श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। पञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामप्रभृतीनां मिथिलापुर्यां गमनं जनकेन विश्वामित्रस्य सत्कारस्तस्य श्रीरामलक्ष्मणयोः परिचयजिज्ञासा तस्याः पूर्तिश्च - श्रीराम आदिंचे मिथिला गमन, राजा जनकद्वारा विश्वामित्रांचा सत्कार, तथा त्यांचे श्रीराम आणि लक्ष्मणाविषयी जिज्ञासा करणे आणि परिचय मिळविणे -
ततः प्रागुत्तरां गत्वा रामः सौमित्रिणा सह ।
विश्वामित्रं पुरस्कृत्य यज्ञवाटमुपागमत् ॥ १ ॥
लक्ष्मणासहित श्रीराम विश्वामित्रांना पुढे करून महर्षि गौतमांच्या आश्रमातून ईशान्य दिशेकडे चालू लागले आणि मिथिला नरेशाच्या यज्ञमंडपात जाऊन पोहोंचले. ॥ १ ॥
रामस्तु मुनिशार्दूलमुवाच सहलक्ष्मणः ।
साध्वी यज्ञसमृद्धिर्हि जनकस्य महात्मनः ॥ २ ॥

बहूनीह सहस्राणि नानादेशनिवासिनाम् ।
ब्राह्मणानां महाभाग वेदाध्ययनशालिनाम् ॥ ३ ॥
तेथे लक्ष्मणासहित श्रीरामांनी मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना म्हटले - " महाभाग ! महात्मा जनकाच्या यज्ञाचा समारंभ तर सुंदर दिसून येत आहे. येथे नाना देशांतील निवासी, हजारो ब्राह्मण, एकत्रित आलेले आहेत; जे वेदांच्या स्वाध्यायाने शोभा प्राप्त करीत आहेत. ॥ २-३ ॥
ऋषिवाटाश्च दृश्यन्ते शकटीशतसंकुलाः ।
देशो विधीयतां ब्रह्मन् यत्र वत्स्यामहे वयम् ॥ ४ ॥
ऋषिंचे गोठे मालवाहू बैलगाड्यांनी भरलेले दिसत आहेत. ब्रह्मन् ! आता असे एखादे स्थान निश्चित करावे की जेथे आपणही मुक्काम करू. ॥ ४ ॥
रामस्य वचनं श्रुत्वा विश्वामित्रो महामुनिः ।
निवासमकरोद् देशे विविक्ते सलिलान्विते ॥ ५ ॥
श्रीरामचंद्रांचे वचन ऐकून महामुनि विश्वामित्रांनी एकांत असून जेथे पाण्याची चांगली सोय असे स्थान पाहून तेथे मुक्काम ठोकला. ॥ ५ ॥
विश्वामित्रमनुप्राप्तं श्रुत्वा नृपवरस्तत्दा ।
शतानन्दं पुरस्कृत्य पुरोहितमनिन्दितः ॥ ६ ॥
अनिंद्य आचार विचार संपन्न नृपश्रेष्ठ महाराज जनकांनी जेव्हां ऐकले की विश्वामित्र आले आहेत, तेव्हां ते तात्काळ आपले पुरोहित शतानन्द यांना घेऊन तसेच अर्घ्य इ. घेऊन विनीतभावाने त्यांचे स्वागत करण्यासाठी निघाले. ॥ ६ ॥
ऋत्विजोऽपि महात्मानस्त्वर्घ्यमादाय सत्वरम् ।
प्रत्युज्जगाम सहसा विनयेन समन्वितः ॥ ७ ॥

विश्वामित्राय धर्मेण ददौ धर्मपुरस्कृतम् ।
त्यांच्या बरोबर अर्घ्य घेऊन महात्मा ऋत्विजही शीघ्रतापूर्वक निघाले. राजा विनीतभावाने लगबगीने पुढे होऊन महर्षिंना सामोरे गेले तथा धर्मशास्त्रास अनुसरून विश्वामित्रांना धर्मयुक्त अर्घ्य समर्पित केले. ॥ ७ १/२ ॥
प्रतिगृह्य तु तां पूजां जनकस्य महात्मनः ॥ ८ ॥

पप्रच्छ कुशलं राज्ञो यज्ञस्य च निरामयम् ।
महात्मा राजा जनकाची पूजा ग्रहण करून मुनिंनी त्यांचा कुशल समाचार विचारला तसेच त्यांच्या यज्ञाच्या निर्बाध स्थितिविषयी जिज्ञासा व्यक्त केली. ॥ ८ १/२ ॥
स तांश्चाथ मुनीन् पृष्ट्‍वा सोपाध्यायपुरोधसः ॥ ९ ॥

यथार्हमृषिभिः सर्वैः समागच्छत् प्रहृष्टवत् ।
राजाबरोबर जे मुनि, उपाध्याय आणि पुरोहित आलेले होते त्यांचेही कुशल मंगल विचारून विश्वामित्र अत्यंत हर्षाने सर्व महर्षिंना यथायोग्य भेटले. ॥ ९ १/२ ॥
अथ राजा मुनिश्रेष्ठं कृताञ्जलिरभाषत ॥ १० ॥

आसने भगवनास्तां सहैभिर्मुनिपुङ्‌गवैः ।
त्यानंतर राजा जनकांनी मुनिवर विश्वामित्रांना हात जोडून म्हटले - "भगवन् ! आपण या मुनिवरांसह आसनावर विराजमान व्हावे." ॥ १० १/२ ॥
जनकस्य वचः श्रुत्वा निषसाद महामुनिः ॥ ११ ॥

पुरोधा ऋत्विजश्चैव राजा च सहमन्त्रिभिः ।
आसनेषु यथान्यायमुपविष्टाः समन्ततः ॥ १२ ॥
हे ऐकून महामुनि विश्वामित्र आसनावर बसले. नंतर पुरोहित, ऋत्विज, आणि मंत्री वगैरे सर्व बाजूस यथायोग्य आसनांवर विराजमान झाले. ॥ ११-१२ ॥
दृष्ट्‍वा स नृपतिस्तत्र विश्वामित्रमथाब्रवीत् ।
अद्य यज्ञसमृद्धिर्मे सफला दैवतैः कृता ॥ १३ ॥
तत्पश्चात् राजा जनकांनी विश्वामित्रांकडे पाहून म्हटले - "भगवन् ! आज देवतांनी माझ्या यज्ञाचे आयोजन सफल केले आहे. ॥ १३ ॥
अद्य यज्ञफलं प्राप्तं भगवद्दर्शनान्मया ।
धन्योऽस्म्यनुगृहीतोऽस्मि यस्य मे मुनिपुङ्‍गव ॥ १४ ॥

यज्ञोपसदनं ब्रह्मन् प्राप्तोऽसि मुनिभिः सह ।
'आज पूज्य चरणांच्या दर्शनाने मी यज्ञाचे फल प्राप्त केले आहे. ब्रह्मन् ! आपण मुनिंमध्ये श्रेष्ठ आहात. आपण इतक्या महर्षिंच्या बरोबर यज्ञ मंडपात पदार्पण केले आहे त्यामुळे मी धन्य झालो आहे. हा माझ्यावर आपला फार मोठा अनुग्रह आहे. ॥ १४ १/२ ॥
द्वादशाहं तु ब्रह्मर्षे दीक्षामाहुर्मनीषिणः ॥ १५ ॥

ततो भागार्थिनो देवान् द्रष्टुमर्हसि कौशिक ।
'ब्रह्मर्षि ! मनीषी ऋत्विजांचे सांगणे आहे की 'माझ्या यज्ञ दीक्षेचे बारा दिवसच शेष राहिले आहेत. म्हणून कुशिकनन्दन ! बारा दिवसानंतर येथे भाग ग्रहण करण्यासाठी येणार्‍या देवतांचे दर्शन आपण करावे.' ॥ १५ १/२ ॥
इत्युक्त्वा मुनिशार्दूलं प्रहृष्टवदनस्तदा ॥ १६ ॥

पुनस्तं परिपप्रच्छ प्राञ्जलिः प्रयतो नृपः ।
मुनिवर विश्वामित्रांना असे सांगून त्यावेळी प्रसन्नमुख झालेला जितेंद्रिय राजा जनक याने पुन्हा हात जोडून विचारले - ॥ १६ १/२ ॥
इमौ कुमारौ भद्रं ते देवतुल्यपराक्रमौ ॥ १७ ॥

गजतुल्यगती वीरौ शार्दूलवृषभोपमौ ।
पद्मपत्रविशालाक्षौ खड्गतूणीधनुर्धरौ ।
अश्विनाविव रूपेण समुपस्थितयौवनौ ॥ १८ ॥

यदृच्छयेव गां प्राप्तौ देवलोकादिवामरौ ।
कथं पद्‍भ्यामिह प्राप्तौ किमर्थं कस्य वा मुने ॥ १९ ॥

वरायुधधरौ वीरौ कस्य पुत्रौ महामुने ।
भूषयन्ताविमं देशं चन्द्रसूर्यविवाम्बरम् ॥ २० ॥

परस्परस्य सदृशौ प्रमाणेङ्‌गितचेष्टितैः ।
काकपक्षधरौ वीरौ श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ २१ ॥
'महामुने ! आपले कल्याण होवो ! देवतांप्रमाणे पराक्रमी आणि सुंदर आयुधे धारण केलेले हे दोन्ही वीर राजकुमार, जे हत्तीप्रमाणे मंदगतिने चालत आहेत; सिंह आणि वृषभ यांच्यासारखे भासत आहेत; प्रफुल्ल कमलदलाप्रमाणे सुशोभित आहेत; तलवार, भाता आणि धनुष्य धारण केलेले आहेत; आपल्या मनोहर रूपाने जे अश्विनीकुमारांनाही लज्जित करीत आहेत; ज्यांनी नुकताच यौवनांत प्रवेश केला आहे; तसेच ते स्वेच्छानुसार देवलोकातून उतरून पृथ्वीवर आलेल्या दोन देवतांप्रमाणेच भासत आहेत, ते कुणाचे पुत्र आहेत ? आणि येथे कसे, कशासाठी अथव कोणत्या उद्देशाने पायीच आले आहेत ? ज्याप्रमाणे चंद्रमा आणि सूर्य आकाशाची शोभा वाढवित असतात, त्याप्रकारे हे आपल्या उपस्थितीने या देशाला विभूषित करीत आहेत. हे दोघे एकमेकांशी खूप मिळते जुळते आहेत. यांच्या शरीराची उंची, संकेत, वर्तणूक प्रायः एकसारखीच आहे. मी या दोन काकपक्षधारी वीरांचा परिचय आणि वृत्तांत यथार्थरूपाने ऐकू इच्छितो." ॥ १७-२१ ॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा जनकस्य महात्मनः ।
न्यवेदयदमेयात्मा पुत्रौ दशरथस्य तौ ॥ २२ ॥
महात्मा जनकांचा हा प्रश्न ऐकून अमित आत्मबलाने संपन्न विश्वामित्रांनी म्हटले - "राजन् ! हे दोघे महाराज दशरथांचे पुत्र आहेत." ॥ २२ ॥
सिद्धाश्रमनिवासं च राक्षसानां वधं तथा ।
तत्रागमनमव्यग्रं विशालायाश्च दर्शनम् ॥ २३ ॥
अहल्यादर्शनं चैव गौतमेन समागमम् ।
महाधनुषि जिज्ञासां कर्तुमागमनं तथा ॥ २४ ॥
त्यानंतर त्यांनी त्या दोघांचा सिद्धाश्रमात निवास, राक्षसांचा वध, जराही न कचरता मिथिलेपर्यंत आगमन, विशालापुरीचे दर्शन, अहल्येचा साक्षात्कार आणि महर्षि गौतमांबरोबर समागम आदिंचे विस्तारपूर्वक वर्णन केले. शेवटी हेही सांगितले की 'हे आपल्या येथे ठेवलेल्या महान् धनुष्यासंबंधी काही जाणून घेण्याच्या इच्छेने येथेपर्यंत आले आहेत.' ॥ २३-२४ ॥
एतत् सर्वं महातेजा जनकाय महात्मने ।
निवेद्य विररामाथ विश्वामित्रो महामुनिः ॥ २५ ॥
महात्मा राजा जनकांना या सर्व गोष्टी निवेदन करून महातेजस्वी महामुनि विश्वामित्र गप्प झाले. ॥ २५ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चाशः सर्गः ॥ ५० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा पन्नासावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP