[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। पंचषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वन्दितजनकर्तृको राज्ञः स्तवपाठः, राजानं दशरथं दिवंगतं मत्वा राज्ञीनां विलापः -
बंदीजनांचा स्तुतिपाठ, राजा दशरथ दिवंगत झाल्याचे कळल्याने त्यांच्या राण्यांचा करूण विलाप -
अथ रात्र्यां व्यतीतायां प्रातरेवापरेऽहनि ।
वन्दिनः पर्युपातिष्ठंस्तत्पार्थिवनिवेशनम् ॥ १ ॥
त्यानंतर रात्र संपल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळीच बंदीजन महाराजांची स्तुती करण्यासाठी राजमहालात उपस्थित झाले. ॥१॥
सूताः परमसंस्कारा मागधाश्चोत्तमश्रुताः ।
गायकाः श्रुतिशीलाश्च निगदन्तः पृथक् पृथक् ॥ २ ॥
व्याकरण ज्ञानांनी संपन्न (अथवा उत्तम अलङ्‌‍कारांनी विभूषित) सूत, उत्तम रूपाने वंशपरंपरेचे श्रवण करविणारे मागध आणि संगीत शास्त्राचे अनुशीलन करणारे गायक आपापल्या मार्गानुसार पृथक पृथक यशोगान करीत तेथे आले. ॥२॥
राजानं स्तुवतां तेषामुदात्ताभिहिताशिषाम् ।
प्रासादाभोगविस्तीर्णः स्तुतिशब्दो ह्यवर्तत ॥ ३ ॥
उच्च स्वरांनी आशीर्वाद देऊन राजांची स्तुति करणार्‍या त्या सूत- मागध आदिंचा शब्द राजमहालाच्या आतील भागात पसरून गुंजत राहिला. ॥३॥
ततस्तु स्तुवतां तेषां सूतानां पाणिवादकाः ।
अपदानान्युदाहृत्य पाणिवादान्यवादयन् ॥ ४ ॥
ते सूतगण स्तुति करीतच होते इतक्यात पाणीवादक (हातांनी ताल देऊन गाणारे) तेथे आले आणि राजांच्या पूर्वी केलेल्या अद्‍भुत कर्मांचे वर्णन करीत तालगतिला अनुसरून टाळ्या वाजवू लागले. ॥४॥
तेन शब्देन विहगाः प्रतिबुद्धाश्च सस्वनुः ।
शाखास्थाः पञ्जरस्थाश्च ये राजकुलगोचराः ॥ ५ ॥
त्या शब्दांनी वृक्षांच्या शाखांवर बसलेले तसेच राजकुलातच विचरणारे पिंजर्‍यात बंद असलेले शुक आदि पक्षीही जागे होऊन किलबिलाट करू लागले. ॥५॥
व्याहृताः पुण्यशब्दाश्च वीणानां चापि निस्वनाः ।
आशीर्गेयं च गाथानां पूरयामास वेश्म तत् ॥ ६ ॥
शुक आदि पक्षी तसेच ब्राह्मणांच्या मुखातून निघालेले पवित्र शब्द, वीणांचा मधुर नाद आणि गाथांचे आशीर्वादयुक्त गान यांच्यामुळे ते सारे भवन निनादित झाले. ॥६॥
ततः शुचिसमाचाराः पर्युपस्थानकोविदाः ।
स्त्रीवर्षवरभूयिष्ठा उपतस्थुर्यथापुरा ॥ ७ ॥
त्यानंतर सदाचारी आणी परिचर्याकुशल सेवक, ज्यांच्यात स्त्रिया आणि खोजांची संख्या अधिक होती, नित्याप्रमाणेच त्या दिवशीही राजभवनात उपस्थित झाले. ॥७॥
हरिचन्दनसम्पृक्तमुदकं काञ्चनैर्घटैः ।
आनिन्युः स्नानशिक्षाज्ञा यथाकालं यथाविधि ॥ ८ ॥
स्नानविधिचे ज्ञाते भृत्यजन विधिपूर्वक सोन्याच्या घड्यात चंदनमिश्रित जल घेऊन योग्य समयी तेथे आले. ॥८॥
मङ्‌गलालम्भनीयानि प्राशनीयान्युपस्करान् ।
उपनिन्युस्तथा पुण्याः कुमारीबहुलाः स्त्रियः ॥ ९ ॥
पवित्र आचार-विचार असणार्‍या स्त्रिया ज्यांच्यामध्ये कुमारी कन्यांची संख्या अधिक होती, मंगलासाठी स्पर्श करण्यायोग्य गाई आदि, पिण्यायोग्य गङ्‌‍गाजल आदि तसेच अन्य उपकरणे - दर्पण, आभूषणे आणि वस्त्रे आदि घेऊन आल्या. ॥९॥
सर्वलक्षणसम्पन्नं सर्वं विधिवदर्चितम् ।
सर्वं सुगुणलक्ष्मीवत् तदभूदाभिहारिकम् ॥ १० ॥
प्रात:काळी राजांच्या मङ्‌‍गलासाठी ज्या ज्या वस्तु आणल्या जातात त्यांचे नाम आभिहारिक आहे. तेथे आणली गेलेली सर्व आभिहारिक सामग्री समस्त शुभ लक्षणांनी संपन्न, विधिला अनुरूप, आदर आणि प्रशंसा योग्य उत्तम गुणांनी युक्त आणि शोभायमान होती. ॥१०॥
तत्तः सूर्योदयं यावत् सर्वं परिसमुत्सुकम् ।
तस्थावनुपसम्प्राप्तं किंस्विदित्युपशङ्‌कितम् ॥ ११ ॥
सूर्योदय होईपर्यंत राजाच्या सेवेसाठी उत्सुक झालेला सर्व परिजन वर्ग तेथे येऊन उभा राहिला होता. ज्यावेळे पर्यंत महाराज बाहेर आले नाहीत, तेव्हां सर्वाच्या मनात ही शंका उत्पन्न झाली की महाराजांच्या न येण्याचे काय कारण असू शकेल ? ॥११॥
अथ याः कोसलेन्द्रस्य शयनं प्रत्यनन्तराः ।
ताः स्त्रियस्तु समागम्य भर्तारं प्रत्यबोधयन् ॥ १२ ॥
त्यानंतर ज्या कोसल नरेश दशरथांच्या समीप राहाणार्‍या स्त्रिया होत्या त्या त्यांच्या शय्येजवळ जाऊन आपल्या स्वामींना जागे करू लागल्या. ॥१२॥
अथाप्युचितवृत्तास्ता विनयेन नयेन च ।
न ह्यस्य शयनं स्पृष्ट्‍वा किञ्चिदप्युपलेभिरे ॥ १३ ॥
त्या स्त्रिया त्यांना स्पर्श आदि करण्यास योग्य अधिकारी होत्या म्हणून विनीतभावाने, युक्तीपूर्वक त्यांनी (महाराजांच्या) शय्येला स्पर्श केला. स्पर्श करूनही त्यांना त्यांच्या ठिकाणी जिवंतपणाचे कोणतेही चिन्ह आढळले नाही. ॥१३॥
ताः स्त्रियः स्वप्नशीलज्ञाश्चेष्टां संचलनादिषु ।
ता वेपथुपरीताश्च राज्ञः प्राणेषु शङ्‌किताः ॥ १४ ॥
झोपलेल्या पुरुषाची जशी स्थिती होते तेही त्या स्त्रिया उत्तम प्रकारे जाणत होत्या म्हणून त्यांनी हृदय आणी हाताच्या मूळभागी चालणार्‍या नाड्यांचीही परीक्षा केली, परंतु तेथेही त्यांना काही हालचाल प्रतीत झाली नाही. मग तर त्यांचा थरकाप झाला. त्यांच्या मनांत राजांचे प्राण निघून गेल्याची आशङ्‌‍का उत्पन्न झाली. ॥१४॥
प्रतिस्रोतस्तृणाग्राणां सदृशं संचकाशिरे ।
अथ संदेहमानानां स्त्रीणां दृष्ट्‍वा च पार्थिवम् ।
यत् तदाशङ्‌कितं पापं तदा जज्ञे विनिश्चयः ॥ १५ ॥
त्या जलाच्या प्रवाहाच्या सन्मुख पडलेल्या गवताच्या काडीच्या अग्रभागाप्रमाणे राजाकडे पाहिल्यावर त्यांच्या मृत्युविषयी जी शङ्‌‍का आली होती, तिच्या संबंधी त्यांचा पूरा निश्चय झाला. ॥१५॥
कौसल्या च सुमित्रा च पुत्रशोकपराजिते ।
प्रसुप्ते न प्रबुध्येते यथाकालसमन्विते ॥ १६ ॥
पुत्रशोकाने आक्रान्त झालेल्या कौसल्या आणि सुमित्रा त्या समयी मेल्या सारख्या झोपलेल्या होत्या आणि त्या वेळपर्यंत त्यांची झोप उघडलेली नव्हती (त्या जागा झाल्या नव्हत्या). ॥१६॥
निष्प्रभासा विवर्णा च सन्ना शोकेन संनता ।
न व्यराजत कौसल्या तारेव तिमिरावृता ॥ १७ ॥
झोपलेली कौसल्या श्रीहीन झाली होती. तिच्या शरीराचा रंग बदलून गेला होता. ती शोकाने पराजित आणि पीडित होऊन अंधकाराने आच्छादित झालेल्या तारकेसमान शोभाहीन झाली होती. ॥१७॥
कौसल्यानन्तरं राज्ञः सुमित्रा तदनन्तरम् ।
न स्म विभ्राजते देवी शोकाश्रुलुलितानना ॥ १८ ॥
(राजाच्या जवळ कौसल्या होती आणि कौसेल्येच्या समीप देवी सुमीत्रा होती.) त्या दोघी गाढ झोपेत असल्याने शोभाहीन प्रतीत होत होत्या. त्या दोघींच्या मुखांवर शोकांचे अश्रु पसरले होते ॥ १८ ॥
ते च दृष्ट्‍वा तदा सुप्ते उभे देव्यौ च तं नृपम् ।
सुप्तमेवोद्‌गतप्राणमन्तःपुरममन्यत ॥ १९ ॥
त्या समयी त्या दोन देवींना निंद्रामग्न पाहून अन्तःपुरातील अन्य स्त्रिया हेच समजल्या की झोपल्येल्या अवस्थेत महाराजांचे प्राण निघून गेले आहेत. ॥ १९ ॥
ततः प्रचुक्रुशुर्दीनाः सस्वरं ता वराङ्‌गनाः ।
करेणेव इवारण्ये स्थानप्रच्युतयूथपाः ॥ २० ॥
नंतर तर ज्या प्रमाणे जंगलात यूथपति गजराज आपल्या निवासस्थानातून अन्यत्र निघून गेल्यावर हत्तीणी करूण चीत्कार करू लागतात, त्याप्रमाणे त्या अन्तःपुरातील सुंदर राण्या अत्यंत दुःखी होऊन उच्च स्वराने आर्तनाद करू लागल्या ॥ २० ॥
तासामाक्रन्दशब्देन सहसोद्‌गतचेतने ।
कौसल्या च सुमित्रा च त्यक्तनिद्रे बभूवतुः ॥ २१ ॥
त्यांच्या रडण्याच्या आवाजाने कौसल्या आणि सुमित्रेची ही झोप उडाली आणि त्या दोघी एकाएकी जाग्या झाल्या. ॥ २१ ॥
कौसल्या च सुमित्रा च दृष्ट्‍वा स्पृष्ट्‍वा च पार्थिवम् ।
हा नाथेति परिक्रुश्य पेततुर्धरणीतले ॥ २२ ॥
कौसल्या आणि सुमित्रेने राजांना पाहिले, त्यांच्या शरिरास स्पर्श केला आणि ’हा नाथ’ असे ओरडून त्या दोन्ही राण्या पृथ्वीवर कोसळल्या. ॥ २२ ॥
सा कोसलेन्द्रदुहिता चेष्टमाना महीतले ।
न भ्राजते रजोध्वस्ता तारेव गगनच्च्युता ॥ २३ ॥
’कोसल राजकुमारी कौसल्या जमिनीवर पडून गडाबडा लोळू लागली. तिचे धुळीने माखलेले शरीर शोभाहीन दिसू लागले, जणु आकाशांतून तुटुन कुणी तारका धुळीत लोळत आहे ॥ २३ ॥
नृपे शान्तगुणे जाते कौसल्यां पतितां भुवि ।
अपश्यंस्ताः स्त्रियः सर्वा हतां नागवधूमिव ॥ २४ ॥
’राजा दशरथांच्या शरीरातील उष्णता शांत झाली होती (शरीर गार पडले होते). या प्रकारे त्यांचे जीवन शांत झाल्यावर जमिनीवर अचेत पडलेली कौसल्या अंतःपुरातील स्त्रियांना मेलेल्या नागिणीप्रमाणे वाटली. ॥ २४ ॥
ततः सर्वा नरेन्द्रस्य कैकेयीप्रमुखाः स्त्रियः ।
रुदन्त्यः शोकसंतप्ता निपेतुर्गतचेतनाः ॥ २५ ॥
त्यानंतर मागून तेथे आलेल्या महाराजांच्या कैकयी आदि सार्‍या राण्या शोकाने संतप्त होऊन रडू लागल्या आणि अचेत होऊन जमीनीवर कोसळ्ल्या. ॥ २५ ॥
ताभिः स बलवान् नादः क्रोशन्तीभिरनुद्रुतः ।
येन स्फीतीकृतो भूयस्तद् गृहं समनादयत् ॥ २६ ॥
त्या क्रंदन करण्यार्‍या राण्यांनी तेथे प्रथमच होत असलेल्या आर्तनादला आणखीनच वाढविले. त्या वाढलेल्या आर्तनादाने तो सारा राजमहल पुन्हा अत्यंत जोराने निनादून गेला. ॥ २६ ॥
तत् परित्रस्तसम्भ्रान्तपर्युत्सुकजनाकुलम् ।
सर्वतस्तुमुलाक्रन्दं परितापार्तबान्धवम् ॥ २७ ॥

सद्योनिपतितानन्दं दीनं विक्लवदर्शनम् ।
बभूव नरदेवस्य सद्म दिष्टान्तमीयुषः ॥ २८ ॥
कालधर्माला प्राप्त झालेल्या त्या राजा दशरथांचे ते भवन, घाबरलेल्या, भयभीत आणि उत्सुक झालेल्या मनुष्यांनी भरून गेले. सर्व बाजूनी बन्धु-बान्धव शोक संतापाने पीडीत होऊन एकत्र जमले. ते सारे भवन तात्काळ आनंदशून्य होऊन दीन-दुःखी आणि व्याकुळ दिसून येऊ लागले. ॥ २७-२८ ॥
अतीतमाज्ञाय तु पार्थिवर्षभं
     यशस्विनं तं परिवार्य पत्‍नयः ।
भृशं रुदन्त्यः करुणं सुदुःखिताः
     प्रगृह्य बाहू व्यलपन्ननाथवत् ॥ २९ ॥
तो यशस्वी भूपालशिरोमणी दिवंगत झाल्याचे जाणून त्याच्या सर्व पत्‍न्या त्याला चारी बाजूनी घेरून अत्यंत दुःखी होऊन जोरजोराने रडू लागल्या आणि त्याचे दोन्ही हात (बाहु) पकडून अनाथाप्रमाणे करूण विलाप करु लागल्या. ॥ २९ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे पञ्चषष्टितमः सर्गः ॥ ६५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा पासष्टावा सर्ग पूरा झाला. ॥ ६५ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP