श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। एकपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शतानन्दपृष्टेन विश्वामित्रेण श्रीरामकर्तृकस्याहल्योद्धारस्य वृत्तान्तनिवेदनं, शतानन्देन च श्रीराममभिनन्द्य तं प्रति विश्वामित्रपूर्वचरित्रस्य वर्णनम् - शतानन्दांनी विचारल्यावर विश्वामित्रांनी त्यांना श्रीरामद्वारा अहल्येच्या उद्धाराचा वृत्तांत सांगणे तथा शतानन्दद्वारा श्रीरामांचे अभिनन्दन करून विश्वामित्रांच्या पूर्वचरित्राचे वर्णन -
तस्य तद् वचनं श्रुत्वा विश्वामित्रस्य धीमतः ।
हृष्टरोमा महातेजाः शतानन्दो महातपाः ॥ १ ॥
परम बुद्धिमान विश्वामित्रांनी सांगितलेला वृत्तांत ऐकून महातेजस्वी महातपस्वी शतानन्दांच्या शरीरावर रोमाञ्च आले. ॥ १ ॥
गौतमस्य सुतो ज्येष्ठस्तपसा द्योतितप्रभः ।
रामसंदर्शनादेव परं विस्मयमागतः ॥ २ ॥
ते गौतमांचे ज्येष्ट पुत्र होते. तपस्येमुळे त्यांची कांति प्रकाशमय झाली होती. ते श्रीरामचंद्रांच्या दर्शनमात्रेंच अत्यंत विस्मित झाले. ॥ २ ॥
एतौ निषण्णौ सम्प्रेक्ष्य शतानन्दो नृपात्मजौ ।
सुखासीनौ मुनिश्रेष्ठं विश्वामित्रमथाब्रवीत् ॥ ३ ॥
त्या दोन्ही राजकुमारांना सुखपूर्वक बसलेले पाहून शतानन्दांनी मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना विचारले - ॥ ३ ॥
अपि ते मुनिशार्दूल मम माता यशस्विनी ।
दर्शिता राजपुत्राय तपोदीर्घमुपागता ॥ ४ ॥
"मुनिप्रवर ! माझी यशस्विनी माता अहल्या फार दिवसापासून तपस्या करीत राहिली होती. काय आपण राजकुमार श्रीरामांना तिचे दर्शन करविले ? ॥ ४ ॥
अपि रामे महातेजा मम माता यशस्विनी ।
वन्यैरुपाहरत् पूजां पूजार्हे सर्वदेहिनाम् ॥ ५ ॥
'माझ्या महातेजस्विनी आणि यशस्विनी माता अहल्येने वनात होणार्‍या फल-मूल आदिंनी समस्त देहधारी पूजनीय श्रीरामचंद्रांचे पूजन, आदर सत्कार केला होता का ? ॥ ५ ॥
अपि रामाय कथितं यद् वृत्तं तत् पुरातनम् ।
मम मातुर्महातेजो देवेन दुरनुष्ठितम् ॥ ६ ॥
'महातेजस्वी मुने ! काय श्रीरामाला आपण तो प्राचीन वृत्तांत सांगितला होता का, की जो माझ्या मातेच्या प्रति देवराज इंद्रद्वारा केल्या गेलेल्या छल कपट आणि दुराचाराद्वारा घडला होता ? ॥ ६ ॥
अपि कौशिक भद्रं ते गुरुणा मम संगता ।
मम माता मुनिश्रेष्ठ रामसंदर्शनादितः ॥ ७ ॥
मुनिश्रेष्ठ कौशिक ! आपले कल्याण होवो ! काय श्रीरामचंद्रांच्या दर्शन आदिंच्या प्रभावाने माझी माता शापमुक्त होऊन पित्याला जाऊन भेटली ? ॥ ७ ॥
अपि मे गुरुणा रामः पूजितः कुशिकात्मज ।
इहागतो महातेजाः पूजां प्राप्य महात्मनः ॥ ८ ॥
'कुशिकनन्दन ! माझ्या पित्याने श्रीरामांचे पूजन केले होते का ? त्या महात्म्याची पूजा ग्रहण करून हे महातेजस्वी श्रीराम येथे आले आहेत कां ? ॥ ८ ॥
अपि शान्तेन मनसा गुरुर्मे कुशिकात्मज ।
इहागतेन रामेण पूजितेनाभिवादितः ॥ ९ ॥
'विश्वामित्र मुनि ! काय येथे येऊन माझ्या माता-पिता यांच्याद्वारे सन्मानित झालेल्या श्रीरामाने माझ्या पूज्य पित्याचे शांत चित्ताने अभिवादन केले होते ?" ॥ ९ ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्य विश्वामित्रो महामुनिः ।
प्रत्युवाच शतानन्दं वाक्यज्ञो वाक्यकोविदम् ॥ १० ॥
शतानन्दांचा हा प्रश्न ऐकून संभाषणाची कला जाणणार्‍या महामुनि विश्वामित्रांनी संभाषण कुशल शतानन्दांना याप्रकारे उत्तर दिले - ॥ १० ॥
नातिक्रान्तं मुनिश्रेष्ठ यत्कर्तव्यं कृतं मया ।
सङ्‍गता मुनिना पत्‍नी भार्गवेणेव रेणुका ॥ ११ ॥
'मुनिश्रेष्ठ ! मी काही सांगण्याचे बाकी ठेवलेले नाही. माझे कर्तव्य होते ते मी पूर्ण केले आहे. भृगुवंशी जमदग्नीशी रेणुका ज्याप्रमाणे जाऊन मिळाली होती त्याचप्रमाणे महर्षि गौतमांना त्यांची पत्‍नी अहल्या जाऊन भेटली आहे.' ॥ ११ ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्य विश्वामित्रस्य धीमतः ।
शतानन्दो महातेजा रामं वचनमब्रवीत् ॥ १२ ॥
बुद्धिमान विश्वामित्रांचे हे बोलणे ऐकून महातेजस्वी शतानन्दांनी श्रीरामास ही गोष्ट सांगितली - ॥ १२ ॥
स्वागतं ते नरश्रेष्ठ दिष्ट्या प्राप्तोऽसि राघव ।
विश्वामित्रं पुरस्कृत्य महर्षिमपराजितम् ॥ १३ ॥
"नरश्रेष्ठ ! आपले स्वागत आहे. रघुनन्दना ! माझे फार मोठे भाग्य आहे की आपण कुणाकडूनही पराजित न होणार्‍या महर्षि विश्वामित्रांना पुढे करून येथपर्यंत येण्याचे कष्ट घेतलेत. ॥ १३ ॥
अचिन्त्यकर्मा तपसा ब्रह्मर्षिरमितप्रभः ।
विश्वामित्रो महातेजा वेद्‌म्येनं परमां गतिम् ॥ १४ ॥
'महर्षि विश्वामित्रांची कर्मे अचिंत्य आहेत. ते तपस्येच्या योगे ब्रह्मर्षि पदास प्राप्त झाले आहेत. त्यांची कांति असीम आहे आणि हे महातेजस्वी आहेत. मी यांना जाणतो. हे जगाचे परम हितैषी आहेत. ॥ १४ ॥
नास्ति धन्यतरो राम त्वत्तोऽन्यो भुवि कश्चन ।
गोप्ता कुशिकपुत्रस्ते येन तप्तं महत्तपः ॥ १५ ॥
'श्रीराम ! या जगात आपल्यापेक्षा अधिक धन्यातिधन्य पुरुष दुसरा कोणीही नाही. कारण कुशिकनन्दन विश्वामित्र, ज्यांनी फार मोठी तपस्या केली आहे, आपले रक्षक आहेत. ॥ १५ ॥
श्रूयतां चाभिधास्यामि कौशिकस्य महात्मनः ।
यथा बलं यथातत्त्वं तन्मे निगदतः शृणु ॥ १६ ॥
'मी महात्मा कौशिकांच्या बलाचे आणि स्वरुपाचे यथार्थ वर्णन करीत आहे. आपण ध्यान देऊन माझ्याकडून हे सर्व ऐकावे. ॥ १६ ॥
राजाऽऽसीदेष धर्मात्मा दीर्घकालमरिंदमः ।
धर्मज्ञः कृतविद्यश्च प्रजानां च हिते रतः ॥ १७ ॥
'हे विश्वामित्र प्रथम एक धर्मात्मा राजा होते. त्यांनी शत्रूंचे दमनपूर्वक दीर्घकाल पर्यंत राज्य केले होते. हे धर्मज्ञ आणि विद्वान असून त्याचबरोबर प्रजावर्गाच्या हितसाधनात तत्पर रहात असत. ॥ १७ ॥
प्रजापतिसुतस्त्वासीत् कुशो नाम महीपतिः ।
कुशस्य पुत्रो बलवान् कुशनाभः सुधार्मिकः ॥ १८ ॥
'प्राचीनकाली कुश नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला होता. तो प्रजापतिचा पुत्र होता. कुशाच्या बलवान् पुत्राचे नाम कुशनाभ होते. तो फारच मोठा धर्मात्मा होता. ॥ १८ ॥
कुशनाभसुतस्त्वासीद् गाधिरित्येव विश्रुतः ।
गाधेः पुत्रो महातेजा विश्वामित्रो महामुनिः ॥ १९ ॥
'कुशनाभाचे पुत्र गाधि नामाने विख्यात होते. त्याच गाधिंचे महातेजस्वी पुत्र हे महामुनि विश्वामित्र आहेत. ॥ १९ ॥
विश्वामित्रो महातेजाः पालयामास मेदिनीम् ।
बहुवर्षसहस्राणि राजा राज्यमकारयत् ॥ २० ॥
'महातेजस्वी राजा विश्वामित्रांनी कित्येक हजार वर्षेपर्यंत या पृथ्वीचे पालन तथा राज्याचे शासन केले. ॥ २० ॥
कदाचित् तु महातेजा योजयित्वा वरूथिनीम् ।
अक्षौहिणीपरिवृतः परिचक्राम मेदिनीम् ॥ २१ ॥
'एके समयीची गोष्ट. महातेजस्वी राजा विश्वामित्र सेना एकत्र करून एक अक्षौहिणी सेनेसह पृथ्वीवर विचरण करू लागले. ॥ २१ ॥
नगराणि च राष्ट्राणि सरितश्च महागिरीन् ।
आश्रमान् क्रमशो राजा विचरन्नाजगाम ह ॥ २२ ॥

वसिष्ठस्याश्रमपदं नानापुष्पलताद्रुमम् ।
नानामृगगणाकीर्णं सिद्धचारणसेवितम् ॥ २३ ॥
'ते अनेकानेक नगरे, राष्ट्रे, नद्या, मोठमोठे पर्वत, आणि आश्रमांतून क्रमशः विचरत असतां महर्षि वसिष्ठांच्या आश्रमावर येऊन पोहोंचले. तो आश्रम नाना प्रकारच्या फुलांनी, लतांनी आणि वृक्षांनी शोभून दिसत होता. नाना प्रकारचे मृग (वन्यपशु) तेथे सर्वत्र पसरलेले होते आणि सिद्ध व चारण त्या आश्रमामध्ये निवास करीत होते. ॥ २२-२३ ॥
देवदानवगन्धर्वैः किन्नरैरुपशोभितम् ।
प्रशान्तहरिणाकीर्णं द्विजसङ्‍घनिषेवितम् ॥ २४ ॥
'देवता, दानव, गंधर्व आणि किन्नर त्याची शोभा वाढवत होते. शांत मृग तेथे भरपूर होते. अनेक ब्राह्मण, ब्रह्मर्षि आणि देवर्षिंचे समुदाय त्याचे सेवन करीत होते. ॥ २४ ॥
ब्रह्मर्षिगणसङ्‍कीर्णं देवर्षिगणसेवितम् ।
तपश्चरणसंसिद्धैरग्निकल्पैर्महात्मभिः ॥ २५ ॥

सततं संकुलं श्रीमद्‌ब्रह्मकल्पैर्महात्मभिः ।
अब्भक्षैर्वायुभक्षैश्च शीर्णपर्णाशनैस्तथा ॥ २६ ॥

फलमूलाशनैर्दान्तैर्जितदोषैर्जितेन्द्रियैः ।
ऋषिभिर्वालखिल्यैश्च जपहोमपरायणैः ॥ २७ ॥

अन्यैर्वैखानसैश्चैव समंतादुपशोभितम् ।
वसिष्ठस्याश्रमपदं ब्रह्मलोकमिवापरम् ।
ददर्श जयतां श्रेष्ठो विश्वामित्रो महाबलः ॥ २८ ॥
'तपस्येने सिद्ध झालेले अग्निसमान तेजस्वी महात्मा, तथा ब्रह्मदेवाप्रमाणे महामहिम असे बरेच महात्मे सदा त्या आश्रमात रहात होते. त्यांच्यापैकी कुणी जल पिऊन राहात असत तर कुणी वायु भक्षण करून रहात असत. कित्येक महात्मे फल-मूल खाऊन अथवा वाळलेली पाने खाऊन रहात असत. राग आदि दोषांना जिंकून, मन आणि इंद्रियांवर ताबा राखणारे बरेचसे ऋषि जप, होम यात गुंतलेले असत. वालखिल्य मुनिगण तथा अन्यान्य वैखानस महात्मे सर्व बाजूंनी त्या आश्रमाची शोभा वाढवित होते. या सर्व वैशिष्ठ्यांमुळे महर्षि वसिष्ठांचा आश्रम प्रति ब्रह्मलोकाप्रमाणे वाटत होता. विजयी वीरात श्रेष्ठ महाबली विश्वामित्रांनी त्यांचे दर्शन केले. ॥ २५-२८ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकपञ्चाशः सर्गः ॥ ५१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एक्कावन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५१ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP