श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकोन नवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
इलाबुधयोः समागमः पुरूरवस उत्पत्तिश्च -
बुध आणि इलाचा समागम तसेच पुरुरव्याची उत्पत्ति -
श्रुत्वा किम्पुरुषोत्पत्तिं लक्ष्मणो भरतस्तथा ।
आश्चर्यमिति चाब्रूतां उभौ रामं जनेश्वरम् ॥ १ ॥
किंपुरुषजातिच्या उत्पत्तिचा हा प्रसंग ऐकून लक्ष्मण आणि भरत दोघांनी महाराज श्रीरामांना म्हटले - ही तर फार आश्चर्याची गोष्ट आहे. ॥१॥
अथ रामः कथामेतां भूय एव महायशाः ।
कथयामास धर्मात्मा प्रजापतिसुतस्य वै ॥ २ ॥
त्यानंतर महायशस्वी धर्मात्मा श्रीरामांनी प्रजापति कर्दमांचे पुत्र इलाची ही कथा परत या प्रकारे सांगण्यास आरंभ केला - ॥२॥
सर्वास्ता विहृता दृष्ट्‍वा किन्नरीःब् ऋषिसत्तमः ।
उवाच रूपसम्पन्नां तां स्त्रियं प्रहसन्निव ॥ ३ ॥
त्या सर्व किन्नरी पर्वत किनार्‍याकडे निघून गेल्या. हे पाहून मुनिश्रेष्ठ बुधाने त्या रूपवती स्त्रीला हसत हसत विचारले - ॥३॥
सोमस्याहं सुदयितः सुतः सुरुचिरानने ।
भजस्व मां वरारोहे भक्त्या स्निग्धेन चक्षुषा ॥ ४ ॥
सुमुखि ! मी सोमदेवतेचा परम प्रिय पुत्र आहे. वरारोहे ! मला अनुराग आणि स्नेहपूर्ण दृष्टीने पाहून आपलासा कर. ॥४॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा शून्ये स्वजनवर्जिते ।
इला सुरुचिरप्रख्यं प्रत्युवाच महाप्रभम् ॥ ५ ॥
स्वजनांविरहित त्या शून्य स्थानी बुधाचे हे वचन ऐकून इला त्या परम सुंदर महातेजस्वी बुधाला याप्रकारे बोलली - ॥५॥
अहं कामचरी सौम्य तवास्मि वशवर्तिनी ।
प्रशाधि मां सोमसुत यथेच्छसि तथा कुरु ॥ ६ ॥
सौम्य सोमकुमार ! मी आपल्या इच्छेनुसार विचरण करणारी (स्वतंत्र) आहे, परंतु यासमयी आपल्या आज्ञेच्या अधीन होत आहे, म्हणून मला उचित सेवेसाठी आदेश द्यावा आणि जशी आपली इच्छा असेल तसे करावे. ॥६॥
तस्यास्तदद्‌भुतप्रख्यं श्रुत्वा हर्षमुपागतः ।
स वै कामी सह तया रेमे चन्द्रमसः सुतः ॥ ७ ॥
इलेचे हे अद्‌भुत वचन ऐकून कामासक्त सोमपुत्रांना फार हर्ष झाला. ते तिच्यासह रमण करू लागले. ॥७॥
बुधस्य माधवो मासः तामिलां रुचिराननाम् ।
गतो रमयतोऽत्यर्थं क्षणवत्तस्य कामिनः ॥ ८ ॥
मनोहर मुख असलेल्या इलेबरोबर अतिशय रमण करणार्‍या कामासक्त बुधांचा वैशाख मास एका क्षणासारखा निघून गेला. ॥८॥
अथ मासे तु सम्पूर्णे पूर्णेन्दुसदृशाननः ।
प्रजापतिसुतः श्रीमान् शयने प्रत्यबुध्यत ॥ ९ ॥
एक मास पूर्ण झाल्यावर पूर्ण चंद्र्म्यासमान मनोहर मुख असणारे प्रजापति पुत्र श्रीमान्‌ इल आपल्या शय्येवर जागे झाले. ॥९॥
सोऽपश्यत्सोमजं तत्र तपन्तं सलिलाशये ।
ऊर्ध्वबाहुं निरालम्बं तं राजा प्रत्यभाषत ॥ १० ॥
त्यांनी पाहिले सोमपुत्र बुध तेथे जलाशयात तप करत आहेत. त्यांच्या भुजा वर उचलेल्या आहेत आणि ते निराधार उभे आहेत. त्यासमयी राजाने बुधांना विचारले - ॥१०॥
भगवन्पर्वतं दुर्गं प्रविष्टोऽस्मि सहानुगः ।
न च पश्यामि तत्सैन्यं क्व नु ते मामका गताः ॥ ११ ॥
भगवन्‌ ! मी आपल्या सेवकांसह दुर्गम पर्वतावर आलो होतो, परंतु येथे मला आपली ती सेना दिसून येत नाही. पत्ता नाही, माझे सारे सैनिक कोठे निघून गेले ? ॥११॥
तच्छ्रुत्वा तस्य राजर्षेः नष्टसंज्ञस्य भाषितम् ।
प्रत्युवाच शुभं वाक्यं सान्त्वयन् परया गिरा ॥ १२ ॥
राजर्षि इलची स्त्रीत्व-विषयक स्मृति नष्ट झाली होती. त्यांचे बोलणे ऐकून बुध उत्तम वाणी द्वारा त्यांना सान्त्वना देत हे शुभ वचन बोलले - ॥१२॥
अश्मवर्षेण महता भृत्यास्ते विनिपातिताः ।
त्वं चाश्रमपदे सुप्तो वातवर्षभयार्दितः ॥ १३ ॥
राजन्‌ ! आपले सारे सेवक गारांच्या भारी वृष्टिने मारले गेले. आपणही पाऊस वादळ यांच्या भयाने पीडित होऊन या आश्रमात येऊन झोपून गेलात. ॥१३॥
समाश्वसिहि भद्रं ते निर्भयो विगतज्वरः ।
फलमूलाशनो वीर निवसेह यथासुखम् ॥ १४ ॥
वीरा ! आता आपण धैर्य धारण करा. आपने कल्याण होवो. आपण निर्भय आणि निश्चिंत होऊन फळ-मूळाचा आहार करीत येथे सुखपूर्वक निवास करावा. ॥१४॥
स राजा तेन वाक्येन प्रत्याश्वस्तो महामतिः ।
प्रत्युवाच ततो वाक्यं दीनो भृत्यजनक्षयाद् ॥ १५ ॥
बुधाच्या या वचनांने परम बुद्धिमान्‌ राजा इलला मोठे आश्वासन मिळाले. परंतु आपले सेवक नष्ट झाल्याने ते फार दुःखी होते, म्हणून त्यांना या प्रकारे बोलले- ॥१५॥
त्यक्ष्याम्यहं स्वकं राज्यं नाहं भृत्यैर्विनाकृतः ।
वर्तयेयं क्षणं ब्रह्मन् समनुज्ञातुमर्हसि ॥ १६ ॥
ब्रह्मन्‌ ! मी सेवकांविरहित झाल्यावरही राज्याचा परित्याग करणार नाही. आता क्षणभरही मला येथे राहावणार नाही, म्हणून मला जाण्याची आज्ञा द्यावी. ॥१५॥
सुतो धर्मपरो ब्रह्मन् ज्येष्ठो मम महायशाः ।
शशबिन्दुरिति ख्यातः स मे राज्यं प्रपत्स्यते ॥ १७ ॥
ब्रह्मन्‌ ! माझा धर्म परायण ज्येष्ठ पुत्र मोठे यशस्वी आहेत. त्याचे नाव शराबिंदु आहे. जेव्हा मी तेथे जाऊन त्यांचा अभिषेक करीन तेव्हाच ते माझे राज्य ग्रहण करतील. ॥१७॥
न हि शक्ष्याम्यहं हित्वा भृत्यदारान् सुखान्वितान् ।
प्रतिवक्तुं महातेजः किञ्चिदप्यशुभं वचः ॥ १८ ॥
महातेजस्वी मुने ! देशात जे माझे सेवक आणि स्त्री, पुत्र आदि परिवाराचे लोक सुखाने राहात आहेत; त्यांना सर्वांना सोडून मी येथे राहू शकणार नाही. म्हणून माझ्याशी अशी कुठलीही अशुभ गोष्ट आपण बोलू नये, ज्यायोगे स्वजनांपासून दुरावून मला येथे दुःखपूर्वक राहाण्यासाठी विवश व्हावे लागेल. ॥१८॥
तथा ब्रुवति राजेन्द्रे बुधः परममद्‌भुतम् ।
सान्त्वपूर्वमथोवाच वासस्त इह रोचताम् ॥ १९ ॥

न सन्तापस्त्वया कार्यः कार्दमेय महाबल ।
संवत्सरोषितस्येह कारयिष्यामि ते हितम् ॥ २० ॥
राजेंद्र इलाने असे म्हटल्यावर बुधाने त्यांना सान्त्वना देत अत्यंत अद्‍भुत गोष्ट सांगितली - राजन्‌ ! तू प्रसन्नतापूर्वक येथे राहाणे स्वीकार कर. कर्दमांच्या महाबली पुत्रा ! तूं संताप करता कामा नये. जेव्हा तू एक वर्षपर्यंत येथे निवास करशील तेव्हा मी तुझे हित साधन करीन. ॥१९-२०॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा बुधस्याक्लिष्टकर्मणः ।
वासाय विदधे बुद्धिं यदुक्तं ब्रह्मवादिना ॥ २१ ॥
पुण्यकर्मा बुधाचे हे वचन ऐकून त्या ब्रह्मवादी महात्म्याच्या कथनानुसार राजाने तेथेच राहाण्याचा निश्चय केला. ॥२१॥
मासं स स्त्री तदा भूत्वा रमयत्यनिशं शुदा ।
मासं पुरुषभावेन धर्मबुद्धिं चकार सः ॥ २२ ॥
ते एक मासपर्यंत स्त्री होऊन निरंतर बुधासह रमण करीत आणि नंतर एक मासपर्यंत पुरुष होऊन धर्मानुष्ठानात मन लावीत असत. ॥२२॥
ततः सा नवमे मासि इला सोमसुतात्सुतम् ।
जनयामास सुश्रोणी पुरूरवसमूर्जितम् ॥ २३ ॥
त्यानंतर नवव्या महिन्यात सुंदरी इलेने सोमपुत्र बुधापासून एका पुत्रास जन्म दिला; जो अत्यंत तेजस्वी आणि बलवान्‌ होता. त्याचे नाव होते पुरूखा. ॥२३॥
जातमात्रं तु सुश्रोणी पितुर्हस्ते न्यवेशयत् ।
बुधस्य समवर्णं च इला पुत्रं महाबलम् ॥ २४ ॥
तिच्या त्या महाबली पुत्राची अंगकांती बुधासमान होती. जन्म होताच तो उपनयन योग्य वयाचा बालक झाला, म्हणून सुंदरी इलाने त्याला पित्याच्या हाती सोपवून दिले. ॥२४॥
बुधस्तु पुरुषीभूतं स वै संवत्सरान्तरम् ।
कथाभी रमयामास धर्मयुक्ताभिरात्मवान् ॥ २५ ॥
वर्ष पुरे होण्यास जितके महिने बाकी होते त्या समयापर्यंत जेव्हा जेव्हा राजा पुरुष होत असत तेव्हा तेव्हा मनाला अधीन ठेवणारे बुध धर्मयुक्त कथांच्या द्वारा त्यांचे मनोरंजन करीत होते. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकोननवतितमः सर्गः ॥ ८९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकोणनव्वदावा सर्ग पूरा झाला. ॥८९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP