श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ त्रिपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ससैन्यस्य वज्रदंष्ट्रस्य युद्धाय प्रस्थानं राक्षसैः सह युद्धं वज्रदंष्ट्रेन वानराणामङ्‌गदेन रक्षसां च संहारः -
वज्रदंष्ट्राचे सेनेसहित युद्धासाठी प्रस्थान, वानरांचे आणि राक्षसांचे युद्ध, वज्रदंष्ट्र द्वारा वानरांचा तसेच अंगद द्वारा राक्षसांचा संहार -
धूम्राक्षं निहतं श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः ।
क्रोधेन महताऽऽविष्टो निश्वसन्नुरगो यथा ॥ १ ॥
धूम्राक्ष मारला गेल्याचा समाचार ऐकून राक्षसराज रावणाला महान्‌ क्रोध आला. तो फुस्कारणार्‍या सर्पाप्रमाणे जोरजोराने श्वास घेऊ लागला. ॥१॥
दीर्घमुष्णं विनिश्वस्य क्रोधेन कलुषीकृतः ।
अब्रवीद्राक्षसं क्रूरं वज्रदंष्ट्रं महाबलम् ॥ २ ॥
क्रोधाने कलुषित होऊन ऊष्ण दीर्घ श्वास घेऊन त्याने क्रूर निशाचर महाबली वज्रदंष्ट्रास म्हटले- ॥२॥
गच्छ त्वं वीर निर्याहि राक्षसैः परिवारितः ।
जहि दाशरथिं रामं सुग्रीवं वानरैः सह ॥ ३ ॥
वीरा ! तू राक्षसांसह जा आणि दाशरथि राम आणि वानरांसहित सुग्रीवाला मारून टाक. ॥३॥
तथेत्युक्त्वा द्रुततरं मायावी राक्षसेश्वरः ।
निर्जगाम बलै सार्धं बहुभिः परिवारितः ॥ ४ ॥
तेव्हा तो मायावी राक्षस ’फार चांगले’ असे म्हणून फार मोठ्‍या सेनेसह तात्काळ युद्धसाठी निघाला. ॥४॥
नागैरश्वैः खरैरुष्ट्रैः संयुक्तः सुसामाहितः ।
पताकाध्वजचित्रैश्च बहुभिः समलंकृतः ॥ ५ ॥
तो हत्ती, घोडे, गाढवे आणि ऊंट आदि वाहनांनी युक्त होता, चित्ताला त्याने पूर्ण एकाग्र केलेले होते आणि पताका, ध्वज आदिंनी विचित्र शोभा वाढविणारे बरेचसे सेनाध्यक्ष त्याची शोभा वाढवत होते. ॥५॥
ततो विचित्रकेयूर मुकुटैश्च विभूषितः ।
तनुत्रण् च समावृत्य सधनुर्निर्ययौ द्रुतम् ॥ ६ ॥
विचित्र भुजबंद आणि मुकुटांनी विभूषित होऊन कवच धारण करून हातात धनुष्य घेऊन तो त्वरितच निघाला. ॥६॥
पताकालंकृतं दीप्तं तप्तकाञ्चनभूषणम् ।
रथं प्रदक्षिणं कृत्वा समारोहच्चमूपतिः ॥ ७ ॥
ध्वजा-पताकांनी अलंकृत, दीप्तिमान तसेच सोन्याच्या साज-बाजाने सुसज्जित रथाची परिक्रमा करून सेनापति वज्रदंष्ट्र त्यावर आरूढ झाला. ॥७॥
यष्टिभिस्तोमरैश्चित्रैः शूलैश्च मुसलैरपि ।
भिन्दिपालैश्च चापैश्च शक्तिभिः पट्टिशैरपि ॥ ८ ॥

खड्गैश्चक्रैर्गदाभिश्च निशितैश्च परश्वधैः ।
पदातयश्च निर्यान्ति विविधाः शस्त्रपाणयः ॥ ९ ॥
त्याच्या बरोबर ऋष्टि, विचित्र तोमर, स्निग्ध मुसळ, भिंदिपाल, धनुष्य, शक्ति, पट्टिश, खङ्‌ग, चक्र, गदा आणि तीक्ष्ण कुर्‍हाडीनी सुसज्जित बरेचसे पायदळ योद्धे निघाले. त्यांच्या हातात अनेक प्रकारची अस्त्रे-शस्त्रे शोभून दिसत होती. ॥८-९॥
विचित्रवाससः सर्वे दीप्ता राक्षसपुङ्‌गवाः ।
गजा मदोत्कटाः शूराः चलन्त इव पर्वताः ॥ १० ॥
विचित्र वस्त्रे धारण करणारे सर्व राक्षसवीर आपल्या तेजाने उद्‍भासित होत होते आणि शौर्यसंपन्न मदमत्त गजराज, चालत्या - फिरत्या पर्वतासमान वाटत होते. ॥१०॥
ते युद्धकुशलै रूढाः तोमराङ्‌कुशपाणिभिः ।
अन्ये लक्षणसंयुक्ताः शूरारूढा महाबलाः ॥ ११ ॥
हातात तोमर, अंकुश धारण करणारे महावत ज्यांच्या मानेवर स्वार झाले होते तसेच जे युद्धकलेत कुशल होते, ते हत्ती युद्ध करण्यासाठी पुढे चालू लागले. उत्तम लक्षणांनी युक्त जे दुसरे अन्य महाबली घोडे होते, ज्यांच्यावर शूरवीर सैनिक स्वार झाले होते, तेही युद्धासाठी बाहेर पडले. ॥११॥
तद् राक्षसबलं सर्वंरं विप्रस्थितमशोभत ।
प्रावृट्काले यथा मेघा नर्दमानाः सविद्युतः ॥ १२ ॥
युद्धाच्या उद्देशाने प्रस्थित झालेली राक्षसांची ती सारी सेना, वर्षाकाळी गरजणार्‍या विजांसहित मेघाप्रमाणे शोभून दिसत होती. ॥१२॥
निःसृता दक्षिणद्वाराद् अङ्‌गदो यत्र यूथपः ।
तेषां निष्क्रममाणानां अशुभं समजायत ॥ १३ ॥
ती सेना लंकेच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडली जेथे वानरयूथपति अंगद रस्ता अडवून उभे होते. तिकडून बाहेर पडताच त्या राक्षसांच्या समोर अशुभसूचक अपशकुन होऊ लागले. ॥१३॥
आकाशाद् विद्विघनात् तीव्रा उल्काश्चाभ्यपतंस्तदा ।
वमन्त्यः पावकज्वालाः शिवा घोरं ववाशिरे ॥ १४ ॥
मेघरहित आकाशातून तात्काळ दुःसह उल्कापात होऊ लागले. भयानक कोल्हे मुखांतून आगीच्या ज्वाळा ओकत आपल्या बोलीमध्ये बोलू लागले. ॥१४॥
व्याहरन्त मृगा घोरा रक्षसां निधनं तदा ।
समापतन्तो योधास्तु प्रास्खलन् तत्र दारुणम् ॥ १५ ॥
घोर पशु ज्यायोगे राक्षसांच्या संहाराची सूचना मिळत होती अशी बोली बोलू लागले. युद्धासाठी येणारे योद्धे वाईट प्रकारे धडपडत पृथ्वीवर पडत होते. त्यामुळे त्यांची फार दारूण अवस्था होत होती. ॥१५॥
एतानौत्पातिकान् दृष्ट्‍वा वज्रदंष्ट्रो महाबलः ।
धैर्यमालम्ब्य तेजस्वी निर्जगाम रणोत्सुकः ॥ १६ ॥
ही उत्पातसूचक लक्षणे पाहूनही महाबली वज्रदंष्ट्राने धीर सोडला नाही. तो तेजस्वी वीर युद्धासाठी उत्सुक होऊन बाहेर पडला. ॥१६॥
तांस्तु विद्रवतो दृष्ट्‍वा वानरा जितकाशिनः ।
प्रणेदुः सुमहानादान् दिशः शब्देन पूरयन् ॥ १७ ॥
तीव्रगतिने येणार्‍या त्या राक्षसांना पाहून विजयलक्ष्मीने सुशोभित होणारे वानर फार मोठमोठ्‍याने गर्जना करू लागले. त्यांनी आपल्या सिंहनादाने संपूर्ण दिशा निनादित केल्या. ॥१७॥
ततः प्रवृत्तं तुमुलं हरीणां राक्षसैः सह ।
घोराणां भीमरूपाणां अन्योन्यवधकाङ्‌क्षिणाम् ॥ १८ ॥
त्यानंतर भयानक रूप धारण करणार्‍या घोर वानरांचे राक्षसांशी तुमुळ युद्ध सुरू झाले. दोन्ही दलांतील योद्धे एक दुसर्‍याचा वध करण्याची इच्छा करत होते. ॥१८॥
निष्पतन्तो महोत्साहा भिन्नदेहशिरोधराः ।
रुधिरोक्षितसर्वाङ्‌गा न्यपतन् धरणीतले ॥ १९ ॥
ते मोठ्‍या उत्साहाने युद्धासाठी निघत पण देह आणि गळा कापला गेल्याने पृथ्वीवर कोसळत होते. त्या समयी त्यांचे सारे अंग रक्ताने भिजून जात होते. ॥१९॥
केचिद् अन्योन्यमासाद्य शूराः परिघबाहवः ।
चिक्षिपुर्विविधान् शस्त्रान् समरेष्वनिवर्तिनः ॥ २० ॥
युद्धापासून कधी मागे न होणारे आणि परिघासारखे असणारे कित्येक शूरवीर एक दुसर्‍या जवळ पोहोचून परस्परांवर नाना प्रकारच्या अस्त्रशस्त्रांचे प्रहार करत होते. ॥२०॥
द्रुमाणां च शिलानां च शस्त्राणां चापि निस्वनः ।
श्रूयते सुमहांस्तत्र घोरो हृदयभेदनः ॥ २१ ॥
त्या युद्धस्थळी प्रयुक्त केल्या जाणार्‍या वृक्ष, शिला आणि शस्त्रांचा महान आणि घोर शब्द जेव्हा कानावर पडत असे त्यावेळी तो हृदयाला जणु विदीर्ण करून टाकत असे. ॥२१॥
रथनेमिस्वनस्तत्र धनुषश्चापि घोरवत् ।
शङ्‌खभेरीमृदङ्‌गानां बभूव तुमुलः स्वनः ॥ २२ ॥
तेथे रथांच्या चाकांचा घडघडाट, धनुष्यांचे भयंकर टणत्कार तसेच शंख, भेरी आणि मृदुगांचे शब्द एकत्र मिसळून फार भयंकर प्रतीत होत होता. ॥२२॥
केचिदस्त्राणि संसृज्य बाहुयुद्धमकुर्वत ॥ २३ ॥

तलैश्च चरणैश्चापि मुष्टिभिश्च द्रुमैरपि ।
जानुभिश्च हताः केचिद् भग्नदेहाश्च राक्षसाः ।
शिलाभिश्चूर्णिताः केचिद् वाद्वानरैर्युद्धदुर्मदैः ॥ २४ ॥
काही योद्धे आपली ह्त्यारे फेकून बाहुयुद्ध करू लागले होते. थपडा, लाथा बुक्क्या, वृक्ष आणि गुड्घ्यांचा मार खाऊन कित्येक राक्षसांच्या शरीराचा चुराडा होऊन गेला. रणदुर्मद वानरांनी शिलांनी मारमारून कित्येक राक्षसांचा चुराडा केला होता. ॥२३-२४॥
वज्रदंष्ट्रो भृशं बाणै रणे वित्रासयन् हरीन् ।
चचार लोकसंहारे पाशहस्त इवान्तकः ॥ २५ ॥
त्या समयी वज्रद्रंष्ट्र आपल्या बाणांच्या मार्‍याने वानरांना अत्यंत भयभीत करत तीन्ही लोकांच्या संहारासाठी निघालेल्या पाशधारी यमराजाप्रमाणे रणभूमीवर विचरण करू लागला. ॥२५॥
बलवन्तोऽस्त्रविदुषो नानाप्रहरणा रणे ।
जघ्नुर्वानरसैन्यानि राक्षसाः क्रोधमूर्च्छिताः ॥ २६ ॥
त्याच बरोबर क्रोधाविष्ट झालेले आणि नाना प्रकारची अस्त्रे शस्त्रे घेतलेले अन्य शस्त्रवेत्ते बलवान्‌ राक्षसही वानरसेनांचा रणभूमीमध्ये संहार करू लागले. ॥२६॥
निघ्ने तान् राक्षसान् सर्वान् धृष्टोवालिसुतो रणे ।
क्रोधेन द्विगुणाविष्टः संवर्तक इवानलः ॥ २७ ॥
परंतु प्रलयकाली संवर्तक अग्नि जसा प्राण्यांचा संहार करतो, त्या प्रमाणेच वालिपुत्र अंगद अधिकच निर्भय होऊन दुप्पट क्रोधाने भरून त्या सर्व राक्षसांचा वध करू लागले. ॥२७॥
तान् राक्षसगणान् सर्वान् वृक्षमुद्यम्य वीर्यवान् ।
अङ्‌गदः क्रोधताम्राक्षः सिंहः क्षुद्रमृगानिव ॥ २८ ॥

चकार कदनं घोरं शक्रतुल्यपराक्रमः ।
त्यांचे डोळे क्रोधाने लाल होत होते. ते इंद्रतुल्य पराक्रमी होते. जसा सिंह लहान वन्य पशुंना विनासायासच नष्ट करून टाकतो त्याच तर्‍हेने पराक्रमी अंगदाने एक वृक्ष उचलला आणि त्या समस्त राक्षसगणांचा घोर संहार आरंभला. ॥२८ १/२॥
अङ्‌गदाभिहतास्तत्र राक्षसा भीमविक्रमाः ॥ २९ ॥

विभिन्नशिरसः पेतुः निकृत्ता इव पादपाः ।
अंगदाचा मार खावून ते भयानक पराक्रमी राक्षस डोके फुटल्यामुळे तोडून टाकलेल्या वृक्षांप्रमाणे पृथ्वीवर कोसळू लागले. ॥२९ १/२॥
रथैश्चित्रैः ध्वजैरश्वैः शरीरैर्हरिरक्षसाम् ॥ ३० ॥

रुधिरेण च सञ्छन्ना भूमिर्भयकरी तदा ।
त्यासमयी रथ, चित्र-विचित्र ध्वजा, घोडे, राक्षस आणि वानर यांची शरीरे तसेच रक्तांच्या धारांनी भरून गेल्याने ती रणभूमी फार भयानक भासत होती. ॥३० १/२॥
हारकेयूरवस्त्रैश्च शस्त्रैश्च समलंकृता ॥ ३१ ॥

भूमिर्भाति रणे तत्र शारदीव यथा निशा ।
योद्धांचे हार, केयूर(बाजूबंद), वस्त्रे आणि शस्त्रांनी अलंकृत झालेली रणभूमी शरत्कालच्या रात्रीसमान शोभत होती. ॥३१ १/२॥
अङ्‌गदस्य च वेगेन तद् राक्षसबलं महत् ।
प्राकम्पत तदा तत्र पवनेनाम्बुदो यथा ॥ ३२ ॥
अंगदांच्या वेगाने तेथे ती विशाल राक्षससेना त्या समयी, जसे वायुच्या वेगाने मेघ कंपित होतो त्या प्रमाणे कापू लागली. ॥३२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे त्रिपञ्चाशः सर्गः ॥ ५३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा त्रेपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP