श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ चतुःषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्याज्ञया सेनामग्रे प्रेष्य मासमनु शत्रुघ्नस्य मथुरां प्रति प्रस्थानम् -
श्रीरामांच्या आज्ञेनुसार शत्रुघ्नाने सेनेला पुढे धाडून एका महिन्यानंतर स्वतःही प्रस्थान करणे -
एवमुक्त्वा च काकुत्स्थं प्रशस्य च पुनः पुनः ।
पुनरेवापरं वाक्यं उवाच रघुनन्दनः ॥ १ ॥
शत्रुघ्नास याप्रकारे समजावून आणि त्यांची वारंवार प्रशंसा करून रघुकुलनंदन श्रीरामांनी पुन्हा त्यांना हे वाक्य म्हटले - ॥१॥
इमान्यश्वसहस्राणि चत्वारि पुरुषर्षभ ।
रथानां द्वे सहस्रे च गजानां शतमुत्तमम् ॥ २ ॥

अन्तरा पणवीथ्यश्च नानापण्योपशोभिताः ।
अनुगच्छन्तु काकुत्स्थं तथैव नटनर्तकाः ॥ ३ ॥
पुरुषश्रेष्ठ ! हे चार हजार घोडे, दोन हजार रथ, शंभर हत्ती आणि वाटेत निरनिराळ्या सामानाची दुकाने थाटणारे व्यापारी लोक विक्रीच्या आवश्यक वस्तुंसह तुमच्या बरोबर जातील. त्याच बरोबर मनोरंजनासाठी नट आणि नर्तक ही रहातील. ॥२-३॥
हिरण्यस्य सुवर्णस्य नियुतं पुरुषर्षभ ।
आदाय गच्छ शत्रुघ्न पर्याप्तधनवाहनः ॥ ४ ॥
पुरुषश्रेष्ठ ! शत्रुघ्न ! तू दहा लाख स्वर्ण मुद्रा घेऊन जा. याप्रकारे पर्याप्त धन आणि वाहाने आपल्या बरोबर ठेव. ॥४॥
बलं च सुभृतं वीर हृष्टपुष्टमनुद्धतम् ।
सम्भाषासम्प्रदानेन रञ्जयस्व नगेत्तम ॥ ५ ॥
या सेनेचे चांगल्या प्रकारे भरण-पोषण केले गेले आहे. ही हर्ष आणि उत्साहाने पूर्ण, संतुष्ट आणि उद्दण्डता विरहित राहून आज्ञेच्या अधीन राहाणारी आहे. नरश्रेष्ठ ! हिला मधुर भाषणाने आणि धन देऊन प्रसन्न ठेव. ॥५॥
न ह्यर्थास्तत्र तिष्ठन्ति न दारा न च बान्धवाः ।
सुप्रीतो भृत्यवर्गस्तु यत्र तिष्ठसि राघव ॥ ६ ॥
रघुनंदना ! अत्यंत प्रसन्न ठेवले गेलेले सेवक-समूह (सैनिक) जेथे (ज्या संकटकाळात) उभे राहातात अथवा साथ देतात तेथे धन टिकत नाही, स्त्री उभी राहू शकत नाही अथवा बंधु-बान्धवही उभे राहू शकत नाहीत. (म्हणून त्या सर्वांना सदा संतुष्ट ठेवले पाहिजे.) ॥६॥
ततो हृष्टजनाकीर्णां प्रस्थाप्य महतीं चमूम् ।
एक एव धनुष्पाणिर्गच्छ त्वं मधुनो वनम् ॥ ७ ॥

यथा त्वां न प्रजानाति गच्छन्तं युद्धकाङ्‌क्षिणम् ।
लवणस्तु मधोः पुत्रः तथा गच्छेरशंकितम् ॥ ८ ॥
म्हणून हृष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेल्या त्या विशाल सेनेला पुढे धाडून तू मागाहून एकटाच केवळ धनुष्य हातात घेऊन मधुवनास जा आणि याप्रकारे यात्रा कर की ज्यायोगे मधुपुत्र लवणाला हा संदेहही होणार नाही की तू युद्धाच्या इच्छेने तेथे जात आहेस. तुझ्या गतिविधिचा पत्ता त्याला लागता कामा नये. ॥७-८॥
न तस्य मूत्युरन्योऽस्ति कश्चिद्धि पुरुषर्षभ ।
दर्शनं योऽभिगच्छेत स वध्यो लवणेन हि ॥ ९ ॥
पुरुषोत्तमा ! मी जो सांगितला आहे त्या व्यतिरिक्त त्याच्या मृत्युचा दुसरा कोठलाही उपाय नाही आहे कारण की जो कोणी शूलसहित लवणासुराच्या दृष्टिपथात येतो, तो अवश्यच त्याच्या द्वारे मारला जातो. ॥९॥
स हि ग्रीष्मोऽपयाते तु वर्षारात्र उपागते ।
हन्यास्त्वं लवणं सौम्य सहि कालोऽस्य दुर्मतेः ॥ १० ॥
सौम्य ! जेव्हा ग्रीष्म-ऋतु संपुष्टात येऊन आणि वर्षाकाल येईल, त्या समयी तू लवणासुराचा वध कर, कारण की त्या दुर्बुद्धि राक्षसाच्या नाशाचा तोच समय आहे. ॥१०॥
महर्षींस्तु पुरत्कृत्य प्रयान्तु तव सौनिकाः ।
यथा ग्रीष्मावशेषेण तरेयुर्जाह्नवीजलम् ॥ ११ ॥
तुझे सैनिक महर्षिंना पुढे घालून येथून यात्रा करू देत. ज्यायोगे ग्रीष्म ऋतु संपता संपता ते गंगेला पार करून जातील. ॥११॥
तत्र स्थाप्य बलं सर्वं नदीतीरे समाहितः ।
अग्रतो धनुषा सार्धं गच्छ त्वं लघुविक्रमः ॥ १२ ॥
शीघ्र पराक्रमी वीरा ! नंतर सर्व सेनेला तेथे गंगेच्या तटावरच ठेवून तू धनुष्यमात्र घेऊन पूर्ण सावधानतेने एकटाच पुढे जा. ॥१२॥
एवमुक्तस्तु रामेण शत्रुघ्नस्तान् महाबलान् ।
सेनामुख्यान् सन्समानीय ततो वाक्यमुवाच ह ॥ १३ ॥
श्रीरामांनी असे सांगितल्यावर शत्रुघ्नांनी आपल्या प्रधान सेनापतिला बोलाविले आणि याप्रकारे सांगितले - ॥१३॥
एते वो गणिता वासा यत्र तत्र निवत्स्यथ ।
स्थातव्यं चाविरोधेन यथा बाधा न कस्यचित् ॥ १४ ॥
पहा, मार्गात जेथे जेथे छावणी ठोकावयाची आहे त्या ठिकाणाचा निश्चय केला गेला आहे. तुम्ही तेथेच निवास करावा. जेथे कोठे मुक्काम कराल, तेथे विरोधभावाला मनातून काढून टाका, ज्यायोगे कुणाला कष्ट पोहोचणार नाहीत. ॥१४॥
तथा तांस्तु समाज्ञाप्य प्रस्थाप्य च महद्बलम् ।
कौसल्यां च सुमित्रां च कैकेयीं चाभ्यवादयत् ॥ १५ ॥
याप्रकारे त्या सेनापतिंना आज्ञा देऊन आपल्या विशाल सेनेला पुढे धाडून शत्रुघ्नांनी कौसल्या, सुमित्रा तसेच कैकेयीला प्रणाम केला. ॥१५॥
रामं प्रदक्षिणीकृत्य शिरसाऽभिप्रणम्य च ।
लक्ष्मणं भरतं चैव प्रणिपत्य कृताञ्जलिः ॥ १६ ॥
त्यानंतर श्रीरामांची परिक्रमा करून त्यांच्या चरणी मस्तक नमवून नंतर हात जोडून भरत आणि लक्ष्मणांनाही वंदन केले. ॥१६॥
पुरोहितं वसिष्ठं च शत्रुघ्नः प्रयतात्मवान् ।
रामेण चाभ्यनुज्ञातः शत्रुघ्नः शत्रुतापनः ।
प्रदक्षिणमथो कृत्वा निर्जगाम महाबलः ॥ १७ ॥
तदनंतर मनाला संयमित ठेवून शत्रुघ्नाने पुरोहित वसिष्ठांना नमस्कार केला. नंतर श्रीरामांची आज्ञा घेऊन त्यांची परिक्रमा करून शत्रूंना संताप देणारे महाबली शत्रुघ्न अयोध्येतून बाहेर पडले. ॥१७॥
प्रस्थाप्य सेनामथ सोऽग्रतस्तदा
गजेन्द्रवाजिप्रवरौघसङ्‌कुलाम् ।
उपास मासं तु नरेन्द्रपार्श्वतः
त्वथ प्रयातो रघुवंशवर्धनः ॥ १८ ॥
गजराज आणि श्रेष्ठ अश्वांच्या समुदायाने भरलेली विशाल सेना पुढे धाडून रघुवंशाची वृद्धि करणारे शत्रुघ्न एक महिनापर्यंत महाराज श्रीरामांच्या जवळच राहिले. त्यानंतर त्यांनी तेथून प्रस्थान केले. ॥१८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे चतुष्षष्टितमः सर्गः ॥ ६४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा चौसष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP