[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकोनविंशत्यधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
अनसूयादेशेन सीतायास्तत्प्रदत्तानां दिव्यवस्त्राभूषणानां धारणं कृत्वा श्रीरामस्य पार्श्वे गमनं श्रीरामादीनां रात्रावाश्रमे स्थित्वा प्रातरन्यत्र गन्तुमृषिभ्योऽनुज्ञाया ग्रहणम् -
अनसूयेच्या आज्ञेने सीतेने तिने दिलेल्या वस्त्राभूषणांना धारण करून श्रीरामांच्या जवळ जाणे, तसेच श्रीराम आदिंचे रात्री आश्रमात राहून प्रातःकाळी अन्यत्र जाण्यासाठी ऋषिंचा निरोप घेणे -
अनसूया तु धर्मज्ञा श्रुत्वा तां महतीं कथाम् ।
पर्यष्वजत बाहुभ्यां शिरस्याघ्राय मैथिलीम् ॥ १ ॥
धर्मास जाणणार्‍या अनसूयेने ती दीर्घ कथा ऐकून मैथिली सीतेला आपल्या दोन्ही भुजांनी मांडीवर बसवून घेतले आणि तिचे मस्तक हुंगून म्हटले - ॥ १ ॥
व्यक्ताक्षरपदं चित्रं भाषितं मधुरं त्वया ।
यथा स्वयंवरं वृत्तं तत् सर्वं च श्रुतं मया ॥ २ ॥
मुली ! तू सुस्पष्ट अक्षरांनी, युक्त शब्दांत हा विचित्र आणि मधुर प्रसंग ऐकविलास. तुझे स्वयंवर ज्याप्रकारे झाले होते ते सर्व मी ऐकले आहे. ॥ २ ॥
रमेयं कथया ते तु दृढं मधुरभाषिणि ।
रविरस्तं गतः श्रीमानुपोह्य रजनीं शुभाम् ॥ ३ ॥

दिवसं परिकीर्णानामाहारार्थं पतत्त्रिणाम् ।
संध्याकाले निलीनानां निद्रार्थं श्रूयते ध्वनिः ॥ ४ ॥
’मधुरभाषिणी सीते ! तुझ्या या कथेत माझे मन फारच रमले आहे; तथापि तेजस्वी सूर्यदेव रजनीच्या शुभ वेळेला निकट पोहोंचून अस्त झाले आहेत. जे दिवसा चारा वेचण्यासाठी चारी बाजूस निघून गेले होते ते पक्षी आता संध्याकाळी झोप घेण्यासाठी आपल्या घरट्यात येऊन लपले आहेत, त्यांचा हा ध्वनी ऐकू येत आहे. ॥ ३-४ ॥
एते चाप्यभिषेकार्द्रा मुनयः कलशोद्यताः ।
सहिता उपवर्तन्ते सलिलाप्लुतवल्कलाः ॥ ५ ॥
’हे जलाने भिजलेले वल्कल धारण करणारे मुनि, ज्यांचे शरीर स्नानामुळे आर्द्र दिसून येत आहे, जलाने भरलेले कलश उचलून एकसाथ आश्रमात परत येत आहेत. ॥ ५ ॥
अग्निहोत्रे च ऋषीणा हुते च विधिपूर्वकम् ।
कपोताङ्‌गारुणो धूमो दृश्यते पवनोद्धतः ॥ ६ ॥
’महर्षि अत्रिंनी विधिपूर्वक अग्निहोत्र संबंधी होमकार्य संपन्न केले आहे, म्हणून वायुच्या वेगाने वर जाणारा धूम कबुतराच्या कण्ठाप्रमाणे श्यामवर्णाचा दिसून येत आहे. ॥ ६ ॥
अल्पवर्णा हि तरवो घनीभूताः समन्ततः ।
विप्रकृष्टेन्द्रिये देशे न प्रकाशन्ति वै दिशः ॥ ७ ॥
’दूरच्या देशात चारी बाजूला वृक्ष दिसून येत आहेत, ते थोड्या पानांचे असून अंधःकाराने व्याप्त होऊन घनीभूत झाले आहेत, म्हणून दिशांचे भान होत नाही आहे. ॥ ७ ॥
रजनीचरसत्त्वानि प्रचरन्ति समन्ततः ।
तपोवनमृगा ह्येते वेदितीर्थेषु शेरते ॥ ८ ॥
’रात्री विचरण करणारे प्राणी (घुबड आदि) सर्वत्र विचरण करीत आहेत. तसेच हे तपोवनातील मृग पुण्यक्षेत्रस्वरूप आश्रमाच्या वेदी आणि विभिन्न प्रदेशात झोपत आहेत. ॥ ८ ॥
सम्प्रवृत्ता निशा सीते नक्षत्रसमलङ्‌कृता ।
जोत्स्नाप्रावरणश्चन्द्रो दृश्यतेऽभ्युदितोऽम्बरे ॥ ९ ॥
’सीते ! आत रात्र झालेली आहे. ती नक्षत्रांनी सजलेली आहे. आकाशात चंद्रदेव चांदण्यांची चादर पांघरून उदित झालेला दिसून येत आहे. ॥ ९ ॥
गम्यतामनुजानामि रामस्यानुचरी भव ।
कथयन्त्या हि मधुरं त्वयाहमपि तोषिता ॥ १० ॥
’म्हणून आता जा. मी तुला जाण्याची आज्ञा देत आहे. जाऊन श्रीरामचंद्रांच्या सेवेस लाग. तू आपल्या गोड गोड बोलण्याने मलाही संतुष्ट केले आहेस. ॥ १० ॥
अलङ्‌कुरु च तावत् त्वं प्रत्यक्षं मम मैथिलि ।
प्रीतिं जनय मे वत्से दिव्यालङ्‌कारशोभिनी ॥ ११ ॥
’मुली ! मैथिली ! प्रथम माझ्या डोळ्यांसमोर आपल्या स्वतःला अलंकृत कर. ही दिव्य वस्त्रे आणि आभूषणे धारण करून यांनी सुशोभित होऊन मला प्रसन्न कर." ॥ ११ ॥
सा तदा समलंकृत्य सीता सुरसुतोपमा ।
प्रणम्य शिरसा पादौ रामं त्वभिमुखी ययौ ॥ १२ ॥
हे ऐकून देवकन्येप्रमाणे सुंदर सीतेने त्या समयी त्या वस्त्राभूषणांनी आपला शृंगार केला आणि अनसूयेच्या चरणी मस्तक नमवून प्रणाम करून नंतर ती श्रीरामांसमोर गेली. ॥ १२ ॥
तथा तु भूषितां सीतां ददर्श वदतां वरः ।
राघवः प्रीतिदानेन तपस्विन्या जहर्ष च ॥ १३ ॥
श्रीरामांनी त्यावेळी याप्रकारे सीतेला वस्त्रे आणि आभूषणांनी विभूषित झालेली पाहिले, तेव्हां तपस्विनी अनसूयेच्या त्या प्रेमोपहार दर्शनाने वक्त्यांमध्ये श्रेष्ठ राघवांना फार प्रसन्नता वाटली. ॥ १३ ॥
न्यवेदयत् ततः सर्वं सीता रामाय मैथिली ।
प्रीतिदानं तपस्विन्या वसनाभरणस्रजाम् ॥ १४ ॥
’त्या समयी मैथिली सीतेने तपस्विनी अनसूयेकडून ज्याप्रकारे वस्त्रे, आभूषणे आणि हार आदिंचा प्रेमोपहार प्राप्त झाला होता ते सर्व श्रीरामचंद्रांना कथन केले. ॥ १४ ॥
प्रहृष्टस्त्वभवद् रामो लक्ष्मणश्च महारथः ।
मैथिल्याः सत्क्रियां दृष्ट्‍वा मानुषेषु सुदुर्लभाम् ॥ १५ ॥
भगवान् श्रीराम आणि महारथी लक्ष्मण सीतेचा तो सत्कार, जो मनुष्यांसाठी सर्वथा दुर्लभ आहे, पाहून फार प्रसन्न झाले. ॥ १५ ॥
ततस्तां शर्वरीं प्रीतः पुण्यां शशिनिभाननाम् ।
अर्चितस्तापसैः सर्वैः उवास रघुनन्दनः ॥ १६ ॥
तदनंतर समस्त तपस्वी जनांकडून सन्मानित झालेल्या रघुनंदन श्रीरामांनी अनसूयेने दिलेल्या पवित्र अलंकारांनी अलंकृत झालेली चंद्रमुखी सीतेला पाहून मोठ्या प्रसन्नतेने तेथे रात्री निवास केला. ॥ १६ ॥
तस्यां रात्र्यां व्यतीतायामभिषिच्य हुताग्निकान् ।
आपृच्छेतां नरव्याघ्रौ तापसान् वनगोचरान् ॥ १७ ॥
ती रात्र सरल्यावर जेव्हां सर्व वनवासी तपस्वी मुनि स्नान करून अग्निहोत्र करून चुकले, तेव्हां पुरुषसिंह श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्यांच्याकडे जाण्यासाठी आज्ञा मागितली. ॥ १७ ॥
तावूचुस्ते वनचरास्तापसा धर्मचारिणः ।
वनस्य तस्य सञ्चारं राक्षसैः समभिप्लुतम् ॥ १८ ॥

रक्षांसि पुरुषादानि नानारूपाणि राघव ।
वसन्त्यस्मिन् महारण्ये व्यालाश्च रुधिराशनाः ॥ १९ ॥
तेव्हां ते धर्मपरायण वनवासी तपस्वी त्या दोघा भावांना या प्रकारे म्हणाले - "रघुनंदन ! या वनाचा मार्ग राक्षसांच्या द्वारा आक्रांत आहे. येथे त्यांचा उपद्रव होतच असतो. या विशाल वनात नानारूपधारी नरभक्षी राक्षस तसेच रक्तभोजी हिंस्र पशु निवास करीत आहेत. ॥ १८-१९ ॥
उच्छिष्टं वा प्रमत्तं वा तापसं ब्रह्मचारिणम् ।
अदन्त्यस्मिन् महारण्ये तान् निवारय राघव ॥ २० ॥
’राघवेंद्र ! या महान वनात जो तपस्वी आणि ब्रह्मचारी अपवित्र अथवा असावधान अवस्थेमध्ये मिळतो, त्याला ते राक्षस आणि हिंस्र जंतु खाऊन टाकतात. म्हणून आपण त्यांना अडवावे. येथून मारून पळवून लावावे. ॥ २० ॥
एष पन्था महर्षीणां फलान्याहरतां वने ।
अनेन तु वनं दुर्गं गन्तुं राघव ते क्षमम् ॥ २१ ॥
’राघवा ! हा तोच मार्ग आहे ज्यावरून महर्षि लोक फळेमुळे आणणासाठी वनात जातात. आपल्यालाही याच मार्गाने या दुर्गम वनांत प्रवेश केला पाहिजे." ॥ २१ ॥
इतीरितः प्राञ्जलिभिस्तपस्विभि-
     र्द्विजैः कृतः स्वस्त्ययनः परंतपः ।
वनं सभार्यः प्रविवेश राघवः
     सलक्ष्मणः सूर्यमिवाभ्रमण्डलम् ॥ २२ ॥
तपस्वी ब्राह्मणणांनी हात जोडून जेव्हामशा गोष्टी सांगितल्या, आणि त्यांच्या मंगल यात्रेसाठी स्वस्तिवाचन केले, तेव्हां शत्रूंना संताप देणार्‍या भगवान् श्रीरामांनी आपली पत्‍नी आणि भाऊ लक्ष्मण यांच्या सह त्या वनात अशा प्रकारे प्रवेश केला, जणु काय सूर्यदेव मेघांच्या समूहात घुसून जावे. ॥ २२ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे श्रीमद्वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकोनविंशत्यधिकशततमः सर्गः ॥ ११९ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे एकोविणसावा सर्ग पूरा झाला ॥ ११९ ॥
॥ इति अयोध्याकाण्डः समाप्तः ॥
॥ अयोध्याकाण्ड समाप्त ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP