| 
सीताया वनगमनाय भूशमाग्रहं विलापं व्याकुलतां चावलोक्य श्रीरामेण तसै स्वेन सह वने चलितुमनुज्ञाप्रदानं, पितुर्नातुर्गुरूणां च सेवाया महत्त्वस्य वर्णनं वनगमनोपक्रमाय गृहवस्तूनि ब्राह्मणादिभ्यो दातुं सीतां प्रत्यादेशदानं च - 
 |  
 
सीतेचा वनात चलण्यासाठी अधिक आग्रह, विलाप आणि व्याकुलता पाहून श्रीरामांनी तिला बरोबर येण्यास स्वीकृती देणे, पिता-माता आणि गुरूजनांच्या सेवेचे महत्व सांगणे तथा सीतेला वनात चलण्याची तयारी करण्यासाठी घरांतील वस्तूंचे दान करण्याची आज्ञा देणे - 
 | 
सान्त्व्यमाना तु रामेण मैथिली जनकात्मजा ।  
वनवासनिमित्तार्थं भर्तारमिदमब्रवीत् ॥ १ ॥  
 |  
 
राघवाने समजाविल्यावर जनकात्मज मैथिली वनवासाची आज्ञा प्राप्त करण्यासाठी आपल्या पतिला परत याप्रमाणे म्हणाली - ॥१॥
 | 
सा तमुत्तमसंविग्ना सीता विपुलवक्षसम् ।  
प्रणयाच्चाभिमानाच्च परिचिक्षेप राघवम् ॥ २ ॥  
 |  
 
सीता अत्यंत घाबरलेली होती. ती प्रेम आणि स्वभिमानामुळे विशाल वक्षस्थल असणार्या राघवावर आक्षेप करीत असल्याप्रमाणे म्हणू लागली - ॥२॥
 | 
किं त्वामन्यत वैदेहः पिता मे मिथिलाधिपः ।  
राम जामातरं प्राप्य स्त्रियं पुरुषविग्रहम् ॥ ३ ॥  
 |  
 
'श्रीराम ! काय माझे पिता मिथिलानरेश विदेहराज जनकांनी आपल्याला जामात्याच्या रूपात प्राप्त करून कधी असेही समजले होते का की आपण केवळ शरीरानेही पुरुष आहात, कार्यकलापाच्या दृष्टीने तर स्त्री आहात. ॥३॥
 | 
अनृतं बत लोकोऽयमज्ञानाद् यदि वक्ष्यति ।  
तेजो नास्ति परं रामे तपतीव दिवाकरे ॥ ४ ॥  
 |  
 
'नाथ ! आपण मला सोडून निघून गेल्यावर संसारातील लोक अज्ञानवश जर असे म्हणू लागले की सूर्यासमान तप्त असलेल्या श्रीरामामध्ये तेज आणि पराक्रमाचा अभाव आहे तर त्यांची ती असत्य धारणा माझ्यासाठी किती दुःखाची गोष्ट होईल. ॥४॥
 | 
किं हि कृत्वा विषण्णस्त्वं कुतो वा भयमस्ति ते ।  
यत् परित्यक्तुकामस्त्वं मामनन्यपरायणाम् ॥ ५ ॥  
 |  
 
'आपण कुठल्या विचाराने विषादात पडला आहात अथवा आपल्याला कुणाचे भय वाटत आहे, की ज्यामुळे आपण माझा, आपल्या पत्नीचा, जी एकमात्र आपलीच आश्रीत आहे, परित्याग करू इच्छिता ? ॥५॥
 | 
द्युमत्सेनसुतं वीर सत्यवन्तमनुव्रताम् ।  
सावित्रीमिव मां विद्धि त्वमात्मवशवर्तिनीम् ॥ ६ ॥  
 |  
 
'जशी सावित्री द्युमत्सेनकुमार वीरवर सत्यवानाचीच अनुगामिनी होती, त्याच प्रमाणे आपण मलाही आपल्याच आज्ञेच्या आधीन समजा. ॥६॥
 | 
न त्वहं मनसा त्वन्यं द्रष्टास्मि त्वदृतेऽनघ ।  
त्वया राघव गच्छेयं यथान्या कुलपांसनी ॥ ७ ॥  
 |  
 
'निष्पाप राघव ! ज्याप्रमाणे दुसरी कुणी कुलकलंकिनी स्त्री परपुरुषावर दृष्टी ठेवते, तशी मी नाही. मी तर आपल्या शिवाय दुसर्या पुरुषाला मनानेही कधी पाहू शकत नाही, म्हणून आपल्या बरोबरच येईन. (आपल्या शिवाय मी एकटी येथे राहाणार नाही). ॥७॥
 | 
स्वयं तु भार्यां कौमारीं चिरमध्युषितां सतीम् ।  
शैलूष इव मां राम परेभ्यो दातुमिच्छसि ॥ ८ ॥  
 |  
 
'श्रीरामा ! जिचा कुमारीअवस्थेत आपल्या बरोबर विवाह झाला आहे आणि जी चिरकालपर्यत आपल्या बरोबर राहून चुकली आहे त्याच मला, आपल्या सती-साध्वी पत्नीला आपण स्त्रीच्या कमाईवर जगणार्या नटाप्रमाणे दुसर्यांच्या हाती सोपवू इच्छिता कां ? ॥८॥
 | 
यस्य पथ्यंचरामात्थ यस्य चार्थेऽवरुध्यसे ।  
त्वं तस्य भव वश्यश्च विधेयश्च सदानघ ॥ ९ ॥  
 |  
 
'निष्पाप रघुनंदना ! आपण मला ज्याच्या अनुकूल वागण्याची शिकवण देत आहात आणि ज्याचा मुळे आपला राज्याभिषेक रोखला गेला आहे त्या भरताचे सदाच वशवर्ती आणि आज्ञाधारक बनून आपणच राहा, मी राहाणार नाही. ॥९॥
 | 
स मामनादाय वनं न त्वं प्रस्थितुमर्हसि ।  
तपो वा यदि वारण्यं स्वर्गो वा स्यात् त्वया सह ॥ १० ॥  
 |  
 
'म्हणून मला बरोबर न घेता आपण वनाकडे प्रस्थान करणे उचित नाही. जर तपस्या करावयाची असेल, वनात राहावयाचे असेल अथवा स्वर्गात जावयाचे असेल तर सर्व ठिकाणी मी आपल्या बरोबर राहू इच्छिते. ॥१०॥
 | 
न च मे भविता तत्र कश्चित् पथि परिश्रमः ।  
पृष्ठतस्तव गच्छन्त्या विहारशयनेष्विव ॥ ११ ॥  
 |  
 
'ज्याप्रमाणे बगीच्यात हिंडण्यात आणि पलंगावर झोपण्यात काहीही कष्ट होत नाहीत त्याच प्रमाणे आपल्या पाठोपाठ वनाच्या मार्गावर चालण्यातही मला काही परिश्रम वाटणार नाहीत. ॥११॥
 | 
कुशकाशशरेषीका ये च कण्टकिनो द्रुमाः ।  
तूलाजिनसमस्पर्शा मार्गे मम सह त्वया ॥ १२ ॥  
 |  
 
'रस्त्यांत जे कुश-काश बोरू, गवत अथवा काटेरी वृक्ष आदि लागतील त्यांचा स्पर्श मला आपणां बरोबर असल्यावर कापूस आणि मृगचर्म यांच्यासमान सुखद प्रतीत होईल. ॥१२॥
 | 
महावातसमुद्भूतं यन्मामवकरिष्यति ।  
रजो रमण तन्मन्ये परार्घ्यमिव चंदनम् ॥ १३ ॥  
 |  
 
'प्राणवल्लभा ! प्रचण्ड वावटळी मुळे माझ्या शरीरावर जी धूळ उडेल, तिला मी उत्तम चंदनाप्रमाणे समजेन. ॥१३॥
 | 
शाद्वलेषु यथा शिश्ये वनान्तर्वनगोचरा ।  
कुथास्तरणयुक्तेषु किं स्यात् सुखतरं ततः ॥ १४ ॥  
 |  
 
ज्यावेळी वनात राहीन, त्यावेळी आपल्या बरोबर गवतावरही मी झोपेन रंगीबेरंगी गालिचे आणि मुलायम बिछान्यानी युक्त पलंगावर काय त्याहून अधिक सुख मिळू शकेल का ? ॥१४॥
 | 
पत्रं मूलं फलं यत्तु अल्पं वा यदि वा बहु ।  
दास्यसे स्वयमाहृत्य तन्मेऽमृतरसोपमम् ॥ १५ ॥  
 |  
 
'आपण आपल्या हाताने आणून थोडे अथवा जास्त जे काही फल, मूल अथवा पाने द्याल तेच माझ्यासाठी अमृत-रसाप्रमाणे होईल. ॥१५॥
 | 
न मातुर्न पितुस्तत्र स्मरिष्यामि न वेश्मनः ।  
आर्तवान्युपभुञ्जाना पुष्पाणि च फलानि च ॥ १६ ॥  
 |  
 
'ऋतूस अनुकूल जे काही फल-फूल प्राप्त होईल, ते खाऊन मी राहीन, आणि माता-पिता अथवा महालाची कधी आठवण काढणार नाही. ॥१६॥
 | 
न च तत्र ततः किञ्चिद् द्रष्टुमर्हसि विप्रियम् ।  
मत्कृते न च ते शोको न भविष्यामि दुर्भरा ॥ १७ ॥  
 |  
 
'तेथे रहात असतां माझा कुठलाही प्रतिकूल व्यवहार आपण पाहू शकणार नाही . माझ्यासाठी आपल्याला काही कष्ट सोसावे लागणार नाहीत. माझा निर्वाह आपल्यासाठी दुर्भर होणार नाही. ॥१७॥
 | 
यस्त्वया सह स स्वर्गो निरयो यस्त्वया विना ।  
इति जानन् परां प्रीतिं गच्छ राम मया सह ॥ १८ ॥  
 |  
 
'आपल्या बरोबर जेथे कुठे राहावे लागेल तो माझ्यासाठी स्वर्ग आहे आणि आपल्या शिवाय कुठलेही स्थान असेल ते माझ्यासाठी नरकासमान आहे. रामा ! माझा हा निश्चय जाणून आपण अत्यंत प्रसन्नतापूर्वक माझ्या बरोबर वनात चला. ॥१८॥
 | 
अथ मामेवमव्यग्रां वनं नैव नयिष्यसे ।  
विषमद्यैव पास्यामि मा वशं द्विषतां गमम् ॥ १९ ॥  
 |  
 
'मला वनवासांतील कष्टांची काही भीती वाटत नाही. जर अशा स्थितीतही आपण आपल्या बरोबर मला वनात घेऊन गेला नाहीत तर मी आजच विष प्राशन करीन, परंतु शत्रूंच्या अधीन होऊन राहाणार नाही. ॥१९॥
 | 
पश्चादपि हि दुःखेन मम नैवास्ति जीवितम् ।  
उज्झितायास्त्वया नाथ तदैव मरणं वरम् ॥ २० ॥  
 |  
 
'नाथ ! जर आपण माझा त्याग करून वनात निघून जाल तर नंतरही या भारी दुःखामुळे माझे जिंवत रहाणे संभवनीय नाही. अशा दशेत मी याच समयी, आपण जाताच आपला प्राणत्याग करणे चांगले समजते. ॥२०॥
 | 
इमं हि सहितुं शोकं मुहूर्तमपि नोत्सहे ।  
किं पुनर्दशवर्षाणि त्रीणि चैकं च दुःखिता ॥ २१ ॥  
 |  
 
'आपल्या विरहाचा हा शोक मी मुहूर्तपर्यंतही सहन करू शकणार नाही. मग मला दुःखितेला हा चौदा वर्षे पर्यंत कसा सहन होऊ शकेल ? ॥२१॥
 | 
इति सा शोकसंतप्ता विलप्य करुणं बहु ।  
चुक्रोश पतिमायस्ता भृशमालिङ्ग्य सस्वरम् ॥ २२ ॥  
 |  
 
'याप्रकारे बराच वेळपर्यंत करूणाजनक विलाप करून शोकाने संतप्त झालेली सीता शिथिल होऊन आपल्या पतिला जोराने पकडून - त्यांस गाढ आलिंगन देऊन ढसाढसां रडू लागली. ॥२२॥
 | 
सा विद्धा बहुभिर्वाक्यैर्दिग्धैरिव गजाङ्गना ।  
चिरसन्नियतं बाष्पं मुमोचाग्निमिवारणिः ॥ २३ ॥  
 |  
 
ज्याप्रमाणे एखादी हत्तीण विषाने माखलेल्या बहुसंख्य बाणांच्या द्वारे घायाळ केली जावी त्याप्रकारे सीता श्रीरामांच्या पूर्वोक्त अनेकानेक वचनांच्या द्वारे मर्माहत झाली होती म्हणून ज्याप्रमाणे अरणीतून आग प्रकट व्हावी त्याप्रमाणे ती बराच वेळ रोखून धरलेल्या अश्रूंना ढाळू लागली. ॥२३॥
 | 
तस्याः स्फटिकसङ्काशं वारि संतापसम्भवम् ।  
नेत्राभ्यां परिसुस्राव पङ्कजाभ्यामिवोदकम् ॥ २४ ॥  
 |  
 
तिच्या दोन्ही डोळ्यातून स्फटिकासमान निर्मल संतापजनित अश्रुजल झरत होते, जणु दोन कमलांतून जलाची धारा पडत राहिली असावी. ॥२४॥
 | 
तत्सितामलचंद्राभं मुखमायतलोचनम् ।  
पर्यशुष्यत बाष्पेण जलोद्धृतमिवाम्बुजम् ॥ २५ ॥  
 |  
 
मोठमोठ्या नेत्रांनी सुशोभित आणि पौर्णिमेच्या निर्मल चंद्रम्याप्रमाणे कांतिमान असे तिचे मनोहर मुख संतापजनित तापाने पाण्यांतून बाहेर काढलेल्या कमळा प्रमाणे सुकून गेले होते. ॥२५॥
 | 
तां परिष्वज्य बाहुभ्यां विसञ्ज्ञामिव दुःखिताम् ।  
उवाच वचनं रामः परिविश्वासयंस्तदा ॥ २६ ॥  
 |  
 
सीता दुःखाने अचेत (निश्चेष्ट) झाली होती, रामांनी तिला दोन्ही हातांनी संभाळून हृदयाशी धरले आणि त्यावेळी तिला सांत्वना देतांना म्हटले - ॥२६॥
 | 
न देवि बत दुःखेन स्वर्गमप्यभिरोचये ।  
न हि मेऽस्ति भयं किञ्चित् स्वयम्भोरिव सर्वतः ॥ २७ ॥  
 |  
 
'देवी ! तुला दुःख देऊन मला स्वर्गाचे सुख मिळत असेल तर मी तेही घेऊ इच्छित नाही. स्वयंभू ब्रह्मदेवाप्रमाणे मला कुणापासूनही किञ्चितही भय नाही. ॥२७॥
 | 
तव सर्वमभिप्रायमविज्ञाय शुभानने ।  
वासं न रोचयेऽरण्ये शक्तिमानपि रक्षणे ॥ २८ ॥  
 |  
 
'शुभानने ! यद्यपि वनात तुझे रक्षण करण्यासाठी मी सर्वथा समर्थ आहे, तरीही तुझा हार्दिक अभिप्राय पूर्णरूपाने जाणल्याशिवाय तुला वनवासिनी बनविणे मी उचित समजत नव्हतो. ॥२८॥
 | 
यत् सृष्टासि मया सार्धं वनवासाय मैथिलि ।  
न विहातुं मया शक्या प्रीतिरात्मवता यथा ॥ २९ ॥  
 |  
 
'मैथिली ! जर तू माझ्या बरोबर वनात राहण्यासाठीच उत्पन्न झाली आहेस तर मी तुला सोडू शकत नाही. जसा आत्मज्ञानी पुरुष आपल्या स्वाभाविक प्रसन्नतेचा त्याग करीत नाही अगदी त्याचप्रमाणे. ॥२९॥
 | 
धर्मस्तु गजनासोरु सद्भिराचरितः पुरा ।  
तं चाहमनुवर्तिष्ये यथा सूर्यं सुवर्चला ॥ ३० ॥  
 |  
 
'हत्तीच्या सोंडेसमान जांघा असलेल्या जनककिशोरी ! पूर्वकालाच्या सत्पुरुषांनी आपल्या पत्नींच्या बरोबर राहून ज्या धर्माचे आचरण केले होते, मीही तुझ्या बरोबर राहून त्याचेच अनुसरण करीन. तथा ज्याप्रमाणे सुवर्चला (संज्ञा) आपला पति सूर्य याचे अनुगमन करते, त्याप्रमाणे तूही माझे अनुसरण कर. ॥३०॥
 | 
न खल्वहं न गच्छेयं वनं जनकनन्दिनि ।  
वचनं तन्नयति मां पितुः सत्योपबृंहितम् ॥ ३१ ॥  
 |  
 
'जनकनंदिनी ! मी वनांत जाणार नाही हे तर कुठल्याही प्रकारे संभव नाही आहे. कारण पित्याचे ते सत्ययुक्त वचनच मला वनाकडे घेऊन जात आहे. ॥३१॥
 | 
एष धर्मस्तु सुश्रोणि पितुर्मातुश्च वश्यता ।  
आज्ञां चाहं व्यतिक्रम्य नाहं जीवितुमुत्सहे ॥ ३२ ॥  
 |  
 
'सुश्रोणी ! पिता आणि माता यांच्या आज्ञेच्या अधीन राहाणे पुत्राचा धर्म आहे म्हणून मी त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करून जीवित राहू शकत नाही . ॥३२॥
 | 
अस्वाधीनं कथं दैवं प्रकारैरभिराध्यते ।  
स्वाधीनं समतिक्रम्य मातरं पितरं गुरुम् ॥ ३३ ॥  
 |  
 
'जी आपल्या सेवेच्या अधीन आहेत, त्या प्रत्यक्ष देवता ज्या माता, पिता एवं गुरू यांचे उल्लंघन करून ज्या सेवेच्या अधीन नाहीत त्या अप्रत्यक्ष देवता दैवाची विभिन्न प्रकारांनी कशा तर्हेने आराधना केला जाऊ शकते. ॥३३॥
 | 
यत्र त्रयं त्रयो लोकाः पवित्रं तत्समं भुवि ।  
नान्यदस्ति शुभापाङ्गे तेनेदमभिराध्यते ॥ ३४ ॥  
 |  
 
'सुंदर नेत्रप्रांत असणार्या सीते ! ज्यांची आराधना केल्यावर धर्म, अर्थ आणि काम तिन्ही प्राप्त होतात तथा तिन्ही लोकांची आराधना संपन्न होऊन जाते त्या माता, पिता आणि गुरू समान दुसरी कुठलीही पवित्र देवता या भूतलावर नाही आहे. म्हणून भूतल निवासी या तीन देवतांची आराधना करतात. ॥३४॥
 | 
न सत्यं दानमानौ वा यज्ञो वाप्याप्तदक्षिणाः ।  
तथा बलकराः सीते यथा सेवा पितुर्मता ॥ ३५ ॥  
 |  
 
'सीते ! पित्याची सेवा करणे कल्याणाच्या प्राप्तिचे जसे प्रबल साधन मानले गेले आहे तसे ना सत्य आहे, ना दान आहे, ना मान आहे आणि ना पर्याप्त दक्षिणायुक्त यज्ञही आहे. ॥३५॥
 | 
स्वर्गो धनं वा धान्यं वा विद्याः पुत्राः सुखानि च ।  
गुरुवृत्त्यनुरोधेन न किञ्चिदपि दुर्लभम् ॥ ३६ ॥  
 |  
 
'गुरूजनांच्या सेवेचे अनुसरण करण्याने स्वर्ग, धन-धान्य, विद्या, पुत्र आणि सुख- काहीही दुर्लभ नाही. ॥३६॥
 | 
देवगंधर्वगोलोकान् ब्रह्मलोकांस्तथापरान् ।  
प्राप्नुवंति महात्मानो मातापितृपरायणाः ॥ ३७ ॥  
 |  
 
'माता -पिता यांच्या सेवेत तत्पर राहाणारे महात्मा पुरुष देवलोक, गंधर्वलोक, ब्रह्मलोक, गोलोक तथा अन्य लोकांनाही प्राप्त करून घेतात. ॥३७॥
 | 
स मा पिता यथा शास्ति सत्यधर्मपथे स्थितः ।  
तथा वर्तितुमिच्छामि स हि धर्मः सनातनः ॥ ३८ ॥  
 |  
 
'म्हणून सत्य आणि धर्माच्या मार्गावर स्थित राहाणारे पूज्य पिताश्री मला जशी आज्ञा देत आहेत, मी तसेच वर्तन करू इच्छितो, कारण तोच सनातन धर्म आहे. ॥३८॥
 | 
मम सन्ना मतिः सीते त्वां नेतुं दण्डकावनम् ।  
वसिष्यामीति सा त्वं मामनुयातुं सुनिश्चिता ॥ ३९ ॥  
 |  
 
"सीते ! मी आपल्या बरोबर वनात निवास करीन' - असे म्हणून तू माझ्या बरोबर येण्याचा दृढ निश्चय केला आहेस म्हणून तुला दण्डकारण्यात नेण्यासंबंधी ( घेऊन जाण्याविषयी) जो माझा पहिला विचार होता तो आता बदलला आहे. ॥३९॥
 | 
सा हि दिष्टानवद्याङ्गी वनाय मदिरेक्षणे ।  
अनुगच्छस्व मां भीरु सहधर्मचरी भव ॥ ४० ॥  
 |  
 
'मदयुक्त नेत्र असणार्या सुंदरी ! आता मी तुला वनात चलण्यासाठी आज्ञा देत आहे. भीरू ! तू माझी अनुगामिनी बन आणि माझ्या बरोबर राहून धर्माचे आचरण कर. ॥४०॥
 | 
सर्वथा सदृशं सीते मम स्वस्य कुलस्य च ।  
व्यवसायमनुक्रान्ता कान्ते त्वमतिशोभनम् ॥ ४१ ॥  
 |  
 
'प्राणवल्लभे सीते ! तू माझ्या बरोबर येण्याचा हा जो परम सुंदर निश्चय केला आहेस, तो तुझ्या आणि माझ्या कुळाच्या सर्वथा योग्य आहे. ॥४१॥
 | 
आरभस्व शुभश्रोणि वनवासक्षमाः क्रियाः ।  
नेदानीं त्वदृते सीते स्वर्गोऽपि मम रोचते ॥ ४२ ॥  
 |  
 
'सुश्रोणी ! आता तू वनवास योग्य दान आदि कर्म प्रारंभ कर. सीते या वेळी तू या प्रकारे दृढ निश्चय केल्यावर तुझ्याशिवाय स्वर्ग सुद्धा मला चांगला वाटत नाही. ॥४२॥
 | 
ब्राह्मणेभ्यश्च रत्नानि भिक्षुकेभ्यश्च भोजनम् ।  
देहि चाशंसमानेभ्यः संत्वरस्व च मा चिरम् ॥ ४३ ॥  
 |  
 
'ब्राह्मणांना रत्नस्वरूप उत्तम वस्तु दान कर आणि भोजन मागणार्या भिक्षुकांना भोजन दे. शीघ्रता कर, विलंब होऊन उपयोगी नाही. ॥४३॥
 | 
भूषणानि महार्हाणि वरवस्त्राणि यानि च ।  
रमणीयाश्च ये केचित् क्रीडार्थाश्चाप्युपस्कराः ॥ ४४ ॥ 
  
शयनीयानि यानानि मम चान्यानि यानि च ।  
देहि स्वभृत्यवर्गस्य ब्राह्मणानामनन्तरम् ॥ ४५ ॥  
 |  
 
'तुझ्या जवळ जितकी बहुमूल्य आभूषणे असतील जी जी उत्तम वस्त्रे असतील अथवा कुठलाही रमणीय पदार्थ असेल तथा मनोरञ्जनाची जी जी सुंदर सामग्री असेल, माझ्या आणि तुझ्या उपयोगात आणावयाच्या उत्तम शय्या, वाहने तथा अन्य वस्तू, त्यांतील ब्राह्मणांना दान केल्यानंतर ज्या शिल्लक राहतील त्या आपल्या सेवकात वाटून दे. ॥४४-४५॥
 | 
अनुकूलं तु सा भर्तुर्ज्ञात्वा गमनमात्मनः ।  
क्षिप्रं प्रमुदिता देवी दातुमेव प्रचक्रमे ॥ ४६ ॥  
 |  
 
'स्वामीनी माझे वनात जाणे स्वीकार केले - माझे वनगमन त्यांच्या मनाच्या अनुकूल झाले हे जाणून देवी सीता अत्यंत प्रसन्न झाली आणि शीघ्रतापूर्वक सर्ववस्तूंचे दान करण्यात तत्पर झाली. ॥४६॥
 | 
ततः प्रहृष्टा प्रतिपूर्णमानसा  
      	यशस्विनी भर्तुरवेक्ष्य भाषितम् ।  
धनानि रत्नानि च दातुमङ्गना  
      	प्रचक्रमे धर्मभृतां मनस्विनी ॥ ४७ ॥  
 |  
 
त्यानंतर आपला मनोरथ पूर्ण झाल्याने अत्यंत हर्षयुक्त झालेली यशस्विनी सीता देवी स्वामीच्या आदेशाचा विचार करून धर्मात्मा ब्राह्मणांना धन आणि रत्नांचे दान करण्यास उद्यत झाली. ॥४७॥
 | 
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे त्रिँशः सर्गः ॥ ३० ॥  
 |  
 
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायणाच्या आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा तिसावा सर्ग पूरा झाला. ॥३०॥ 
 |