[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। षोडशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामसद्मनि प्रविष्टेन सुमन्त्रेण श्रीरामं प्रति महाराजसन्देशस्य श्रावणं, सीतयानुमतेन श्रीरामेण सलक्ष्मणेन रथमारुह्य गीतवाद्यसहकारेण पथि पौराणां स्त्रीपुरुषाणां विविधा वार्ता आकर्णयता प्रस्थानम् - सुमंत्रांनी श्रीरामाच्या महालात पोहोचून महाराजांचा संदेश ऐकविणे आणि श्रीरामांनी सीतेची अनुमति घेऊन लक्ष्मणासह रथावर बसून गाजावाजा सह मार्गातील स्त्री-पुरुषांच्या गोष्टी ऐकत जाणे -
स तदन्तःपुरद्वारं समतीत्य जनाकुलम् ।
प्रविविक्तां ततः कक्ष्यामाससाद पुराणवित् ॥ १ ॥
पुरातन वृत्तांतांचे ज्ञाता सूत सुमंत्र मनुष्यांच्या गर्दीनी भरलेल्या त्या अंतःपुराच्या द्वाराला ओलांडून महालाच्या एकांत कक्षात जाऊन पोहोचले, जेथे बिलकुल गर्दी नव्हती. ॥१॥
प्रासकार्मुकबिभ्रद्‌भिर्युवभिर्मृष्टकुण्डलैः ।
अप्रमादिभिरेकाग्रैः स्वनुरक्तैरधिष्ठिताम् ॥ २ ॥
तेथे श्रीरामांच्या चरणी अनुराग ठेवणारे एकाग्रचित्त आणि सावधान युवक प्रास आणि धनुष्य आदि घेऊन खिळून राहिलेले होते. त्यांच्या कानात शुद्ध सुवर्णाची बनविलेली कुण्डले झगमगत होती. ॥२॥
तत्र काषायिणो वृद्धान् वेत्रपाणीन् स्वलङ्‌‍कृतान् ।
ददर्श विष्ठितान् द्वारि स्त्र्यध्यक्षान् सुसमाहितान् ॥ ३ ॥
त्या देवडीवर सुमंत्रांना काषायवस्त्रे परिधान केलेले आणि हातात छडी घेतलेले वस्त्राभूषणांनी अलंकृत बरेचसे वृद्ध पुरुष मोठ्या सावधपणे द्वारावर बसलेले दिसून आले, जे अंतःपुरातील स्त्रियांचे अध्यक्ष (संरक्षक) होते. ॥३॥
ते समीक्ष्य समायान्तं रामप्रियचिकीर्षवः ।
सहसोत्पतिताः सर्वे ह्यासनेभ्यः ससम्भ्रमाः ॥ ४ ॥
सुमंत्राला येताना पाहून रामांचे प्रिय करण्याची इच्छा बाळगणारे ते सर्व पुरुष सहसा वेगपूर्वक आसनांवरून उठून उभे राहिले. ॥४॥
तानुवाच विनीतात्मा सूतपुत्रः प्रदक्षिणः ।
क्षिप्रमाख्यात रामाय सुमन्त्रो द्वारि तिष्ठति ॥ ५ ॥
राजसेवेत अत्यंत कुशल तथा विनीत हृदयाच्या सूतपुत्र सुमंत्रांनी त्यांना म्हटले - आपण रामांना शीघ्र जाऊन सांगा की सुमंत्र दरवाजावर उभे आहेत.' ॥५॥
ते राममुपसंगम्य भर्त्तुः प्रियचिकीर्षवः ।
सहभार्याय रामाय क्षिप्रमेवाचचक्षिरे ॥ ६ ॥
स्वामींचे प्रिय करण्याची इच्छा असणारे ते सर्व सेवक रामांच्या जवळ जाऊन पोहोंचले. त्या समयी राम आपली धर्मपत्‍नी सीतेसह विराजमान होते. त्या सेवकांनी शीघ्रच त्यांना सुमंत्रांचा संदेश ऐकवला. ॥६॥
प्रतिवेदितमाज्ञाय सूतमभ्यन्तरं पितुः ।
तत्रैवानाययामास राघवः प्रियकाम्यया ॥ ७ ॥
द्वाररक्षकांच्या द्वारा दिली गेलेली सूचना मिळताच रामांनी पित्याच्या प्रसन्नतेसाठी त्यांचे अंतरंग सेवक सुमंत्र यांना तेथे अंतःपुरातच बोलावून घेतले. ॥७॥
तं वैश्रवणसङ्‌‍काशमुपविष्टं स्वलङ्‌‍कृतम् ।
ददर्श सूतः पर्यंके सौवर्णे सोत्तरच्छदे ॥ ८ ॥
तेथे पोहोंचल्यावर सुमंत्रांनी पाहिले की श्रीरामचंद्र वस्त्राभूषणांनी अलंकृत होऊन कुबेरासमान भासत होते आणि बिछान्याने युक्त सोन्याच्या पलंगावर विराजमान झालेले होते. ॥८॥
वराहरुधिराभेण शुचिना च सुगन्धिना ।
अनुलिप्तं परार्घ्येन चन्दनेन परंतपम् ॥ ९ ॥

स्थितया पार्श्वतश्चापि वालव्यजनहस्तया ।
उपेतं सीतया भूयश्चित्रया शशिनं यथा ॥ १० ॥
परंतप (शत्रूंना संताप देणार्‍या) रामांच्या श्रीअंगावर, वराहाच्या रुधिराप्रमाणे लाल, पवित्र आणि सुगंधित उत्तम चंदनाचा लेप लावलेला आहे आणि सीतादेवी त्यांच्या जवळ बसून आपल्या हाताने चवरी ढाळीत आहे. सितेच्या अत्यंत समीप बसलेले राम चित्राने संयुक्त चंद्रम्याप्रमाणे शोभून दिसत आहेत. ॥९ -१०॥
तं तपन्तमिवादित्यं उपपन्नं स्वतेजसा ।
ववन्दे वरदं वन्दी विनयज्ञो विनीतवत् ॥ ११ ॥
विनयाचा ज्ञाता बंदी सुमंत्रांनी तप्त झालेल्या सूर्याप्रमाणे आपल्या नित्य प्रकाशाने संपन्न राहून अधिक प्रकाशित होणार्‍या वरदायक श्रीरामांना विनीतभावाने प्रणाम केला. ॥११॥
प्राञ्जलिः सुमुखं पृष्ट्‍वा विहारशयनासने ।
राजपुत्रमुवाचेदं सुमन्त्रो राजसत्कृतः ॥ १२ ॥
विहारकालिक शयनासाठी जे आसन होते त्या पलंगावर बसलेल्या प्रसन्न मुखाच्या राजकुमार श्रीरामांचे दर्शन करून राजा दशरथांच्या द्वारा सन्मानित सुमंत्रांनी हात जोडून त्यांना या प्रकारे म्हटले - ॥१२॥
कौसल्या सुप्रजा राम पिता त्वां द्रष्टुमिच्छति ।
महिष्यापि हि कैकेय्या गम्यतां तत्र मा चिरम् ॥ १३ ॥
'श्रीरामा ! आपल्याला प्राप्त करून महाराणी कौसल्या सर्वश्रेष्ठ संतान असणारी ठरली आहे. या समयी राणी कैकेयीच्या सह बसलेले आपले वडील आपल्याला पाहू इच्छित आहेत, म्हणून तेथे चलावे; विलंब करू नये' ॥१३॥
एवमुक्तस्तु संहृष्टो नरसिंहो महाद्युतिः ।
ततः सम्मानयामास सीतामिदमुवाच ह ॥ १४ ॥
सुमंत्रांनी असे म्हटल्यावर महातेजस्वी नरश्रेष्ठ श्रीरामांनी सीतेचा सन्मान करीत प्रसन्नतापूर्वक तिला या प्रकारे म्हटले - ॥१४॥
देवि देवश्च देवी च समागम्य मदन्तरे ।
मन्त्रयेते ध्रुवं किञ्चिदभिषेचनसंहितम् ॥ १५ ॥
'देवि ! असे कळून येत आहे की पिता (महाराज दशरथ) आणि माता कैकेयी दोघे मिळून माझ्या विषयीच काही विचार करीत आहेत. निश्चितच माझ्या अभिषेका संबंधीच काही तरी गोष्ट असली पाहिजे. ॥१५॥
लक्षयित्वा ह्यभिप्रायं प्रियकामा सुदक्षिणा ।
सञ्चोदयति राजानं मदर्थमसितेक्षणा ॥ १६ ॥

सा प्रहृष्टा महाराजं हितकामानुवर्तिनी ।
जननी चार्थकामा मे केकयाधिपतेः सुता ॥ १७ ॥
माझ्या अभिषेकाविषयी राजांच्या अभिप्रायाला लक्ष्य करून त्यांचे प्रिय करण्याची इच्छा असणारी परम उदार तसेच समर्थ, काळेभोर नेत्र असलेली कैकेयी माझ्या अभिषेकासाठीच राजांना प्रेरीत करीत असेल. ॥१६-१७॥
दिष्ट्या खलु महाराजो महिष्या प्रियया सह ।
सुमन्त्रं प्राहिणोद् दूतमर्थकामकरं मम ॥ १८ ॥
सौभाग्याची गोष्ट आहे की महाराज आपल्या प्रिय राणीसह बसलेले आहेत आणि त्यांनी माझ्या अभीष्ट अर्थाला सिद्ध करणार्‍या सुमंत्रांनाच दूत बनवून धाडले आहे. ॥१८॥
यादृशी परिषत् तत्र तादृशो दूत आगतः ।
ध्रुवमद्यैव मां राजा यौवराज्येऽभिषेक्ष्यति ॥ १९ ॥
जशी तेथे अंतरंग परिषद बसली आहे तसेच दूत सुमंत्र येथे आलेले आहेत. अवश्य आजच महाराज मला युवराजपदावर अभिषिक्त करतील. ॥१९॥
हन्त शीघ्रमितो गत्वा द्रक्ष्यामि च महीपतिम् ।
सह त्वं परिवारेण सुखमास्व रमस्व च ॥ २० ॥
म्हणून मी प्रसन्नतापूर्वक येथून शीघ्र जाऊन महाराजांचे दर्शन करीन. तू परिजनांसह येथे सुखपूर्वक बस आणि आनंदात रहा. ॥२०॥
पतिसम्मानिता सीता भर्त्तारमसितेक्षणा ।
आ द्वारमनुवव्राज मङ्‌‍गलान्यभिदध्युषी ॥ २१ ॥
पतिच्या द्वारा याप्रकारे सन्मानित होऊन काळे भोर नेत्र असलेली सीता देवी त्यांचे मंगल- चिंतन करीत स्वामींच्या बरोबरच द्वारापर्यंत त्यांना पोहोचविण्यासाठी गेली. ॥२१॥
राज्यं द्विजातिभिर्जुष्टं राजसूयाभिषेचनम् ।
कर्तुमर्हति ते राजा वासवस्येव लोककृत् ॥ २२ ॥
त्या समयी ती म्हणाली - 'आर्यपुत्र ! ब्राह्मणांसह राहून आपला युवराजपदावर अभिषेक करून महाराज दुसर्‍या समयी राजसूय- यज्ञात सम्राटाच्या पदावर आपला अभिषेक करण्यायोग्य आहेत. ठीक त्याप्रकारे जसे लोकस्रष्टा ब्रह्मदेवांनी देवराज इंद्राचा अभिषेक केला होता. ॥२२॥
दीक्षितं व्रतसम्पन्नं वराजिनधरं शुचिम् ।
कुरङ्‌‍गशृङ्‌‍गपाणिं च पश्यन्ती त्वां भजाम्यहम् ॥ २३ ॥
आपण राजसूय- यज्ञात दीक्षित होऊन तदनुकूल व्रताचे पालन करण्यात तत्पर, श्रेष्ठ मृगचर्मधारी, पवित्र तथा हातात मृगाचे शृंग धारण करणारे व्हा आणि या रूपात आपले दर्शन करीत मी आपल्या सेवेत संलग्न राहावे हीच माझी शुभ कामना आहे. ॥२३॥
पूर्वां दिशं वज्रधरो दक्षिणां पातु ते यमः ।
वरुणः पश्चिमामाशां धनेशस्तूत्तरां दिशम् ॥ २४ ॥
'आपले पूर्व दिशेला वज्रधारी इंद्र, दक्षिण दिशेला यमराज, पश्चिम दिशेला वरूण आणि उत्तर दिशेला कुबेर रक्षण करोत'. ॥२४॥
अथ सीतामनुज्ञाप्य कृतकौतुकमङ्‌‍गलः ।
निश्चक्राम सुमन्त्रेण सह रामो निवेशनात् ॥ २५ ॥
त्यानंतर सीतेची अनुमती घेऊन उत्सवकालीन मंगलकृत्य पूर्ण करून राम सुमंत्रासह आपल्या महालतून बाहेर पडले. ॥२५॥
पर्वतादिव निष्क्रम्य सिंहो गिरिगुहाशयः ।
लक्ष्मणं द्वारि सोऽपश्यत् प्रह्वाञ्जलिपुटं स्थितम् ॥ २६ ॥
पर्वताच्या गुहेत शयन करणारा सिंह जसा पर्वतातून बाहेर निघून येतो त्याप्रकारे महालातून बाहेर पडून श्रीरामांनी द्वारावर लक्ष्मणास उपस्थित असलेला पाहिला, जो विनीत भावाने हात जोडून उभा होता. ॥२६॥
अथ मध्यमकक्ष्यायां समागम्य सुहृज्जनैः ।
स सर्वानर्थिनो दृष्ट्‍वा समेत्य प्रतिनन्द्य च ॥ २७ ॥

ततः पावकसङ्‌‍काशमारुरोह रथोत्तमम् ।
वैयाघ्रं पुरुषव्याघ्रो राजितं राजनन्दनः ॥ २८ ॥
त्यानंतर मध्यम कक्षात येऊन ते मित्रांना भेटले. नंतर प्रार्थी जनांना उपस्थित पाहून त्या सर्वांना भेटून त्यांना संतुष्ट करून पुरुषसिंह राजकुमार राम व्याघ्रचर्माने आवृत्त, शोभाशाली तथा अग्नि-समान तेजस्वी उत्तर रथावर आरुढ झाले. ॥२७ -२८॥
मेघनादमसम्बाधं मणिहेमविभूषितम् ।
मुष्णन्तमिव चक्षूंषि प्रभया मेरुवर्चसम् ॥ २९ ॥
त्या रथाचा घडघडाट मेघाच्या गंभीर गर्जने समान प्रतीत होत होता. त्यात स्थानाची संकीर्णता नव्हती. तो विस्तृत होता आणि मणि एवं सुवर्णांनी विभूषित होता. त्याची कांति सुवर्णमय मेरूपर्वता समान भासत होती. तो रथ आपल्या प्रभेने लोकांच्या डोळ्यांना जणु दिपवून टाकत होता. ॥२९॥
करेणुशिशुकल्पैश्च युक्तं परमवाजिभिः ।
हरियुक्तं सहस्राक्षो रथमिन्द्र इवाशुगम् ॥ ३० ॥
त्याला उत्तम घोडे जोडलेले होते, जे अधिक पुष्ट असल्याकारणाने हत्तीच्या पिला प्रमाणे प्रतीत होत होते. ज्याप्रमाणे सहस्त्रनेत्रधारी इंद्र हिरव्या रंगाच्या घोड्यांनी युक्त शीघ्रगामी रथावर आरूढ होतो त्या प्रकारेच श्रीराम आपल्या त्या रथावर आरूढ झाले होते. ॥३०॥
प्रययौ तूर्णमास्थाय राघवो ज्वलितः श्रिया ।
स पर्जन्य इवाकाशे स्वनवानभिनादयन् ॥ ३१ ॥

निकेतान्निर्ययौ श्रीमान् महाभ्रादिव चन्द्रमाः ।
आपल्या सहज शोभेने प्रकाशित राघव त्या रथावर आरुढ होऊन ताबडतोब तेथून निघाले. तो तेजस्वी रथ आकाशांत गरजणार्‍या मेघाप्रमाणे आपल्या घडघडाटाने संपूर्ण दिशांना प्रतिध्वनित करीत महान मेघखण्डातून बाहेर पडणार्‍या चंद्रम्या प्रमाणे श्रीरामाच्या भवनांतून बाहेर निघाला. ॥३१ १/२॥
चित्रचामरपाणिस्तु लक्ष्मणो राघवानुजः ॥ ३२ ॥

जुगोप भ्रातरं भ्राता रथमास्थाय पृष्ठतः ।
श्रीराघवाचा लहान बंधु लक्ष्मणही हातात विचित्र चवरी घेऊन त्या रथावर बसला आणि पाठीमागून आपला ज्येष्ठ भ्राता राम याचे रक्षण करु लागला. ॥३२ १/२॥
ततो हलहलाशब्दस्तुमुलः समजायत ॥ ३३ ॥

तस्य निष्क्रममाणस्य जनौघस्य समन्ततः ।
मग तर सर्व बाजूनी मनुष्यांची एकच गर्दी उसळून गेली. त्या समयी त्या जन-समूहाच्या चालण्याने सहसा भयंकर कोलाहल माजला. ॥३३ १/२॥
ततो हयवरा मुख्या नागाश्च गिरिसन्निभाः ॥ ३४ ॥

अनुजग्मुस्तथा रामं शतशोऽथ सहस्रशः ।
श्रीरामांच्या पाठोपाठ उत्तम उत्तम घोडे आणि पर्वतासमान विशालकाय श्रेष्ठ गजराज शेकडो आणि हजारोंच्या संख्येमध्ये चालू लागले. ॥३४ १/२॥
अग्रतश्चास्य सन्नद्धाश्चन्दनागुरुभूषिताः ॥ ३५ ॥

खड्गचापधराः शूरा जग्मुराशंसवो जनाः ।
त्यांच्या पुढे पुढे कवच आदिनी सुसज्जित तथा चंदन आणि अगुरुनी मंगलाशंसी लोक-बंदी आदि चालत होते. ॥३५ १/२॥
ततो वादित्रशब्दास्तु स्तुतिशब्दास्तु वन्दिनाम् ॥ ३६ ॥

सिंहनादाश्च शूराणां तथा शुश्रुविरे पथि ।
हर्म्यवातायनस्थाभिर्भूषिताभिः समम्ततः ॥ ३७ ॥

कीर्यमाणः सुपुष्पौघैर्ययौ स्त्रीभिररिन्दमः ।
त्यानंतर मार्गात वाद्यांचा ध्वनी, बंदीजनांचे स्तुतिपाठाचे शब्द तथा शूरवीरांचा सिंहनाद ऐकू येऊ लागला. महालाच्या खिडक्यामध्ये बसलेल्या वस्त्राभूषणांनी विभूषित वनिता सर्वबाजूनी शत्रुदमन श्रीरामावर ढीगभर सुंदर पुष्पे वर्षत होत्या. अशा अवस्थेत श्रीराम पुढे पुढे चालले होते. ॥३६ - ३७ १/२॥
रामं सर्वानवद्याङ्‌‍ग्यो रामपिप्रीषया ततः ॥ ३८ ॥

वचोभिरग्र्यैर्हर्म्यस्थाः क्षितिस्थाश्च ववन्दिरे ।
त्या समयी अट्टालिकामध्ये आणि भूतलावर उभ्या असलेल्या सर्वांगसुंदर युवती रामाचे प्रिय करण्याच्या इच्छेने श्रेष्ठ वचनांच्या द्वारा त्यांची स्तुति गाऊ लागल्या. ॥३८ १/२॥
नूनं नन्दति ते माता कौसल्या मातृनन्दन ॥ ३९ ॥

पश्यन्ती सिद्धयात्रं त्वां पित्र्यं राज्यमवस्थितम् ।
मातेला आनंद प्रदान करणार्‍या रघुवीरा ! आपली ही यात्रा सफल होईल आणि आपल्याला पैतृक राज्य प्राप्त होईल. या अवस्थेत आपल्याला पाहून आपली माता कौसल्या निश्चितच आनंदित होत असेल. ॥३९ १/२॥
सर्वसीमन्तिनीभ्यश्च सीतां सीमन्तिनीं वराम् ॥ ४० ॥

अमन्यन्त हि ता नार्यो रामस्य हृदयप्रियाम् ।
तया सुचरितं देव्या पुरा नूनं महत् तपः ॥ ४१ ॥

रोहिणीव शशाङ्‌‍केन रामसंयोगमाप या ।
त्या स्त्रिया श्रीरामाची हृदयवल्लभा सीमांतिनी सीता हिला संसारातील समस्त सौभाग्यवती स्त्रियांमध्ये श्रेष्ठ मानीत या प्रमाणे म्हणू लागल्या- 'देवी सितेने पूर्वकाली निश्चितच फार मोठे तप केले असले पाहिजे, तेव्हाच तर तिला चंद्रम्यानी संयुक्त झालेल्या रोहिणी प्रमाणे श्रीरामांचा संयोग प्राप्त झाला आहे. ॥४० -४१ १/२॥
इति प्रासादशृङ्‌‍गेषु प्रमदाभिर्नरोत्तमः ।
शुश्राव राजमार्गस्थः प्रिया वाच उदाहृताः ॥ ४२ ॥
या प्रकारे राजमार्गावर रथात बसलेले श्रीरामचंद्र प्रासाद-शिखरांवर बसलेल्या त्या युवतींच्या द्वारा बोलल्या जाणार्‍या या प्रिय वार्ता ऐकत होते. ॥४२॥
स राघवस्तत्र तदा प्रलापा-
     ञ्शुश्राव लोकस्य समागतस्य ।
आत्माधिकारा विविधाश्च वाचः
     प्रहृष्टरूपस्य पुरे जनस्य ॥ ४३ ॥
त्या समयी अयोध्येत दूर दूरहून आलेले लोक अत्यंत हर्षयुक्त होऊन श्रीरामांच्या विषयी जो वार्तालाप आणि तर्‍हेतर्‍हेच्या गोष्टी करीत होते, त्या आपल्या विषयी बोलल्या जाणार्‍या सर्व गोष्टी श्रीरघुनाथ ऐकत होते. ॥४३॥
एष श्रियं गच्छति राघवोऽद्य
     राजप्रसादाद् विपुलां गमिष्यन् ।
एते वयं सर्वसमृद्धकामा
     येषामयं नो भविता प्रशास्ता ॥ ४४ ॥
ते म्हणत होते- 'या समयी श्री राघव महाराज दशरथांच्या कृपेने फार मोठ्या संपत्तिचे अधिकारी होणार आहेत. आता आम्हां सर्वांच्या समस्त कामना पूर्ण होतील, कारण की हे राम आमचे शासक होतील. ॥४४॥
लाभो जनस्यास्य यदेष सर्वं
     प्रपत्स्यते राष्ट्रमिदं चिराय ।
न ह्यप्रियं किंञ्चन जातु कश्चित्
     पश्येन्न दुःखं मनुजाधिपेऽस्मिन् ॥ ४५ ॥
जर हे सारे राज्य चिरकालासाठी यांच्या हाती आले तर या जगातील समस्त जनतेसाठी हा महान लाभ ठरेल. हे राजा झाल्यावर कुणाचेही कधी अप्रिय होणार नाही. आणि कुणाला कधी कुठलेही दुःखही पाहावे लागणार नाही. ॥४५॥
स घोषवद्‌भिश्च हयैः सनागैः
     पुरःसरैः स्वस्तिकसूतमागधैः ।
महीयमानः प्रवरैश्च वादकै-
     राभिष्टुतो वैश्रवणो यथा ययौ ॥ ४६ ॥
खिंकाळणारे घोडे, चित्कार करणारे हत्ती, जय जयकार करीत पुढे पुढे चालणारे बंदी, स्तुतिपाठ करणारे सूत, वंशाची बिरूदावली वर्णन करणारे मागध तथा सर्वश्रेष्ठ गुणगायकांच्या तुमुळ घोषामध्ये त्या बंदी आदिच्या द्वारा पूजित आणि प्रशंसित होत श्रीरामचंद्र कुबेरा समान जात होते. ॥४६॥
करेणुमातङ्‌‍गरथाश्वसंकुलं
     महाजनौघैः परिपूर्णचत्वरम् ।
प्रभूतरत्‍नं बहुपुण्यसञ्चयं
     ददर्श रामो रुचिरं महापथम् ॥ ४७ ॥
यात्रा करीत असता श्रीरामांनी त्या विशाल राजमार्गास पाहिले, जो हत्तिणी (मतवाले) मदमस्त हत्ती, रथ आणि घोड्यांनी खचाखच भरलेला होता. त्याच्या प्रत्येक चौकात मनुष्यांची प्रचंड गर्दी एकत्रित झालेली होती. त्याच्या दोन्ही पार्श्वभागामध्ये प्रचुर रत्‍नांनी भरलेली दुकाने होती तसेच विक्री करण्यास योग्य अशा आणखीही बर्‍याचशा द्रव्यांचे ढीग तेथे दिसून येत होते. तो राजमार्ग अत्यंत साफ -स्वच्छ होता. ॥४७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे षोडशः सर्गः ॥ १६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा सोळावा सर्ग पूरा झाला. ॥१६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP