श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ द्वाविंशत्यधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामस्याज्ञया विभीषणेन वानराणां भृशं सत्कारो विभीषणं वानरांश्च सहैवादाय श्रीरामस्य पुष्पकेणायोध्यां प्रति प्रस्थानं च - श्रीरामांच्या आज्ञेने विभीषणांच्या द्वारे वानरांचा विशेष सत्कार तसेच सुग्रीव आणि विभीषणांसहित वानरांना बरोबर घेऊन श्रीरामांचे पुष्पकविमान द्वारा अयोध्येला प्रस्थान करणे -
उपस्थितं तु तं दृष्ट्‍वा पुष्पकं पुष्पभूषितम् ।
अविदूरे स्थितो रामं प्रत्युवाच विभीषणः ॥ १ ॥
फुलांनी सजलेले पुष्पक विमान तेथे उपस्थित करून जवळच उभ्या असलेल्या विभीषणांनी श्रीरामांना काही सांगण्याचा विचार केला. ॥१॥
स तु बद्धाञ्जलिपुटो विनीतो राक्षसेश्वरः ।
अब्रवीत् त्वरयोपेतः किं करोमीति राघवम् ॥ २ ॥
राक्षसराज विभीषणांनी दोन्ही हात जोडून मोठ्‍या विनयाने आणि उतावळेपणाने राघवांना विचारले - प्रभो ! आता मी काय सेवा करूं ? ॥२॥
तमब्रवीन् महातेजा लक्ष्मणस्योपशृण्वतः ।
विमृश्य राघवो वाक्यं इदं स्नेहपुरस्कृतम् ॥ ३ ॥
तेव्हा महातेजस्वी राघवांनी थोडासा विचार करून लक्ष्मण ऐकत असतांना हे स्नेहयुक्त वचन उच्चारले - ॥३॥
कृतप्रयत्‍नतकर्माणः सर्व एव वनौकसः ।
रत्‍नैरर्थैश्च विविधैः संपूज्यन्तां विभीषणः ॥ ४ ॥
विभीषणा ! या सार्‍या वानरांनी युद्धात फार यत्‍न आणि परिश्रम केले आहेत. म्हणून तू नाना प्रकारची रत्‍ने आणि धन आदि द्वारा या सर्वांचा सत्कार कर. ॥४॥
सहामीभिस्त्वया लङ्‌का निर्जिता राक्षसेश्वर ।
हृष्टैः प्राणभयं त्यक्त्वा सङ्‌ग्रामेष्वनिवर्तिभिः ॥ ५ ॥
राक्षसेश्वरा ! हे वीर वानर संग्रामात कधी मागे फिरत नाहीत आणि हर्ष आणि उत्साहाने भरलेले असतात. प्राणांचे भय सोडून लढणार्‍या या वानरांच्या सहयोगाने तुला लंकेवर विजय प्राप्त झाला आहे. ॥५॥
त इमे कृतकर्माणः सर्व एव वनौकसः ।
धनरत्‍नाप्रदानैश्च कर्मैषां सफलं कुरु ॥ ६ ॥
हे सर्व वानर या समयी आपले काम पूर्ण करून चुकले आहेत. म्हणून यांना रत्‍ने आणि धन आदि देऊन तू यांच्या या कर्माला सफल कर. ॥६॥
एव सम्मानिताश्चैते नन्द्यमाना यथा त्वया ।
भविष्यन्ति कृतज्ञेन निर्वृता हरियूथपाः ॥ ७ ॥
तू कृतज्ञ होऊन जेव्हा यांचा याप्रकारे सन्मान आणि अभिनंदन करशील तेव्हा हे वानरयूथपति फार संतुष्ट होतील. ॥७॥
त्यागिनं सङ्‌ग्रहीतारं सानुक्रोशं यजितेन्द्रियम् ।
सर्वे त्वामवगच्छन्ति ततः सम्बोधयामि ते ॥ ८ ॥
असे करण्याने सर्व लोक हे जाणतील की विभीषण उचित अवसरी धनाचा त्याग करतात तसेच यथासमय न्यायोचित रीतिने धन आणि रत्‍ने आदिंचा संग्रह करत राहतात, दयाळू आहेत आणि जितेंद्रिय आहेत, म्हणून तुला असे करण्यासाठी समजावित आहे. ॥८॥
हीनं रतिगुणैः सर्वैः अभिहन्तारमाहवे ।
सेना त्यजति संविग्ना नृपतिं तं नरेश्वर ॥ ९ ॥
नरेश्वर ! जो राजा सेवकांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न करणार्‍या दान मान आदि सर्व गुणरहित असतो त्याला युद्धाच्या प्रसंगी उद्विग्न झालेली सेना सोडून निघून जाते. ती समजते की हा व्यर्थच आमचा वध करीत आहे - आमच्या भरणपोषणाची अथवा योगक्षेमाची चिंता याला बिल्कुल नाही. ॥९॥
एवमुक्तस्तु रामेण वानरांस्तान् विभीषणः ।
रत्‍नातर्थ संविभागेन सर्वानेवाभ्यपूजयत् ॥ १० ॥
श्रीरामांनी असे सांगितल्यावर विभीषणांनी त्या सर्व वानरांना रत्‍ने आणि धन देवून सर्वांचे पूजन सत्कार केले. ॥१०॥
ततस्तान् पूजितान् दृष्ट्‍वा रत्‍नावर्थैर्हरियूथपान् ।
आरुरोह ततो रामः तद् विमानमनुत्तमम् ॥ ११ ॥

अङ्‌केनादाय वैदेहीं लज्जमानां यशस्विनीम् ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा विक्रान्तेन धनुष्मता ॥ १२ ॥
त्या वानरयूथपतिंना रत्‍ने आणि धन यांनी पूजित झालेले पाहून त्या समयी भगवान्‌ श्रीराम लाजत असणार्‍या मनस्विनी वैदेही सीतेला मांडीवर घेऊन पराक्रमी धनुर्धर बंधु लक्ष्मणासह त्या उत्तम विमानावर आरूढ झाले. ॥११-१२॥
अब्रवीत् स विमानस्थः पूजयन् सर्ववानरान् ।
सुग्रीवं च महावीर्यं काकुत्स्थः सविभीषणम् ॥ १३ ॥
विमानात बसल्यावर समस्त वानरांचा समादर करीत त्या काकुत्स्थ श्रीरामांनी विभीषणासहित महापराक्रमी सुग्रीवास म्हटले- ॥१३॥
मित्रकार्यं कृतमिदं भवद्‌भिर्वानरर्षभाः ।
अनुज्ञाता मया सर्वे यथेष्टं प्रतिगच्छत ॥ १४ ॥
वानरश्रेष्ठ वीरांनो ! आपण सर्वानी आपल्या या मित्राचे कार्य मित्रोचित रीतिने उत्तमप्रकारे संपन्न केले आहे. आता आपण सर्व आपापल्या अभीष्ट स्थानांकडे निघून जावे. ॥१४॥
यत्तु कार्यं वयस्येन स्निग्धेन च हितेन च ।
कृतं सुग्रीव तत् सर्वं भवताधर्मभीरुणा ॥ १५ ॥
सख्या सुग्रीवा ! एक हितैषी तसेच प्रेमी मित्राने जे काम करावयास पाहिजे होते ते सर्व तुम्ही परिपूर्ण करून दाखवले आहे कारण तुम्ही अधर्माला घाबरणारे आहात. ॥१५॥
किष्किन्धां प्रति याह्याशु स्वसैन्येनाभिसंवृतः ।
स्वराज्ये वस लङ्‌कायां मया दत्ते विभीषण ।
न त्वां धर्षयितुं शक्ताः सेन्द्रा अपि दिवौकसः ॥ १६ ॥
वानरराज ! आता तुम्ही आपल्या सेनेसह शीघ्रच किष्किंधापुरीला निघून जा. विभीषणा ! तू ही लंकेत मी दिलेल्या आपल्या राज्यावर स्थिर राहा. आता इंद्र आदि देवताही तुझे काहीही बिघडवू शकत नाहीत. ॥१६॥
अयोध्यां प्रतियास्यामि राजधानीं पितुर्मम ।
अभ्यनुज्ञातुमिच्छामि सर्वांश्चामन्त्रयामि वः ॥ १७ ॥
आता या समयी मी आपल्या पित्याची राजधानी अयोध्येला जाईन. यासाठी आपणा सर्वांना मी विचारत आहे आणि आपली अनुमति मी इच्छितो. ॥१७॥
एवमुक्तास्तु रामेण हरीन्द्रा हरयस्तथा ।
ऊचुः प्राञ्जलयः सर्वे राक्षसश्च विभीषणः ॥ १८ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर सर्व वानर सेनापति तसेच राक्षसराज विभीषण हात जोडून म्हणू लागले - ॥१८॥
अयोध्यां गन्तुमिच्छामः सर्वान्नयतु नो भवान् ।
मुद्युक्ता विचरिष्यामो वनानि उपवनानि च ॥ १९ ॥
भगवन्‌ ! आम्हीही अयोध्यापुरीला येऊ इच्छितो, आपण आम्हांलाही आपल्या बरोबर घेऊन चला. तेथे आम्ही प्रसन्नतापूर्वक वने आणि उपवने यात विचरण करूं. ॥१९॥
दृष्ट्‍वा त्वामभिषेकार्द्रं कौसल्यामभिवाद्य च ।
अचिरेणागमिष्यामः स्वगृहान् नृपसत्तमः ॥ २० ॥
नृपश्रेष्ठ ! राज्याभिषेकाच्या समयी मंत्रपूर्ण जलाने भिजलेल्या आपल्या श्रीविग्रहाचे दर्शन करून माता कौसल्येच्या चरणीं मस्तक नमवून आम्ही लवकरच आपापल्या घरी परत येऊं. ॥२०॥
एवमुक्तस्तु धर्मात्मा वानरैः सविभीषणैः ।
अब्रवीद् वानरान् रामः ससुग्रीवविभीषणान् ॥ २१ ॥
विभीषणांसहित वानरांनी याप्रकारे अनुरोध केल्यावर श्रीरामांनी सुग्रीव तसेच विभीषणासहित त्या वानरांना म्हटले- ॥२१॥
प्रियात् प्रियतरं लब्धं यदहं ससुहृज्जनः ।
सर्वैर्भवद्‌भिः सहितः प्रीतिं लप्स्ये पुरीं गतः ॥ २२ ॥
मित्रांनो ! ही तर माझ्यासाठी प्रियाहून प्रिय गोष्ट होईल - परम प्रिय वस्तुचा लाभ होईल, जर मी आपणा सर्व सुहृदांसह अयोध्यापुरीला जाऊ शकलो ! यामुळे मला अत्यंत प्रसन्नता प्राप्त होईल. ॥२२॥
क्षिप्रमारोह सुग्रीव विमानं सह वानरैः ।
त्वमध्यारोह सामात्यो राक्षसेन्द्र विभीषण ॥ २३ ॥
सुग्रीवा ! तुम्ही सर्व वानरांसह शीघ्रच या विमानावर चढून या. राक्षसराज विभीषण ! तुम्ही ही मंत्र्यांच्या सह विमानावर आरूढ होऊन चला. ॥२३॥
ततः स पुष्पकं दिव्यं सुग्रीवः सह वानरैः ।
आरुरोह मुदा युक्तः सामात्यश्च विभीषणः ॥ २४ ॥
तेव्हा वानरांसहित सुग्रीव आणि मंत्र्यांसहित विभीषण अत्यंत प्रसन्नतेने त्या दिव्य पुष्पक विमानावर चढले. ॥२४॥
तेष्वारूढेषु सर्वेषु कौबेरं परमासनम् ।
राघवेणाभ्यनुज्ञातं उत्पपात विहायसम् ॥ २५ ॥
ते सर्व चढल्यानंतर कुबेरांचे ते उत्तम आसन पुष्पकविमान राघवांची आज्ञा मिळताच आकाशात उडू लागले. ॥२५॥
खगतेन विमानेन हंसयुक्तेन भास्वता ।
प्रहृष्टश्च प्रतीतश्च बभौ रामः कुबेरवत् ॥ २६ ॥
आकाशांत पोहोचल्यावर त्या हंसयुक्त तेजस्वी विमानाने यात्रा करत असता पुलकित तसेच प्रसन्नचित्त झालेले श्रीराम साक्षात्‌ कुबेरासमान शोभा प्राप्त करीत होते. ॥२६॥
ते सर्वे वानरर्क्षाश्च हृष्टा राक्षसाश्च महाबलाः ।
यथासुखमसम्बाधं दिव्ये तस्मिन्नुपाविशन् ॥ २७ ॥
ते सर्व वानर, भालू आणि महाबली राक्षस त्या दिव्य विमानांत अत्यंत सुखाने ऐसपैस पसरून बसलेले होते. कुणाला कुणाकडून धक्का लागत नव्हता. ॥२७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे द्वाविंशत्यधिकशततमः सर्गः ॥ १२२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेबाविसावा सर्ग पूरा झाला. ॥१२२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP