श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ तृतीयः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्रवसो वैश्रवणस्योत्पत्तेस्तपसो वरप्राप्तेर्लङ्‌कायां निवासस्य च वर्णनम् -
विश्रवापासून वैश्रवणा (कुबेरां)ची उत्पत्ति, त्यांची तपस्या, वर प्राप्ति, तसेच लंकेत निवास -
अथ पुत्रः पुलस्त्यस्य विश्रवा मुनिपुङ्‌गवः ।
अचिरेणैव कालेन पितेव तपसि स्थितः ॥ १ ॥
पुलस्त्यांचे पुत्र मुनिवर विश्रवा थोड्‍याच समयात पित्याप्रमाणे तपस्येत संलग्न झाले. ॥१॥
सत्यवान् शीलवान् दान्तः स्वाध्यायनिरतः शुचिः ।
सर्वभोगेष्वसंसक्तो नित्यं धर्मपरायणः ॥ २ ॥
ते सत्यवादी, शीलवान्‌, जितेंद्रिय, स्वाध्यायपरायण, अंतरर्बाह्य पवित्र, संपूर्ण भोगांपासून अनासक्त तसेच सदाच धर्मपरायण होते. ॥२॥
ज्ञात्वा तस्य तु तद् वृत्तं भरद्वाजो महामुनिः ।
ददौ विश्रवसे भार्यां स्वसुतां देववर्णिनीम् ॥ ३ ॥
विश्रवा यांचे ते उत्तम आचरण जाणून महामुनि भरद्वाजांनी आपल्या कन्येचा जी देवांगने प्रमाणे सुंदर होती, त्यांच्याशी विवाह करून दिला. ॥३॥
प्रतिगृह्य तु धर्मेण भरद्वाजसुतां तदा ।
प्रजान्वीक्षिकया बुद्ध्या श्रेयो ह्यस्य विचिन्तयन् ॥ ४ ॥

मुदा परमया युक्तो विश्रवा मुनिपुङ्‌गवः ।
स तस्यां वीर्यसम्पन्नं अपत्यं परमाद्‌भुतम् ॥ ५ ॥

जनयामास धर्मज्ञः सर्वैर्ब्रह्मगुणैर्युतम् ।
तस्मिञ्जाते तु संहृष्टः सम्बभूव पितामहः ॥ ६ ॥
धर्माचे ज्ञाते मुनिवर विश्रवा यांनी अत्यंत प्रसन्नतेने धर्मानुसार भरद्वाजांच्या कन्येचे पाणिग्रहण केले आणि प्रजेचे हित-चिंतन करणार्‍या बुद्धिच्या द्वारे लोककल्याणाचा विचार करून त्यांनी तिच्या गर्भापासून एक अद्‍भुत आणि पराक्रमी पुत्र उत्पन्न केला. त्याच्या ठिकाणी सर्व ब्राह्मणोचित गुण विद्यमान होते. त्याच्या जन्माने पितामह पुलस्त्य मुनींना फार प्रसन्नता वाटली. ॥४-६॥
दृष्ट्‍वा श्रेयस्करीं बुद्धिं धनाध्यक्षो भविष्यति ।
नाम तस्याकरोत् प्रीतः सार्धं देवर्षिभिस्तदा ॥ ७ ॥
त्यांनी दिव्य दृष्टिने बघितले - या बालकात संसाराचे कल्याण करण्याची बुद्धि आहे तसेच हा पुढे जाऊन धनाध्यक्ष होईल. तेव्हा त्यांनी अत्यंत हर्षाने देवर्षिंच्या बरोबर त्याचा नामकरण संस्कार केला. ॥७॥
यस्माद्विश्रवसोऽपत्यं सादृश्याद् विश्रवा इव ।
तस्माद् वैश्रवणो नाम भविष्यत्वेष विश्रुतः ॥ ८ ॥
ते म्हणाले- विश्रव्याचा हा पुत्र विश्रव्याप्रमाणेच उत्पन्न झाला आहे, म्हणून हा वैश्रवण नामाने विख्यात होईल. ॥८॥
स तु वैश्रवणस्तत्र तपोवनगतस्तदा ।
अवर्धताहुतिहुतो महातेजा यथानलः ॥ ९ ॥
कुमार वैश्रवण तेथे तपोवनात राहून त्यासमयी आहुति दिल्यामुळे प्रज्वलित अग्निप्रमाणे वाढू लागला आणि महान्‌ तेजाने संपन्न झाला. ॥९॥
तस्याश्रमपदस्थस्य बुद्धिर्जज्ञे महात्मनः ।
चरिष्ये परमं धर्मं धर्मो हि परमा गतिः ॥ १० ॥
आश्रमांत राहिल्यामुळे त्या महात्मा वैश्रवणाच्या मनांतही हा विचार उत्पन्न झाला की मी उत्तम धर्माचरण करीन कारण की धर्मच परमगति आहे. ॥१०॥
स तु वर्षसहस्राणि तपस्तप्त्वा महावने ।
यन्त्रितो नियमैरुग्रैः चकार सुमहत्तपः ॥ ११ ॥
असा विचार करून त्याने तपस्येचा निश्चय केला आणि नंतर महान्‌ वनात जाऊन हजारो वर्षे पर्यंत कठोर नियम पाळून फार मोठी तपस्या केली. ॥११॥
पूर्णे वर्षसहस्रान्ते तं तं विधिमकल्पयत् ।
जलाशी मारुताहारो निराहारस्तथैव च ॥ १२ ॥

एवं वर्षसहस्राणि जग्मुस्तान्येकवर्षवत् ।
ते एक-एक हजार वर्षे पूर्ण झाल्यावर तपस्येचा नवीन नवीन विधि ग्रहण करीत होते. प्रथम तर त्यांनी केवळ जलाचा आहार केला. त्यानंतर ते हवा पिऊन राहू लागले. नंतर पुढे जाऊन त्यांनी त्याचाही त्याग केला आणि ते एकदम निराहार राहू लागले. याप्रकारे त्यांनी कित्येक हजार वर्षे एका वर्षासमान घालविली. ॥१२ १/२॥
अथ प्रीतो महातेजाः सेन्द्रैः सुरगणैः सह ॥ १३ ॥

गत्वा तस्याश्रमपदं ब्रह्मेदं वाक्यमब्रवीत् ।
तेव्हा त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन महातेजस्वी ब्रह्मदेव इंद्र आदि देवतांसह त्यांच्या आश्रमावर आले आणि या प्रकारे बोलले - ॥१३ १/२॥
परितुष्टोऽस्मि ते वत्स कर्मणानेन सुव्रत ॥ १४ ॥

वरं वृणीष्व भद्रं ते वरार्हस्त्वं महामते ।
हे सुव्रता, वत्सा ! मी तुझ्या या कर्माने - तपस्येने फार संतुष्ट झालो आहे. महामते ! तुझे भले होवो ! तू कुठलाही वर माग कारण तूं वर प्राप्त करण्यास योग्य आहेस. ॥१४ १/२॥
अथाब्रवीद् वैश्रवणः पितामहमुपस्थितम् ॥ १५ ॥

भगवँल्लोकपालत्वं इच्छेयं लोकरक्षणम् ।
हे ऐकून वैश्रणाने आपल्या जवळ उभ्या असलेल्या पितामहांना म्हटले - भगवन्‌ ! माझा विचार लोकांचे रक्षण करण्याचा आहे; म्हणून मी लोकपाल होण्याची इच्छा करत आहे. ॥१५ १/२॥
अथाब्रवीद् वैश्रवणं परितुष्टेन चेतसा ॥ १६ ॥

ब्रह्मा सुरगणैः सार्धं बाढमित्येव हृष्टवत् ।
वैश्रवणाच्या या बोलण्याने ब्रह्मदेवांच्या चित्ताला अधिकच संतोष झाला. त्यांनी संपूर्ण देवतांसह प्रसन्नतापूर्वक म्हटले -फार चांगले ॥१६ १/२॥
अहं वै लोकपालानां चतुर्थं स्रष्टुमुद्यतः ॥ १७ ॥

यमेन्द्रवरुणानां च पदं यत् तव चेप्सितम् ।
त्यानंतर ते परत म्हणाले -मुला ! मी चौथ्या लोकपालाची सृष्टि करण्यास उद्यत होतो. यम, इंद्र आणि वरूण यांना जे पद प्राप्त आहे तसेच लोकपाल पद जे तुझे अभिष्ट आहे, तुलाही प्राप्त होईल. ॥१७ १/२॥
तद्गच्छ त्वं हि धर्मज्ञ निधीशत्वमवाप्नुहि ॥ १८ ॥

शक्राम्बुपयमानां च चतुर्थस्त्वं भविष्यसि ।
धर्मज्ञा ! तू प्रसन्नतापूर्वक ते पद ग्रहण कर आणि अक्षय निधिंचा स्वामी बन. इंद्र, वरूण आणि यमाबरोबरच तू चौथा लोकपाल म्हणून संबोधला जाशील. ॥१८ १/२॥
एतच्च पुष्पकं नाम विमानं सूर्यसन्निभम् ॥ १९ ॥

प्रतिगृह्णीष्व यानार्थं त्रिदशैः समतां व्रज ।
हे सूर्यतुल्य तेजस्वी पुष्पक विमान आहे. ह्याला स्वतःचे वाहन म्हणून ग्रहण कर आणि देवतांच्या समान होऊन जा. ॥१९ १/२॥
स्वस्ति तेऽस्तु गमिष्यामः सर्व एव यथागतम् ॥ २० ॥

कृतकृत्या वयं तात दत्त्वा तव वरद्वयम् ।
तात ! तुझे कल्याण होवो ! आता आम्ही सर्व लोक जसे आले होतो तसे परत जाऊ. तुला हे दोन वर देऊन आम्ही आपल्याला कृतकृत्य समजत आहोत. ॥२० १/२॥
इत्युक्त्वा स गतो ब्रह्मा स्वस्थानं त्रिदशैः सह ॥ २१ ॥

गतेषु ब्रह्मपूर्वेषु देवेष्वथ नभस्थलम् ।
धनेशः पितरं प्राह प्राञ्जलिः प्रयतात्मवान् ॥ २२ ॥

भगवँल्लब्धवानस्मि वरमिष्टं पितामहात् ।
असे म्हणून ब्रह्मदेव देवतांसह आपल्या स्थानी निघून गेले. ब्रह्मदेव आदि देवता आकाशात निघून गेल्यावर आपल्या मनाला संयमित ठेवणार्‍या धनाध्यक्षाने पित्याला हात जोडून म्हटले -भगवन्‌ ! मी पितामह ब्रह्मदेवांकडून मनोवांछित फल प्राप्त केले आहे. ॥२१-२२ १/२॥
निवासनं न मे देवो विदधे स प्रजापतिः ॥ २३ ॥

तं पश्य भगवन् कंञ्चिन् निवासं साधु मे प्रभो ।
न च पीडा भवेद् यत्र प्राणिनो यस्य कस्यचित् ॥ २४ ॥
परंतु त्या प्रजापतिदेवांनी माझ्यासाठी कुठलेही निवास स्थान सांगितलेले नाही, म्हणून भगवन्‌ ! आता आपणच मला राहाण्यायोग्य एखाद्या अशा स्थानाचा शोध घ्या जे सर्व दृष्टीने चांगले असेल. (हे प्रभो !) ते स्थान असे असले पाहिजे की जेथे राहिले असता कुठल्याही प्राण्याला कष्ट होता कामा नयेत. ॥२३-२४॥
एवमुक्तस्तु पुत्रेण विश्रवा मुनिपुङ्‌गवः ।
वचनं प्राह धर्मज्ञः श्रूयतामिति सत्तमः ॥ २५ ॥

दक्षिणस्योदधेस्तीरे त्रिकूटो नाम पर्वतः ।
तस्याग्रे तु विशाला सा महेन्द्रस्य पुरी यथा ॥ २६ ॥
आपल्या पुत्राने असे म्हटल्यावर मुनिवर विश्रवा म्हणाले - धर्मज्ञा ! साधुशिरोमणे ! ऐक. दक्षिण समुद्राच्या तटावर एक त्रिकूट नामक पर्वत आहे. त्याच्या शिखरावर एक विशाल पुरी आहे, जी देवराज इंद्रांच्या अमरावती पुरीच्या समान शोभा प्राप्त करत आहे. ॥२५-२६॥
लङ्‌का नाम पुरी रम्या निर्मिता विश्वकर्मणा ।
राक्षसानां निवासार्थं यथेन्द्रस्यामरावती ॥ २७ ॥
तिचे नाव लंका आहे. इंद्राच्या अमरावती समान त्या रमणीय पुरीची निर्मिती विश्वकर्म्याने राक्षसांना राहाण्यासाठी केली आहे. ॥२७॥
तत्र त्वं वस भद्रं ते लङ्‌कायां नात्र संशयः ।
हेमप्राकारपरिखा यन्त्रशस्त्रसमावृता ॥ २८ ॥
मुला ! तुझे कल्याण होवो. तू निःसंदेह त्या लंकापुरीत जाऊन राहा. तिची तटबंदी सोन्याची बनलेली आहे. तिच्या चारी बाजूस मोठे खंदक खोदलेले आहेत. आणि ती अनेकानेक यंत्रांनी आणि शस्त्रांनी सुरक्षित आहे. ॥२८॥
रमणीया पुरी सा हि रुक्मवैदूर्यतोरणा ।
राक्षसैः सा परित्यक्ता पुरा विष्णुभयार्दितैः ॥ २९ ॥
ती पुरी फार रमणीय आहे. तिच्यांतील तोरणे सोने आणि नीलम रत्‍नांनी बनविलेली आहेत. पूर्वकाळी भगवान्‌ विष्णुंच्या भयाने पीडित झालेल्या राक्षसांनी त्या पुरीचा त्याग केला आहे. ॥२९॥
शून्या रक्षोगणैः सर्वै रसातलतलं गतैः ।
शून्या सम्प्रति लङ्‌का सा प्रभुस्तस्या न विद्यते ॥ ३० ॥
ते समस्त राक्षस रसातलास निघून गेले आहेत म्हणून लंकापुरी शून्य (ओसाड) झालेली आहे. या समयीही लंकापुरी ओसाडच आहे, तिचा कोणी स्वामी नाही आहे. ॥३०॥
स त्वं तत्र निवासाय गच्छ पुत्र यथासुखम् ।
निर्दोषस्तत्र ते वासो न बाधास्तत्र कस्यचित् ॥ ३१ ॥
म्हणून मुला ! तू तेथे निवास करण्यासाठी सुखपूर्वक जा. तेथे राहाण्यांस कुठल्याही प्रकारचा दोष अथवा भीति नाही आहे. तेथे कोणाकडूनही काही विघ्न, बाधा येऊ शकत नाही. ॥३१॥
एतच्छुत्वा स धर्मात्मा धर्मिष्ठं वचनं पितुः ।
निवासयामास तदा लङ्‌कां पर्वतमूर्धनि ॥ ३२ ॥
आपल्या पित्याचे धर्मयुक्त वचन ऐकून धर्मात्मा वैश्रवणाने त्रिकूट पर्वताच्या शिखरावर बसलेल्या लंकापुरीत निवास केला. ॥३२॥
नैर्‌ऋतानां सहस्रैस्तु हृष्टैः प्रमुदुतैः सदा ।
अचिरेणैव कालेन सम्पूर्णा तस्य शासनात् ॥ ३३ ॥
त्यांनी निवास केल्यावर थोड्‍या दिवसात ती पुरी हजारो हृष्ट पुष्ट राक्षसांनी भरून गेली. त्यांच्या आज्ञेने ते राक्षस तेथे येऊन आनंदपूर्वक राहू लागले. ॥३३॥
स तु तत्रावसत् प्रीतो धर्मात्मा नैर्‌ऋतर्षभः ।
समुद्रपरिघायां स लङ्‌कायां विश्रवात्मजः ॥ ३४ ॥
समुद्र जिच्यासाठी खंदकाचे काम करत होता त्या लंकानगरीत विश्रव्याचा धर्मात्मा पुत्र वैश्रवण राक्षसांचा राजा होऊन मोठ्‍या प्रसन्नतेने निवास करू लागला. ॥३४॥
काले काले तु धर्मात्मा पुष्पकेण धनेश्वरः ।
अभ्यागच्छद् विनीतात्मा पितरं मातरं च हि ॥ ३५ ॥
धर्मात्मा धनेश्वर वेळोवेळी पुष्पकविमानाच्या द्वारा येऊन आपल्या मातापित्यांना भेटून जात असे. त्याचे हृदय फारच विनीत होते. ॥३५॥
स देवगन्धर्वगणैरभिष्टुतः
तथाप्सरोनृत्यविभूषितालयः ।
गभस्तिभिः सूर्य इवावभासयन्
पितुः समीपं प्रययौ स वित्तपः ॥ ३६ ॥
देवता आणि गंधर्व त्यांची स्तुति करत असत. त्यांचे भव्य भवन अप्सरांच्या नृत्याने सुशोभित होत होते. ते धनपति कुबेर आपल्या किरणांनी सुशोभित होणार्‍या सूर्याप्रमाणे सर्वत्र प्रकाश पसरवित आपल्या पित्याजवळ गेले. ॥३६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा तृतीय सर्ग पूरा झाला. ॥३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP