[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ दशमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण मुनीनां संरक्षणाय राक्षसां वधाय कृतायाः प्रतिज्ञायाः पालने दृढमवस्थानाय स्वविचारस्य प्रकटनम् -
श्रीरामांनी ऋषिंच्या रक्षणासाठी राक्षसांच्या वधाच्या निमित्ताने केलेल्या प्रतिज्ञा पालनावर दृढ राहण्याचा विचार प्रकट करणे -
वाक्यमेतत्तु वैदेह्या व्याहृतं भर्तृभक्तया ।
श्रुत्वा धर्मे स्थितो रामः प्रत्युवाचाथ जानकीम् ॥ १ ॥
आपल्या स्वामींच्या प्रति भक्ति ठेवणार्‍या वैदेही सीतेने सांगितलेली गोष्ट ऐकल्यावर सदा धर्मामध्ये स्थित राहाणार्‍या श्रीरामचंद्रानी जानकीला या प्रकारे उत्तर दिले - ॥१॥
हितमुक्तं त्वया देवि स्निग्धया सदृशं वचः ।
कुलं व्यपदिशन्त्या च धर्मज्ञे जनकात्मजे ॥ २ ॥
’देवी ! धर्मज्ञे जनकात्मजे ! तुझा माझावर स्नेह आहे म्हणूनच तू माझ्या हिताची गोष्ट सांगितली आहेस. क्षत्रियांच्या कुलधर्माचा उपदेश करीत तू जे काही सांगितलेस ते तुझ्या योग्यच आहे. ॥२॥
किं नु वक्ष्याम्यहं देवि त्वयैवोक्तमिदं वचः ।
क्षत्रियैर्धार्यते चापो नार्तशब्दो भवेदिति ॥ ३ ॥
’देवी ! मी तुला काय उत्तर देऊ ? तूच पहिल्याने ही गोष्ट सांगितली आहेस की क्षत्रिय लोक यासाठी धनुष्य धारण करतात की कुणी दुःखी होऊन हाहाकार करू लागता कामा नये. (जर कोणी दुःख अथवा संकटात पडले तर त्याचे रक्षण केले जावे.) ॥३॥
ते चार्ता दण्डकारण्ये मुनयः संशितव्रताः ।
मां सीते स्वयमागम्य शरण्याः शरणं गताः ॥ ४ ॥
’सीते ! दण्डकारण्यात राहून कठोर व्रताचे पालन करणारे ते मुनि फार दुःखी आहेत, म्हणून मला शरणागत वत्सल जाणून ते स्वतः माझ्या जवळ आले आणि शरणागत झाले. ॥४॥
वसन्तः कालकालेषु वने मूलफलाशनाः ।
न लभन्ते सुखं भीरु राक्षसैः क्रूरकर्मभिः ॥ ५ ॥

भक्ष्यन्ते राक्षसैर्भीमैर्नरमांसोपजीविभिः ।
’भीरू ! सदाच वनात राहून फल-मूलांचा आहार करणारे ते मुनि या क्रूरकर्मा राक्षसांच्या मुळे कधी सुख प्राप्त करू शकत नाहीत. मनुष्यांच्या मांसाने जीवन निर्वाह करणारे हे भयानक राक्षस त्यांना मारून खाऊन जातात. ॥५ १/२॥
ते भक्ष्यमाणा मुनयो दण्डकारण्यवासिनः ॥ ६ ॥

अस्मानभ्यवपद्येति मामूचुर्द्विजसत्तमाः ।
’त्या राक्षसांचा ग्रास बनलेले ते दण्डकारण्यवासी द्विजश्रेष्ठ मुनि आपल्या जवळ येऊन मला म्हणाले - ’प्रभो ! आमच्यावर अनुग्रह करावा.’ ॥६ १/२॥
मया तु वचनं श्रुत्वा तेषामेवं मुखाच्च्युतम् ॥ ७ ॥

कृत्वा वचनशुश्रूषां वाक्यमेतदुदाहृतम् ।
’त्यांच्या मुखातून निघालेले ते रक्षणासाठी याचना करणारे वचन ऐकून आणि त्यांच्या आज्ञापालन रूपी सेवेचा विचार मनात आणून मी त्यांना असे सांगितले - ॥७ १/२॥
प्रसीदन्तु भवन्तो मे ह्रीरेषा तु ममातुला ॥ ८ ॥

यदीदृशैरहं विप्रैरुपस्थेयैरुपस्थितः ।
किं करोमीति च मया व्याहृतं द्विजसंनिधौ ॥ ९ ॥
’महर्षिंनो ! आपल्या सारख्या ब्राह्मणांच्या सेवेत मी स्वतःच उपस्थित व्हावयास पाहिजे होते; परंतु आपण स्वतःच आपल्या रक्षणासाठी माझ्या जवळ आलात ही माझ्यासाठी अनुपम लज्जेची गोष्ट आहे; म्हणून आपण प्रसन्न व्हावे. सांगावे, मी आपणां लोकांची काय सेवा करूं ? असे मी त्या ब्राह्मणांच्या समोर म्हटले.’ ॥८-९॥
सर्वैरेव समागम्य वागियं समुदाहृता ।
राक्षसैर्दण्डकारण्ये बहुभिः कामरूपिभिः ॥ १० ॥

अर्दिताः स्म भृशं राम भवान् नस्तत्र रक्षतु ।
तेव्हा त्या सगळ्यांनी मिळून आपला मनोभाव या वचनांत प्रकट केला - ’श्रीरामा ! दण्डकारण्यात इच्छानुसार रूप धारण करणारे बरेचसे राक्षस राहातात. त्यांच्या कडून आम्हाला फार कष्ट पोहोंचत आहेत. म्हणून तेथे त्यांच्या भयापासून आपण आमचे रक्षण करा. ॥१० १/२॥
होमकाले तु सम्प्राप्ते पर्वकालेषु चानघ ॥ ११ ॥

धर्षयन्ति सुदुर्धर्षा राक्षसाः पिशिताशनाः ।
’निष्पाप रघुनंदना ! अग्निहोत्राची वेळ आल्यावर तसेच पर्वकाळाच्या वेळी ते अत्यंत दुर्धर्ष मांसभोजी राक्षस आम्हाला पकडून दाबून ठेवतात. ॥११ १/२॥
राक्षसैर्धर्षितानां च तापसानां तपस्विनाम् ॥ १२ ॥

गतिं मृगयमाणानां भवान् नः परमा गतिः ।
’राक्षसांच्या द्वारा आक्रांत होणारे आम्ही तपस्वी तापस सदा आपल्यासाठी कुठला न कुठला आश्रय शोधत राहातो म्हणून आपणच आमचे परम आश्रय व्हावे.’ ॥१२ १/२॥
कामं तपःप्रभावेण शक्ता हन्तुं निशाचरान् ॥ १३ ॥

चिरार्जितं तु नेच्छामस्तपः खण्डयितुं वयम् ।
बहुविघ्नं तपो नित्यं दुश्चरं चैव राघव ॥ १४ ॥
’राघव ! जरी आम्ही तपस्येच्या प्रभावाने इच्छेनुसार या राक्षसांचा वध करण्यास समर्थ आहोत तथापि चिरकालापासून उपार्जित केलेल्या तपाला खण्डित करू इच्छित नाही; कारण की तपामध्ये सदाच अनेक विघ्ने येत राहातात तसेच त्याचे संपादन ही फारच कठीण असते. ॥१३-१४॥
तेन शापं न मुञ्चामो भक्ष्यमाणाश्च राक्षसैः ।
तदर्द्यमानान् रक्षोभिर्दण्डकारण्यवासिभिः ॥ १५ ॥

रक्ष नस्त्वं सह भ्रात्रा त्वन्नाथा हि वयं वने ।
’हेच कारण आहे की राक्षसांचा ग्रास बनत असूनही आम्ही त्यांना शाप देत नाही, म्हणून दण्डकारण्यवासी निशांचरापासून पीडित झालेल्या आम्हा तापसांचे भावांसहित आपण रक्षण करावे; कारण की या वनात आता आपण आमचे रक्षक आहात.’ ॥१५ १/२॥
मया चैतद्वचः श्रुत्वा कार्त्स्न्येन परिपालनम् ॥ १६ ॥

ऋषीणां दण्डकारण्ये संश्रुतं जनकात्मजे ।
जनकात्मजे ! दण्डकारण्यातील ऋषिंचे हे बोलणे ऐकून मी पूर्णरूपाने त्यांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली आहे. ॥१६ १/२॥
संश्रुत्य च न शक्ष्यामि जीवमानः प्रतिश्रवम् ॥ १७ ॥

मुनीनामन्यथा कर्तुं सत्यमिष्टं हि मे सदा ।
’मुनिंच्या समोर अशी प्रतिज्ञा करून आता मी जीवात जीव असेपर्यंत या प्रतिज्ञेला मिथ्या करू शकत नाही; कारण सत्याचे पालन मला सदाच प्रिय आहे. ॥१७ १/२॥
अप्यहं जीवितं जह्यां त्वां वा सीते सलक्ष्मणाम् ॥ १८ ॥

न तु प्रतिज्ञां संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः ।
’सीते ! मी आपले प्राण सोडू शकतो , तुझा आणि लक्ष्मणाचाही परित्याग करू शकतो परंतु आपल्या प्रतिज्ञेला विशेषतः ब्राह्मणांसाठी केल्या गेलेल्या प्रतिज्ञेला मी कदापि तोडू शकत नाही. ॥१८ १/२॥
तदवश्यं मया कार्यमृषीणां परिपालनम् ॥ १९ ॥

अनुक्तेनापि वैदेहि प्रतिज्ञाय कथं पुनः ।
’म्हणून ऋषिंचे रक्षण करणे माझ्यासाठी आवश्यक आहे. वैदेही ! ऋषिंनी न सांगताही मी त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे, मग जेव्हा त्यांनी स्वतः सांगितले आहे आणि मी प्रतिज्ञाही केली आहे; तर आता त्यांच्या रक्षणापासून मी कसा विन्मुख होऊ शकतो ? ॥१९ १/२॥
मम स्नेहाच्च सौहार्दादिदमुक्तं त्वया वचः ॥ २० ॥

परितुष्टोऽस्म्यहं सीते न ह्यनिष्टोऽनुशाष्यते
’सीते ! तू स्नेह आणि सौहार्दवश मला ज्या गोष्टी सांगितल्यास, त्यायोगे मी फार संतुष्ट झालो आहे, कारण की जी व्यक्ति आपल्याला प्रिय नसेल तिला कोणी हितकर उपदेश करीत नाही. ॥२० १/२॥
सदृशं चानुरूपं च कुलस्य तव शोभने ।
सधर्मचारिणी मे त्वं प्राणेभ्योऽपि गरीयसी ॥ २१ ॥
शोभने ! तुझे हे कथन तुझ्या योग्य तर आहेच, तुझ्या कुळालाही सर्वथा अनुरूप आहे. तू माझी सहधर्मिणी आहेस आणि मला प्राणांपेक्षाही अधिक प्रिय आहेस.’ ॥२१॥
इत्येवमुक्त्वा वचनं महात्मा
सीतां प्रियां मैथिलराजपुत्रीम् ।
रामो धनुष्मान् सह लक्ष्मणेन
जगाम रम्याणि तपोवनानि ॥ २२ ॥
महात्मा श्रीरामांनी आपली प्रिया मिथिलेश राजकुमारी सीतेस असे वचन सांगून हातात धनुष्य घेऊन लक्ष्मणासह ते रमणीय तपोवनात विचरण करू लागले. ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे दशमः सर्गः ॥ १० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा दहावा सर्ग पूरा झाला. ॥१०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP