श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चत्रिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

माल्यवता रावणस्य श्रीरामेण सह संधिकरणाय प्रबोधनम् - माल्यवानाचे रावणाला श्रीरामाशी संधि करण्यासाठी समजाविणे -
तेन शङ्‌खविमिश्रेण भेरीशब्देन नादिना ।
उपयाति महाबाहू रामः परपुरञ्जयः ॥ १ ॥
शत्रुनगरीवर विजय मिळविणार्‍या महाबाहु श्रीरामांनी शंखध्वनीने मिश्रित तुमुलनाद करणार्‍या भेरींच्या आवाजासह लंकेवर आक्रमण केले. ॥१॥
तं निनादं निशम्याथ रावणो राक्षसेश्वरः ।
मुहूर्तं ध्यानमास्थाय सचिवानभ्युदैक्षत ॥ २ ॥
तो भेरीनाद ऐकून राक्षसराज रावणाने एक मुहूर्तपर्यंत काही विचार करून नंतर आपल्या मंत्र्यांकडे पाहिले. ॥२॥
अथ तान् सचिवांस्तत्र सर्वानाभाष्य रावणः ।
सभां संनादयन् सर्वां इत्युवाच महाबलः ॥ ३ ॥

जगत्संतापनः क्रूरो गर्हयन् राक्षसेश्वरः ।
त्या सर्व मंत्र्यांना संबोधित करून जगताला संताप देणार्‍या, महाबली, क्रूर राक्षसराज रावणांनी सर्व सभेला प्रतिध्वनित करून कुणावरही आक्षेप न करता म्हटले- ॥३ १/२॥
तरणं सागरस्यास्य विक्रमं बलपौरुषम् ॥ ४ ॥

यदुक्तवन्तो रामस्य भवंतस्तन्मया श्रुतम् ।
भवतश्चाप्यहं वेद्मि युद्धे सत्यपराक्रमान् ।
तूष्णीकानीक्षतोऽन्योन्यं विदित्वा रामविक्रमम् ॥ ५ ॥
आपण रामाच्या पराक्रम, बल-पौरूष तसेच समुद्रलंघनाची जी गोष्ट सांगितली गेली, ते सर्व मी ऐकले आहे परंतु मी तर आपणा सर्वांनाही, जे या समयी रामांच्या पराक्रमाच्या गोष्टी जाणून गुपचुप एक दुसर्‍याच्या तोंडाकडे पहात बसला आहात, त्यांना संग्रामभूमी मधील सत्यपराक्रमी वीरच समजतो. ॥४-५॥
ततस्तु सुमहाप्राज्ञो माल्यवान् नाम राक्षसः ।
रावणस्य वचः श्रुत्वा मातुः मातामहोऽब्रवीत् ॥ ६ ॥
रावणाचे हे आक्षेपपूर्ण वचन ऐकल्यानंतर महाबुद्धिमान्‌ माल्यवान्‌ नामक राक्षस, जो रावणाचा मातामह (आजोबा) होता, त्याने याप्रकारे म्हटले- ॥६॥
विद्यास्वभिविनीतो यो राजा राजन् नयानुगः ।
स शास्ति चिरमैश्वर्यं अरींश्च कुरुते वशे ॥ ७ ॥
राजन्‌ ! जो राजा चौदा विद्यांमध्ये सुशिक्षित आणि नीतिचे अनुसरण करणारा असतो, तो दीर्घकाळपर्यंत राज्याचे शासन करतो. तो शत्रुंना वश करून घेतो. ॥७॥
सन्दधानो हि कालेन विगृह्णंश्चारिभिः सह ।
स्वपक्षवर्धनं कुर्वन् महदैश्वर्यमश्नुते ॥ ८ ॥
जो वेळप्रसंगानुसार आवश्यक वाटल्यास शत्रुंच्या बरोबर संधि आणि विग्रह करतो तसेच आपल्या पक्षाच्या वृद्धिमध्ये लागून राहातो, तो महान्‌ ऐश्वर्याचा भागी होत असतो. ॥८॥
हीयमानेन कर्तव्यो राज्ञा सन्धिः समेन च ।
न शत्रुमवमन्येत ज्यायान् कुर्वीत विग्रहम् ॥ ९ ॥
ज्या राजाची शक्ती क्षीण होत आहे अथवा जो शत्रुच्या समान शक्ति बाळगून असतो, त्याने संधि केली पाहिजे, आपल्याहून अधिक अथवा समान शक्ति असणार्‍या शत्रूचा कधी अपमान करू नये. जर स्वत:च शक्तिमध्ये तो शत्रूपेक्षा वरचढ असेल तर तेव्हांच शत्रुबरोबर त्याने युद्ध आरंभावे. ॥९॥
तन्मह्यं रोचते संधिः सह रामेण रावण ।
यदर्थमभियुक्तोऽसि सीता तस्मै प्रदीयताम् ॥ १० ॥
म्हणून रावणा ! मला तर श्रीरामांच्या बरोबर संधि करणेच चांगले वाटले आहे. जिच्यासाठी तुझ्यावर आक्रमण होत आहे त्या सीतेला तू श्रीरामांकडे परत धाड. ॥१०॥
यस्य देवर्षयः सर्वे गंधर्वाश्च जयैषिणः ।
विरोधं मा गमस्तेन सन्धिस्ते तेन रोचताम् ॥ ११ ॥
पहा, देवता, ऋषि आणि गंधर्व, सर्व श्रीरामांच्या विजयाची इच्छा करत आहेत. म्हणून तू त्यांच्याशी विरोध करू नको. त्यांच्याशी संधि करण्याचीच इच्छा कर. ॥११॥
असृजद्‌भगवान् पक्षौ द्वावेव हि पितामहः ।
सुराणामसुराणां च धर्माधर्मौ तदाश्रयौ ॥ १२ ॥
भगवान्‌ ब्रह्मदेवाने सुर आणि असुर ही दोन पक्षांचीच सृष्टि केली आहे. धर्म आणि अधर्म हेच यांचे आश्रय आहेत. ॥१२॥
धर्मो हि श्रूयते पक्षो अमराणां महात्मनाम् ।
अधर्मो रक्षसां पक्षो ह्यसुराणां च राक्षस ॥ १३ ॥
असे ऐकिवात आहे की महात्मा देवतांचा पक्ष धर्म आहे. राक्षसराज ! राक्षसांचा आणि असुरांचा पक्ष अधर्म आहे. ॥१३॥
धर्मो वै ग्रसतेऽधर्मं ततः कृतमभूद् युगम् ।
अधर्मो ग्रसते धर्मं यदा तिष्यः प्रवर्तते ॥ १४ ॥
जेव्हा सत्ययुग असते तेव्हा धर्म बलवान्‌ होऊन अधर्मास ग्रसतो आणि जेव्हा कलियुग येते तेव्हा अधर्मच धर्माला ग्रासून टाकतो. ॥१४॥
तत्त्वया चरता लोकान् धर्मोऽपि निहतो महान् ।
अधर्मः प्रगृहीतश्च तेनास्मद्‌ बलिनः परे ॥ १५ ॥
तू दिग्विजयासाठी सर्व लोकात भ्रमण करतांना महान्‌ धर्माचा नाश केला आहेस आणि अधर्माला आपलेसे केले आहेस. त्यामुळे आमचे शत्रू आमच्यापेक्षा प्रबळ आहेत. ॥१५॥
स प्रमादाद्विवृद्धस्ते अधर्मोऽहिग्रसते हि नः ।
विवर्धयति पक्षं च सुराणां सुरभावनः ॥ १६ ॥
तुझ्या प्रसादाने वाढलेला अधर्मरूपी अजगर आता आम्हाला गिळून टाकू पहात आहे आणि देवतांच्या द्वारा पालित धर्म त्यांच्या पक्षाची वृद्धि करत आहे. ॥१६॥
विषयेषु प्रसक्तेन यत्किंचित्कारिणा त्वया ।
ऋषीणामग्निकल्पानां उद्वेगो जनितो महान् ॥ १७ ॥
विषयात आसक्त होऊन काहीही करणार्‍या तू जे मन मानेल तसे आचरण केले आहेस. त्यामुळे अग्निसमान तेजस्वी ऋषिंनाहि फार मोठा उद्वेग प्राप्त झाला आहे. ॥१७॥
तेषां प्रभावो दुर्धर्षः प्रदीप्त इव पावकः ।
तपसा भावितात्मानो धर्मस्यानुग्रहे रताः ॥ १८ ॥
त्यांचा प्रभाव प्रज्वलित अग्निप्रमाणे दुर्धर्ष आहे. ते ऋषि-मुनि तपस्येच्या द्वारा आपल्या अंत:करणाला शुद्ध करून धर्माच्याच संग्रहात तत्पर राहातात. ॥१८॥
मुख्यैर्यज्ञैर्यजन्त्येते तैस्तैर्यत्ते द्विजातयः ।
जुह्वत्यग्नींश्च विधिवद् वेदांश्चोच्चैरधीयते ॥ १९ ॥
हे द्विजगण मुख्य-मुख्य यज्ञांच्या द्वारे यजन करतात. विधिवत्‌ अग्नित आहुति देतात आणि उच्च स्वराने वेदांचा पाठ करतात. ॥१९॥
अभिभूय च रक्षांसि ब्रह्मघोषानुदीरयन् ।
दिशो विप्रद्रुताः सर्वाः स्तनयित्‍नु्रिवोष्णगे ॥ २० ॥
त्यांनी राक्षसांना अभिभूत करुन वेदमंत्रांच्या ध्वनिचा विस्तार केला आहे. म्हणून ग्रीष्म ऋतुतील मेघाप्रमाणे राक्षस संपूर्ण दिशात पळून जाऊन उभे आहेत. ॥२०॥
ऋषीणामग्निकल्पानां अग्निहोत्रसमुत्थितः ।
आदत्ते रक्षसां तेजो धूमो व्याप्य दिशो दश ॥ २१ ॥
अग्नितुल्य तेजस्वी ऋषिंच्या अग्निहोत्रातून प्रकट झालेला धूम दाही दिशांमध्ये व्याप्त होऊन राक्षसांचे तेज हरण करत आहे. ॥२१॥
तेषु तेषु च देशेषु पुण्येष्वेव दृढव्रतैः ।
चर्यमाणं तपस्तीव्रं संतापयति राक्षसान् ॥ २२ ॥
भिन्न-भिन्न देशात पुण्यकर्मांतच गढून गेलेले, दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणारे ऋषिलोक जी तीव्र तपस्या करत आहेत, तीच राक्षसांना संताप देत आहे. ॥२२॥
देवदानवयक्षेभ्यो गृहीतश्च वरस्त्वया ।
मनुष्या वानरा ऋक्षा गोलाङ्‌गूला महाबलाः ।
बलवंत इहागम्य गर्जंति दृढविक्रमाः ॥ २३ ॥
तू देवता, दानव आणि यक्षांपासूनच अवध्य होण्याचा वर प्राप्त केला आहेस, मनुष्य आदिंपासून नाही, परंतु येथे तर मनुष्य, वानर, अस्वले आणि लंगूर येऊन गर्जना करीत आहेत. ते सर्वच्या सर्व अत्यंत बलवान्‌, सैनिक शक्तिने संपन्न तसेच सुदृढ पराक्रमी आहेत. ॥२३॥
उत्पातान् विविधान् दृष्ट्‍वा घोरान् बहुविधान् बहून् ।
विनाशमनुपश्यामि सर्वेषां रक्षसामहम् ॥ २४॥
नाना प्रकारच्या बर्‍याचशा उत्पातांना लक्ष्य करून मी तर या समस्त राक्षसांच्या विनाशाचाच अवसर उपस्थित झाल्याचे पहात आहे. ॥२४॥
खराभिस्तनिता घोरा मेघाः प्रतिभयङ्‌कराः ।
शोणितेनाभिवर्षन्ति लङ्‌कामुष्णेन सर्वतः ॥ २५ ॥
घोर आणि भयंकर मेघ, प्रचंड गर्जनेसह लंकेवर सर्व बाजूनी उष्ण रक्ताची वृष्टि करत राहिले आहेत. ॥२५॥
रुदतां वाहनानां च प्रपतन्त्यश्रुबिन्दवः ।
ध्वजा ध्वस्ता विवर्णाश्च न प्रभान्ति यथापुरम् ॥ २६ ॥
घोडे, हत्ती आदि वाहने रडत आहेत आणि त्यांच्या नेत्रांतून अश्रुबिंदु झरत आहेत. दिशा धुळीने भरून गेल्याने मलीन होऊन आता पूर्वीप्रमाणे प्रकाशित होत नाहीत. ॥२६॥
व्याला गोमायवो गृध्रा वाश्यन्ति च सुभैरवम् ।
प्रविश्य लङ्‌कामारामे समवायांश्च कुर्वते ॥ २७ ॥
मांसभक्षी हिंसक पशु, कोल्हे आणि गिधाडे भयंकर बोली बोलत आहेत. तसेच लंकेच्या उपवनात घुसून झुंडी बनवून बसत आहेत. ॥२७॥
कालिकाः पाण्डरैर्दन्तैः प्रहसन्त्यग्रतः स्थिताः ।
स्त्रियः स्वप्नेषु मुष्णन्त्यो गृहाणि प्रतिभाष्य च ॥ २८ ॥
स्वप्नात काळ्या रंगाच्या स्त्रिया आपले पिवळे दात दाखवित समोर येऊन उभ्या राहात आहेत आणि प्रतिकूल गोष्टी सांगून घरांतील सामान चोरून जोरजोराने हसत आहेत. ॥२८॥
गृहाणां बलिकर्माणि श्वानः पर्युपभुञ्जते ।
खरा गोषु प्रजायन्ते मूषिका नकुलेषु च ॥ २९ ॥
घरात जे बलिकर्म केले जाते, त्या बलि-सामग्रीला कुत्रे खाऊन टाकत आहेत. गायींपासून गाढवे आणि मुंगुसापासून उंदीर उत्पन्न होत आहेत. ॥२९॥
मार्जारा द्वीपिभिः सार्धं सूकराः शुनकैः सह ।
किन्नरा राक्षसैश्चापि समेयुर्मानुषैः सह ॥ ३० ॥
वाघांबरोबर मांजरे, कुत्र्यांच्या बरोबर डुकरे, तसेच राक्षस आणि मनुष्य यांच्या बरोबर किन्नर समागम करत आहेत. ॥३०॥
पाण्डुरा रक्तपादाश्च विहङ्‌गाः कालचोदिताः ।
राक्षसानां विनाशाय कपोता विचरन्ति च ॥ ३१ ॥
ज्यांचे पंख पांढरे आणि पंजे लाल आहेत, ते कबूतर पक्षी दैवाने प्रेरित होऊन राक्षसांचा भावी विनाश सूचित करण्यासाठी येथे सर्व बाजूस विचरत आहेत. ॥३१॥
वीचीकूचीति वाश्यन्त्यः शारिका वेश्मसु स्थिताः ।
पतन्ति ग्रथिताश्चापि निर्जिताः कलहैषिभिः ॥ ३२ ॥
घरांत राहणार्‍या सारिका कलहाची इच्छा असणार्‍या दुसर्‍या पक्ष्यांबरोबर चें चें करीत भिडत आहेत आणि त्यांच्याकडून पराजित होऊन पृथ्वीवर कोसळून पडत आहेत. ॥३२॥
पक्षिणश्च मृगाः सर्वे प्रत्यादित्यं रुदन्ति ते ।
करालो विकटो मुण्डः परुषः कृष्णपिङ्‌गलः॥ ३३ ॥

कालो गृहाणि सर्वेषां काले कालेऽन्ववेक्षते ।
पक्षी आणि मृग सूर्याकडे मुख करून रडत आहेत. विकराळ, विकट काळ्या आणि भुर्‍या रंगाचे मुंडन केलेल्या पुरूषाचे रूप धारण करून काळ समय-समयावर आपणा सर्वांच्या घरांकडे पहात आहे. ॥३३ १/२॥
एतान्यन्यानि दुष्टानि निमित्तान्युत्पतन्ति च ॥ ३४ ॥

विष्णुं मन्यामहे रामं मानुषं रूपमास्थितम् ।
नहि मानुषमात्रोऽसौ राघवो दृढविक्रमः ॥ ३५ ॥

येन बद्धः समुद्रे च सेतुः स परमाद्‌भुतः ।
कुरुष्व नरराजेन संधिं रामेण रावण ।
ज्ञात्वा वधार्य कार्याणि क्रियतामायतिक्षमम् ॥ ३६ ॥
हे तसेच आणखीही बरेचसे अपशकुन होत आहेत. मी असे समजतो आहे की साक्षात्‌ भगवान्‌ विष्णुच मानवरूप धारण करून राम होऊन आले आहेत. ज्यांनी समुद्रात अत्यंत अद्‍भुत सेतु बांधला आहे, ते दृढ पराक्रमी राघव साधारण मनुष्य मात्र नाहीत. रावणा ! तू नाराज रामांबरोबर संधि कर. श्रीरामांची अलौकिक कर्मे आणि लंकेत होणारे उत्पात जाणून, जे कार्य भविष्यात सुख देणारे होईल त्याचा निश्चय करून, तेच करा. ॥३४-३६॥
इदं वचस्तत्र निशम्य माल्यवान्
परीक्ष्य रक्षोधिपतेर्मनः पुनः।
अनुत्तमेषूत्तमपौरुषो बली
बभूव तूष्णीं समवेक्ष्य रावणम् ॥ ३७ ॥
याप्रमाणे बोलून तसेच राक्षसराज रावणाच्या मनोभावाची परीक्षा करून उत्तम मंत्र्यांमध्ये श्रेष्ठ पौरूषशाली महाबली माल्यवान्‌ रावणाकडे पहात असता गप्प झाला. ॥३७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चत्रिंशः सर्गः ॥ ३५ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा पस्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP