[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
एकोनसप्ततितमः सर्गः
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतस्य चिन्ता तं प्रसादयितुं मित्राणां प्रयासस्तैः पृष्टेन भरतेन तेषां समक्षे स्वदृष्टस्य भयंकरदुःस्वप्नस्य वर्णनम् -
भरतांची चिन्ता, मित्रांच्या द्वारे त्यांना प्रसन्न करण्याचे प्रयत्‍न आणि त्यांनी विचाल्यावरून भरतांनी मित्रांच्या समक्ष आपण पाहिलेल्या भयंकर दुःस्वप्नांचे वर्णन करणे -
यामेव रात्रिं ते दूताः प्रविशन्ति स्म तां पुरीम् ।
भरतेनापि तां रात्रिं स्वप्नो दृष्टोऽयमप्रियः ॥ १ ॥
ज्या रात्री दूतांनी त्या नगरात प्रवेश केला होता त्याच्या पूर्वरात्री भरतांनी ही एक अप्रिय स्वप्न पाहिले होते. ॥ १ ॥
व्युष्टामेव तु तां रात्रिं दृष्ट्‍वा तं स्वप्नमप्रियम् ।
पुत्रो राजाधिराजस्य सुभृशं पर्यतप्यत ॥ २ ॥
रात्र संपून जवळ जवळ पहाट होऊ लागली होती तेव्हा ते अप्रिय स्वप्न पाहून राजाधिराज दशरथांचे पुत्र भरत मनातल्या मनात अत्यन्त संतप्त झाले. ॥ २ ॥
तप्यमानं समाज्ञाय वयस्याः प्रियवादिनः ।
आयासं हि विनयिष्यन्तः सभायां चक्रिरे कथाः ॥ ३ ॥
त्यांना चिन्तित जाणून त्यांचा अनेकानेक प्रियवादी मित्रांनी त्यांचे मानसिक क्लेश दूर करण्याच्या इच्छेने एक सभा भरवली आणि त्यात अनेक प्रकारच्या गोष्टी करू लागले. ॥ ३ ॥
वादयन्ति तदा शान्तिं लासयन्त्यपि चापरे ।
नाटकान्यपरे स्माहुर्हास्यानि विविधानि च ॥ ४ ॥
काही लोक वीणा वाजवू लागले. दुसरे लोक त्यांचा खेद शांत व्हावा म्हणून नृत्य करू लागले. दुसर्‍या मित्रांनी नाना प्रकारच्या नाटकांचे आयोजन केले, ज्यात हास्यरसाचे प्राधान्य होते. ॥ ४ ॥
स तैर्महात्मा भरतः सखिभिः प्रियवादिभिः ।
गोष्ठीहास्यानि कुर्वद्‌भिर्न प्राहृष्यत राघवः ॥ ५ ॥
परन्तु राघव महात्मा भरत त्या प्रियवादी मित्रांच्या सभेमध्ये हास्य-विनोद करण्यानेही प्रसन्न झाले नाहीत. ॥ ५ ॥
तमब्रवीत् प्रियसखो भरतं सखिभिर्वृतम् ।
सुहृद्‌भिः पर्युपासीनः किं सखे नानुमोदसे ॥ ६ ॥
तेव्हा सुहृदांनी घेरलेल्या मध्यभागी विराजमान भरतांना एका प्रिय मित्राने विचारले - ’सख्या ! तुम्ही आज प्रसन्न का होत नाही ?’॥ ६ ॥
एवं ब्रुवाणं सुहृदं भरतः प्रत्युवाच ह ।
शृणु त्वं यन्निमित्तं मे दैन्यमेतदुपागतम् ॥ ७ ॥

स्वप्ने पितरमद्राक्षं मलिनं मुक्तमूर्धजम् ।
पतन्तमद्रिशिखरात् कलुषे गोमये ह्रदे ॥ ८ ॥
’मित्रा ! ज्या कारणाने माझ्या मनात हे दैन्य आले आहे ते सांगतो. ऐका ! मी आज स्वप्नात आपल्या वडिलांना पाहिले. त्यांचे मुख मलिन होते, केस मोकळे होते आणि ते पर्वताच्या शिखरावरून ज्यांत शेण भरलेले होते अशा घाणेरड्या खड्यात पडलेले होते. ॥ ७-८ ॥
प्लवमानश्च मे दृष्टः स तस्मिन् गोमये ह्रदे ।
पिबन्नञ्जलिना तैलं हसन्निव मुहुर्मुहुः ॥ ९ ॥
’मी त्या शेणाच्या कुण्डात त्यांना पोहोतांना पाहिले. ते ओंजळीत तेल घेऊन पीत होते आणि वारंवार जणु हासत आहेत असे भासत होते. ॥ ९ ॥
ततस्तिलोदनं भुक्त्वा पुनः पुनरधःशिराः ।
तैलेनाभ्यक्तसर्वाङ्‌गस्तैलमेवान्वगाहत ॥ १० ॥
’नंतर त्यांनी तिळ आणि भात खाल्ला. त्यानंतर त्यांच्या सर्व शरीरावर तेल चोपडण्यात आले आणि नंतर ते खाली डोके (वर पाय) असे तेलातच गटंगळ्या खाऊ लागले. ॥ १० ॥
स्वप्नेऽपि सागरं शुष्कं चन्द्रं च पतितं भुवि ।
उपरुद्धां च जगतीं तमसेव समावृताम् ॥ ११ ॥
’स्वप्नातच मी हे ही पाहिले की समुद्र सुकून गेला आहे, चन्द्रमा पृथ्वीवर पडला आहे सारी पृथ्वी उपद्रवाने ग्रस्त आणि अंधकाराने आच्छादित झाल्याप्रमाणे भासत आहे. ॥ ११ ॥
औपवाह्यस्य नागस्य विषाणं शकलीकृतम् ।
सहसा चापि संशान्ता ज्वलितं जातवेदसम् ॥ १२ ॥
महाराजांच्या स्वारीच्या कामी येणार्‍या हत्तीचे दात तुटून गेले; त्यांची शकले झाली आहेत, आणि पहिल्याने प्रज्वलित असलेला अग्नि एकाएकी विझून गेला आहे. ॥ १२ ॥
अवदीर्णां च पृथिवीं शुष्कांश्च विविधान् द्रुमान् ।
अहं पश्यामि विध्वस्तान् सधूमांश्चैव पर्वतान् ॥ १३ ॥
’मी हे ही पाहिले की पृथ्वी दुभंग झाली आहे, नानाप्रकाचे वृक्ष वाळून गेले आहेत आणि पर्वत उध्वस्त झाले असून त्यांतून धूर निघत आहे. ॥ १३ ॥
पीठे कार्ष्णायसे चैवं निषण्णं कृष्णवाससम् ।
प्रहरन्ति स्म राजानं प्रमदाः कृष्णपिङ्‌गलाः ॥ १४ ॥
’काळ्या लोखंडाच्या चौरंगावर दशरथ महाराज बसलेले होते. त्यांनी काळे वस्त्र नेसलेले होते आणि काळ्या आणि पिंगट वर्णाच्या स्त्रिया त्यांच्यावर प्रहार करीत होत्या. ॥ १४ ॥
त्वरमाणश्च धर्मात्मा रक्तमाल्यानुलेपनः ।
रथेन खरयुक्तेन प्रयातो दक्षिणामुखः ॥ १५ ॥
’धर्मात्मा राजा दशरथ लाल रंगाच्या फुलांच्या माळा घालून आणि लालचन्दन लावून गाढवे जुंपलेल्या रथावर बसून मोठ्या वेगाने दक्षिण दिशेकडे गेले आहेत. ॥ १५ ॥
प्रहसन्तीव राजानं प्रमदा रक्तवासिनी ।
प्रकर्षन्ती मया दृष्टा राक्षसी विकृतानना ॥ १६ ॥
’लाल वस्त्र धारण करणारी एक स्त्री, जी विकराळ मुखाची राक्षसीण प्रतीत होत होती, महाराजांना जणु हसत हंसत खेचून घेऊन जात होती. हे दृश्यही माझ्या पहाण्यात आले. ॥ १६ ॥
एवमेतन्मया दृष्टमिमां रात्रिं भयावहाम् ।
अहं रामोऽथवा राजा लक्ष्मणो वा मरिष्यति ॥ १७ ॥
’या प्रकारे या भयंकर रात्रिच्या समयी मी हे स्वप्न पाहिले आहे. याचे फल हे असेल की मी, श्रीराम, राजा दशरथ अथवा लक्ष्मण - यांच्यापैकी कुणा तरी एकाचा अवश्य मृत्यु होईल. ॥ १७ ॥
नरो यानेन यः स्वप्ने खरयुक्तेन याति हि ।
अचिरात्तस्य धूमाग्रं चितायां सम्प्रदृश्यते ॥ १८ ॥

एतन्निमित्तं दीनोऽहं न वचः प्रतिपूजये ।
शुष्यतीव च मे कण्ठो न स्वस्थमिव मे मनः ॥ १९ ॥
’जो मनुष्य स्वप्नात गाढवे जुंपलेल्या रथात यात्रा करतांना दिसून येतो त्याच्या चितेचा धूर लवकरच दिसून येतो. हेच कारण आहे की ज्यामुळे मी दुःखी झालो आहे आणि आपल्या म्हणण्याचा आदर करीत नाही आहे. माझा गळा सुकून गेल्या सारखा झाला आहे आणि मन अस्वस्थ झाल्यासारखे झाले आहे. ॥ १८-१९ ॥
न पश्यामि भयस्थानं भयं चैवोपधारये ।
भ्रष्टश्च स्वरयोगो मे च्छाया चापगता मम ।
जुगुप्सन्निव चात्मानं न च पश्यामि कारणम् ॥ २० ॥
’मला भयाचे काही कारण दिसत नसूनही मी भयभीत झालो आहे. माझा स्वर बदलून गेला आहे, माझी कान्ति ही फिकी पडली आहे. मला माझ्या स्वतःचीच जणु घृणा वाटू लागली आहे, परन्तु याचे कारण काय आहे हे मला समजत नाहीसे झाले आहे. ॥ २० ॥
इमां च दुःस्वप्नगतिं निशाम्य हि
     त्वनेकरूपामवितर्कितां पुरा ।
भयं महत्तु हृदयान्न याति मे
     विचिन्त्य राजानमचिन्त्यदर्शनम् ॥ २१ ॥
’ज्यांच्या विषयी मी पूर्वी कधी विचारही केला नव्हता अशा अनेक प्रकारच्या दुःस्वप्नांना पाहून मी मनातही कधी कल्पना केली नव्हती- अशा विचारांनी माझ्या हृदयातून हे महान भय दूरही होत नाही आहे. ॥ २१ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकोनसप्ततितमः सर्गः ॥ ६९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकोणसत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥ ६९ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP