[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। सप्ताधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य भरतं परिसान्त्व्यायोध्यागमनार्थं तं प्रत्यादेशः -
श्रीरामांनी भरतास समजावून त्यांना अयोध्येस जाण्याचा आदेश देणे -
पुनरेवं ब्रुवाणं तं भरतं लक्ष्मणाग्रजः ।
प्रत्युवाच ततः श्रीमाञ्ज्ञातिमध्ये सुसत्कृतः ॥ १ ॥
जेव्हां भरत याप्रकारे प्रार्थना करू लागले तेव्हां कुटुंबी जनांच्या मध्ये सत्कारपूर्वक बसलेले लक्ष्मणांचे मोठे बंधु श्रीमान् रामांनी त्यांना याप्रकारे उत्तर दिले - ॥ १ ॥
उपपन्नमिदं वाक्यं यस्त्वमेवमभाषथाः ।
जातः पुत्रो दशरथात् कैकेय्यां राजसत्तमात् ॥ २ ॥
हे बंधो ! तुम्ही नृपश्रेष्ठ महाराज दशरथांच्या द्वारा केकय राजकन्या माता कैकेयीच्या गर्भापासून उत्पन्न झालेले आहात, म्हणून तुम्ही जे उत्तम वचन बोललात ते सर्वथा तुमच्या योग्य आहे. ॥ २ ॥
पुरा भ्रातः पिता नः स मातरं ते समुद्वहन् ।
मातामहे समाश्रौषीद् राज्यशुल्कमनुत्तमम् ॥ ३ ॥
’बंधो ! आजपासून फार पूर्वीची गोष्ट आहे - पित्याचा जेव्हां तुमच्या मातेशी विवाह झाला होता, तेव्हा त्यांनी तुमचे आजोबांची कैकेयीच्या पुत्राला राज्य देण्याची उत्तम अट मान्य केलेली होती. ॥ ३ ॥
देवासुरे च सङ्‌ग्रामे जनन्यै तव पार्थिवः ।
सम्प्रहृष्टो ददौ राजा वरमाराधितः प्रभुः ॥ ४ ॥
’त्यानंतर देवासुर संग्रामात तुमच्या मातेने प्रभावशाली महाराजांची मोठी सेवा केली होती. यामुळे संतुष्ट होऊन राजांनी तिला वरदान दिले होते. ॥ ४ ॥
ततः सा सम्प्रतिश्राव्य तव माता यशस्विनी ।
अयाचत नरश्रेष्ठं द्वौ वरौ वरवर्णिनी ॥ ५ ॥
त्याच्या पूर्तीसाठी प्रतिज्ञा घ्यावयास लावून तुमच्या श्रेष्ठ वर्णाच्या यशस्विनी मातेने त्या नरश्रेष्ठ पित्याकडून दोन वर मागितले. ॥ ५ ॥
तव राज्यं नरव्याघ्र मम प्रव्राजनं तथा ।
तौ च राजा तदा तस्यै नियुक्तः प्रददौ वरम् ॥ ६ ॥
’पुरुषसिंह ! एका वराच्या द्वारे तिने तुमच्यासाठी राज्य मागितले आणि दुसर्‍याच्या द्वारे माझा वनवास. यामुळे या प्रकारे प्रेरित होऊन राजांनी हे दोन्ही वर तिला देऊन टाकले. ॥ ६ ॥
तेन पित्राऽहमप्यत्र नियुक्तः पुरुषर्षभ ।
चतुर्दश वने वासं वर्षाणि वरदानिकम् ॥ ७ ॥
पुरुषप्रवर ! या प्रकारे त्या पित्याने वरदानाच्या रूपात मला चौदा वर्षेपर्यंत वनवासाची आज्ञा दिलेली आहे. ॥ ७ ॥
सोऽयं वनमिदं प्राप्तो निर्जनं लक्ष्मणान्वितः ।
सीतया चाप्रतिद्वंद्वः सत्यवादे स्थितः पितुः ॥ ८ ॥
’हेच कारण आहे की ज्यासाठी मी सीता आणि लक्ष्मणासह या निर्जन वनात निघून आलो आहे. येथे माझा कोणी प्रतिद्वंदी नाही. मी येथे पित्याच्या सत्याच्या रक्षणात स्थित राहीन. ॥ ८ ॥
भवानपि तथेत्येव पितरं सत्यवादिनम् ।
कर्तुमर्हसि राजेन्द्र क्षिप्रमेवाभिषिञ्चनात् ॥ ९ ॥
राजेंद्र ! तूही त्यांची आज्ञा मानून शीघ्रच राज्यपदावर आपला अभिषेक करवून घे आणि पित्याला सत्यवादी बनव. हेच तुझ्यासाठी उचित आहे. ॥ ९ ॥
ऋणान्मोचय राजानं मत्कृते भरत प्रभुम् ।
पितरं त्राहि धर्मज्ञं मातरं चाभिनन्दय ॥ १० ॥
धर्मज्ञ भरता ! तुम्ही माझ्यासाठी पूज्य पिता राजा दशरथांना कैकेयीच्या ऋणांतून मुक्त करा. त्यांना नरकात पडण्यापासून वाचवा आणि मातेचाही आनंद वाढवा. ॥ १० ॥
श्रूयते धीमता तात श्रुतिर्गीता यशस्विना ।
गयेन यजमानेन गयेष्वेव पितॄन् प्रति ॥ ११ ॥
’तात ! असे ऐकीवात आहे की बुद्धिमान यशस्वी राजा गय याने गय देशातच यज्ञ करताना पितरांच्या प्रति एक म्हण सांगितली आहे. ॥ ११ ॥
पुन्नाम्नो नरकाद् यस्मात् पितरं त्रायते सुतः ।
तस्मात् पुत्र इति प्रोक्तः पितॄन् यः पाति सर्वतः ॥ १२ ॥
(ती अशी आहे)’मुलगा पुत् नामक नरकापासून पितरांचा उद्धार करतो म्हणून त्यास ’पुत्र’ म्हटले जाते. जो पितरांचे सर्व बाजूने रक्षण करतो तोच पुत्र आहे. ॥ १२ ॥
एष्टव्या बहवः पुत्रा गुणवन्तो बहुश्रुताः ।
तेषां वै समवेतानामपि कश्चिद् गयां व्रजेत् ॥ १३ ॥
बर्‍याचशा गुणवान आणि बहुश्रुत पुत्रांची इच्छा केली पाहिजे. संभव आहे की प्राप्त झालेल्या या पुत्रांपैकी कुणी एक तरी गयेची यात्रा करील. ॥ १३ ॥
एवं राजर्षयः सर्वे प्रतीता रघुनन्दन ।
तस्मात् त्राहि नरश्रेष्ठ पितरं नरकात् प्रभो ॥ १४ ॥
रघुनंदन ! नरश्रेष्ठ भरत ! या प्रकारे सर्व राजर्षिंनी पितरांच्या उद्धाराचा निश्चय केला आहे. म्हणून प्रभो ! तुम्हीही आपल्या पित्याचा नरकापासून उद्धार करा. ॥ १४ ॥
अयोध्यां गच्छ भरत प्रकृतीरनुरञ्जय ।
शत्रुघ्नसहितो वीर सह सर्वैर्द्विजातिभिः ॥ १५ ॥
वीर भरत ! तुम्ही, शत्रुघ्न, तसेच समस्त ब्राह्मणांना बरोबर घेऊन अयोध्येस परत जा आणि प्रजेला सुख द्या. ॥ १५ ॥
प्रवेक्ष्ये दण्डकारण्यमहमप्यविलम्बयन् ।
आभ्यां तु सहितो राजन् वैदेह्या लक्ष्मणेन च ॥ १६ ॥
वीर ! आता मीही लक्ष्मण आणि सीतेसह शीघ्रच दण्डकारण्यात प्रवेश करेन. ॥ १६ ॥
त्वं राजा भरत भव स्वयं नराणां
     वन्यानामहमपि राजराण्मृगाणाम् ।
गच्छत्वं पुरवरमद्य सम्प्रहृष्टः
     संहृष्टस्त्वहमपि दण्डकान् प्रवेक्ष्ये ॥ १७ ॥
भरत ! तुम्ही स्वतः मनुष्यांचे राजे बना आणि मी जंगली पशुंचा सम्राट बनेन. आता तुम्ही अत्यंत हर्षपूर्वक श्रेष्ठ नगरी अयोध्येस जा आणि मीही प्रसन्नतापूर्वक दण्डक वनात प्रवेश करीन. ॥ १७ ॥
छायां ते दिनकरभाः प्रबाधमानं
     वर्षत्रं भरत करोतु मूर्ध्नि शीताम् ।
एतेषामहमपि काननद्रुमाणां
     छायां तामतिशयिनीं शनैः श्रयिष्ये ॥ १८ ॥
भरता ! सूर्याच्या प्रभेला तिरोहित करणारे छत्र तुमच्या मस्तकावर शीतल छाया करो. आता मीही हळूहळू या जंगली वृक्षांच्या घनदाट छायेचा आश्रय घेईन. ॥ १८ ॥
शत्रुघ्नस्त्वतुलमतिस्तु ते सहायः
     सौमित्रिर्मम विदितः प्रधानमित्रम् ।
चत्वारस्तनयवरा वयं नरेन्द्रं
     सत्यस्थं भरत चराम मा विषीद ॥ १९ ॥
भरता ! अतुलित बुद्धि असणारे शत्रुघ्न तुमच्या सहाय्यतेला राहतील आणि सुविख्यात सौमित्र लक्ष्मण माझा प्रधानमित्र (सहायक) आहे. आपण चार्‍ही पुत्र आपले पिता राजा दशरथ यांच्या सत्याचे रक्षण करूया. तुम्ही विषाद करू नका." ॥ १९ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्तोत्तरशततमः सर्गः ॥ १०७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे सातवा सर्ग पूरा झाला ॥ १०७ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP