श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। षष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
त्रिशङ्कोर्यज्ञं कारयितुमृषीन् प्रति विश्वामित्रस्यानुरोध ऋषिभिर्यज्ञस्यारम्भः, सशरीरस्य त्रिशङ्कोः स्वर्गलोके गमनं स्वर्गादिन्द्रेण पात्यमाने त्रिशङ्कौ विक्षुब्धेन विश्वामित्रेण नूतन देवसर्गायोद्यमो देवानामनुरोधेन तस्य ततो विरामश्च - विश्वामित्रांचा जमलेल्या ऋषिंना त्रिशङ्‍कुचा यज्ञ करविण्याविषयी अनुरोध, ऋषिंच्याद्वारा यज्ञाचा आरंभ, त्रिशङ्‍कुचे सशरीर स्वर्गगमन, इंद्रद्वारा स्वर्गातून त्यांना ढकलून देण्यात आल्याने क्षुब्ध झालेल्या विश्वामित्रांचा नूतन देवसर्गासाठी उद्योग, नंतर देवतांच्या अनुरोधामुळे त्यांचे या कार्यापासून विरत होणे -
तपोबलहताञ्ज्ञात्वा वासिष्ठान् समहोदयान् ।
ऋषिमध्ये महातेजा विश्वामित्रोऽभ्यभाषत ॥ १ ॥
[शतानन्द सांगत आहेत - श्रीरामा ! ] महोदयासह वसिष्ठांच्या पुत्रांना आपल्या तपोबलाने नष्ट झालेले जाणून महातेजस्वी विश्वामित्र ऋषिंच्या सभेत या प्रकारे बोलले - ॥ १ ॥
अयमिक्ष्वाकुदायादस्त्रिशङ्‍कुरिति विश्रुतः ।
धर्मिष्ठश्च वदान्यश्च मां चैव शरणं गतः ॥ २ ॥
'मुनिवरांनो ! हे इक्ष्वाकु वंशात उत्पन्न राजा त्रिशङ्‍कु आहेत. हे विख्यात नरेश मोठे धर्मात्मा आणि दानी आहेत आणि या समयी मला शरण आलेले आहेत. ॥ २ ॥
स्वेनानेन शरीरेण देवलोकजिगीषया ।
यथायं स्वशरीरेण स्वर्गलोकं गमिष्यति ॥ ३ ॥

तथा प्रवर्त्यतां यज्ञो भवद्‌भिश्च मया सह ।
यांची इच्छा आहे की आपल्या या शरीरानेच देवलोकावर अधिकार प्राप्त करावा. म्हणून आपण लोक माझ्याबरोबर राहून अशा यज्ञाचे अनुष्ठान करावे की ज्यायोगे त्यांना या शरीरानेच देवलोकाची प्राप्ति होऊ शकेल. ॥ ३ १/२ ॥
विश्वामित्रवचः श्रुत्वा सर्व एव महर्षयः ॥ ४ ॥

ऊचुः समेताः सहसा धर्मज्ञा धर्मसंहितम् ।
अयं कुशिकदायादो मुनिः परमकोपनः ॥ ५ ॥

यदाह वचनं सम्यगेतत् कार्यं न संशयः ।
विश्वामित्रांचे असे म्हणणे ऐकून धर्मास जाणणार्‍या सर्व महर्षिंनी लगेच एकत्र येऊन आपसात धर्मयुक्त परामर्ष केला - 'ब्राह्मणांनो ! कुशिकाचे पुत्र विश्वामित्र फार क्रोधी आहेत. ते जी गोष्ट सांगत आहेत तिचे व्यवस्थित रीतीने पालन केले पाहिजे यांत संशय नाही' ॥ ४-५ १/२ ॥
अग्निकल्पो हि भगवान् शापं दास्यति रोषितः ॥ ६ ॥

तस्मात् प्रवर्त्यतां यज्ञः सशरीरो यथा दिवि ।
गच्छेदिक्ष्वाकुदायादो विश्वामित्रस्य तेजसा ॥ ७ ॥
'हे भगवान् विश्वामित्र अग्निसमान तेजस्वी आहेत. जर यांचे म्हणणे मान्य केले नाही तर हे रोषपूर्वक शाप देऊन टाकतील. म्हणून अशा यज्ञाचा आरंभ केला पाहिजे ज्या योगे विश्वामित्रांच्या तेजाने इक्ष्वाकुनन्दन त्रिशङ्‍कु सशरीर स्वर्गलोकात जाऊ शकतील. ॥ ६-७ ॥
ततः प्रवर्त्यतां यज्ञः सर्वे समधितिष्ठत ।
एवमुक्त्वा महर्षयः संजह्रुस्ताः क्रियास्तदा ॥ ८ ॥
या प्रमाणे विचार करून त्यांनी सर्वांच्या सम्मतिने असा निश्चय केला की 'यज्ञ आरंभ केला जावा.' असा निश्चय करून सर्व महर्षिंनी त्या समयी आपापले कार्य आरंभ केले. ॥ ८ ॥
याजकश्च महातेजा विश्वामित्रोऽभवत् क्रतौ ।
ऋत्विजश्चानुपूर्व्येण मन्त्रवन्मन्त्रकोविदाः ॥ ९ ॥

चक्रुः सर्वाणि कर्माणि यथाकल्पं यथाविधि ।
महातेजस्वी विश्वामित्र स्वयं त्या यज्ञात याजक (अध्वर्यु) झाले. नंतर क्रमशः अनेक मंत्रवेत्ते ब्राह्मण ऋत्विज झाले, व त्यांनी कल्पशास्त्रास अनुसरून विधि आणि मंत्रोच्चारणपूर्वक सर्व कार्ये संपन्न केली. ॥ ९ १/२ ॥
ततः कालेन महता विश्वामित्रो महातपाः ॥ १० ॥

चकारावाहनं तत्र भागार्थं सर्वदेवताः ।
नाभ्यागमंस्तदा तत्र भागार्थं सर्वदेवताः ॥ ११ ॥
तद्‌नंतर बराच काळपर्यंत यत्‍नपूर्वक मंत्रपाठ करून महातपस्वी विश्वामित्रांनी आपापला भाग ग्रहण करण्यासाठी संपूर्ण देवतांचे आवाहन केले, परंतु त्या समयी तेथे भाग घेण्यासाठी देवता आल्या नाहीत. ॥ १०-११ ॥
ततः कोपसमाविष्टो विश्वामित्रो महामुनिः ।
स्रुवमुद्यम्य सक्रोधस्त्रिशङ्‍कुमिदमब्रवीत् ॥ १२ ॥
यामुळे महामुनि विश्वामित्रांना फार क्रोध आला आणि त्यांनी स्त्रुवा उचलून रोषाने राजा त्रिशङ्‍कुला या प्रकारे सांगितले - ॥ १२ ॥
पश्य मे तपसो वीर्यं स्वार्जितस्य नरेश्वर ।
एष त्वां सशरीरेण नयामि स्वर्गमोजसा ॥ १३ ॥
'नरेश्वर ! आता तू माझ्याद्वारे उपार्जित तपस्येचे बल पहा. मी आत्ता तुम्हाला आपल्या शक्तीने सशरीर स्वर्गलोकात पोहोंचवितो. ॥ १३ ॥
दुष्प्रापं स्वशरीरेण स्वर्गं गच्छ नरेश्वरः ।
स्वार्जितं किञ्चिदप्यस्ति मया हि तपसः फलम् ॥ १४ ॥

राजंस्त्वं तेजसा तस्य सशरीरो दिवं व्रज ।
'राजन् ! आज तू आपल्या या शरीरासहच दुर्लभ स्वर्गलोकास जा. नरेश्वर ! जर मी तपस्येने काहीही फल प्राप्त केले असेल तर त्याच्या प्रभावाने तू सशरीर स्वर्गलोकास जा.' ॥ १४ १/२ ॥
उक्तवाक्ये मुनौ तस्मिन् सशरीरो नरेश्वरः ॥ १५ ॥

दिवं जगाम काकुत्स्थ मुनीनां पश्यतां तदा ।
'श्रीरामा ! विश्वामित्र मुनिंनी इतके म्हणताच राजा त्रिशङ्‍कु सर्व मुनिंच्या देखत त्या समयी आपल्या शरीरासहच स्वर्गलोकास निघून गेले. ॥ १५ १/२ ॥
स्वर्गलोकं गतं दृष्ट्‍वा त्रिशङ्‍कुं पाकशासनः ॥ १६ ॥

सह सर्वैः सुरगणैरिदं वचनमब्रवीत् ।
त्रिशङ्‍कुला स्वर्गलोकी पोहोचलेला पाहून समस्त देवतांसहित पाकशासन इंद्र त्यास म्हणाले - ॥ १६ १/२ ॥
त्रिशङ्‍को गच्छ भूयस्त्वं नासि स्वर्गकृतालयः ॥ १७ ॥

गुरुशापहतो मूढ पत भूमिमवाक्शिराः ।
'मूर्ख त्रिशङ्‍कु ! तू येथून आता परत जा. तुझ्यासाठी स्वर्गात स्थान नाही. तू गुरुच्या शापाने भ्रष्ट झाला आहेस, म्हणून खाली तोंड करून तू परत पृथ्वीवर पड. ॥ १७ १/२ ॥
एवमुक्तो महेन्द्रेण त्रिशङ्‍कुरपतत् पुनः ॥ १८ ॥

विक्रोशमानस्त्राहीति विश्वामित्रं तपोधनम् ।
इंद्राने इतके म्हणताच राजा त्रिशङ्‍कु तपोधन विश्वामित्रांना हाका मारीत, 'त्राहि त्राहि'चा घोष करीत पुन्हा स्वर्गातून खाली पडू लागला. ॥ १८ १/२ ॥
तच्छ्रुत्वा वचनं तस्य क्रोशमानस्य कौशिकः ॥ १९ ॥

रोषमाहारयत् तीव्रं तिष्ठ तिष्ठेति चाब्रवीत् ।
आक्रोश करणार्‍या त्रिशङ्‍कुचा करुण स्वर कानी पडताच कौशिक मुनिंना अत्यंत क्रोध आला. ते त्रिशङ्‍कुला म्हणाले - 'राजन् ! तेथेच थांब ! तेथेच थांबून रहा ! त्यांनी असे म्हणताच त्रिशङ्‍कु अधांतरीच लोंबकळत राहिला. ॥ १९ १/२ ॥
ऋषिमध्ये स तेजस्वी प्रजापतिरिवापरः ॥ २० ॥

सृजन् दक्षिणमार्गस्थान् सप्तर्षीनपरान् पुनः ।
नक्षत्रवंशमपरमसृजत् क्रोधमूर्च्छितः ॥ २१ ॥
तत्पश्चात् तेजस्वी विश्वामित्रांनी ऋषिमण्डळींच्या देखत दुसर्‍या प्रजापति समान दक्षिण मार्गासाठी नविन सप्तर्षिंची सृष्टि केली तथा क्रोधाने युक्त होऊन त्यांनी नविन नक्षत्रेंही निर्माण केली. ॥ २०-२१ ॥
दक्षिणां दिशमास्थाय ऋषिमध्ये महायशाः ।
सृष्ट्‍वा नक्षत्रवंशं च क्रोधेन कलुषीकृतः ॥ २२ ॥

अन्यमिन्द्रं करिष्यामि लोको वा स्यादनिन्द्रकः ।
दैवतान्यपि स क्रोधात् स्रष्टुं समुपचक्रमे ॥ २३ ॥
ते महायशस्वी मुनि क्रोधाने आवेशित होऊन दक्षिण दिशेत नूतन नक्षत्रमालांची निर्मिति करून असा विचार करू लागले की, 'मी दुसर्‍या इंद्राची सृष्टि करीन अथवा माझ्याद्वारा रचित स्वर्गलोक इंद्राशिवायच असेल.' असा निश्चय करून त्यांनी क्रोधपूर्वक नूतन देवतांची सृष्टि करण्यास प्रारंभ केला. ॥ २२-२३ ॥
ततः परमसम्भ्रान्ताः सर्षिसङ्‍घाः सुरासुराः ।
विश्वामित्रं महात्मानमूचुः सानुनयं वचः ॥ २४ ॥
यामुळे समस्त देवता, असुर आणि ऋषिसमुदाय फार घाबरला, आणि सर्व तेथे येऊन महात्मा विश्वामित्रांना विनयपूर्वक म्हणाले - ॥ २४ ॥
अयं राजा महाभाग गुरुशापपरिक्षतः ।
सशरीरो दिवं यातुं नार्हत्येव तपोधन ॥ २५ ॥
'महाभाग ! हा राजा त्रिशङ्‍कु गुरुच्या शापाने आपले पुण्य नष्ट करून चाण्डाळ झालेला आहे. म्हणून तपोधन ! हा सशरीर स्वर्गात जाण्यास कदापि अधिकारी नाही.' ॥ २५ ॥
तेषां तदद् वचनं श्रुत्वा देवानां मुनिपुङ्‍गवः ।
अब्रवीत् सुमहद् वाक्यं कौशिकः सर्वदेवताः ॥ २६ ॥
त्या देवतांचे असे म्हणणे ऐकून मुनिवर कौशिक सर्व देवतांना उद्देशून परम उत्कृष्ट वचन बोलले - ॥ २६ ॥
सशरीरस्य भद्रं वस्त्रिशङ्कोरस्य भूपतेः ।
आरोहणं प्रतिज्ञातं नानृतं कर्तुमुत्सहे ॥ २७ ॥
'देवगणांनो ! आपले कल्याण होवो ! मी राजा त्रिशङ्‍कुला स्वर्गात पाठविण्याची प्रतिज्ञा केलेली आहे आणि म्हणून मी ती खोटी करू शकत नाही. ॥ २७ ॥
स्वर्गोऽस्तु सशरीरस्य त्रिशङ्‍कोरस्य शाश्वतः ।
नक्षत्राणि च सर्वाणि मामकानि ध्रुवाण्यथ ॥ २८ ॥

यावल्लोका धरिष्यन्ति तिष्ठन्त्वेतानि सर्वशः ।
यत् कृतानि सुराः सर्वे तदनुज्ञातुमर्हथ ॥ २९ ॥
या महाराज त्रिशङ्‍कुला सदा स्वर्गलोकाचे सुख प्राप्त होत राहो. मी ज्या नक्षत्रांना निर्माण केले आहे, ती सर्व सदा विद्यमान राहोत. जो पर्यंत संसार असेल तो पर्यंत या सर्व वस्तु, ज्यांची सृष्टि माझ्याद्वारे झाली आहे, त्या सदा स्थित राहोत. देवतांनो ! आपण सर्वांनी या गोष्टीचे अनुमोदन करावे.' ॥२८-२९ ॥
एवमुक्ताः सुराः सर्वे प्रत्यूचुर्मुनिपुङ्‍गवम् ।
एवं भवतु भद्रं ते तिष्ठन्त्वेतानि सर्वशः ॥ ३० ॥

गगने तान्यनेकानि वैश्वानरपथाद् बहिः ।
नक्षत्राणि मुनिश्रेष्ठ तेषु ज्योतिःषु जाज्वलन् ॥ ३१ ॥

अवाक्शिरास्त्रिशङ्‍कुश्च तिष्ठत्वमरसन्निभः ।
अनुयास्यन्ति चैतानि ज्योतींषि नृपसत्तमम् ॥ ३२ ॥

कृतार्थं कीर्तिमन्तं च स्वर्गलोकगतं यथा ।
त्यांनी असे म्हटल्यावर सर्व देवता मुनिवर विश्वामित्रांना म्हणाल्या, 'महर्षे ! असेच होवो. या सर्व वस्तु अशाच राहतील. आणि आपले कल्याण होवो ! मुनिश्रेष्ठा ! आपण रचलेली अनेक नक्षत्रे आकाशात वैश्वानर पथाच्या बाहेर प्रकाशित होतील आणि त्या ज्योतिर्मय नक्षत्रांच्यामध्ये खाली डोके केलेला त्रिशङ्‍कुही प्रकाशमान राहील. तेथे त्याची स्थिति देवतांसारखीच राहील आणि ही सर्व नक्षत्रे त्या कृतार्थ आणि यशस्वी नृपश्रेष्ठाचे स्वर्गीय पुरुषाप्रमाणे अनुसरण करत राहतील. ॥ ३०-३२ १/२ ॥
विश्वामित्रस्तु धर्मात्मा सर्वदेवैरभिष्टुतः ॥ ३३ ॥

ऋषिमध्ये महातेजा बाढमित्येव देवताः ।
त्यानंतर समस्त देवतांनी ऋषिंमध्ये महातेजस्वी धर्मात्मा विश्वामित्र मुनिंची स्तुति केली. यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी 'अति उत्तम' असे म्हणून देवतांचा अनुरोध स्वीकार केला. ॥ ३३ १/२ ॥
ततो देवा महात्मानो ऋषयश्च तपोधनाः ।
जग्मुर्यथागतं सर्वे यज्ञस्यान्ते नरोत्तम ॥ ३४ ॥
नरश्रेष्ठ श्रीरामा ! तद्‌नंतर यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देवता आणि तपोधन महर्षि जसे आले होते त्याच प्रकारे आपापल्या स्थानास परत गेले. ॥ ३४ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे षष्टितमः सर्गः ॥ ६० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा साठावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६० ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP