श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ एकषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मधुनोपलब्धस्य वरस्य लवणासुरबलस्य तद् अत्याचारस्य च वर्णनं कृत्वा ततः प्राप्तं भयं दूरीकर्तुं श्रीराघवं प्रति मुनिभिः प्रार्थनाकरणम् -
ऋषिंनी मधुला प्राप्त झालेला वर तसेच लवणासुराचे बल आणि अत्याचाराचे वर्णन करून त्यांच्यामुळे प्राप्त झालेले भय दूर करण्यासाठी श्रीरघुनाथांची प्रार्थना करणे -
ब्रुवद्‌भिः एवं ऋषिभिः काकुत्स्थो वाक्यमब्रवीत् ।
किं कार्यं ब्रूत मुनयो भयं तावदपैतु वः ॥ १ ॥
याप्रमाणे सांगणार्‍या ऋषिंच्या द्वारा प्रेरित होऊन काकुत्स्थांनी म्हटले - महर्षिंनो ! सांगा; आपले कोणते कार्य मला सिद्ध करावयाचे आहे. आपले भय आता दूर झालेच पाहिजे. ॥१॥
तथा ब्रुवति काकुत्स्थे भार्गवो वाक्यमब्रवीत् ।
भयानां शृणु यन्मूलं देशस्य च नरेश्वर ॥ २ ॥
काकुत्स्थांनी असे म्हटल्यावर भृगुपुत्र च्यवन म्हणाले - नरेश्वर ! संपूर्ण देशावर आणि आमच्यावर जे भय प्राप्त झाले आहे त्याचे मूल कारण काय आहे, ते ऐका. ॥२॥
पूर्वं कृतयुगे राजन् दैतेयः सुमहाबलः ।
लोलापुत्रोऽभवज्ज्येष्ठो मधुर्नाम महासुरः ॥ ३ ॥
राजन्‌ ! प्रथम सत्ययुगात एक फार बुद्धिमान्‌ दैत्य होता. तो लोलाचा ज्येष्ठ पुत्र होता. त्या महान्‌ असुराचे नाम होते मधु. ॥३॥
ब्रह्मण्यश्च शरण्यश्च बुद्ध्या च परिनिष्ठितः ।
सुरैश्च परमोदारैः प्रीतिस्तस्यातुलाभवत् ॥ ४ ॥
तो फारच ब्राह्मण-भक्त आणि शरणागत वत्सल होता. त्याची बुद्धि सुस्थिर होती. अत्यंत उदार स्वभाव असणार्‍या देवतांशीही त्याची घनिष्ठ मैत्री अशी होती की जिची तुलना होऊ शकत नव्हती. ॥४॥
स मधुर्वीर्यसम्पन्नो धर्मे च सुसमाहितः ।
बहुमानाच्च रुद्रेण दत्तस्तस्याद्‌भुतो वरः ॥ ५ ॥
मधु बल-विक्रमाने संपन्न होता आणि एकाग्रचित्त होऊन धर्माच्या अनुष्ठानात लागलेला होता. त्याने भगवान्‌ शिवाची फार मोठी आराधना केली होती, ज्यायोगे त्यांनी त्याला अद्‍भुत वर प्रदान केला होता. ॥५॥
शूलं शूलाद् विद्विनिष्कृष्य महावीर्यं महाप्रभम् ।
ददौ महात्मा सुप्रीतो वाक्यं चैतदुवाच ह ॥ ६ ॥
महामना भगवान्‌ शिवांनी अत्यंत प्रसन्न होऊन आपल्या शूलापासून एक चमकणारा परम शक्तिशाली शूल प्रकट करून तो मधुला दिला आणि ही गोष्ट सांगितली - ॥६॥
त्वयायमतुलो धर्मो मत्प्रसादकरः कृतः ।
प्रीत्या परमया युक्तो ददाम्यायुधमुत्तमम् ॥ ७ ॥
तू मला प्रसन्न करणारा हा फार अनुपम धर्म केला आहेस, म्हणून मी अत्यंत प्रसन्न होऊन तुला हे उत्तम आयुध प्रदान करत आहे. ॥७॥
यावत् सुरैश्च विप्रैश्च न विरुध्येर्महासुर ।
तावच्छूलं तवेदं स्याद् अन्यथा नाशमेष्यति ॥ ८ ॥
महान्‌ असुरा ! जोपर्यंत तू ब्राह्मण आणि देवता यांच्याशी विरोध करणार नाहीस तो पर्यंत हा शूल तुझ्याजवळ राहील, अन्यथा अदृश्य होईल. ॥८॥
यश्च त्वामभियुञ्जीत युद्धाय विगतज्वरः ।
तं शूलो भस्मसात्कृत्वा पुनरेष्यति ते करम् ॥ ९ ॥
जो पुरुष निःशंक होऊन तुझ्या समोर युद्धासाठी येईल, त्याला भस्म करून हा शूल पुन्हा तुझ्या हातात परत येईल. ॥९॥
एवं रुद्राद् वरं लब्ध्वा भूय एव महासुरः ।
प्रणिपत्य महादेवं वाक्यमेतदुवाच ह ॥ १० ॥
भगवान्‌ रूद्राकडून असा वर मिळवून तो महान्‌ असुर महादेवांना प्रणाम करून नंतर याप्रमाणे म्हणाला - ॥१०॥
भगवन् मम वंशस्य शूलमेतदनुत्तमम् ।
भवेत् तु सततं देव सुराणामीश्वरो ह्यसि ॥ ११ ॥
भगवन्‌ ! देवाधिदेव ! आपण समस्त देवतांचे स्वामी आहात म्हणून आपल्याला प्रार्थना आहे की परम उत्तम शूल माझ्या वंशजांच्या जवळही सदा राहावा. ॥११॥
तं ब्रुवाणं मधुं देवः सर्वभूतपतिः शिवः ।
प्रत्युवाच महातेजा नैतदेवं भविष्यति ॥ १२ ॥
अशी गोष्ट सांगणार्‍या त्या मधुला समस्त प्राण्यांचे अधिपती महान्‌ देवता भगवान्‌ शिवांनी याप्रकारे सांगितले - असे तर होऊ शकत नाही. ॥१२॥
मा भूत्ते विफला वाणी मत्प्रसादकृता शुभा ।
भवतः पुत्रमेकं तु शूलमेतद् भजिष्यते ॥ १३ ॥
परंतु मला प्रसन्न जाणून तुझ्या मुखांतून जी शुभ वाणी निघाली आहे, ती ही निष्फळ होऊ नये म्हणून मी वर देतो की तुझ्या एका पुत्राजवळ हा शूल राहील. ॥१३॥
यावत् करस्थः शूलोऽयं भविष्यति सुतस्य ते ।
अवध्यः सर्वभूतानां शूलहस्तो भविष्यति ॥ १४ ॥
हा शूल जो पर्यंत तुझ्या पुत्राच्या हातात विद्यमान असेल तो पर्यंत तो समस्त प्राण्यांसाठी अवध्य बनून राहील. ॥१४॥
एवं मधुर्वरं लब्ध्वा देवात् सुमहदद्‌भुतम् ।
भवनं सोऽसुरश्रेष्ठः कारयामास सुप्रभम् ॥ १५ ॥
महादेवांकडून याप्रकारे अत्यंत अद्‍भुत वर प्राप्त करून असुरश्रेष्ठ मधुने एक सुंदर भवन तयार करविले, जे अत्यंत दीप्तिमान्‌ होते. ॥१५॥
तस्य पत्‍नी महाभागा प्रिया कुम्भीनसीति या ।
विश्वावसोरपत्यं सा ह्यनलायां महाप्रभा ॥ १६ ॥
त्याची प्रिय पत्‍नी महाभागा कुम्भीनसी होती, जी विश्वावसुची पुत्री होती, तिचा जन्म अनलेच्या गर्भापासून झाला होता. कुम्भीनसी फारच कान्तिमती होती. ॥१६॥
तस्याः पुत्रो महावीर्यो लवणो नाम दारुणः ।
बाल्यात्प्रभृति दुष्टात्मा पापान्येव समाचरत् ॥ १७ ॥
त्याचा पुत्र महापराक्रमी लवण आहे, ज्याचा स्वभाव फार भयंकर आहे. तो दुरात्मा बालपणापासूनच केवळ पापाचारातच प्रवृत्त राहिला आहे. ॥१७॥
तं पुत्रं दुर्विनीतं तु दृष्ट्‍वा क्रोधसमन्वितः ।
मधुः स शोकमापेदे न चैनं किञ्चिदब्रवीत् ॥ १८ ॥
आपला पुत्र उद्दण्ड झालेला पाहून मधु क्रोधाने जळत राहिला होता. त्याला मुलाची दुष्टता पाहून फार शोक झाला, तथापि तो त्याच्याशी काहीही बोलला नाही. ॥१८॥
स विहाय इमं लोकं प्रविष्टो वरुणालयम् ।
शूलं निवेश्य लवणे वरं तस्मै न्यवेदयत् ॥ १९ ॥
शेवटी तो हा देश सोडून समुद्रात राहाण्यासाठी निघून गेला. जाते वेळी त्याने तो शूल लवणाला देऊन टाकला आणि त्याला वरदानाची गोष्टीही सांगितली. ॥१९॥
स प्रभावेण शूलस्य दौरात्म्येनात्मनस्तथा ।
सन्तापयति लोकांस्त्रीन् विशेषेण च तापसान् ॥ २० ॥
आता तो दुष्ट त्या शूलाच्या प्रभावाने तसेच आपल्या दुष्टतेमुळे तीन्ही लोकांना विशेषतः तपस्वी मुनींना फार संताप देत राहिला. ॥२०॥
एवंप्रभावो लवणः शूलं चैव तथाविधम् ।
श्रुत्वा प्रमाणं काकुत्स्थ त्वं हि नः परमा गतिः ॥ २१ ॥
त्या लवणासुराचा असा प्रभाव आहे आणि त्याच्या जवळ तसा शक्तिशाली शूलही आहे. काकुत्स्थ ! हे सर्व ऐकून यथोचित कार्य करण्यात आपणच प्रमाण आहात आणि आपणच आमची परमगति आहात. ॥२१॥
बहवः पार्थिवा राम भयार्तैः ऋषिभिः पुरा ।
अभयं याचिता वीर त्रातारं न च विद्महे ॥ २२ ॥
श्रीरामा ! आजच्या पूर्वी भयाने पीडित झालेले ऋषि अनेक राजांजवळ जाऊन अभयाची भिक्षा मागून चुकले आहेत. परंतु वीर रघुवीरा ! आतापर्यंत आम्हांला कोणी रक्षक मिळाला नाही. ॥२२॥
ते वयं रावणं श्रुत्वा हतं सबलवाहनम् ।
त्रातारं विद्महे तात नान्यं भुवि नराधिपम् ।
तत् परित्रातुमिच्छामो लवणाद् भयपीडितान् ॥ २३ ॥
तात ! आम्ही असे ऐकले आहे की आपण सेना आणि वाहनांसहित रावणाचा संहार करून टाकला आहे. म्हणून आम्ही आपल्यालाच आमचे रक्षण करण्यास समर्थ समजतो आहोत. भूतलावर दुसरा कुठल्याही राजा नाही. म्हणून आमची इच्छा आहे की आपण भयाने पीडित झालेल्या महर्षिंचे लवणासुरापासून रक्षण करावे. ॥२३॥
इति राम निवेदितं तु ते
भयजं कारणमुत्थितं च यत् ।
विनिवारयितुं भवान् क्षमः
कुरु तं काममहीनविक्रम ॥ २४ ॥
बल-विक्रम संपन्न श्रीरामा ! याप्रकारे आम्ही आमच्या समोर जे भयाचे कारण उपस्थित झालेले आहे ते आपल्या समोर निवेदन केलेले आहे. आपण हे दूर करण्यास समर्थ आहात म्हणून आमची ही अभिलाषा आपण पूर्ण करावी. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकषष्टितमः सर्गः ॥ ६१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील उत्तरकाण्डाचा एकसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP