[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ सप्तपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य मृगं हत्वा निवर्तनं मार्गेऽपशकुनं दृष्ट्‍वा तस्य चिंता तत्र मिलितं लक्ष्मणमुपालभ्य सीताविषयकसंकटस्य तेनाशङ्‌कनम् -
श्रीरामांचे परत येणे, मार्गात अपशकुन पाहून चिंतित होणे, तसेच लक्ष्मण भेटल्यावर त्याला दोष देऊन सीतेवर संकट येण्याची आशंका व्यक्त करणे -
राक्षसं मृगरूपेण चरन्तं कामरूपिणम् ।
निहत्य रामो मारीचं तूर्णं पथि न्यवर्तत ॥ १ ॥
इकडे मृगरूपाने विचरणार्‍या त्या इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या राक्षस मारीचाचा वध करून श्रीराम तात्काळच आश्रमाच्या मार्गावर परतले. ॥१॥
तस्य सन्त्वरमाणस्य द्रष्टुकामस्य मैथिलीम् ।
क्रूरस्वनोऽथ गोमायुर्विननादास्य पृष्ठतः ॥ २ ॥
ते सीतेला पहाण्यासाठी भराभर पावले टाकीत येत होते. इतक्यातच मागील बाजूने एक कोल्हीण अत्यंत कठोर स्वरात चीत्कार करू लागली. ॥२॥
स तस्य स्वरमाज्ञाय दारुणं रोमहर्षणम् ।
चिन्तयामास गोमायोः स्वरेण परिशङ्‌कितः ॥ ३ ॥
त्या कोल्हीणीच्या त्या स्वराने श्रीरामांच्या मनात काही शंका उत्पन्न झाली. तिचा स्वर फारच भयंकर आणि अंगावर काटे उभे करणारा होता. त्याचा अनुभव करून ते फार चिंतेत पडले. ॥३॥
अशुभं बत मन्येऽहं गोमायुर्वाश्यते यथा ।
स्वस्ति स्यादपि वैदेह्या राक्षसैर्भक्षणं विना ॥ ४ ॥
ते मनातल्या मनात म्हणू लागले- ही कोल्हीण ज्या बोलीत बोलत आहे त्यावरून मला कळून येत आहे की काही अशुभ घटना घडलेली आहे. काय वैदेही सीता सकुशल असेल ? तिला राक्षसांनी खाऊन टाकले नाही ना ? ॥४॥
मारीचेन तु विज्ञाय स्वरमालक्ष्य मामकम् ।
विक्रुष्टं मृगरुपेण लक्ष्मणः शृणुयाद् यदि ॥ ५ ॥
मृगरूपधारी मारीचाने जाणून बुजून माझ्या स्वराचे अनुसरण करून जी आर्त हाक मारली होती ती एवढ्‍याच साठी की कदाचित लक्ष्मण ती ऐकू शकेल. ॥५॥
स सौमित्रिः स्वरं श्रुत्वा तां च हित्वाथ मैथिलम् ।
तयैव प्रहितः क्षिप्रं मत्सकाशमिहैष्यति ॥ ६ ॥
सुमित्रानंदन लक्ष्मणाने तो स्वर ऐकताच सीतेच्या सांगण्यावरून तिला एकटी सोडून ताबडतोब माझ्याकडे येण्यासाठी निघाला असेल. ॥६॥
राक्षसैः सहितैर्नूनं सीताया ईप्सितो वधः ।
काञ्चनश्च मृगो भूत्वा व्यपनीयाश्रमात्तु माम् ॥ ७ ॥

दूरं नीत्वाथ मारीचो राक्षसोऽभूच्छराहतः ।
हा लक्ष्मण हतोऽस्मीति यद्वाक्यं व्याजहार च ॥ ८ ॥
राक्षस लोक सर्वच्या सर्व मिळून सीतेचा वध अवश्य करू इच्छितात. याच उद्देश्याने मारीच राक्षस सोन्याचा मृग बनून मला आश्रमापासून दूर घेऊन आला होता आणि माझ्या बाणांनी आहत झाल्यावर त्याने जो आर्तनाद करीत म्हटले होते की हा लक्ष्मण ! मी मारला गेलो यातही त्याचा तोच उद्देश लपलेला होता. ॥७-८॥
अपि स्वस्ति भवेत् द्वाभ्यां रहिताभ्यां मया वने ।
जनस्थाननिमित्तं हि कृतवैरोऽस्मि राक्षसैः ॥ ९ ॥
वनात आम्ही दोघे भाऊ आश्रमापासून दूर झाल्यावर काय सीता तेथे सकुशल राहू शकेल ? जनस्थानात जो राक्षसांचा संहार झाला आहे त्या कारणांनी सर्व राक्षसांनी माझ्याशी वैर धरलेले आहे. ॥९॥
निमित्तानि च घोराणि दृश्यन्तेऽद्य बहूनि च ।
इत्येवं चिन्तयन् रामः श्रुत्वा गोमायुनिःस्वनम् ॥ १० ॥

निवर्तमानस्त्वरितो जगामाश्रममात्मवान् ।
आज बरेचसे भयंकर अपशकुन दिसून येत आहेत. कोल्हीणीची बोली ऐकून याप्रकारे चिंता करीत मनाला वश ठेवणारे श्रीराम तात्काळ परतून आश्रमाकडे निघाले. ॥१० १/२॥
आत्मनश्चापनयनं मृगरूपेण रक्षसा ॥ ११ ॥

आजगम जनस्थानं राघवः परिशङ्‌कितः ।
मृगरूपधारी राक्षसाच्या द्वारा आपल्याला आश्रमापासून दूर नेण्याच्या घटनेवर विचार करून राघव शंकित हृदयाने जनस्थानात आले. ॥११ १/२॥
तं दीनमानसं दीनमासेदुर्मृगपक्षिणः ॥ १२ ॥

सव्यं कृत्वा महात्मानं घोरांश्च ससृजुः स्वरान् ।
त्यांचे मन फार दुःखी होते. ते दीन होत होते. त्याच अवस्थेत वनांतून मृग आणि पक्षी त्यांना डाव्या बाजूस ठेवून तेथे आले आणि भयंकर स्वरात आपली बोली बोलू लागले. ॥१२ १/२॥
तानि दृष्ट्‍वा निमित्तानि महाघोराणि राघवः ।
न्यवर्तताथ त्वरितो जवेनाश्रममात्मनः ॥ १३ ॥
त्या भयंकर अपशकुनांना पाहून राघव तात्काळच अत्यंत वेगाने आपल्या आश्रमाकडे परतले. ॥१३॥
ततो लक्ष्मणमायान्तं ददर्श विगतप्रभम् ।
ततोऽविदूरे रामेण समीयाय स लक्ष्मणः ॥ १४ ॥
इतक्यातच त्यांना लक्ष्मण येतांना दिसले. त्यांची कांति फिकी पडलेली होती. थोड्‍याच वेळात निकट येऊन लक्ष्मण श्रीरामांना भेटले. ॥१४॥
विषण्णः सन् विषण्णेन दुःखितो दुःखभागिना ।
स जगर्हेऽथ तं भ्राता ज्येष्ठो लक्ष्मणमागतम् ॥ १५ ॥

विहाय सीतां विजने वने राक्षससेविते ।
दुःख आणि विषादात बुडलेल्या लक्ष्मणांनी दुःखी आणि विषादग्रस्त रामांची भेट घेतली. त्या समयी राक्षसांनी सेवित निर्जन वनात सीतेला एकाकी सोडून आलेल्या लक्ष्मणास पाहून भ्राता श्रीरामांनी त्यांची निंदा केली. ॥१५ १/२॥
गृहीत्वा च करं सव्यं लक्ष्मणं रघुनन्दनः ॥ १६ ॥

उवाच मधुरोदर्कं इदं परुषमार्तवत् ।
लक्ष्मणाचा डावा हात पकडून रघुनंदन आर्त झाल्यासारखे झाले आणि प्रथम कठोर आणि शेवटी मधुर वाणी द्वारा या प्रकारे बोलले- ॥१६ १/२॥
अहो लक्ष्मण गर्ह्यं ते कृतं यत् त्वं विहाय ताम् ॥ १७ ॥

सीतामिहागतः सौम्य कच्चित् स्वस्ति भवेदिति ।
अहो सौम्य लक्ष्मणा ! हे तू फार वाईट केलेस की सीतेला एकटी सोडून येथे निघून आलास ? काय तेथे सीता सकुशल असेल ? ॥१७ १/२॥
न मेऽस्ति संशयो वीर सर्वथा जनकात्मजा ॥ १८ ॥

विनष्टा भक्षिता वापि राक्षसैर्वनचारिभिः ।
वीरा ! मला यात संदेह नाही आहे की वनात विचरण करणार्‍या राक्षसांनी सीतेला एक तर सर्वथा नष्ट करून टाकली असेल अथवा त्यांनी तिला खाऊन टाकले असेल. ॥१८ १/२॥
अशुभान्येव भूयिष्ठं यथा प्रादुर्भवन्ति मे ॥ १९ ॥

अपि लक्ष्मण सीतायाः सामग्य्रं प्राप्नुयामहे ।
जीवन्त्याः पुरुषव्याघ्र सुताया जनकस्य वै ॥ २० ॥
कारण की माझ्या आसपास बरेचसे अपशकुन होत आहेत. पुरुषसिंह लक्ष्मणा ! काय आपण जिवंत असलेल्या जनककुमारी सीतेला पूर्णतः स्वस्थ आणि सकुशल पाहू शकू ? ॥१९-२०॥
यथा वै मृगसङ्‌घाश्च गोमायुश्चैव भैरवम् ।
वाश्यन्ते शकुनाश्चापि प्रदीप्तामभितो दिशम् ।
अपि स्वस्ति भवेत् तस्या राजपुत्र्या महाबल ॥ २१ ॥
महाबली लक्ष्मणा ! या मृगांच्या झुंडी (डाव्या बाजूने येऊन) जसे अमंगल सूचित करीत आहेत; हे कोल्हे ज्याप्रकारे भैरवनाद करीत आहेत तसेच जळत असल्याप्रमाणे प्रतीत होणार्‍या या संपूर्ण दिशांमध्ये पक्षी ज्या प्रकारची बोली बोलत आहेत - या सर्वांवरून हेच अनुमान होत आहे की राजकुमारी सीता क्वचितच्‌ कुशल असेल. ॥२१॥
इदं हि रक्षो मृगसंनिकाशं
     प्रलोभ्य मां दूरमनुप्रयातम् ।
हतं कथञ्चिन्महता श्रमेण
     स राक्षसोऽभून्म्रियमाण एव ॥ २२ ॥
हा राक्षस मृगाचे रूप धारण करून मला लोभ दाखवून दूर घेऊन आला होता. महान्‌ परिश्रम करून जेव्हा मी याला कसातरी मारला तेव्हा मरताच तो राक्षस होऊन गेला. ॥२२॥
मनश्च मे दीनमिहाप्रहृष्टं
     चक्षुश्च सव्यं कुरुते विकारम् ।
असंशयं लक्ष्मण नास्ति सीता
     हृता मृता वा पथि वर्तते वा ॥ २३ ॥
लक्ष्मणा ! म्हणून माझे मन अत्यंत दीन आणि अप्रसन्न होत आहे. माझा डावा डोळा फडफडत आहे. यावरून कळून येत आहे की निःसंदेह आश्रमावर सीता नाही आहे. तिला कुणी हरण करून नेले असावे, ती मारली गेली असावी अथवा (कुणा राक्षसा बरोबर) मार्गात असावी. ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे सप्तपञ्चाशः सर्गः ॥ ५७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा सत्तावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP