[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकादशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कैकेय्या राजानं प्रतिज्ञया बद्ध्वा तेन प्राक् प्रदत्तौ वरौ स्मारयित्वा तयोरेकेन भरताभिषेकस्यापरेण च श्रीरामकर्तृकचतुर्दशवर्षावधिकवनवासस्य च याचनम् - कैकेयीने राजाला प्रतिज्ञाबद्ध करून त्यांनी पूर्वी दिलेल्या दोन वरांचे स्मरण देऊन भरतासाठी अभिषेक आणि रामासाठी चौदा वर्षांचा वनवास मागणे -
तं मन्मथशरैर्विद्धं कामवेगवशानुगम् ।
उवाच पृथिवीपालं कैकेयी दारुणं वचः ॥ १ ॥
भूपाल दशरथ कामदेवाच्या बाणांनी पीडित तथा कामवेगाच्या वशीभूत होऊन तिचे अनुसरण करत होते. त्यांना कैकेयी या प्रमाणे कठोर वचन बोलली - ॥१॥
नास्मि विप्रकृता देव केनचिन्नावमानिता ।
अभिप्रायस्तु मे कश्चित् तमिच्छामि त्वया कृतम् ॥ २ ॥
'देवा ! कुणीही माझा अपकार केलेला नाही किंवा कुणाकडून माझा अपमानही झालेला नाही अथवा माझी निंदाही कुणी केलेली नाही. माझा काही एक मनोरथ आहे आणि मी आपल्या द्वारा त्याची पूर्ति करूं इच्छित आहे. ॥२॥
प्रतिज्ञां प्रतिज्ञानीष्व यदि त्वं कर्तुमिच्छसि ।
अथ ते व्याहरिष्यामि यथाभिप्रार्थितं मया ॥ ३ ॥
'जर आपण तो पूर्ण करू इच्छित असाल तर प्रतिज्ञा करावी. त्या नंतर मी आपला वास्तविक अभिप्राय आपल्याला सांगेन.' ॥३॥
तामुवाच महाराजः कैकेयीमीषदुत्स्मयः ।
कामी हस्तेन सङ्‌‍गृह्य मूर्धजेषु भुवि स्थिताम् ॥ ४ ॥
महाराज दशरथ कामाच्या अधीन होते. ते कैकेयीचे म्हणणे ऐकून थोडेसे हसले आणि पृथ्वीवर पडलेल्या त्या देवीचे केस हातांनी पकडून तिचे मस्तक (शिर) आपल्या मांडीवर ठेवून तिला या प्रकारे म्हणाले- ॥४॥
अवलिप्ते न जानासि त्वत्तः प्रियतरो मम ।
मनुजो मनुजव्याघ्राद् रामाद् अन्यो न विद्यते ॥ ५ ॥
आपल्या सौभाग्या संबंधी गर्व करणार्‍या कैकेयी ! काय तुला माहीत नाही की नरश्रेष्ठ रामाच्या अतिरिक्त दुसरा कुणीही असा मनुष्य नाही की जो मला तुझ्या पेक्षा अधिक प्रिय असेल. ॥५॥
तेनाजय्येन मुख्येन राघवेण महात्मना ।
शपे ते जीवनार्हेण ब्रूहि यन्मनसेप्सितम् ॥ ६ ॥
जो प्राण्यांच्या द्वाराही आराधनीय आहे आणि ज्याला जिंकणे कुणालाही असंभवनीय आहे त्या प्रमुख वीर महात्मा राघवाची शपथ घेऊन मी सांगतो की तुझी कामना पूर्ण होईल, म्हणून तुझ्या मनांत जी इच्छा असेल ती तू मला सांग. ॥६॥
यं मुहूर्तमपश्यंस्तु न जीवे तमहं ध्रुवम् ।
तेन रामेण कैकेयि शपे ते वचनक्रियाम् ॥ ७ ॥
'कैकेयी ! ज्याला (दोन घटका) मुहूर्तमात्रही न पहाण्याने निश्चितच मी जिवंत राहू शकत नाही, त्या रामाची शपथ घेऊन मी सांगतो की तू जे सांगशील ते मी पूर्ण करीन.' ॥७॥
आत्मना चात्मजैश्चान्यैर्वृणे यं मनुजर्षभम् ।
तेन रामेण कैकेयि शपे ते वचनक्रियाम् ॥ ८ ॥
'कैकेयी ! आपल्या स्वतःला आणि आपल्या दुसर्‍या पुत्रांनाही ओवाळून टाकूनही मी ज्या नरश्रेष्ठ रामाचे वरण करण्यास उद्यत आहे, त्यांची शपथ घेऊन मी सांगतो की तू सांगशील ती गोष्ट मी पूरी करीन. ॥८॥
भद्रे हृदयमप्येतदनुमृश्योद्धरस्व मे ।
एतत् समीक्ष्य कैकेयि ब्रूहि यत् साधु मन्यसे ॥ ९ ॥
'भद्रे ! कैकेयी ! माझे हे हृदयही तुझ्या वचनांची पूर्ति करण्यासाठी तत्पर आहे, असा विचार करून तू आपली इच्छा व्यक्त करून या दुःखांतून माझा उद्धार कर. श्रीराम सर्वांना अधिक प्रिय आहे या गोष्टीवर दृष्टीपात करून तुला जे चांगले वाटेल ते तू सांग. ॥९॥
बलमात्मनि पश्यन्ती न विशङ्‌कितुमर्हसि ।
करिष्यामि तव प्रीतिं सुकृतेनापि ते शपे ॥ १० ॥
आपल्या बळाकडे पाहूनही तू माझ्या विषयी शंका घेता कामा नये. मी आपल्या सत्कर्मांची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की तुझे प्रिय कार्य अवश्य सिद्ध करीन.' ॥१०॥
सा तदर्थमना देवी तमभिप्रायमागतम् ।
निर्माध्यस्थ्याच्च हर्षाच्च बभाषे दुर्वचं वचः ॥ ११ ॥
राणी कैकेयीचे मन स्वार्थाच्या सिद्धीकडेच लागून राहिलेले होते. तिच्या हृदयात भरताच्या प्रति पक्षपात आणि राजा आपल्याला वश आहे हे पाहून तिला हर्ष होत होता. म्हणून आतां माझ्यासाठी आपला हेतु सिद्ध करण्याचा अवसर आलेला आहे असा विचार करून ती राजाला अशा गोष्टी सांगू लागली की ज्यांचा तोंडाने उच्चार करणे (शत्रू साठीही) कठीण आहे. ॥११॥
तेन वाक्येन संहृष्टा तमभिप्रायमात्मनः ।
व्याजहार महाघोरमभ्यागतमिवान्तकम् ॥ १२ ॥
राजाच्या त्या शपथयुक्त वचनांनी तिला फारच हर्ष झाला. तिने आपल्या अभिप्रायास - जो जवळ आलेल्या यमराजां प्रमाणे अत्यंत भयंकर होता, या शब्दात व्यक्त केले - ॥१२॥
यथा क्रमेण शपसे वरं मम ददासि च ।
तच्छृण्वन्तु त्रयस्त्रिंशद् देवाः सेन्द्रपुरोगमाः ॥ १३ ॥
'राजन् ! आपण ज्या प्रकारे क्रमशः शपथ घेऊन मला वर देण्यासाठी उद्यत झाला आहात; त्यास इंद्र आदि तेहतीस देवता ऐकोत'. ॥१३॥
चन्द्रादित्यौ नभश्चैव ग्रहा रात्र्यहनी दिशः ।
जगच्च पृथिवी चेयं सगन्धर्वा सराक्षसा ॥ १४ ॥

निशाचराणि भूतानि गृहेषु गृहदेवताः ।
यानि चान्यानि भूतानि जानीयुर्भाषितं तव ॥ १५ ॥
चंद्रमा, सूर्य, आकाश, ग्रह, रात्र, दिवस, दिशा, जगत, ही पृथ्वी, गंधर्व, राक्षस, रात्री विचरणारे प्राणी, घरात राहाणार्‍या गृह देवता तथा यांच्या अतिरिक्तही जितके प्राणी आहेत- ते सर्व आपले कथन जाणोत- आपल्या (गोष्टींचे) वचनांचे साक्षी बनोत. ॥१४-१५॥
सत्यसंधो महातेजा धर्मज्ञः सत्यवाक्शुचिः ।
वरं मम ददात्येष सर्वे शृण्वन्तु दैवताः ॥ १६ ॥
सर्व देवता ऐकोत ! महातेजस्वी, सत्यप्रतिज्ञ, धर्माचे ज्ञाता, सत्यवादी तथा शुद्ध आचार-विचार असणारे हे महाराज मला वर देत आहेत'. ॥१६॥
इति देवी महेष्वासं परिगृह्याभिशस्य च ।
ततः परमुवाचेदं वरदं काममोहितम् ॥ १७ ॥
या प्रकारे काममोहित होऊन वर देण्यासाठी उद्यत झालेल्या महाधनुर्धर राजा दशरथांना आपल्या मुठीत पकडून देवी कैकेयीने प्रथम त्यांची प्रशंसा केली नंतर या प्रकारे त्यांना म्हणाली- ॥१७॥
स्मर राजन् पुरा वृत्तं तस्मिन् देवासुरे रणे ।
तत्र त्वां च्यावयच्छत्रुस्तव जीवितमन्तरा ॥ १८ ॥
'राजन् ! त्या जुन्या गोष्टीची आठवण करावी; की जेव्हा देवासुर संग्राम चालू होता. तेथे शत्रूनी आपल्याला घायाळ करून पाडले होते; केवळ प्राण घेतले नव्हते एवढेच.' ॥१८॥
तत्र चापि मया देव यत् त्वं समभिरक्षितः ।
जाग्रत्या यतमानायास्ततो मे प्रददौ वरौ ॥ १९ ॥
'देव ! त्या युद्धस्थळी सारी रात्र जागून अनेक प्रकारचे प्रयत्‍न करून मी जे आपल्या जीवनाचे रक्षण केले होते त्यामुळे संतुष्ट होऊन आपण मला दोन वर दिले होते. ॥१९॥
तौ दत्तौ च वरौ देव निक्षेपौ मृगयाम्यहम् ।
तवैव पृथिवीपाल सकाशे रघुनन्दन ॥ २० ॥
'देवा ! पृथ्वीपाल, रघुनंदन ! आपण दिलेले ते दोन वर मी (धरोहर) ठेव म्हणून आपल्या पाशीच ठेवले होते. आज या वेळी मी त्यांच्या शोध करीत आहे. ॥२०॥
तत् प्रतिश्रुत्य धर्मेण न चेद् दास्यसि मे वरम् ।
अद्यैव हि प्रहास्यामि जीवितं त्वद्विमानिता ॥ २१ ॥
या प्रकारे धर्मतः प्रतिज्ञा करून जर आपण माझ्या त्या वरांना न द्याल तर मी मला स्वतःला आपल्या द्वारे अपमानित झालेली समजून आजच प्राणांचा परित्याग करून टाकीन. ॥२१॥
वाङ्‌‍मात्रेण तदा राजा कैकेय्या स्ववशे कृतः ।
प्रचस्कन्द विनाशाय पाशं मृग इवात्मनः ॥ २२ ॥
ज्या प्रमाणे मृग पारध्याच्या वाणी मात्रे आपल्याच विनाशासाठी त्याच्या जाळ्यांत फसला जातो, त्याच प्रमाणे कैकेयीच्या वशीभूत झालेला राजा दशरथ, त्या समयी पूर्वकालीन वरदान वाक्याच्या केवळ स्मरणामुळेच आपल्याच विनाशासाठी प्रतिज्ञेच्या बंधनात बांधला गेला. ॥२२॥
ततः परमुवाचेदं वरदं काममोहितम् ।
वरौ देयौ त्वया देव तदा दत्तौ महीपते ॥ २३ ॥

तौ तावदहमद्यैव वक्ष्यामि शृणु मे वचः ।
अभिषेकसमारम्भो राघवस्योपकल्पितः ॥ २४ ॥

अनेनैवाभिषेकेण भरतो मेऽभिषिच्यताम् ।
तदनंतर कैकेयीने काममोहित होऊन वर देण्यासाठी उद्यत झालेल्या राजास या प्रकारे म्हटले- 'देव ! पृथ्वीनाथ ! त्या दिवसात आपण जे वर देण्याची प्रतिज्ञा केली होतीत, ते आता तुम्ही मला दिले पाहिजेत. ते दोन्ही वर मी आता सांगते- आपण माझे म्हणणे (नीट) ऐकावे -ही जी राघवाच्या राज्याभिषेकाची तयारी केली गेली आहे, याच अभिषेक- सामग्रीच्या द्वारा माझा पुत्र भरत याचा अभिषेक केला जावा. ॥२३ - २४ १/२॥
यो द्वितीयो वरो देव दत्तः प्रीतेन मे त्वया ॥ २५ ॥

तदा दैवासुरे युद्धे तस्य कालोऽयमागतः ।
'देव ! आपण त्या समयी देवासुर संग्रामा मध्ये प्रसन्न होऊन माझ्यासाठी जो दुसरा वर दिला होतात, तो प्राप्त करण्याचा समयही आता आला आहे. ॥२५ १/२॥
नव पञ्च च वर्षाणि दण्डकारण्यमाश्रितः ॥ २६ ॥

चीराजिनधरो धीरो रामो भवतु तापसः ।
भरतो भजतामद्य यौवराज्यमकण्टकम् ॥ २७ ॥
धीर स्वभावाचे राम तपस्याच्या वेशात वल्कल तथा मृगचर्म धारण करून चौदा वर्षेपर्यंत दण्डकारण्यात जाऊन राहातील. भरताला आज निष्कण्टक युवराज पद प्राप्त व्हावे. ॥२६-२७॥
एष मे परमः कामो दत्तमेव वरं वृणे ।
अद्य चैव हि पश्येयं प्रयान्तं राघवं वने ॥ २८ ॥
हीच माझी सर्वश्रेष्ठ कामना आहे. मी आपल्या पासून आपण प्रथम दिलेले वरच मागत आहे. आपण अशी व्यवस्था करावी, ज्यायोगे मी आजच राघवाला वनाकडे जातांना पाहीन. ॥२८॥
स राजराजो भव सत्यसं‍गरः
     कुलं च शीलं च हि जन्म रक्ष च ।
परत्र वासे हि वदन्त्यनुत्तमं
     तपोधनाः सत्यवचो हितं नृणाम् ॥ २९ ॥
आपण राजांचेही राजे आहात, म्हणून सत्यप्रतिज्ञ बना आणि सत्याचा द्वारे आपले कुल, शील तथा जन्माचे रक्षण करावे. तपस्वी पुरुष म्हणतात की सत्य बोलणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. तो परलोकात निवास झाल्यावर मनुष्यांसाठी परम कल्याणकारी होत असतो. ॥२९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे एकादशः सर्गः ॥ ११ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा अकरावा सर्ग पूरा झाला. ॥११॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP