[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकोनाशीतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मंत्रीप्रभृतीनां भरतं प्रति राज्यमङ्‌गीकर्तुं प्रस्तावो, भरतेनाभिषेसामग्रीं परिक्रम्य ’श्रीराम एव राज्यमधिकरोति’ इति प्रतिपाद्य तन्निवर्तयितुं वने गन्तुं व्यवस्थाकरणाय सर्वान् प्रत्यादेशदानं च -
मंत्री आदिंचा भरतांनी राज्य ग्रहण करावे म्हणून प्रस्ताव तसेच भरतांनी अभिषेक सामग्रीची परिक्रमा करून श्रीरामच राज्याचे अधिकारी आहेत असे सांगून त्यांना परत आणण्यासाठी चलण्याच्या निमित्ताने व्यवस्था करण्याची सर्वांना आज्ञा देणे -
ततः प्रभातसमये दिवसे च चतुर्दशे ।
समेत्य राजकर्तारो भरतं वाक्यमब्रुवन् ॥ १ ॥
त्यानंतर चौदावे दिवशी प्रातःकाळी समस्त राज्यकर्मचारी एकत्र जमले आणि त्यांनी भरतास याप्रकारे म्हटले - ॥ १॥
गतो दशरथः स्वर्गं यो नो गुरुतरो गुरुः ।
रामं प्रव्राज्य वै ज्येष्ठं लक्ष्मणं च महाबलम् ॥ २ ॥

त्वमद्य भव नो राजा राजपुत्र महायशः ।
सङ्‌गत्या नापराध्नोति राज्यमेतदनायकम् ॥ ३ ॥
’महायशस्वी राजकुमारा ! जे आमचे सर्वश्रेष्ठ गुरू होते ते महाराज दशरथ तर आपला ज्येष्ठ पुत्र श्रीराम तसेच महाबली लक्ष्मण यांना वनात पाठवून स्वतःही स्वर्गलोकास निघून गेले आहेत. आता या राज्याला कोणी स्वामी नाही म्हणून आपण आमचा राजा व्हावे. आपल्या वडिल बंधुना स्वतः महाराजांनीच वनवासाची आज्ञा दिली आहे आणि आपल्याला हे राज्य प्रदान केले आहे. म्हणून आपण राजा होणे हे न्यायसंगत आहे. या संगतिमुळेच आपण राज्य आपल्या अधिकारात घेऊन कुणाही प्रति काही अपराध करीत नाही आहांत. ॥ २-३॥
आभिषेचनिकं सर्वमिदमादाय राघव ।
प्रतीक्षते त्वां स्वजनः श्रेणयश्च नृपात्मज ॥ ४ ॥
’राजकुमार राघव (भरत) ! हे मंत्री आदि स्वजन, पुरवासी धनिक लोग अभिषेकाची सर्व सामग्री घेऊन आपली वाट पहात आहेत. ॥ ४॥
राज्यं गृहाण भरत पितृपैतामहं ध्रुवम् ।
अभिषेचय चात्मानं पाहि चास्मान् नरर्षभ ॥ ५ ॥
’भरत ! आपण आपल्या मातापिता पितामहांचे हे राज्य अवश्य ग्रहण करावे. नरश्रेष्ठ ! राजाच्या पदावर आपला अभिषेक करवावा आणि आम्हा लोकांचे रक्षण करावे.’ ॥ ५॥
आभिषेचनिकं भाण्डं कृत्वा सर्वं प्रदक्षिणम् ।
भरतस्तं जनं सर्वं प्रत्युवाच धृतव्रतः ॥ ६ ॥
हे ऐकून उत्तमव्रत धारण करण्यार्‍या भरतांनी अभिषेकासाठी ठेवल्या गेलेल्या सर्व सामग्रीची प्रदक्षिणा केली आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना याप्रमाणे उत्तर दिले - ॥ ६॥
ज्येष्ठस्य राजता नित्यं उचिता हि कुलस्य नः ।
नैवं भवन्तो मां वक्तुमर्हन्ति कुशला जनाः ॥ ७ ॥
’सज्जन हो ! आपण बुद्धिमान आहात आपण माझ्याशी याप्रकारे बोलता कामा नये. आमच्या कुळात सदा ज्येष्ठ पुत्रच राज्याचा अधिकारी होत आलेला आहे आणि हेच उचितही आहे. ॥ ७॥
रामः पूर्वो हि नो भ्राता भविष्यति महीपतिः ।
अहं त्वरण्ये वत्स्यामि वर्षाणि नव पञ्च च ॥ ८ ॥
’श्रीराम आमचे ज्येष्ठ बंधु आहेत, म्हणून तेच राजा होतील. त्यांचा ऐवजी मीच चौदा वर्षे वनात निवास करीन. ॥ ८॥
युज्यतां महती सेना चतुरङ्‌गामहाबला ।
आनयिष्याम्यहं ज्येष्ठं भ्रातरं राघवं वनात् ॥ ९ ॥
आपण सर्वांनी सर्वार्थाने बलसंपन्न अशी चतुरंगिणी सेना सज्ज करावी. मी आता आमचे ज्येष्ठ बंधु श्रीरामांना वनांतून परत आणीन. ॥ ९ ॥
आभिषेचनिकं चैव सर्वमेतदुपस्कृतम् ।
पुरस्कृत्य गमिष्यामि रामहेतोर्वनं प्रति ॥ १० ॥

तत्रैव तं नरव्याघ्रमभिषिच्य पुरस्कृतम् ।
आनयिष्यामि वै रामं हव्यवाहमिवाध्वरात् ॥ ११ ॥
’अभिषेकासाठी एकत्रित केलेल्या या सर्व सामग्रीला पुढे ठेवून मी श्रीरामांना भेटण्यासाठी वनात जाईन आणि त्या नरश्रेष्ठ श्रीरामांचा तेथेच अभिषेक करून यज्ञातून आणल्या गेलेल्या अग्नीप्रमाणे त्यांना पुढे करुन मी अयोध्येस घेऊन येईन. ॥ १०-११॥
न सकामां करिष्यामि स्वामिमां मातृगन्धिनीम् ।
वने वत्स्याम्यहं दुर्गे रामो राजा भविष्यति ॥ १२ ॥
’परंतु जिच्यात लेशमात्र मातृभाव शेष आहे त्या माझी माता म्हणविणार्‍या या कैकेयीला मी कदापि सफल मनोरथ होऊ देणार नाही. श्रीराम येथील राजा होतील आणि मी दुर्गम वनात निवास करीन. ॥ १२॥
क्रियतां शिल्पिभिः पन्थाः समानि विषमाणि च ।
रक्षिणश्चानुसंयान्तु पथि दुर्गविचारकाः ॥ १३ ॥
’कारागिरांनी पुढे जाऊन रस्ता तयार करावा, उंच सखल भूमीला सारखी करावी तसेच मार्गातील दुर्गम स्थानांची माहिती असणारे रक्षकही बरोबर घ्यावेत. ॥ १३॥
एवं सम्भाषमाणं तं रामहेतोर्नृपात्मजम् ।
प्रत्युवाच जनः सर्वः श्रीमद् वाक्यमनुत्तमम् ॥ १४ ॥
श्रीरामांसाठी अशा गोष्टी बोलणार्‍या राजकुमार भरताला तेथे आलेल्या सर्व लोकांनी याप्रकारे सुंदर आणि परम उत्तम गोष्ट सांगितली- ॥ १४॥
एवं ते भाषमाणस्य पद्मा श्रीरुपतिष्ठताम् ।
यस्त्वं ज्येष्ठे नृपसुते पृथिवीं दातुमिच्छसि ॥ १५ ॥
’भरत ! अशा उत्तम वचने बोलणार्‍या आपल्याजवळ कमलवनात निवास करणारी लक्ष्मी अवस्थित होवो, कारण की आपण राजांचे ज्येष्ठ पुत्र श्रीराम यांना स्वतःच या पृथ्वीचे राज्य परत देऊ इच्छित आहात’. ॥ १५॥
अनुत्तमं तद्वचनं नृपात्मजः
     प्रभाषितं संश्रवणे निशम्य च ।
प्रहर्षजास्तं प्रति बाष्पविन्दवो
     निपेतुरार्यानननेत्रसम्भवाः ॥ १६ ॥
त्या लोकांनी बोललेले ते परम उत्तम आशीर्वचन जेव्हा कानावर पडले तेव्हा ते ऐकून राजकुमार भरताला अत्यंत प्रसन्नता वाटली. त्या सर्वांकडे पाहून भरताच्या मुखमण्डलात सुशोभित होणार्‍या नेत्रातून हर्षजनित अश्रूंचे थेंब पडू लागले. ॥ १६॥
ऊचुस्ते वचनमिदं निशम्य हृष्टाः
     सामात्याः सपरिषदो वियातशोकाः ।
पन्थानं नरवर भक्तिमान् जनश्च
     व्यादिष्टास्तव वचनाच्च शिल्पिवर्गः ॥ १७ ॥
भरताच्या मुखांतून श्रीरामांना परत आणण्याची गोष्ट ऐकून त्या सभेतील सर्व सदस्य आणि मन्त्र्यांसहित समस्त राजकर्मचारी हर्षाने प्रफुल्लित झाले. त्यांचा सारा शोक दूर झाला आणि ते भरतास म्हणाले- नरश्रेष्ठ ! आपल्या आज्ञेप्रमाणे राजपरिवाराच्या प्रति भक्तिभाव ठेवणारे कारागीर आणि रक्षकांना मार्ग ठीक करण्यासाठी धाडून देण्यात आले आहे. ॥ १७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकोनाशीतितमः सर्गः ॥ ७९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकोणविंशीवा सर्ग पूरा झाला. ॥ ७९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP