श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ सप्तत्रिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विभीषणेन श्रीरामं प्रति रावणेन विहिताया लङ्‌कारक्षाव्यवस्थाया वर्णनं श्रीरामेण लङ्‌काया द्वारेष्वाक्रमणाय वानरसेनापतीनां नियुक्तिः - विभीषणाने श्रीरामांना रावणद्वारा केल्या गेलेल्या लंकेच्या रक्षणाच्या प्रबंधाचे वर्णन करून सांगणे तसेच श्रीराम द्वारा लंकेच्या विभिन्न द्वारांवर आक्रमण करण्यासाठी आपल्या सेनापतिंची नियुक्ती -
नरवानरराजानौ स तु वायुसुतः कपिः ।
जांबवान् ऋक्षराजश्च राक्षसश्च विभीषणः ॥ १ ॥

अङ्‌गदो वालिपुत्रश्च सौमित्रिः शलभः कपिः ।
सुषेणः सहदायादो मैन्दो द्विविद एव च ॥ २ ॥

गजो गवाक्षः कुमुदो नलोऽथ पनसस्तथा ।
अमित्रविषयं प्राप्ताः समवेताः समर्थयन् ॥ ३ ॥
शत्रुच्या देशात पोहोचलेले नरराज श्रीराम, सौमित्र लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, वायुपुत्र हनुमान्‌, ऋक्षराज जांबवान्‌, राक्षस विभीषण, वालिपुत्र अंगद, शरभ, बंधु-बांधवांसह सुषेण, मैंद, द्विविद, गज, गवाक्ष, कुमुद, नल आणि पनस - हे सर्व आपसात भेटून विचार करू लागले- ॥१-३॥
इयं सा लक्ष्यते लङ्‌का पुरी रावणपालिता ।
सासुरोरगगंधर्वैः अमरैरपि दुर्जया ॥ ४ ॥
हीच ती लंकापुरी दिसून येत आहे, जिचे पालन रावण करत आहे. असुर, नाग आणि गंधर्वासहित संपूर्ण देवतांसाठीही हिच्यावर विजय मिळविणे अत्यंत कठीण आहे. ॥४॥
कार्यसिद्धिं पुरस्कृत्य मंत्रयध्वं विनिर्णये ।
नित्यं सन्निहितो यत्र रावणो राक्षसाधिपः ॥ ५ ॥
राक्षसराज रावण या पुरीत सदा निवास करतो. आता आपण हिच्यावर विजय मिळविण्यासाठी उपायांचा निर्णय करण्यसाठी परस्परात विचार करू या ? ॥५॥
तथा तेषु ब्रुवाणेषु रावणावरजोऽब्रवीत् ।
वाक्यमग्राम्यपदवत् पुष्कलार्थं विभीषणः ॥ ६ ॥
त्या सर्वांनी असे म्हटल्यावर रावणाचा लहान भाऊ विभीषण याने संस्कारयुक्त पद आणि प्रचुर अर्थाने भरलेल्या वाणीमध्ये म्हटले- ॥६॥
अनलः शरभश्चैव संपातिः प्रमतिस्तथा ।
गत्वा लङ्‌कां ममामात्याः पुरीं पुनरिहगताः ॥ ७ ॥
माझे मंत्री अनल, पनस, संपाति आणि प्रभति - हे चौघे लंकापुरीत जाऊन येथे परत आले आहेत. ॥७॥
भृत्वा शकुनयः सर्वे प्रविष्टाश्च रिपोर्बलम् ।
विधानं विहितं यच्च तद् दृष्ट्‍वा समुपस्थिताः ॥ ८ ॥
हे सर्व लोक पक्ष्यांचे रूप धारण करून शत्रुंच्या सेनेमध्ये गेले होते आणि तेथे जी व्यवस्था केली गेली आहे, ती आपल्या डोळ्यांनी पाहून नंतर परत येथे उपस्थित झाले आहेत. ॥८॥
संविधानं यथाहुस्ते रावणस्य दुरात्मनः ।
राम तद्‌ ब्रुवतः सर्वं यथातत्त्वेन मे शृणु ॥ ९ ॥
श्रीरामा ! त्यांनी दुरात्मा रावणाच्या द्वारे केल्या गेलेल्या नगररक्षणाच्या प्रबंधाचे जसे वर्णन केले आहे ते मी ठीक-ठीक सांगतो. आपण हे सर्व माझ्या कडून ऐकावे. ॥९॥
पूर्वं प्रहस्तः सबलो द्वारमासाद्य तिष्ठति ।
दक्षिणं च महावीर्यौ महापार्श्वमहोदरौ ॥ १० ॥
सेनेसहित प्रहस्त नगराच्या पूर्वद्वाराचा आश्रय घेऊन उभा आहे. महापराक्रमी महापार्श्व आणि महोदर दक्षिण द्वारावर उभे आहेत. ॥१०॥
इंद्रजित् पश्चिमं द्वारं राक्षसैर्बहुभिर्वृतः ।
पट्टिशासिधनुष्मद्‌भिः शूलमुद्‌गरपाणिभिः ॥ ११ ॥

नानाप्रहरणैः शूरैः आवृतो रावणात्मजः ।
बहुसंख्य राक्षसांनी घेरलेला इंद्रजित नगराच्या पश्चिम द्वारावर उभा आहे. त्याचे साथीदार राक्षस पट्टिश, खड्ग, धनुष्य, शूल आणि मुद्‌गर आदि अस्त्र-शस्त्र हातात घेऊन उभे आहेत. नाना प्रकारची आयुधे धारण करणार्‍या शूरवीरांनी घेरलेला तो रावण कुमार पश्चिमद्वाराच्या रक्षणासाठी ठाम उभा आहे. ॥११ १/२॥
राक्षसानां सहस्रैस्तु बहुभिः शस्त्रपाणिभिः ॥ १२ ॥

युक्तः परमसंविग्नो राक्षसैः सह मंत्रवित् ।
उत्तरं नगरद्वारं रावणः स्वयमास्थितः ॥ १३ ॥
स्वत: मंत्रवेत्ता रावण शुक, सारण आदि कित्येक सहस्त्र शस्त्रधारी राक्षसांसह नगराच्या द्वारावर सावधपणे उभा आहे. तो मनातल्या मनात अत्यंत उद्विग्न झाल्याप्रमाणे कळून येत आहे. ॥१२-१३॥
विरूपाक्षस्तु महता शूलखड्गधनुष्मता ।
बलेन राक्षसैः सार्धं मध्यमं गुल्ममाश्रितः ॥ १४ ॥
विरूपाक्ष, शूल, खड्ग आणि धनुष्य धारण करणार्‍या विशाल राक्षससेनेसह नगराच्या मध्यभागी असलेल्या छावणीवर उभा आहे. ॥१४॥
एतानेवंविधान् गुल्मान् लङ्‌कायां समुदीक्ष्य ते ।
मामकाः मंत्रिणः सर्वे शीघ्रं पुनरिहागताः ॥ १५ ॥
याप्रकारे माझे सर्व मंत्री लंकेमध्ये विभिन्न स्थानांवर नियुक्त केल्या गेलेल्या या सेनांचे निरीक्षण करून नंतर शीघ्र येथे परत आले आहेत. ॥१५॥
गजानां दशसहस्रं रथानामयुतं पुरे ।
हयानामयुते द्वे च साग्रकोटिश्च रक्षसाम् ॥ १६ ॥
रावणाच्या सेनेत दहा हजार हत्ती, दहा हजार रथ, वीस हजार घोडे आणि एक कोटीहून अधिक पायदळ राक्षस आहेत. ॥१६॥
विक्रान्ता बलवंतश्च संयुगेष्वाततायिनः ।
इष्टा राक्षसराजस्य नित्यमेते निशाचराः ॥ १७ ॥
ते सर्व वीर, फार बळ-पराक्रमाने संपन्न आणि युद्धात आततायी आहेत. हे सर्व निशाचर राक्षसराज रावणास सदाच प्रिय आहेत. ॥१७॥
एकैकस्यात्र युद्धार्थे राक्षसस्य विशांपते ।
परिवारः सहस्राणां सहस्रमुपतिष्ठते ॥ १८ ॥
प्रजानाथ ! यापैकी एकेका राक्षसाजवळ युद्धासाठी दहा-दहा लाखाचा परिवार उपस्थित आहे. ॥१८॥
एतां प्रवृत्तिं लङ्‌कायां मंत्रिप्रोक्तां विभीषणः ।
एवमुक्त्वा महाबाहू राक्षसांस्तानदर्शयत् ॥ १९ ॥

लङ्‌कायां सचिवैः सर्वां रामाय प्रत्यवेदयत् ।
महाबाहु विभीषणाने मंत्र्यांच्या द्वारा सांगितला गेलेला युद्धविषयक समाचार याप्रमाणे सांगून त्या मंत्रीस्वरूप राक्षसांनाही श्रीरामांना भेटविले आणि त्यांच्याकडून लंकेचा सारा वृत्तांत पुन्हा वदविला. ॥१९ १/२॥
रामं कमलपत्राक्षं इदमुत्तरमब्रवीत् ॥ २० ॥

रावणावरजः श्रीमान् रामप्रियचिकीर्षया ।
त्यानंतर रावणाचा लहान भाऊ श्रीमान्‌ विभीषणाने कमलनयन श्रीरामांचे प्रिय करण्यासाठी त्यांना स्वत: ही उत्तम गोष्ट सांगितली- ॥२० १/२॥
कुबेरं तु यदा राम रावणः प्रतियुद्ध्यति ॥ २१ ॥

षष्टिः शतसहस्राणि तदा निर्यान्ति राक्षसाः ।
पराक्रमेण वीर्येण तेजसा सत्त्वगौरवात् ।
सदृशा ह्यत्र दर्पेण रावणस्य दुरात्मनः ॥ २२ ॥
श्रीरामा ! जेव्हा रावणाने कुबेराशी युद्ध केले होते, त्यासमयी साठ लाख राक्षस त्याच्या बरोबर गेले होते, ते सर्वच्या सर्व बळ, पराक्रम, तेज, धैर्याची अधिकता आणि दर्पाच्या दृष्टीने दुरात्मा रावणा समानच होते. ॥२१-२२॥
अत्र मन्युर्न कर्तव्यो रोषये त्वां न भीषये ।
समर्थो ह्यसि वीर्येण सुराणामपि निग्रहे ॥ २३ ॥
मी जे रावणाच्या शक्तिचे वर्णन केले आहे ते लक्षांत घेऊन आपल्या मनात आपण दीनता येऊ देऊ नये अथवा माझ्यावर रोष करता कामा नये. मी आपल्याला घाबरवत नाही, शत्रूच्या प्रति आपल्या क्रोधाला चेतवीत आहे, कारण आपण आपल्या बल-पराक्रम द्वारा देवतांचेही दमन करण्यास समर्थ आहात. ॥२३॥
तद्‌भवांश्चतुरङ्‌गेण बलेन महता वृतः ।
व्यूह्येदं वानरानीकं निर्मथिष्यसि रावणम् ॥ २४ ॥
म्हणून आपण या वानरसेनेचा व्यूह बनवूनच विशाल चतुरंगिणी सेनेने घेरलेल्या रावणाचा विनाश करू शकाल. ॥२४॥
रावणावरजे वाक्यं एवं ब्रुवति राघवः ।
शत्रूणां प्रतिघातार्थं इदं वचनमब्रवीत् ॥ २५ ॥
विभीषणाने असे म्हटल्यावर भगवान्‌ राघवांनी शत्रूंना परास्त करण्यासाठी या प्रकारे म्हटले- ॥२५॥
पूर्वद्वारे तु लङ्‌काया नीलो वानरपुंगवः ।
प्रहस्तप्रतियोद्धा स्याद् वानरैर्बहुभिर्वृतः ॥ २६ ॥
बहुसंख्य वानरांनी घेरलेले कपिश्रेष्ठ नील पूर्वद्वारावर जाऊन प्रहस्ताचा सामना करोत. ॥२६॥
अङ्‌गदो वालिपुत्रस्तु बलेन महता वृतः ।
दक्षिणे बाधतां द्वारे महापार्श्वमहोदरौ ॥ २७ ॥
विशाल वाहिनीने युक्त वालिकुमार अंगद दक्षिण द्वारावर स्थित होऊन महापार्श्व आणि महोदराच्या कार्यात बाधा करील. ॥२७॥
हनुमान् पश्चिमद्वारं निपीड्य पवनात्मजः ।
प्रविशत्वप्रमेयात्मा बहुभिः कपिभिर्वृतः ॥ २८ ॥
पवनकुमार हनुमान्‌ अप्रमेय आत्मबळाने संपन्न आहेत. ते बर्‍याचशा वानरांसह लंकेच्या पश्चिम द्वारात प्रवेश करतील. ॥२८॥
दैत्यदानवसङ्‌घानां ऋषीणां च महात्मनाम् ।
विप्रकारप्रियः क्षुद्रो वरदानबलान्वितः ॥ २९ ॥

परिक्रामति यः सर्वान् लोकान् संतापयन् प्रजाः ।
तस्याहं राक्षसेन्द्रस्य स्वयमेव वधे धृतः ॥ ३० ॥

उत्तरं नगरद्वारं अहं सौमित्रिणा सह ।
निपीड्याभिप्रवेक्ष्यामि सबलो यत्र रावणः ॥ ३१ ॥
दैत्य, दानवसमूह तथा महात्मा ऋषिंचा अपकार करणे हेच ज्याला प्रिय वाटते, ज्याचा स्वभाव क्षुद्र आहे, जो वरदानाच्या शक्तीने संपन्न आहे आणि प्रजाजनांना संताप देत संपूर्ण लोकांमध्ये फिरत राहतो, त्या राक्षसराज रावणाच्या वधाचा दृढ निश्चय करून मी स्वत:च सौमित्र लक्ष्मणासह नगराच्या उत्तर द्वारावर आक्रमण करून त्याच्या आत प्रवेश करीन, जेथे सेनेसहित रावण विद्यमान आहे. ॥२९-३१॥
वानरेन्द्रश्च बलवान् ऋक्षराजश्च वीर्यवान् ।
राक्षसेन्द्रानुजश्चैव गुल्मो भवतु मध्यमे ॥ ३२ ॥
बलवान्‌ वानरराज सुग्रीव, अस्वलांचे पराक्रमी राजे जांबवान्‌ तसेच राक्षसराज रावणाचे लहान भाऊ विभीषण - हे लोक नगराच्या मध्यभागी असलेल्या मोर्च्यावर आक्रमण करतील. ॥३२॥
न चैव मानुषं रूपं कार्यं हरिभिराहवे ।
एषा भवतु नः संज्ञा युद्धेऽस्मिन् वानरे बले ॥ ३३ ॥
वानरांनी युद्धात मनुष्याचे रूप धारण करता कामा नये. या युद्धात वानरांच्या सेनेचा आमच्यासाठी हाच संकेत अथवा चिन्ह असेल. ॥३३॥
वानरा एव नश्चिह्नं स्वजनेऽस्मिन् भविष्यति ।
वयं तु मानुषेणैव सप्त योत्स्यामहे परान् ॥ ३४ ॥
या स्वजनवर्गात वानरच आमचे चिन्ह असेल. केवळ आम्ही सात व्यक्तीच मनुष्यरूपात राहून शत्रूशी युद्ध करू. ॥३४॥
अहमेष सह भ्रात्रा लक्ष्मणेन महौजसा ।
आत्मना पञ्चमश्चायं सखा मम विभीषणः ॥ ३५ ॥
मी आपला महातेजस्वी भाऊ लक्ष्मणासह राहीन आणि हे माझे मित्र विभीषण आपल्या चार मंत्र्यांसह पाचवे असतील. (या प्रकारे आम्ही सात व्यक्ती मनुष्यरूपात राहून युद्ध करू.) ॥३५॥
स रामः कृत्यसिद्ध्यर्थं एवमुक्त्वा विभीषणम् ।
सुवेलारोहणे बुद्धिः चकार मतिमान् प्रभुः ।
रमणीयतरं दृष्ट्‍वा सुवेलस्य गिरेस्तटम् ॥ ३६ ॥
आपल्या विजयरूपी प्रयोजनाच्या सिद्धिसाठी विभीषणास या प्रकारे सांगून बुद्धिमान्‌ भगवान्‌ (प्रभु) श्रीरामांनी सुवेल पर्वतावर चढण्याचा विचार केला. सुवेल पर्वताचा तटप्रांत फारच रमणीय होता, तो पाहून त्यांना फार प्रसन्नता वाटली. ॥३६॥
ततस्तु रामो महता बलेन
प्रच्छाद्य सर्वां पृथिवीं महात्मा ।
प्रहृष्टरूपोऽभिजगाम लङ्‌कां
कृत्वा मतिं सोऽरिवधे महात्मा ॥ ३७ ॥
तदनंतर महामना महात्मा श्रीराम आपल्या विशाल सेनेच्या द्वारे तेथील सार्‍या पृथ्वीला आच्छादित करून शत्रुवधाचा निश्चय करून मोठ्‍या हर्षाने आणि उत्साहाने लंकेकडे निघाले. ॥३७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्तत्रिंशः सर्गः ॥ ३७ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा सदतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP