[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ त्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण परुषमुक्तस्य खरस्य तं प्रति परुषोक्तिस्तदुपरि खरेण शालेन प्रहारश्च तं शालं छित्वा श्रीरामेण खरस्य वधो देवैर्मुनिभिश्च श्रीरामस्य स्तवनम् -
श्रीरामांनी व्यंग केल्यावर खरानी त्यांचा धिक्कार करून त्यांच्यावर सालवृक्षाचा प्रहार करणे, श्रीरामांनी त्या वृक्षास तोडून टाकून एका तेजस्वी बाणाने खराला ठार मारून टाकणे तसेच देवता आणि महर्षिंच्या द्वारा श्रीरामांची प्रशंसा -
भित्त्वा तु तां गदां बाणै राघवो धर्मवत्सलः ।
स्मयमान इदं वाक्यं संरब्धमिदमब्रवीत् ॥ १ ॥
धर्मप्रेमी भगवान श्रीरामांनी आपल्या बाणांनी खराच्या त्या गदेला विदीर्ण करून हसत हसत ही रोष सूचक गोष्ट सांगितली- ॥१॥
एतत् ते बलसर्वस्वं दर्शितं राक्षसाधम ।
शक्तिहीनतरो मत्तो वृथा त्वमुपगर्जसि ॥ २ ॥
राक्षसाधमा ! हेच तुझे बल आहे ना जे तू या गदेबरोबर दाखविले आहेस. आता सिद्ध झाले आहे की तू माझ्या तुलनेत अत्यंत शक्तिहीन आहेस, व्यर्थच आपल्या बलाच्या बढाया मारीत होतास. ॥२॥
एषा बाणविनिर्भिन्ना गदा भूमितलं गता ।
अभिधानप्रगल्भस्य तव प्रत्यरिघातिनी ॥ ३ ॥
माझ्या बाणांनी छिन्न-भिन्न होऊन तुझी ही गदा पृथ्वीवर पडलेली आहे. तुझ्या मनात हा विश्वास होता की मी या गदेने शत्रूचा वध करून टाकीन, त्याचे खण्डन तुझ्या या गदेनेच केले आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की तू केवळ थापा मारण्यात तरबेज आहेस (तुझ्या कडून काही पराक्रम घडू शकत नाही.) ॥३॥
यत् त्वयोक्तं विनष्टानामिदमश्रुप्रमार्जनम् ।
राक्षसानां करोमीति मिथ्या तदपि ते वचः ॥ ४ ॥
तू जे म्हटले होतेस की तुझा वध करून तुझ्या हातून मारल्या गेलेल्या राक्षसांचे अश्रू पुसीन, तुझे ते म्हणणे ही खोटे ठरले आहे. ॥४॥
नीचस्य क्षुद्रशीलस्य मिथ्यावृत्तस्य रक्षसः ।
प्राणानपहरिष्यामि गरुत्मानमृतं यथा ॥ ५ ॥
तू नीच, क्षुद्र स्वभावाने युक्त आणि मिथ्याचारी राक्षस आहेस. मी तुझ्या प्राणांना, गरूडाने देवतांच्या जवळून जसे अमृताचे अपहरण केले त्याप्रमाणे हरण करून घेईन. ॥५॥
अद्य ते भिन्नकण्ठस्य फेनबुद्‌बुदभूषितम् ।
विदारितस्य मद्‌बाणैर्मही पास्यति शोणितम् ॥ ६ ॥
आता मी आपल्या बाणांनी तुझ्या शरीरास विर्दीण करून तुझा गळा कापून टाकीन. मग ही पृथ्वी फेन(फेस) आणि बुडबुड्‍यांनी युक्त तुझ्या गरम गरम रक्ताचे पान करील. ॥६॥
पांसुरूषितसर्वाङ्‌गः स्रस्तन्यस्तभुजद्वयः ।
स्वप्स्यसे गां समाश्लिष्य दुर्लभां प्रमदामिव ॥ ७ ॥
तुझे सारे अंग धुळीने धूसर होऊन जाईल, तुझ्या दोन्ही भुजा शरीरापासून अलग होऊन पृथ्वीवर पडतील आणि त्या दशेमध्ये तू दुर्लभ युवती प्रमाणे या पृथ्वीचे आलिंगन करून सदासाठीच झोपून जाशील. ॥७॥
प्रवृद्धनिद्रे शयिते त्वयि राक्षसपांसने ।
भविष्यन्ति शरण्यानां शरण्या दण्डका इमे ॥ ८ ॥
तुझ्या सारखा राक्षसकुलकलंक कायमचा महानिद्रेमध्ये झोपी गेल्यावर हा दण्डकवनसारखा प्रदेश शरणार्थींना शरण देणारा होईल. ॥८॥
जनस्थाने हतस्थाने तव राक्षस मच्छरैः ।
निर्भया विचरिष्यन्ति सर्वतो मुनयो वने ॥ ९ ॥
राक्षसा ! माझ्या बाणांनी जनस्थानात बनलेले तुझे निवास स्थान नष्ट होऊन गेले की मुनिगण या वनात सर्वत्र निर्भय होऊन विचरू शकतील. ॥९॥
अद्य विप्रसरिष्यन्ति राक्षस्यो हतबान्धवाः ।
बाष्पार्द्रवदना दीना भयादन्यभयावहाः ॥ १० ॥
ज्या आजपर्यंत दुसर्‍यांना भय दाखवीत होत्या त्या राक्षसिणी आज आपले बांधवजन मारले गेल्याने दीन होऊन अश्रूंनी भिजलेल्या मुखांनी जनस्थानातून स्वतःच भयामुळे पळून जातील. ॥१०॥
अद्य शोकरसज्ञास्ता भविष्यन्ति निरर्थिकाः ।
अनुरूपकुलाः पत्‍न्यो यासां त्वं पतिरीदृशः ॥ ११ ॥
ज्यांचा तुझ्या सारखा पति आहे त्या तदनुरूप कुल असलेल्या तुझ्या पत्‍नी आज तू मारला गेल्यावर काम आदि पुरुषार्थपासून वंचित होऊन शोकरूपी स्थायीभाव असणार्‍या करूणरसाचा अनुभव करणार्‍या होतील. ॥११॥
नृशंसशील क्षुद्रात्मन् नित्यं ब्राह्मणकण्टक ।
यत्कृते शङ्‌कितैरग्नौ मुनिभिः पात्यते हविः ॥ १२ ॥
क्रूर स्वभावाच्या निशाचरा ! तुझे हृदय सदाच क्षुद्र विचारांनी भरलेले राहात असते. तू ब्राह्मणांसाठी कण्टकरूप आहेस. तुझ्या कारणानेच मुनिलोक शंकित राहूनच अग्निमध्ये हविष्याच्या आहुती देत असतात. ॥१२॥
तमेवमभिसंरब्धं ब्रुवाणं राघवं रणे ।
खरो निर्भर्त्सयामास रोषात् खरतरस्वरः ॥ १३ ॥
वनात श्रीरामचंद्र जेव्हा या प्रकारे रोषपूर्ण भाषण करीत होते त्या समयी क्रोधामुळे खराचा स्वरही अत्यंत कठोर झाला आणि त्याने धिक्कार करून म्हटले- ॥१३॥
दृढं खल्ववलिप्तोऽसि भयेष्वपि च निर्भयः ।
वाच्यावाच्यं ततो हि त्वं मृत्योर्वश्यो न बुध्यसे ॥ १४ ॥
अहो ! निश्चितच तू फार घमेंडी आहेस. भयाच्या समयीही निर्भय बनला आहेस. असे कळून येत आहे की तू मृत्युच्या अधीन झाला आहेस, या कारणामुळेच तुला याचाही पत्ता नाही आहे की केव्हां काय बोलले पाहिजे आणि काय बोलतां कामा नये. ॥१४॥
कालपाशपरिक्षिप्ता भवन्ति पुरुषा हि ये ।
कार्याकार्यं न जानन्ति ते निरस्तषडिन्द्रियाः ॥ १५ ॥
जे पुरुष काळाच्या फंदात फसले जातात त्यांची सहाही इंद्रिये निकामी होऊन जातात, म्हणून त्यांना कर्तव्य आणि अकर्तव्याचे ज्ञान राहात नाही. ॥१५॥
एवमुक्त्वा ततो रामं संरुध्य भ्रुकुटीं ततः ।
स ददर्श महासालमविदूरे निशाचरः ॥ १६ ॥

रणे प्रहरणस्यार्थे सर्वतो ह्यवलोकयन् ।
स तमुत्पाटयामास सन्दष्टदशनच्छदम् ॥ १७ ॥
असे म्हणून त्या निशाचराने एक वेळ श्रीरामांकडे भुवया वक्र करुन पाहिले आणि रणभूमीवर त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी तो चोहोबाजूस दृष्टिपात करू लागला. इतक्यातच त्याला एक विशाल साल वृक्ष दिसून आला जो निकटच होता. खराने आपल्या ओठांना दातांनी दाबून त्या वृक्षाला उपटून काढले. ॥१६-१७॥
तं समुत्क्षिप्य बाहुभ्यां विनर्दित्वा महाबलः ।
राममुद्दिश्य चिक्षेप हतस्त्वमिति चाब्रवीत् ॥ १८ ॥
नंतर त्या महाबलाढ्‍य निशाचराने विकट गर्जना करून दोन्ही हातांनी तो वृक्ष उचलला आणि श्रीरामांवर फेकला, त्याचबरोबर असेही म्हटले की - घे आता तू मारला गेलास. ॥१८॥
तमापतन्तं बाणौघैश्छित्त्वा रामः प्रतापवान् ।
रोषमाहारयत् तीव्रं निहन्तुं समरे खरम् ॥ १९ ॥
परम प्रतापी भगवान श्रीरामांनी आपल्याकडे येणार्‍या त्या वृक्षाला बाण-समूहांनी तोडून टाकला आणि त्या समरभूमी मध्ये खराला ठार मारण्यासाठी अत्यंत क्रोध प्रकट केला. ॥१९॥
जातस्वेदस्ततो रामो रोषरक्तान्तलोचनः ।
निर्बिभेद सहस्रेण बाणानां समरे खरम् ॥ २० ॥
त्या समयी श्रीरामांच्या शरीरातून घाम येऊ लागला. त्यांचे नेत्र प्रांत रोषाने रक्तवर्णाचे झाले. त्यांनी हजारो बाणांचा प्रहार करून समरांगणात खराला क्षत-विक्षत करून टाकले. ॥२०॥
तस्य बाणान्तराद् रक्तं बहु सुस्राव फेनिलम् ।
गिरेः प्रस्रवणस्येव धाराणां च परिस्रवः ॥ २१ ॥
त्यांच्या बाणांच्या आघाताने त्या निशाचराच्या शरीरात जे घाव झाले, त्यातून अधिक प्रमाणात फेनयुक्त रक्त प्रवाहित होऊ लागले, जणु पर्वताच्या झर्‍यातून जलधारा पडत आहेत. ॥२१॥
विकलः स कृतो बाणैः खरो रामेण संयुगे ।
मत्तो रुधिरगन्धेन तमेवाभ्यद्रवद् द्रुतम् ॥ २२ ॥
श्रीरामांनी युद्धस्थळावर आपल्या बाणांच्या मार्‍याने खराला व्याकुळ करून सोडले तरीही (त्याचे साहस कमी झाले नाही.) तो रक्ताव्य गंधाने उन्मत्त होऊन मोठ्‍या वेगाने श्रीरामांकडे धावला. ॥२२॥
तमापतन्तं संक्रुद्धं कृतास्त्रो रुधिराप्लुतम् ।
अपासर्पद् द्वित्रिपदं किञ्चित्त्वरितविक्रमः ॥ २३ ॥
अस्त्रविद्येचे ज्ञाते भगवान श्रीरामांनी पाहिले कि हा राक्षस रक्ताने चिंब होऊनही अत्यंत क्रोधपूर्वक माझ्याच कडे येत आहे तेव्हा ते त्वरित चरणांचे संचलन करून दोन-तीन पावले मागे गेले. (कारण फार जवळ असल्यावर बाण मारणे संभव होऊ शकत नाही.) ॥२३॥
ततः पावकसंकाशं वधाय समरे शरम् ।
खरस्य रामो जग्राह ब्रह्मदण्डमिवापरम् ॥ २४ ॥
तदनंतर श्रीरामांनी समरांगणात खराचा वध करण्यासाठी एक अग्निसमान तेजस्वी बाण हातात घेतला, जो ब्रह्मदंडासमान भयंकर होता. ॥२४॥
स तद् दत्तं मघवता सुरराजेन धीमता ।
सन्दधे च स धर्मात्मा मुमोच च खरं प्रति ॥ २५ ॥
हा बाण बुद्धिमान देवराज इंद्रांनी दिलेला होता. धर्मात्मा श्रीरामांनी तो धनुष्यावर ठेवला आणि खराला लक्ष्य करून सोडून दिला. ॥२५॥
स विमुक्तो महाबाणो निर्घातसमनिःस्वनः ।
रामेण धनुरायम्य खरस्योरसि चापतत् ॥ २६ ॥
तो महाबाण सुटताच वज्रपात व्हावा तसा भयानक आवाज झाला. श्रीरामांनी आपले धनुष्य कानापर्यंत खेंचून तो सोडला होता. तो खराच्या छातीवर जाऊन लागला. ॥२६॥
स पपात खरो भूमौ दह्यमानः शराग्निना ।
रुद्रेणेव विनिर्दग्धः श्वेतारण्ये यथान्धकः ॥ २७ ॥
जसे श्वेतवनात भगवान रूद्राने अंधकासुराला जाळून भस्म केले होते त्या प्रकारे दण्डकवनात श्रीरामांच्या बाणाच्या आगीत जळत असलेला निशाचर खर पृथ्वीवर कोसळला. ॥२७॥
स वृत्र इव वज्रेण फेनेन नमुचिर्यथा ।
बलो वेन्द्राशनिहतो निपपात हतः खरः ॥ २८ ॥
जसे वज्राने वृत्रासुर, फेनाने नमुचि आणि इंद्राच्या अशनिने बलासुर मारला गेला होता, त्याच प्रकारे श्रीरामांच्या त्या बाणाने आघात होऊन खर धराशायी झाला. ॥२८॥
एतस्मिन्नन्तरे देवाश्चारणैः सह संगताः ।
दुन्दुभींश्चाभिनिघ्नन्तः पुष्पवर्षं समन्ततः ॥ २९ ॥

रामस्योपरि संहृष्टा ववर्षुर्विस्मितास्तदा ।
अर्धाधिकमुहूर्तेन रामेण निशितैः शरैः ॥ ३० ॥

चतुर्दशसहस्राणि रक्षसां कामरूपिणाम् ।
खरदूषणमुख्यानां निहतानि महामृधे ॥ ३१ ॥
त्या समयी देवता चारणांसह मिळून तेथे आल्या आणि अत्यंत हर्षाने दुंदुभि वाजवित श्रीरामांवर चोहोबाजूंनी फुलांची वृष्टी करू लागल्या. त्यावेळी त्यांना श्रीरामांनी आपल्या तीक्ष्ण बाणांनी दीड मुहूर्ताच इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या खर-दूषण आणि चौदा हजार राक्षसांचा महासमरात संहार करून टाकला हे पाहून फारच आश्चर्य वाटले. ॥२९-३१॥
अहो बत महत्कर्म रामस्य विदितात्मनः ।
अहो वीर्यमहो दार्ढ्यं विष्णोरिव हि दृश्यते ॥ ३२ ॥
ते म्हणाले - अहो ! आपल्या स्वरूपास जाणणार्‍या भगवान श्रीरामांचे हे कर्म महान आणि अदभुत आहे, त्यांचे बल आणि पराक्रमही अदभुत आहे आणि यांच्या ठिकाणी भगवान विष्णुंच्या प्रमाणे अश्चर्यजनक दृढता दिसून येत आहे. ॥३२॥
इत्येवमुक्त्वा ते सर्वे ययुर्देवा यथागतम् ।
ततो राजर्षयः सर्वे संगताः परमर्षयः ॥ ३३

सभाज्य मुदिता रामं सागस्त्या इदमब्रुवन् ।
असे म्हणून त्या सर्व देवता जशा आल्या होत्या तशाच निघून गेल्या. तदनंतर बरेचसे राजर्षि आणि अगस्त्य आदि महर्षि मिळून तेथे आले आणि प्रसन्नतापूर्वक श्रीरामांचा सत्कार करुन त्यांना या प्रकारे बोलले- ॥३३ १/२॥
एतदर्थं महातेजा महेन्द्रः पाकशासनः ॥ ३४ ॥

शरभङ्‌गाश्रमं पुण्यमाजगाम पुरंदरः ।
आनीतस्त्वमिमं देशमुपायेन महर्षिभिः ॥ ३५ ॥
रघुनंदना ! यासाठीच महातेजस्वी पाकशासन पुरंदर इंद्र शरभङ्‌ग मुनिंच्या पवित्र आश्रमात आले होते आणि याच कार्याच्या सिद्धिसाठी महर्षिंनी विशेष उपाय करून आपल्याला पंचवटीच्या या प्रदेशात पोहोचविले होते. ॥३४-३५॥
एषां वधार्थं शत्रूणां रक्षसां पापकर्मणाम् ।
तदिदं नः कृतं कार्यं त्वया दशरथात्मज ॥ ३६ ॥

स्वधर्मं प्रचरिष्यन्ति दण्डकेषु महर्षयः ।
मुनिंच्या शत्रुरूप या पापाचारी राक्षसांच्या वधासाठीच आपले येथे शुभागमन आवश्यक समजले गेले होते. दशरथनंदन ! आपण आम्हा लोकांचे हे फार मोठे कार्य सिद्ध केले आहे. आता मोठ मोठे ऋषि-मुनि दण्डकारण्याच्या विभिन्न प्रदेशात निर्भय होऊन आपल्या धर्माचे अनुष्ठान करतील. ॥३६ १/२॥
एतस्मिन्नन्तरे वीरो लक्ष्मणः सह सीतया ॥ ३७ ॥

गिरिदुर्गाद् विनिष्क्रम्य संविवेशाश्रमं सुखी ।
इतक्यात वीर लक्ष्मण सीतेसह पर्वताच्या गुहेतून निघून प्रसन्नतापूर्वक आश्रमात आले. ॥३७ १/२॥
ततो रामस्तु विजयी पूज्यमानो महर्षिभिः ॥ ३८ ॥

प्रविवेशाश्रमं वीरो लक्ष्मणेनाभिपूजितः ।
तत्पश्चात महर्षिंच्या द्वारा प्रशंसित आणि लक्ष्मणाच्या द्वारे पूजित झालेल्या विजयी वीर श्रीरामांनी आश्रमात प्रवेश केला. ॥३८ १/२॥
तं दृष्ट्‍वा शत्रुहन्तारं महर्षीणां सुखावहम् ॥ ३९ ॥

बभूव हृष्टा वैदेही भर्तारं परिषस्वजे ।
मुदा परमया युक्ता दृष्ट्‍वा रक्षोगणान् हतान् ।
रामं चैवाव्यथं दृष्ट्‍वा तुतोष जनकात्मजा ॥ ४० ॥
महर्षिंना सुख देणार्‍या आपल्या शत्रुहंता पतिचे दर्शन करून जनकनंदिनी सीतेला फार हर्ष झाला. तिने परमानंदात निमग्न होऊन आपल्या स्वामींना आलिंगन दिले. राक्षस-समूह मारले गेले आणि श्रीरामांना काही क्षति पोहोंचली नाही हे पाहून आणि जाणून जानकीला फार संतोष झाला. ॥३९-४०॥
ततस्तु तं राक्षससङ्‌घमर्दनं
संपूज्यमानं मुदितैर्महात्मभिः ।
पुनः परिष्वज्य मुदान्वितानना
बभूव हृष्टा जनकात्मजा तदा ॥ ४१ ॥
प्रसन्नतेने भरलेले महात्मा-मुनि ज्यांची भूरि-भूरि प्रशंसा करीत होते तसेच ज्यांनी राक्षसांच्या समुदायाला चिरडून टाकले होते त्या प्राणवल्लभ, श्रीरामांचे वारंवार आलिंगन करून त्या समयी जनकनंदिनी सीतेला अत्यंत हर्ष झाला. तिचे मुख प्रसन्नतेने खुलले. ॥४१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे त्रिंशः सर्गः ॥ ३० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP