श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ पञ्चमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुकेशसन्ततीनां माल्यवत्सुमालिमालिनां सन्तानस्य वर्णनम् -
सुकेशाचे पुत्र माल्यवान्‌, सुमाली आणि मालीच्या संतानांचे वर्णन -
सुकेशं धार्मिकं दृष्ट्‍वा वरलब्धं च राक्षसम् ।
ग्रामणीर्नाम गन्धर्वो विश्वावसुसमप्रभः ॥ १ ॥

तस्य देववती नाम द्वितीया श्रीरिवात्मजा ।
त्रिषु लोकेषु विख्याता रूपयौवनशालिनी ॥ २ ॥

तां सुकेशाय धर्मात्मा ददौ रक्षःश्रियं यथा ।
(अगस्त्य महर्षि म्हणतात -) रघुनंदना ! त्यानंतर एक दिवस विश्वावसुच्या समान तेजस्वी ग्रामणी नामक गंधर्वाने राक्षस सुकेशाला धर्मात्मा तसेच वरप्राप्त वैभावाने संपन्न पाहून आपल्या देववती नामक कन्येचा त्याच्याशी विवाह करून दिला. ती कन्या प्रति लक्ष्मीप्रमाणे दिव्यरूप आणि यौवनाने सुशोभित तसेच तीन्ही लोकात विख्यात होती. धर्मात्मा ग्रामणीने राक्षसांच्या मूर्तीमंत राजलक्ष्मी समान देववतीचा हात सुकेशाच्या हातात दिला. ॥१-२ १/२॥
वरदानकृतैश्वर्यं सा तं प्राप्य पतिं प्रियम् ॥ ३ ॥

आसीद् देववती तुष्टा धनं प्राप्येव निर्धनः ।
वरदानाने मिळालेल्या ऐश्वर्याने संपन्न प्रियतम पति मिळाल्याने देववती फार संतुष्ट झाली; जणु कुणा निर्धनाला धनाची रासच प्राप्त झाली असावी. ॥३ १/२॥
स तया सह संयुक्तो रराज रजनीचरः ॥ ४ ॥

अञ्जनादभिनिष्क्रान्तः करेण्वेव महागजः ।
जसे अञ्जन नामक दिग्गजापासून उत्पन्न झालेला कुणी महान्‌ गज कुणा हत्तिणी बरोबर शोभा प्राप्त करीत असावा, त्याप्रकारे तो राक्षस गंधर्व कन्या देववती बरोबर राहून अधिक शोभा प्राप्त करू लागला. ॥४ १/२॥
देववत्यां सुकेशस्तु जनयामास राघव ॥ ५ ॥

त्रीन् पुत्रान् जनयामास त्रेताग्निसमविग्रहान् ।
रघुनंदना ! त्यानंतर योग्य वेळ आल्यावर सुकेशाने देववतीच्या गर्भापासून तीन पुत्र उत्पन्न केले, जे तीन(*) अग्निंच्या समान तेजस्वी होते. ॥५ १/२॥
(* गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणाग्नि)
माल्यवन्तं सुमालिं च मालिं च बलिनां वरम् ॥ ६ ॥

त्रींस्त्रिनेत्रसमान् पुत्रान् राक्षसान् राक्षसाधिपः ।
त्यांची नामे होती - माल्यवान्‌, सुमाली आणि माली. माली बलवानांमध्ये श्रेष्ठ होता. ते तिघेही त्रिनेत्रधारी महादेवांप्रमाणे शक्तिशाली होते. त्या तीन राक्षसपुत्रांना पाहून राक्षसराज सुकेश खूप प्रसन्न झाला. ॥६ १/२॥
त्रयो लोका इवाव्यग्राः स्थितास्त्रय इवाग्नयः ॥ ७ ॥

त्रयो मन्त्रा इवात्युग्राः त्रयो घोरा इवामयाः ।
ते तीन्ही लोकांचे समान सुस्थिर, तीन अग्निंप्रमाणे तेजस्वी, तीन मंत्रांच्या (शक्तिंच्या (**) अथवा वेदांच्या (***) प्रमाणे उग्र तसेच तीन रोगांच्या (****) प्रमाणे अत्यंत भयंकर होते. ॥७ १/२॥
(** - प्रभुशक्ति, उत्साह शक्ति तसेच मंत्रशक्ति - या तीन शक्ति आहेत.)
(*** - ऋग्‌, यजु आणि साम - हे तीन वेद आहेत.)
(**** - वात, पित्त आणि कफ - यांच्या प्रकोपाने उत्पन्न होणारे तीन प्रकारचे रोग आहेत.)
त्रयः सुकेशस्य सुताः त्रेताग्निसमतेजसः ॥ ८ ॥

विवृद्धिमगमंस्तत्र व्याधयोपेक्षिता इव ।
सुकेशाचे ते तीन्ही पुत्र त्रिविध अग्निंप्रमाणे तेजस्वी होते. ते तेथें जसे उपेक्षावश औषध न घेण्यामुळे रोग जसे वाढतात त्याप्रमाणे वाढू लागले. ॥८ १/२॥
वरप्राप्तिं पितुस्ते तु ज्ञात्वेश्वर्यं तपोबलात् ॥ ९ ॥

तपस्तप्तुं गता मेरुं भ्रातरः कृतनिश्चयाः ।
त्यांना जेव्हा माहित झाले की आपल्या पित्याला तपोबल द्वारा वरदान आणि ऐश्वर्याची प्राप्ति झाली आहे, तेव्हा ते तिघे भाऊ तपस्या करण्याचा निश्चय करून मेरू पर्वतावर निघून गेले. ॥९ १/२॥
प्रगृह्य नियमान् घोरान् राक्षसा नृपसत्तम ॥ १० ॥

विचेरुस्ते तपो घोरं सर्वभूतभयावहम् ।
नृपश्रेष्ठ ! ते राक्षस तेथे भयंकर नियम ग्रहण करून घोर तपस्या करू लागले. त्यांची ती तपस्या समस्त प्राण्यांना भय वाटेल अशी होती. ॥१० १/२॥
सत्यार्जवशमोपेतैः तपोभिर्भुवि दुर्लभैः ॥ ११ ॥

सन्तापयन्त स्त्रींल्लोकान् सदेवासुरमानुषान् ।
सत्य, सरलता आणि शम-दम आदिने युक्त तपाच्या द्वारे जे भूतलावर दुर्लभ आहे ते, देवता, असुर आणि मनुष्यांसहित तीन्ही लोकांना संतप्त करू लागले. ॥११ १/२॥
ततो विभुश्चतुर्वक्त्रो विमानवरमाश्रितः ॥ १२ ॥

सुकेशपुत्रान् आमन्त्र्य वरदोऽस्मीत्यभाषत ।
तेव्हा चतुर्मुख भगवान्‌ ब्रह्मदेव एका श्रेष्ठ विमानावर बसून तेथे गेले आणि सुकेशाच्या पुत्रांना संबोधित करून म्हणाले -मी तुम्हांला वर देण्यासाठी आलो आहे. ॥१२ १/२॥
ब्रह्माणं वरदं ज्ञात्वा सेन्द्रैर्देवगणैर्वृतम् ॥ १३ ॥

ऊचुः प्राञ्जलयः सर्वे वेपमाना इव द्रुमाः ।
इंद्र आदि देवतांनी घेरलेल्या वरदायक ब्रह्मदेवांना आलेले जाणून ते सर्वच्या सर्व वृक्षांप्रमाणे कांपत हात जोडून बोलले - ॥१३ १/२॥
तपसाराधितो देव यदि नो दिशसे वरम् ॥ १४ ॥

अजेयाः शत्रुहन्तारः तथैव चिरजीविनः ।
प्रभविष्ण्वो भवामेति परस्परमनुव्रताः ॥ १५ ॥
देवा ! जर आपण आमच्या तपस्येने आराधित तसेच संतुष्ट होऊन आम्हांला वर देऊ इच्छित असाल तर अशी कृपा करावी, ज्यायोगे आम्हांला कुणी परास्त करू शकणार नाही. आम्ही शत्रुंचा वध करण्यास समर्थ, चिरजीवी तसेच प्रभावशाली व्हावे. त्याच बरोबर आमच्यांत परस्परांतील प्रेम टिकून राहावे. ॥१४-१५॥
एवं भविष्यतीत्युक्त्वा सुकेशतनयान् विभुः ।
स ययौ ब्रह्मलोकाय ब्रह्मा ब्राह्मणवत्सलः ॥ १६ ॥
हे ऐकून ब्रह्मदेवांनी म्हटले - तुम्ही असेच व्हाल. सुकेशाच्या पुत्रांना असे सांगून ब्रह्मदेव ब्रह्मलोकास निघून गेले. ॥१६॥
वरं लब्ध्वा तु ते सर्वे राम रात्रिञ्चरास्तदा ।
सुरासुरान् प्रबाधन्ते वरदानसुनिर्भयाः ॥ १७ ॥
श्रीरामा ! वर मिळतांच ते सर्व निशाचर त्या वरदानाने अत्यंत निर्भय होऊन देवता तसेच असुरांनाही फारच कष्ट देऊ लागले. ॥१७॥
तैर्वध्यमानास्त्रिदशाः सर्षिसङ्‌घाः सचारणाः ।
त्रातारं नाधिगच्छन्ति निरयस्था यथा नराः ॥ १८ ॥
त्यांच्या द्वारा त्रासले गेल्याने देवता, ऋषि समुदाय आणि चारण नरकात पडलेल्या मनुष्यांच्या प्रमाणे कुणालाही आपला रक्षक अथवा सहायक प्राप्त करू शकत नव्हते. ॥१८॥
अथ ते विश्वकर्माणं शिल्पिनां वरमव्ययम् ।
ऊचुः समेत्य संहृष्टा राक्षसा रघुसत्तम ॥ १९ ॥
रघुवंशशिरोमणी ! एक दिवस शिल्पकर्माच्या ज्ञात्यांमध्ये श्रेष्ठ अविनाशी विश्वमर्म्याच्या जवळ जाऊन ते राक्षस हर्ष आणि उत्साहाने भरून बोलले - ॥१९॥
ओजस्तेजोबलवतां महतां आत्मतेजसा ।
गृहकर्ता भवानेव देवानां हृदयेप्सितम् ॥ २० ॥

अस्माकमपि तावत् त्वं गृहं कुरु महामते ।
हिमवन्तं उपाश्रित्य मेरुमन्दरमेव वा ॥ २१ ॥

महेश्वरगृहप्रख्यं गृहं नः क्रियतां महत् ।
महामते ! जे ओज, बल आणि तेजाने संपन्न असल्यामुळे महान्‌ आहेत त्या देवतांसाठी आपणच आपल्या शक्तिने मनोवांछित भवन निर्माण करता म्हणून आमच्यासाठीही आपण हिमालय, मेरू अथवा मंदराचलावर येऊन भगवान्‌ शंकराच्या दिव्य भवनाप्रमाणे एक विशाल निवासस्थान निर्माण करावे. ॥२०-२१ १/२॥
विश्वकर्मा ततस्तेषां राक्षसानां महाभुजः ॥ २२ ॥

निवासं कथयामास शक्रस्येव अमरावतीम् ।
हे ऐकून महाबाहु विश्वकर्म्यांनी त्या राक्षसांना एका अशा निवासस्थानाचा पत्ता सांगितला, की जे इंद्रांच्या अमरावतिलाही लज्जित करणारे होते. ॥२२ १/२॥
दक्षिणस्योदधेस्तीरे त्रिकूटो नाम पर्वतः ॥ २३ ॥

सुवेल इति चाप्यन्यो द्वितीयो राक्षसेश्वराः ।
(ते म्हणाले- ) राक्षसेश्वरांनो ! दक्षिण समुद्राच्या तटावर एक त्रिकूट नामक पर्वत आहे आणि दुसरा सुवेल नावाने विख्यात शैल आहे. ॥२३ १/२॥
शिखरे तस्य शैलस्य मध्यमेऽम्बुदसंनिभे ॥ २४ ॥

शकुनैरपि दुष्प्रापे टङ्‌कच्छिन्न चतुर्दिशि ।
त्रिंशद्‌योजन विस्तीर्णा शतयोजनमायता ॥ २५ ॥

स्वर्णप्राकारसंवीता हेमतोरणसंवृता ।
मया लङ्‌केति नगरी शक्राज्ञप्तेन निर्मिता ॥ २६ ॥
त्या त्रिकूट पर्वताच्या मधल्या शिखरावर, जे हिरवेगार असल्याने मेघांप्रमाणे निळे दिसून येते तसेच ज्याच्या चारी बाजूचे आश्रय छिन्नीने फोडून टाकलेले आहेत म्हणून जेथे पक्षी पोहोचणेही कठीण आहे, मी इंद्रांच्या आज्ञेने लंका नामक नगरी निर्माण केली आहे. ती तीस योजन रूंद आणि शंभर योजने लांब आहे. तिच्या बाजूस सोन्याची तटबंदी आहे आणि तिच्यात सोन्याची तोरणेही लावलेली आहेत. ॥२४-२६॥
तस्यां वसत दुर्धर्षा यूयं राक्षसपुङ्‌गवाः ।
अमरावतीं समासाद्य सेन्द्रा इव दिवौकसः ॥ २७ ॥
दुर्धर्ष राक्षसपुंगवांनो ! ज्याप्रमाणे इंद्र आणि देवता अमरावतीपुरीचा आश्रय घेऊन राहातात त्याच प्रकारे तुम्ही लोकही त्या लंकापुरीत जाऊन निवास करा. ॥२७॥
लङ्‌कादुर्गं समासाद्य राक्षसैर्बहुभिर्वृताः ।
भविष्यथ दुराधर्षाः शत्रूणां शत्रुसूदनाः ॥ २८ ॥
शत्रुसूदन वीरांनो ! लंकेच्या दुर्गाचा आश्रय घेऊन बर्‍याचशा राक्षसांसह जेव्हा तुम्ही निवास कराल, त्या समयी शत्रूसाठी तुमच्यावर विजय मिळविणे अत्यंत कठीण होईल. ॥२८॥
विश्वकर्मवचः श्रुत्वा ततस्ते राक्षसोत्तमाः ।
सहस्रानुचरा भूत्वा गत्वा तामवसन् पुरीम् ॥ २९ ॥
विश्वकर्म्याचे हे वचन ऐकून ते श्रेष्ठ राक्षस हजारो अनुचरांसह त्या पुरीत जाऊन वस्ती करून राहिले. ॥२९॥
दृढप्राकारपरिखां हैमैर्गृहशतैर्वृताम् ।
लङ्‌कामवाप्य ते हृष्टा न्यवसन् रजनीचराः ॥ ३० ॥
तिचे खंदक आणि तटबंदी फार मजबूत बनलेली होती. सोन्याचे शेकडो महाल त्या नगरीची शोभा वाढवत होते. त्या लंकापुरीत पोहोचून ते निशाचर फार आनंदाने तेथे राहू लागले. ॥३०॥
एतस्मिन्नेव काले तु यथाकामं च राघव ।
नर्मदा नाम गन्धर्वी बभूव रघुनन्दन ॥ ३१ ॥

तस्याः कान्यात्रयं ह्यासीत् धीश्रीकिर्तिसमद्युति ।
ज्येष्ठक्रमेण सा तेषां राक्षसानामराक्षसी ॥ ३२ ॥

कन्यास्ताः प्रददौ हृष्टा पूर्णचन्द्रनिभाननाः ।
हे राघव ! त्याच दिवसांत नर्मदा नावाची एक गंधर्वी होती. तिला तीन कन्या झाल्या ज्या ह्री, श्री आणि कीर्ति (*) प्रमाणे शोभायमान होत्या. त्यांची माता जरी राक्षसी नव्हती तरी ही तिने आपल्या रूचिला अनुसरून सुकेशाच्या त्या तीन राक्षसजातीय पुत्रांच्या बरोबर आपल्या कन्यांचा ज्येष्ठ आदि अवस्थेस अनुसरून विवाह करून दिला. त्या कन्या फार प्रसन्न होत्या. त्यांचे मुख पूर्णचंद्र्म्या समान मनोहर. ॥३१-३२ १/२॥
(* ह्या तीन देवी आहेत ज्या क्रमशः लज्जा, शोभा-संपत्ति आणि कीर्तिच्या अधिष्ठात्री मानल्या गेल्या आहेत.)
त्रयाणां राक्षसेन्द्राणां तिस्रो गन्धर्वकन्यकाः ॥ ३३ ॥

दत्ता मात्रा महाभागा नक्षत्रे भगदैवते ।
माता नर्मदेने उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये त्या तीन महाभाग्यवती गंधर्व कन्यांना त्या तीन राक्षसराजांच्या हाती सोपविले. ॥३३ १/२॥
कुतदारास्तु ते राम सुकेशतनयास्तदा ॥ ३४ ॥

चिक्रीडुः सह भार्याभिः अप्सरोभिरिवामराः ।
श्रीरामा ! जशा देवता अप्सरांसह क्रीडा करतात त्याचप्रकारे सुकेशाचे पुत्र विवाहानंतर आपल्या त्या पत्‍नींच्यासह राहून लौकिक सुखाचा उपभोग घेऊ लागले. ॥३४ १/२॥
ततो माल्यवतो भार्या सुन्दरी नाम सुन्दरी ॥ ३५ ॥

स तस्यां जनयामास यदपत्यं निबोध तत् ।
त्यात माल्यवानाच्या स्त्रीचे नाम सुंदरी होते. ती आपल्या नामाला अनुसरूनच परम सुंदर होती. माल्यावानाचे तिच्या गर्भापासून ज्या संतानांना जन्म दिला, तो सांगतो, ऐकावे ! ॥३५ १/२॥
वज्रमुष्टिर्विरूपाक्षो दुर्मुखश्चैव राक्षसः ॥ ३६ ॥

सुप्तघ्नो यज्ञकोपश्च मत्तोन्मत्तौ तथैव च ।
अनला चाभवत् कन्या सुन्दर्यां राम सुन्दरी ॥ ३७ ॥
वज्रमुष्टि, विरूपाक्ष, राक्षस दुर्मुख, सुप्तघ्न, यज्ञकोप, मत्त आणि उन्मत्त हे सात पुत्र होते. श्रीरामा ! यांच्या अतिरिक्त सुंदरीच्या गर्भापासून अनला नावाची एक सुंदर कन्याही उत्पन्न झाली होती. ॥३६-३७॥
सुमालिनोऽपि भार्यासीत् पूर्णचद्रनिभानना ।
नाम्ना केतुमती राम प्राणेभ्योऽपि गरीयसी ॥ ३८ ॥
सुमालीची पत्‍नीही फार सुंदर होती. तिचे मुख पूर्णचंद्रम्यासमान मनोहर होते आणि नाव केतुमती होते. सुमालीला ती प्राणांपेक्षांही अधिक प्रिय होती. ॥३८॥
सुमाली जनयामास यदपत्यं निशाचरः ।
केतुमत्यां महाराज तन्निबोधानुपूर्वशः ॥ ३९ ॥
महाराज ! निशाचर सुमालीने केतुमतीच्या गर्भापासून जी संतति उत्पन्न केली त्यांचाही क्रमशः परिचय दिला जात आहे. ऐकावे. ॥३९॥
प्रहस्तोऽकम्पनश्चैव विकटः कालिकामुखः ।
धूम्राक्षश्चैव दण्डश्च सुपार्श्वश्च महाबलः ॥ ४० ॥

संह्रादिः प्रघसश्चैव भासकर्णश्च राक्षसः ।
राका पुष्पोत्कटा चैव कैकसी च शुचिस्मिताः ॥ ४१ ॥

कुम्भीनसी च इत्येते सुमालेः प्रसवाः स्मृताः ॥ ४२ ॥
प्रहस्त, अकंपन, विकट, कालिकामुख, धूम्राक्ष, दंद, महाबली सुपार्श्व, संह्रादि, प्रघस तसेच राक्षस भासकर्ण - हे सुमालीचे पुत्र होते आणि राका, पुष्पोत्कटा, कैकसी आणि कुम्भीनसी - या चार पवित्र हास्य असणार्‍या त्याच्या कन्या होत्या. ही सर्व सुमालीची संतति सांगितली गेली आहे. ॥४०-४२॥
मालेस्तु वसुदा नाम गन्धर्वी रूपशालिनी ।
भार्यासीत् पद्मपत्राक्षी स्वक्षी यक्षीवरोपमा ॥ ४३ ॥
मालीची पत्‍नी गंधर्व कन्या वसुदा होती जी आपल्या रूप-सौंदर्याने सुशोभित होत होती. तिचे नेत्र प्रफुल्ल कमलाप्रमाणे विशाल आणि सुंदर होते. ती श्रेष्ठ यक्ष-पत्‍नींच्या समान सुंदर होती. ॥४३॥
सुमालेरनुजस्तस्यां जनयामास यत् प्रभो ।
अपत्यं कथ्यमानं तु मया त्वं शृणु राघव ॥ ४४ ॥
प्रभो ! रघुनंदना ! सुमालीचा लहान भाऊ माली याने वसुदेच्या गर्भापासून जी संतति उत्पन्न केली होती, तिचे मी वर्णन करत आहे, आपण ऐकावे. ॥४४॥
अनिलश्चानलश्चैव हरः सम्पातिरेव च ।
एते विभीषणामात्या मालेयास्तु निशाचरः ॥ ४५ ॥
अनल, अनिल, हर आणि संपाति - हे चार निशाचर मालीचेच पुत्र होते, जे या समयी विभीषणाचे मंत्री आहेत. ॥४५॥
ततस्तु ते राक्षसपुङ्‌गवास्त्रयो
निशाचरैः पुत्रशतैश्च संवृताः ।
सुरान् सहेन्द्रान् ऋषि नाग यक्षान्
बबाधिरे तान् बहुवीर्यदर्पिताः ॥ ४६ ॥
माल्यवान्‌ आदि तीन्ही श्रेष्ठ राक्षस आपल्या शेंकडो पुत्रांसह तसेच अन्यान्य निशाचरांसहित राहून आपल्या बाहुबलाच्या अभिमानाने युक्त होऊन इंद्र आदि देवता, ऋषि, नाग तसेच यक्षांना पीडा देऊ लागले. ॥४६॥
जगद्‌भ्रमन्तोऽनिलवद् दुरासदा
रणेषु मृत्युप्रतिमानतेजसः ।
वरप्रदानादपि गर्विता भृशं
क्रतुक्रियाणां प्रशमंकराः सदा ॥ ४७ ॥
ते वायुसमान सार्‍या संसारात विचरण करणारे होते. युद्धात त्यांना जिंकणे फारच कठीण होते. ते मृत्युच्या तुल्य तेजस्वी होते. वरदान मिळण्याने त्यांचा गर्व फारच वाढला होता, म्हणून ते यज्ञादि क्रियांचा सदा अत्यंत विनाश करीत असत. ॥४७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा पांचवा सर्ग पूरा झाला. ॥५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP