव भवने पितुः ।
अचिन्तयन्ती त्रील्लोकाँश्चिन्तयन्ती पतिव्रतम् ॥ १२ ॥
'मी तर जशी आपल्या पित्याच्या घरामध्ये राहात होते त्याच प्रकारे त्या वनातही सुखपूर्वक निवास करीन. तेथे तिन्ही लोकातील ऐश्वर्याला काहीही न मानता (म्हणजे तुच्छ समजून) मी सदा पतिव्रता धर्माचे चिंतन करीत राहून आपल्या सेवेत तत्पर राहीन. ॥१२॥
शुश्रूषमाणा ते नित्यं नियता ब्रह्मचारिणी ।
सह रंस्ये त्वया वीर वनेषु मधुगन्धिषु ॥ १३ ॥
'वीर, मी नियमपूर्वक राहून ब्रह्मचर्यव्रताचे पालन करीन आणि सदा आपल्या सेवेत तत्पर राहून आपल्या बरोबरच गोड सुगंधाने भरलेल्या वनांतून विचरण करीन. ॥१३॥
त्वं हि कर्तुं वने शक्तो राम सम्परिपालनम् ।
अन्यस्यापि जनस्येह किं पुनर्मम मानद ॥ १४ ॥
'हे मानद ! आपण तर वनात राहून दुसर्‍या लोकांचेही रक्षण करू शकता मग माझे रक्षण करणे आपल्यासाठी काय कठीण आहे ? ॥१४॥
साहं त्वया गमिष्यामि वनमद्य न संशयः ।
नाहं शक्या महाभाग निवर्तयितुमुद्यता ॥ १५ ॥
'महाभाग ! म्हणून मी आपल्या बरोबर आज अवश्य वनात येईन, यात संशय नाही. मी सर्व प्रकारे येण्यासाठी तयार आहे. मला कुठल्याही प्रकारे अडविता येणार नाही. ॥१५॥
फलमूलाशना नित्यं भविष्यामि न संशयः ।
न ते दुःखं करिष्यामि निवसन्ती त्वया सदा ॥ १६ ॥
'तेथे येऊन मी आपल्याला काहीही कष्ट पडू देणार नाही. सदा आपल्या बरोबरच राहीन आणि प्रतिदिन फळे-मुळे खाऊनच निर्वाह करीन. माझ्या या कथनात कुठल्याही प्रकारच्या संदेहाला स्थान नाही. ॥१६॥
अग्रतस्ते गमिष्यामि भोक्ष्ये भुक्तवति त्वयि ।
इच्छामि परतः शैलान् पल्वलानि सरांसि च ॥ १७ ॥

द्रष्टुं सर्वत्र निर्भीता त्वया नाथेन धीमता ।
'आपल्या पुढे पुढे मी चालेन आणि आपण भोजन केल्यावर जे काही उरेल, तेच खाऊन राहीन. प्रभो ! माझी अत्यंत इच्छा आहे की मी माझ्या बुद्धिमान प्राणनाथांच्या बरोबर निर्भय होऊन वनात सर्वत्र हिंडून पर्वत, लहान लहान तलाव आणि सरोवरांना पाहावे. ॥१७ १/२॥
हंसकारण्डवाकीर्णाः पद्मिनीः साधुपुष्पिताः ॥ १८ ॥

इच्छेयं सुखिनी द्रष्टुं त्वया वीरेण संगता ।
'आपण माझे वीर स्वामी आहात - मी आपल्या बरोबर राहून सुखपूर्वक, जे श्रेष्ठ कमलपुष्पांनी सुशोभित आहे आणि ज्यात हंस आणि कारण्डव आदि पक्षी भरपूर राहातात, अशा सुंदर सरोवरांची शोभा पाहू इच्छिते. ॥१८ १/२॥
अभिषेकं करिष्यामि तासु नित्यमनुव्रता ॥ १९ ॥

सह त्वया विशालाक्ष रंस्ये परमनन्दिनी ।
'विशाल नेत्र असणार्‍या आर्यपुत्रा ! आपल्या चरणी अनुरक्त राहून मी प्रतिदिन त्या सरोवरात स्नान करीन आणि आपल्या बरोबरच तेथे सर्वत्र विचरेन, त्यामुळे मला परम आनंदाचा अनुभव येईल. ॥१९ १/२॥
एवं वर्षसहस्राणि शतं वापि त्वया सह ॥ २० ॥

व्यतिक्रमं न वेत्स्यामि स्वर्गोऽपि न हि मे मतः ।
याप्रमाणे शेकडो अथवा हजारो वर्षे जर आपल्या बरोबर राहाण्याचा सौभाग्य मिळेल तर मला कधी कष्टाचा अनुभव येणार नाही. जर आपण बरोबर नसाल तर मला स्वर्गलोकाची प्राप्तीही अभीष्ट नाही. ॥२० १/२॥
स्वर्गेऽपि च विना वासो भविता यदि राघव ।
त्वया विना नरव्याघ्र नाहं तदपि रोचये ॥ २१ ॥
'पुरुषसिंह राघवा ! आपल्या शिवाय जर मला स्वर्गलोकात जरी निवास मिळत असेल तर तोही मला रुचकर होऊ शकत नाही - मी तो घेऊ इच्छिणारा नाही. ॥२१॥
अहं गमिष्यामि वनं सुदुर्गमं
     मृगायुतं वानरवारणैश्च ।
वने निवत्स्यामि यथा पितुर्गृहे
     तवैव पादावुपगृह्य सम्मता ॥ २२ ॥
'प्राणनाथ ! म्हणून त्या अत्यंत दुर्गम वनात जेथे हजारो मृग, वानर आणि हत्ती निवास करतात, मी अवश्य येईन आणि आपल्याच चरणांची सेवा करीत राहून अनुकूल वागत राहून त्या वनात, मी जशी पित्याच्या घरी राहात होते तशी सुखाने राहीन. ॥२२॥
अनन्यभावामनुरक्तचेतसं
     त्वया वियुक्तां मरणाय निश्चिताम् ।
नयस्व मां साधु कुरुष्व याचनां
     नातो मया ते गुरुता भविष्यति ॥ २३ ॥
'माझ्या हृदयांतील संपूर्ण प्रेम एकमात्र आपल्यालाच अर्पित आहे. आपल्याशिवाय इतरत्र कोठेही माझे मन जात नाही. जर आपल्या पासून वियोग झाला तर निश्चितच माझा मृत्यु होईल. म्हणून आपण माझी याचना सफल करावी. मला बरोबर घेऊन चलावे. हेच चांगले होईल. मी राहिल्याने आपल्यावर कुठलाही भार पडणार नाही.' ॥२३॥
तथा ब्रुवाणामपि धर्मवत्सलां
     न च स्म सीतां नृवरो निनीषति ।
उवाच चैनां बहु सन्निवर्तने
     वने निवासस्य च दुःखितां प्रति ॥ २४ ॥
धर्मात अनुरक्त राहणार्‍या सीतेने या प्रकारे प्रार्थना केल्यावरही नरश्रेष्ठ श्रीरामांना तिला बरोबर नेण्याची इच्छा झाली नाही. ते तिला वनवासाच्या विचारापासून निवृत्त करण्यासाठी तेथील कष्टांचे अनेक प्रकाराने विस्तारपूर्वक वर्णन करू लागले. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे सप्तविंशः सर्गः ॥ २७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा सत्ताविसावा सर्ग पूरा झाला. ॥२७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP