|
| श्रीरामलक्ष्मणाभ्यां भूयः सीतायाः अन्वेषणं, श्रीरामस्य शोकोद्गारो मृगेभ्यः संकेतं प्राप्य द्वयोर्भ्रात्रोर्दक्षिणदिशां प्रति गमनम्, पर्वताय क्रोधः, सीताया विकीर्णानि पुष्पाणि भूषणानां कणान् युद्धस्य चिह्नानि चावलोक्य श्रीरामेण देवादिसहितां त्रिलोकीं प्रति स्वस्य रोषस्य प्रकटनम् - 
 | श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या द्वारा सीतेचा शोध, श्रीरामांचे शोकोद्गार, मृगांच्या द्वारा संकेत मिळून दोन्ही भावांचे दक्षिण दिशेकडे जाणे, पर्वतावर क्रोध, सीतेची विखरलेली फुले, आभूषणांचे कण आणि युद्धांची चिन्हे पाहून श्रीरामांचा देवता आदि- सहित समस्त त्रैलोक्यावर रोष प्रकट करणे - | 
| स दीनो दीनया वाचा लक्ष्मणं वाक्यमब्रवीत् । शीघ्रं लक्ष्मण जानीहि गत्वा गोदावरीं नदीम् ॥ १ ॥
 
 अपि गोदावरीं सीता पद्मान्यानयितुं गता ।
 
 | त्यानंतर दीन झालेल्या श्रीरामांनी दीन वाणीने लक्ष्मणास म्हटले- लक्ष्मणा ! तू शीघ्रच गोदावरी नदीच्या तटावर जाऊन पत्ता लाव. सीता कमळे आणण्यासाठी तर निघून गेली नाही ना ? ॥१ १/२॥ | 
| एवमुक्तस्तु रामेण लक्ष्मणः पुनरेव हि ॥ २ ॥ 
 नदीं गोदावरीं रम्यां जगाम लघुविक्रमः ।
 
 | श्रीरामांची अशी आज्ञा मिळताच लक्ष्मण शीघ्र गतीने पुन्हा रमणीय गोदावरी नदीच्या तटावर गेले. ॥२ १/२॥ | 
| तां लक्ष्मणस्तीर्थवतीं विचित्वा राममब्रवीत् ॥ ३ ॥ 
 नैनां पश्यामि तीर्थेषु क्रोशतो न शृणोति मे ।
 
 | अनेक तीर्थांनी (घाटांनी) युक्त गोदावरीच्या तटावर शोध घेऊन लक्ष्मण पुन्हा परत आले आणि श्रीरामांना म्हणाले - मी गोदावरीच्या घाटावर सीतेला पाहिले परंतु ती तिथे दिसली नाही. मी मोठमोठ्याने हाका मारल्या पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. ॥३ १/२॥ | 
| कं नु सा देशमापन्ना वैदेही क्लेशनाशिनी ॥ ४ ॥ 
 न हि तं वेद्मि वै राम यत्र सा तनुमध्यमा ।
 
 | श्रीरामा ! क्लेशांचा नाश करणारी वैदेही न जाणो कुठल्या देशात निघून गेली आहे. श्रीरामा ! जेथे तनुमध्यमा सीता गेली आहे त्या स्थानास मी जाणत नाही. ॥४ १/२॥ | 
| लक्ष्मणस्य वचः श्रुत्वा दीनः सन्तापमोहितः ॥ ५ ॥ 
 रामः समभिचक्राम स्वयं गोदावरीं नदीम् ।
 
 | लक्ष्मणाचे हे बोलणे ऐकून दीन आणि संतापाने मोहित झालेले श्रीराम स्वतःच गोदावरी नदीच्या तटावर गेले. ॥५ १/२॥ | 
| स तामुपस्थितो रामः क्व सीतेत्येवमब्रवीत् ॥ ६ ॥ 
 भूतानि राक्षसेन्द्रेण वधार्हेण हृतामपि ।
 न तां शशंसू रामाय तथा गोदावरी नदी ॥ ७ ॥
 
 | तेथे पोहोचून रामांनी विचारले - सीता कोठे आहे ? परंतु वधास योग्य राक्षसराज रावण द्वारा हरली गेलेल्या सीतेच्या विषयी समस्त भूतांपैकी कुणीही काहीही सांगितले नाही. गोदावरी नदीनेही श्रीरामांना काही उत्तर दिले नाही. ॥६-७॥ | 
| ततः प्रचोदिता भूतैः शंस चास्मै प्रियामिति । न च सा ह्यवदत् सीतां पृष्टा रामेण शोचता ॥ ८ ॥
 
 | त्यानंतर वनातील समस्त प्राण्यांनी तिला प्रेरित केले की तू श्रीरामांना त्यांच्या प्रियेचा पत्ता सांग. परंतु शोकमग्न श्रीरामांनी विचारल्यावरही गोदावरीने सीतेचा पत्ता सांगितला नाही. ॥८॥ | 
| रावणस्य च तद्रूपं कर्माणि च दुरात्मनः । ध्यात्वा भयात् तु वैदेहीं सा नदी न शशंस ह ॥ ९ ॥
 
 | दुरात्मा रावणाचे ते रूप आणि त्याचे कर्म आठवून भयामुळे गोदावरी नदीने वैदेहीच्या विषयी श्रीरामास काही सांगितले नाही. ॥९॥ | 
| निराशस्तु तया नद्या सीताया दर्शने कृतः । उवाच रामः सौमित्रिं सीतादर्शनकर्शितः ॥ १० ॥
 
 | सीतेच्या दर्शनाविषयी जेव्हा नदीने त्यांना पूर्ण निराश केले तेव्हा सीता न दिसल्याने कष्टी झालेल्या श्रीरामांनी लक्ष्मणास याप्रकारे म्हटले- ॥१०॥ | 
| एषा गोदावरी सौम्य किञ्चिन्न प्रतिभाषते । किन्नु लक्ष्मण वक्ष्यामि समेत्य जनकं वचः ॥ ११ ॥
 
 मातरं चैव वैदेह्या विना तामहमप्रियम् ।
 
 | सौम्य लक्ष्मणा ! ही गोदावरी नदी तर मला काही उत्तरच देत नाही. आता मी राजा जनकांना भेटल्यावर त्यांना काय उत्तर देऊं ? जानकीशिवाय तिची माता भेटल्यावर मी त्यांना ही अप्रिय गोष्ट कशी ऐकवूं ? ॥११ १/२॥ | 
| या मे राज्यविहीनस्य वने वन्येन जीवतः ॥ १२ ॥ 
 सर्वं व्यपानयेच्छोकं वैदेही क्व नु सा गता ।
 
 | राज्यहीन होऊन वनात जंगली फळा-मूळांनी निर्वाह करते समयी ही जी माझ्या बरोबर राहून माझ्या सर्व दुःखाना दूर करीत होती ती वैदेही कोठे निघून गेली ? ॥१२ १/२॥ | 
| ज्ञातिवर्गविहीनस्य वैदेहीमप्यपश्यतः ॥ १३ ॥ 
 मन्ये दीर्घा भविष्यन्ति रात्रयो मम जाग्रतः ।
 
 | बंधु-बांधवांबरोबर तर माझा वियोग झालाच होता. आता सीतेच्या दर्शनापासूनही मला वञ्चित व्हावे लागले आहे. तिच्या चिंतेत निरंतर जागत राहिल्या कारणामुळे आता माझ्या सर्व रात्री फारच मोठ्या होऊन जातील. ॥१३ १/२॥ | 
| मन्दाकिनीं जनस्थानमिमं प्रस्रवणं गिरिम् ॥ १४ ॥ 
 सर्वाण्यनुचरिष्यामि यदि सीता हि लभ्यते ।
 
 | मंदाकिनी नदी, जनस्थान तसेच प्रस्त्रवण पर्वत- या सर्व स्थानी मी वारंवार भ्रमण करीन. कदाचित् तेथे सीतेचा पत्ता लागू शकेल. ॥१४ १/२॥ | 
| एते महामृगा वीर मामीक्षन्ते पुनः पुनः ॥ १५ ॥ 
 वक्तुकामा इह हि मे इङ्गितान्युपलक्षये ।
 
 | वीर लक्ष्मणा ! हे विशाल मृग माझ्याकडे वारंवार पहात राहिले आहेत. जणु येथे ते मला काही सांगू इच्छित आहेत. मला त्यांचे प्रयत्न समजून येत आहेत. ॥१५ १/२॥ | 
| तांस्तु दृष्ट्वा नरव्याघ्रो राघवः प्रत्युवाच ह ॥ १६ ॥ 
 क्व सीतेति निरीक्षन् वै बाष्पसंरुद्धया गिरा ।
 एवमुक्ता नरेन्द्रेण ते मृगाः सहसोत्थिताः ॥ १७ ॥
 
 दक्षिणाभिमुखाः सर्वे दर्शयन्तो नभःस्थलम् ।
 
 | त्यानंतर त्या सर्वांकडे पाहून पुरुषसिंह राघवांनी त्यांना म्हटले- सांगा सीता कोठे आहे ? त्या मृगांच्याकडे पाहात राजा रामांनी जेव्हा अश्रु गद्गद् वाणीने याप्रकारे विचारले, तेव्हा ते मृग एकाएकी उठून उभे राहिले आणि वरील बाजूस आकाशमार्गाकडे लक्ष्य करवून सर्वच्या सर्व दक्षिण दिशेकडे तोंड करून धावू लागले. ॥१६-१७ १/२॥ | 
| मैथिली ह्रियमाणा सा दिशं यामभ्यपद्यत ॥ १८ ॥ 
 तेन मार्गेण गच्छन्तो निरीक्षन्ते नराधिपम् ।
 
 | मैथिली सीता हरली जाऊन ज्या दिशेकडे नेली गेली होती, त्याच दिशेच्या मार्गाने जात ते मृग राजा श्रीरामचंद्रांकडे वळून वळून पाहात राहिले होते. ॥१८ १/२॥ | 
| येन मार्गं च भूमिं च निरीक्षन्ते स्म ते मृगाः ॥ १९ ॥ 
 पुनर्नदन्तो गच्छन्ति लक्ष्मणेनोपलक्षिताः ।
 तेषां वचनसर्वस्वं लक्षयामास चेङ्गितम् ॥ २० ॥
 
 | ते मृग आकाशमार्ग आणि भूमी दोन्हीकडे पाहात आणि गर्जना करीत पुन्हा पुढे जात होते. लक्ष्मणांनी त्यांची ही कृती लक्षपूर्वक पाहिली. ते जे काही सांगू इच्छित होते त्याचे सार सर्वस्वरूप त्यांची जी कृती होती तिला त्यांनी उत्तमप्रकारे जाणून घेतले. ॥१९-२०॥ | 
| उवाच लक्ष्मणो धीमाञ्ज्येष्ठं भ्रातरमार्तवत् । क्व सीतेति त्वया पृष्टा यथेमे सहसोत्थिताः ॥ २१ ॥
 
 दर्शयन्ति क्षितिं चैव दक्षिणां च दिशं मृगाः ।
 साधु गच्छावहे देव दिशमेतां हि नैर्ऋतिम् ॥ २२ ॥
 
 यदि तस्यागमः कश्चिदार्या वा साथ लक्ष्यते ।
 
 | त्यानंतर बुद्धिमान् लक्ष्मणानी आर्त झाल्यासारखे होऊन आपले मोठे भाऊ श्रीराम यांना याप्रकारे म्हटले- आर्य ! जेव्हा आपण विचारलेत की सीता कोठे आहे, तेव्हा हे मृग एकाएकी उठून उभे राहिले आणि पृथ्वी तसेच दक्षिण दिशेकडे आपले लक्ष्य वेधून घेऊ लागले म्हणून देवा ! हेच बरे होईल की आपण या नैऋत्य दिशेकडे जावे. संभव आहे, इकडे जाण्याने सीतेचा काही समाचार मिळेल अथवा आर्या सीता स्वयं दृष्टीगोचर होईल. ॥२१-२२ १/२॥ | 
| बाढमित्येव काकुत्स्थः प्रस्थितो दक्षिणां दिशम् ॥ २३ ॥ 
 लक्ष्मणानुगतः श्रीमान् वीक्षमाणो वसुंधराम् ।
 
 | तेव्हा फार चांगले असे म्हणून श्रीमान् काकुत्स्थ राम लक्ष्मणास घेऊन पृथ्वीकडे लक्षपूर्वक पहात दक्षिण दिशेकडे जाण्यास निघाले. ॥२३ १/२॥ | 
| एवं संभाषमाणौ तौ अन्योन्यं भ्रातरावुभौ ॥ २४ ॥ 
 वसुंधरायां पतितपुष्पमार्गमपश्यताम् ।
 
 | ते दोघे बंधु आपसात या प्रकारे बोलत असता अशा मार्गावर जाऊन पोहोंचले, जेथे जमिनीवर कांही फुले पडलेली दिसून येत होती. ॥२४ १/२॥ | 
| पुष्पवृष्टिं निपतितां दृष्ट्वा रामो महीतले ॥ २५ ॥ 
 उवाच लक्ष्मणं वीरो दुःखितो दुःखितं वचः ।
 
 | पृथ्वीवरील ती पुष्पांची वृष्टी पांहून वीर श्रीरामांनी दुःखी होऊन लक्ष्मणास हे दुःखाने भरलेले वचन बोलले- ॥२५ १/२॥ | 
| अभिजानामि पुष्पाणि तानीमानीह लक्ष्मण ॥ २६ ॥ 
 अपिनद्धानि वैदेह्या मया दत्तानि कानने ।
 
 | लक्ष्मणा ! मी या फुलांना ओळखतो. जी फुले मी वनात वैदेहीला दिली होती आणि जी तिने आपल्या केसात गुंफली होती तीच ही फुले आहेत. ॥२६ १/२॥ | 
| मन्ये सूर्यश्च वायुश्च मेदिनी च यशस्विनी ॥ २७ ॥ 
 अभिरक्षन्ति पुष्पाणि प्रकुर्वन्तो मम प्रियम् ।
 
 | मी असे समजतो आहे की सूर्य, वायु आणि यशस्विनी पृथ्वी यांनी माझे प्रिय करण्यासाठीच ही फुले सुरक्षित ठेवली आहेत. ॥२७ १/२॥ | 
| एवमुक्त्वा महाबाहुर्लक्ष्मणं पुरुषर्षभः ॥ २८ ॥ 
 उवाच रामो धर्मात्मा गिरिं प्रस्रवणाकुलम् ।
 
 | पुरुषप्रवर लक्ष्मणास असे बोलून धर्मात्मा महाबाहु श्रीरामांनी निर्झरांनी भरलेल्या प्रस्त्रवण गिरीला म्हटले- ॥२८ १/२॥ | 
| कच्चित् क्षितिभृतां नाथ दृष्टा सर्वाङ्गसुन्दरी ॥ २९ ॥ 
 रामा रम्ये वनोद्देशे मया विरहिता त्वया ।
 
 | पर्वतराज ! काय तुम्ही या वनाच्या रमणीय प्रदेशांत माझा वियोग झालेल्या सर्वांग सुंदर रमणी सीतेला पाहिले आहे ? ॥२९ १/२॥ | 
| क्रुद्धोऽब्रवीद् गिरिं तत्र सिंहः क्षुद्रमृगं यथा ॥ ३० ॥ 
 तां हेमवर्णां हेमांगीं सीतां दर्शय पर्वत ।
 यावत् सानूनि सर्वाणि न ते विध्वंसयाम्यहम् ॥ ३१ ॥
 
 | त्यानंतर ज्याप्रमाणे सिंह छोट्या मृगास पाहून गर्जना करू लागतो, त्याप्रमाणे ते कुपित होऊन तेथे त्या पर्वतास म्हणाले- पर्वता ! जो पर्यंत मी तुझ्या सार्या शिखरांना विध्वंस करून टाकीत नाही, त्यापूर्वीच तू त्या काञ्चनासारखी काया कांति असलेल्या सीतेचे दर्शन मला करव. ॥३०-३१॥ | 
| एवमुक्तस्तु रामेण पर्वतो मैथिलीं प्रति । दशयन्नि तां सीतां नादर्शयत राघवे ॥ ३२ ॥
 
 | श्रीरामांच्या द्वारे मैथिली विषयी असे सांगितले गेल्यावर त्या पर्वताने सीतेला दाखवीत असल्याप्रमाणे काही चिन्ह प्रकट केले. पण राघवासमीप तो सीतेला साक्षात् उपस्थित करू शकला नाही. ॥३२॥ | 
| ततो दाशरथी राम उवाच च शिलोच्चयम् । मम बाणाग्निनिर्दग्धो भस्मीभूतो भविष्यसि ॥ ३३ ॥
 
 असेव्यः सर्वतश्चैव निस्तृणद्रुमपल्लवः ।
 
 | तेव्हा दशरथनंदन श्रीरामांनी त्या पर्वतास म्हटले- अरे ! तू माझ्या बाणांच्या आगीने भस्मीभूत होऊन जाशील. कुठल्याही बाजूने तू सेवन करण्यायोग्य राहाणार नाही. तुझे तृण, वृक्ष आणि पल्लव नष्ट होऊन जातील. ॥३३ १/२॥ | 
| इमां वा सरितं चाद्य शोषयिष्यामि लक्ष्मण ॥ ३४ ॥ 
 यदि नाख्याति मे सीतामद्य चन्द्रनिभाननाम् ।
 
 | (त्यानंतर ते लक्ष्मणास म्हणाले-) लक्ष्मणा ! जर आज ही नदी मला चंद्रमुखी सीतेचा पत्ता सांगत नसेल तर मी आता हिला सुकवून टाकीन. ॥३४ १/२॥ | 
| एवं प्ररुषितो रामो दिधक्षन्निव चक्षुषा ॥ ३५ ॥ 
 ददर्श भूमौ निष्क्रान्तं राक्षसस्य पदं महत् ।
 
 | असे म्हणून रागावलेल्या रामांनी तिच्याकडे अशा प्रकारे पाहिले की जणु आपल्या दृष्टि द्वारा जाळून भस्म करू इच्छित आहेत. इतक्यातच तो पर्वत आणि गोदावरीच्या समीपच्या भूमीवर राक्षसाचे विशाल पदचिन्ह उठलेले दिसून आले. ॥३५ १/२॥ | 
| त्रस्ताया रामकाङ्क्षिण्याः प्रधावन्त्या इतस्ततः ॥ ३६ ॥ 
 राक्षसेनानुसृप्ताया वैदेह्याश्च पदानि तु ।
 
 | त्याच बरोबर राक्षसाने जिचा पाठलाग केला होता आणि जी श्रीरामाची अभिलाषा ठेवून रावणाच्या भयाने संत्रस्त होऊन इकडे तिकडे धावली होती त्या वैदेही सीतेची चरणचिन्हे ही तेथे दिसून आली. ॥३६ १/२॥ | 
| स समीक्ष्य परिक्रान्तं सीताया राक्षसस्य च ॥ ३७ ॥ 
 भग्नं धनुश्च तूणी च विकीर्णं बहुधा रथम् ।
 संभ्रान्तहृदयो रामः शशंस भ्रातरं प्रियम् ॥ ३८ ॥
 
 | सीता आणि राक्षसाच्या पावलांच्या खुणा, तुटलेले धनुष्य, भाता आणि छिन्नभिन्न होऊन अनेक तुकड्यात विखुरलेला रथ पाहून श्रीरामांचे हृदयात धस्स झाले. ते आपला प्रिय भ्राता लक्ष्मण यांस म्हणाले- ॥३७-३८॥ | 
| पश्य लक्ष्मण वैदेह्या कीर्णाः कनकबिन्दवः । भूषणानां हि सौमित्रे माल्यानि विविधानि च ॥ ३९ ॥
 
 | लक्ष्मणा ! पहा, हे सीतेच्या आभूषणात जडविलेले सोन्याचे घुंघुर विखरून पडले आहेत. सौमित्र ! तिचे नाना प्रकारचे हार ही तुटून पडले आहेत. ॥३९॥ | 
| तप्तबिन्दुनिकाशैश्च चित्रैः क्षतजबिन्दुभिः । आवृतं पश्य सौमित्रे सर्वतो धरणीतलम् ॥ ४० ॥
 
 | सौमित्रा ! पहा, येथील भूमी सर्व बाजूनी सुवर्णाच्या ठिपक्याप्रमाणेच विचित्र रक्तबिंदुनी रंगलेली दिसून येत आहे. ॥४०॥ | 
| मन्ये लक्ष्मण वैदेही राक्षसैः कामरूपिभिः । भित्त्वा भित्त्वा विभक्ता वा भक्षिता वा भविष्यति ॥ ४१ ॥
 
 | लक्ष्मणा ! मला तर असे कळून येत आहे की इच्छेनुसार रूप धारण करणार्या राक्षसांनी येथे सीतेचे तुकडे तुकडे करून ते आपसात वाटले असावे आणि खाऊन टाकले असावेत. ॥४१॥ | 
| तस्या निमित्तं सीताया द्वयोर्विवदमानयोः । बभूव युद्धं सौमित्रे घोरं राक्षसयोरिह ॥ ४२ ॥
 
 | सौमित्रा ! सीतेसाठी परस्परात विवाद करणार्या दोन राक्षसामध्ये येथे घोर युद्ध ही झालेले आहे. ॥४२॥ | 
| मुक्तामणिचितं चेदं रमणीयं विभूषितम् । धरण्यां पतितं सौम्य कस्य भग्नं महद् धनुः ॥ ४३ ॥
 
 | सौम्या ! म्हणून तर येथे मोती आणि मणि यांनी जडविलेले आणि विभूषित केलेले कोणाचे तरी अत्यंत सुंदर आणि विशाल धनुष्य खण्डित होऊन पृथ्वीवर पडले आहे. हे कोणाचे धनुष्य असू शकेल ? ॥४३॥ | 
| राक्षासानामिदं वत्स सुराणामथवापि वा । तरुणादित्यसंकाशं वैदूर्यगुलिकाचितम् ॥ ४४ ॥
 
 | वत्सा ! पत्ता नाही, हे राक्षसांचे आहे की देवतांचे आहे, हे प्रातः कालच्या सूर्याप्रमाणे प्रकाशित होत आहे तसेच यात वैडूर्यमण्याचे तुकडे ही जडविलेले आहेत. ॥४४॥ | 
| विशीर्णं पतितं भूमौ कवचं कस्य काञ्चनम् । छत्रं शतशलाकं च दिव्यमाल्योपशोभितम् ॥ ४५ ॥
 
 भग्नदण्डमिदं सौम्य भूमौ कस्य निपातितम् ।
 
 | सौम्या ! इकडे पृथ्वीवर एक सोन्याचे तुटलेले कवचही पडलेले आहे. न जाणो हे कोणाचे आहे ? ह्याचा दांडा तुटला आहे आणि हे जमिनीवर पाडले गेलेले आहे. ॥४५ १/२॥ | 
| काञ्चनोरश्छदाश्चेमे पिशाचवदनाः खराः ॥ ४६ ॥ 
 भीमरूपा महाकायाः कस्य वा निहता रणे ।
 
 | इकडे ही पिशाच्चा समान मुख असणारी भयंकर रूप असणारी गाढवे मरून पडली आहेत. यांची शरीरे फारच विशाल आहेत आणि या सर्वांच्या छातीवर सोन्याची कवचे बांधलेली आहेत. ही युद्धात मारली गेलेली दिसून येत आहेत. कळत नाही ही कोणाची होती ? ॥४६ १/२॥ | 
| दीप्तपावकसंकाशो द्युतिमान् समरध्वजः ॥ ४७ ॥ 
 अपविद्धश्च भग्नश्च कस्य साङ्ग्रामिको रथः ।
 
 | तसेच संग्रामात उपयोगी पडणारा हा कुणाचा रथ पडला आहे ? याला कुणीतरी उलटा पाडून तोडून टाकला आहे. समरांगणात स्वामीला सूचित करणारी ध्वजा ही यामध्ये लावलेली आहे. हा तेजस्वी रथ प्रज्वलित अग्नीप्रमाणे चमकत आहे. ॥४७ १/२॥ | 
| रथाक्षमात्रा विशिखास्तपनीयविभूषणाः ॥ ४८ ॥ 
 कस्येमे निहता बाणाः प्रकीर्णा घोरदर्शनाः ।
 
 | हे भयंकर बाण जे तुकडे तुकडे होऊन विखरून पडलेले आहेत, ते कोणाचे आहेत ? यांची लांबी रूंदी रथाच्या धुरेसमान प्रतीत होत आहे. यांचे फल-भाग तुटून गेले आहेत तसेच हे सुवर्णाने विभूषित आहेत. ॥४८ १/२॥ | 
| शरावरौ शरैः पूर्णौ विध्वस्तौ पश्य लक्ष्मण ॥ ४९ ॥ 
 प्रतोदाभीषुहस्तोऽयं कस्य वा सारथिर्हतः ।
 
 | लक्ष्मणा ! इकडे पहा, हे बाणांनी भरलेले दोन भाते पडलेले आहेत जे नष्ट केले गेले आहेत. हा कोणाचा सारथी मरून पडला आहे ज्याच्या हातात चाबुक आणि लगाम अद्यापपर्यंत विद्यमान आहेत. ॥४९ १/२॥ | 
| पदवी पुरुषस्यैषा व्यक्तं कस्यापि रक्षसः ॥ ५० ॥ 
 वैरं शतगुणं पश्य मम तैर्जीवितान्तकम् ।
 सुघोरहृदयैः सौम्य राक्षसैः कामरूपिभिः ॥ ५१ ॥
 
 | सौम्या ! हे नक्कीच कोणा राक्षसाचे पदचिन्ह दिसून येत आहे. या अत्यंत क्रूर हृदय असणार्या कामरूपी राक्षसां बरोबरचे माझे वैर आता शंभरपट वाढले आहे. पहा, हे वैर त्यांचे प्राण घेऊनच आता शांत होईल. ॥५०-५१॥ | 
| हृता मृता वा वैदेही भक्षिता वा तपस्विनी । न धर्मस्त्रायते सीतां ह्रियमाणां महावने ॥ ५२ ॥
 
 | अवश्य ही तपस्विनी वैदेही हरली गेली आहे, मृत्युला प्राप्त झाली आहे अथवा राक्षसांनी तिला खाऊन टाकले आहे. या विशाल वनात हरल्या जाणार्या सीतेचे रक्षण धर्मही करत नाही आहे. ॥५२॥ | 
| भक्षितायां हि वैदेह्यां हृतायामपि लक्ष्मण । के हि लोके प्रियं कर्तुं शक्ताः सौम्य ममेश्वराः ॥ ५३ ॥
 
 | सौम्य लक्ष्मणा ! जेव्हा वैदेही राक्षसांचा ग्रास बनली अथवा त्यांच्या द्वारा हरली गेली आणि कोणी सहाय्य केले नाही तेव्हा या जगतात असा कोण पुरुष आहे की जो माझे प्रिय करण्यास समर्थ असेल ? ॥५३॥ | 
| कर्तारमपि लोकानां शूरं करुणवेदिनम् । अज्ञानादवमन्येरन् सर्वभूतानि लक्ष्मण ॥ ५४ ॥
 
 | लक्ष्मणा ! जे समस्त लोकांची सृष्टी, पालन आणि संहार करणारे त्रिपुर- विजय आदि शौर्याने संपन्न महेश्वर आहेत, तेही जर आपल्या करूणामय स्वभावामुळे गप्प बसून राहात आहेत, तर सारे प्राणी त्यांचे ऐश्वर्य न जाणल्याने त्यांचा तिरस्कार करू लागतील. ॥५४॥ | 
| मृदुं लोकहिते युक्तं दान्तं करुणवेदिनम् । निर्वीर्य इति मन्यन्ते नूनं मां त्रिदशेश्वराः ॥ ५५ ॥
 
 | मी लोकहितात तत्पर, युक्तचित्त, जितेन्द्रिय तसेच जीवांच्यावर करूणा करणारा आहे, म्हणून हे इंद्र आदि देवेश्वर निश्चितच मला निर्बल मानीत आहेत. (म्हणून तर त्यांनी सीतेचे रक्षण केले नाही) ॥५५॥ | 
| मां प्राप्य हि गुणो दोषः संवृत्तः पश्य लक्ष्मण । अद्यैव सर्वभूतानां रक्षसामभवाय च ॥ ५६ ॥
 
 संहृत्यैव शशिज्योत्स्नां महान् सूर्य इवोदितः ।
 संहृत्यैव गुणान् सर्वान् मम तेजः प्रकाशते ॥ ५७ ॥
 
 | लक्ष्मणा ! पहा तर खरे, ही दयाळुवृत्ती आदि गुण माझ्याजवळ येऊन दोष बनले आहेत. (म्हणून तर मला निर्बल मानून माझ्या स्त्रीचे अपहरण केले गेले आहे, म्हणून आता मला पुरुषार्थच प्रकट केला पाहिजे.) ज्या प्रमाणे प्रलयकारी उदित झालेला महान् सूर्य चंद्रम्याच्या ज्योत्स्नेचा संहार करून प्रचण्ड तेजाने प्रकाशित होऊन राहातो, त्या प्रकारे आता माझे तेज आजच समस्त प्राणी तसेच राक्षसांचा अंत करण्यासाठी, माझ्या या कोमल स्वभाव आदि गुणांना नष्ट करून प्रचण्डरूपात प्रकाशित होईल, हे तू ही पहा. ॥५६-५७॥ | 
| नैव यक्षा न गन्धर्वा न पिशाचा न राक्षसाः । किन्नरा वा मनुष्या वा सुखं प्राप्स्यन्ति लक्ष्मण ॥ ५८ ॥
 
 | लक्ष्मणा ! आता हे यक्ष, गंधर्व, पिशाच्च, राक्षस, किन्नर आणि मनुष्य यापैकी कुणीही सुखाने राहू शकणार नाही. ॥५८॥ | 
| ममास्त्रबाणसंपूर्णमाकाशं पश्य लक्ष्मण । असम्पातं करिष्यामि ह्यद्य त्रेलोक्यचारिणाम् ॥ ५९ ॥
 
 | सुमित्रानंदन ! आता तू पहाच. थोड्याच वेळात आकाशातील तीन्ही लोकांना नी बाणांनी असे भरून टाकीन की तिन्ही लोकांतील सर्व प्राणी जागच्या जागी खिळून जातील. कोणालाही तसूभरही हलता येणार नाही ॥ ५९ ॥ | 
| संनिरुद्धग्रहणमावारितनिशाकरम् । विप्रनष्टानलमरुद्भास्करद्युतिसंवृतम् ॥ ६० ॥
 
 विनिर्मथितशैलाग्रं शुष्यमाणजलाशयम् ।
 ध्वस्तद्रुमलतागुल्मं विप्रणाशितसागरम् ॥ ६१ ॥
 
 त्रैलोक्यं तु करिष्यामि संयुक्तं कालकर्मणा ।
 
 | ग्रहांची गति थांबून जाईल, चंद्रमा लपून जाईल, अग्नि, मरूद्गण तसेच सूर्याचे तेज नष्ट होऊन जाईल. सर्व काही अंधःकाराने झाकून जाईल, पर्वताची शिखरे मथली जातील, सर्व जलाशय सुकून जातील, वृक्ष, लता आणि गुल्म नष्ट होऊन जातील आणि समुद्रांचाही नाश केला जाईल. या प्रकारे मी सर्व त्रैलोक्यात काळाच्या विनाश लीलेस आरंभ करीन. ॥६०- ६१ १/२॥ | 
| न ते कुशलिनीं सीतां प्रदास्यन्ति ममेश्वराः ॥ ६२ ॥ 
 अस्मिन् मुहूर्ते सौमित्रे मम द्रक्ष्यन्ति विक्रमम् ।
 
 | सौमित्र ! जर देवेश्वरगण याच मुहूर्तावर मला सीता देवीस सकुशल परत आणून देणार नाहीत तर ते माझा पराक्रम पहातील. ॥६२ १/२॥ | 
| नाकाशमुत्पतिष्यन्ति सर्वभूतानि लक्ष्मण ॥ ६३ ॥ 
 मम चापगुणोन्मुक्तैर्बाणजालैर्निरन्तरम् ।
 
 | लक्ष्मणा ! माझ्या धनुष्याच्या प्रत्यंचेतून सुटलेल्या बाणसमूहाद्वारा आकाश ठसाठस भरून गेल्याने त्यात कोणीही प्राणी उडू शकणार नाही.॥ ६३ १/२॥ | 
| मर्दितं मम नाराचैर्ध्वस्तभ्रान्तमृगद्विजम् ॥ ६४ ॥ 
 समाकुलममर्यादं जगत् पश्याद्य लक्ष्मण ।
 
 | लक्ष्मणा ! पहा आज माझ्या नाराचांनी ध्वस्त होऊन हे सर्व जगत् व्याकुळ आणि मर्यादारहित होऊन जाईल. येथील मृग आणि पक्षी आदि नष्ट तसेच उद्भ्रान्त होऊन जातील. ॥६४ १/२॥ | 
| आकर्णपूर्णैरिषुभिर्जीवलोकदुरावरैः ॥ ६५ ॥ 
 करिष्ये मैथिलीहेतोरपिशाचमराक्षसम् ।
 
 | धनुष्याला आकर्ण (कानापर्यंत) खेचून सोडले गेलेल्या माझ्या बाणांना अडवणे जीव जगतासाठी फार कठीण होईल. मी सीतेसाठी त्या बाणांच्या द्वारा या जगतातील समस्त पिशाच्चांचा आणि राक्षसांचा संहार करून टाकीन. ॥६५ १/२॥ | 
| मम रोषप्रयुक्तानां सायकानां बलं सुराः ॥ ६६ ॥ 
 द्रक्ष्यन्त्यद्य विमुक्तानाममर्षाद् दूरगामिनाम् ।
 
 | रोष आणि अमर्षपूर्वक सोडल्या गेलेल्या माझ्या फलरहित दूरगामी बाणांचे बळ आज देवतालोक पहातील. ॥६६ १/२॥ | 
| नैव देवा न दैतेया न पिशाचा न राक्षसाः ॥ ६७ ॥ 
 भविष्यन्ति मम क्रोधात् त्रैलोक्ये विप्रणाशिते ।
 
 | माझ्या क्रोधाने त्रैलोक्याचा विनाश झाल्यावर देवता, दैत्य अथवा पिशाच्च, राक्षस यापैकीं कुणीही राहू शकणार नाही. ॥६७ १/२॥ | 
| देवदानवयक्षाणां लोका ये रक्षसामपि ॥ ६८ ॥ 
 बहुधा निपतिष्यन्ति बाणौघैः शकलीकृताः ।
 
 | देवता, दानव, यक्ष आणि राक्षस यांचे जे लोक आहेत ते माझ्या बाणसमूहांनी तुकडे तुकडे होऊन वारंवार खाली पडतील. ॥६८ १/२॥ | 
| निर्मर्यादानिमाँल्लोकान् करिष्याम्यद्य सायकैः ॥ ६९ ॥ 
 हृतां मृतां वा सौमित्रे न दास्यन्ति ममेश्वराः ।
 
 | सौमित्रा ! जर देवेश्वरगण माझ्या हरण झालेल्या अथवा मरून गेलेल्या सीतेला आणून देणार नाहीत तर आज मी आपल्या सायकांच्या माराने या तीन्ही लोकांना मर्यादेपासून भ्रष्ट करून टाकीन. ॥६९ १/२॥ | 
| तथारूपां हि वैदेहीं न दास्यन्ति यदि प्रियाम् ॥ ७० ॥ 
 नाशयामि जगत् सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।
 यावद् दर्शनमस्या वै तापयामि च सायकैः ॥ ७१ ॥
 
 | जर त्यांनी माझ्या प्रिय वैदेहीला मला त्याच रूपात परत केले नाही, तर मी चराचर प्राण्यांसहित समस्त त्रैलोक्याचा नाश करून टाकीन. जो पर्यंत सीतेचे दर्शन होणार नाही तो पर्यंत मी आपल्या सायकांनी समस्त संसारास संतप्त करीत राहीन. ॥७०-७१॥ | 
| इत्युक्त्वा क्रोध ताम्राक्षः स्फुरमाणोष्ठसम्पुटः । वल्कलाजिनमाबद्ध्य जटाभारमबन्धयत् ॥ ७२ ॥
 
 | असे म्हणतांना श्रीरामचंद्रांचे डोळे क्रोधाने लाल झाले, ओठ थरथरू लागले. त्यांनी वल्कल आणि मृगचर्म उत्तम प्रकारे कसून आपल्या जटाभारालाही नीट बांधले. ॥७२॥ | 
| तस्य क्रुद्धस्य रामस्य तथाभूतस्य धीमतः । त्रिपुरं जघ्नुषः पूर्वं रुद्रस्येव बभौ तनुः ॥ ७३ ॥
 
 | त्यासमयी क्रोधाविष्ट होऊन त्या प्रकारे संहारासाठी उद्यत होऊन भगवान् श्रीरामांचे शरीर पूर्वकाळी त्रिपुराचा संहार करणार्या रूद्रासमान प्रतीत होत होते. ॥७३॥ | 
| लक्ष्मणादथ चादाय रामो निष्पीड्य कार्मुकम् । शरमादाय सन्दीप्तं घोरमाशीविषोपमम् ॥ ७४ ॥
 
 सन्धाय धनुषि श्रीमान् रामः परपुरञ्जयः ।
 युगान्ताग्निरिव क्रुद्ध इदं वचनमब्रवीत् ॥ ७५ ॥
 
 | त्या समयी लक्ष्मणाच्या हातातून धनुष्य घेऊन श्रीरामांनी ते दृढतापूर्वक पकडले आणि एक विषधर सर्पासमान भयंकर आणि प्रज्वलित बाण घेऊन तो त्या धनुष्यावर ठेवला. त्यानंतर शत्रुनगरीवर विजय प्राप्त करणारे श्रीराम प्रलयाग्नि प्रमाणे कुपित होऊन याप्रकारे बोलले - ॥७४-७५॥ | 
| यथा जरा यथा मृत्युः यथा कालो यथा विधिः । नित्यं न प्रतिहन्यन्ते सर्वभूतेषु लक्ष्मण ।
 तथाहं क्रोधसंयुक्तो न निवार्योऽस्म्यसंशयम् ॥ ७६ ॥
 
 | लक्ष्मणा ! ज्याप्रमाणे जरा, जसा मृत्यु, जसा काळ आणि जसा विधाता सदा समस्त प्राण्यांच्या वर प्रहार करतात, परंतु त्यांना कोणी रोखू शकत नाही, त्या प्रकारेच निःसंदेह क्रोधाविष्ट झाल्यावर माझेही कोणी निवारण करू शकत नाही. ॥७६॥ | 
| पुरेव मे चारुदतीमनिन्दितां दिशन्ति सीतां यदि नाद्य मैथिलीम् ।
 सदेवगन्धर्वमनुष्यपन्नगं
 जगत् सशैलं परिवर्तयाम्यहम् ॥ ७७ ॥
 
 | जर देवता आदि आज पूर्वीप्रमाणेच मनोहर दात असणार्या अनिंद्य सुंदरी वैदेही सीतेला माझ्याकडे परत देणार नाहीत तर मी देवता, गंधर्व, मनुष्य, नाग आणि पर्वतांसहित सर्व संसारास उलथून टाकीन. ॥७७॥ | 
| इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे चतुःषष्टितमः सर्गः ॥ ६४ ॥ 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा चौसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६४॥ | 
|