श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ द्विनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामाश्वमेधे दानमानयोरुत्कर्षः -
श्रीरामांच्या अश्वमेध यज्ञात दान-मानाची विशेषता -
तत्सर्वमखिलेनाशु प्रस्थाप्य भरताग्रजः ।
हयं लक्षणसम्पन्नं कृष्णसारं मुमोच ह ॥ १ ॥
याप्रकारे सर्व सामग्री पूर्णरूपाने धाडून भरताचे मोठे भाऊ श्रीरामांनी उत्तम लक्षणांनी संपन्न तसेच कृष्णसार मृगाप्रमाणे काळ्या रंगाचा एक घोडा सोडला. ॥१॥
ऋत्विग्भिर्लक्ष्मणं सार्धं अश्वे च व्नियुज्य च ।
ततोऽभ्यगच्छत् कात्काकुत्स्थः सह सैन्येन नैमिषम् ॥ २ ॥
ऋत्विजांसहित लक्ष्मणांना त्या अश्वाचा रक्षणासाठी नियुक्त करून काकुत्स्थ सैन्यासहित नैमिषारण्यास गेले. ॥२॥
यज्ञवाटं महाबाहुः दृष्ट्‍वा परममद्‌भुतम् ।
प्रबर्षमतुलं लेभे श्रीमानिति च सोऽब्रवीत् ॥ ३ ॥
तेथे बनविलेल्या अत्यंत अद्‍भुत यज्ञमण्डपास पाहून महाबाहु रामांना अनुपम प्रसन्नता प्राप्त झाली आणि ते म्हणाले -फारच सुंदर आहे. ॥२॥
नैमिषे वसतस्तस्य सर्व एव नराधिपाः ।
आनिन्युरुपहारांश्च तान्रामः प्रत्यपूजयत् ॥ ४ ॥
नैमिषारण्यात निवास करते समयी श्रीरामचंद्राजवळ भूमण्डलावरील सर्व नरेश तर्‍हेतर्‍हेचे उपहार घेऊन आले आणि श्रीरामांनी त्या सर्वांचे स्वागत सत्कार केले. ॥४॥
अन्नपानादि वस्त्राणि सर्वोपकरणानि च ।
भरतः सहशत्रुघ्नो नियुक्तो राजपूजने ॥ ५ ॥
त्यांना अन्न, पान वस्त्रे तसेच अन्य सर्व आवश्यक सामान दिले गेले. शत्रुघ्नासहित भरत त्या राजांच्या स्वागत-सत्कारात नियुक्त केले गेले होते. ॥५॥
वानराश्च महात्मानः सुग्रीवसहितास्तदा ।
परिवेषणं च विप्राणां प्रयताः संप्रचक्रिरे ॥ ६ ॥
सुग्रीवांसहित महामनस्वी वानर परम पवित्र तसेच संयतचित्त होऊन त्या समयी तेथे ब्राह्मणांना भोजन वाढत होते. ॥६॥
बिभीषणश्च रक्षोभिः बहुभिः सुसम्हाहितः ।
ऋषीणां उग्रतपसां किंकर समपद्यत ॥ ७ ॥
बर्‍याचशा राक्षसांनी घेरलेले विभीषण अत्यंत सावधान राहून उग्र तपस्वी ऋषिंच्या सेवाकार्यात संलग्न होते. ॥७॥
उपकार्या महार्हाश्च पार्थिवानां महात्मनाम् ।
सानुगानां नरश्रेष्ठो व्यादिदेश महाबलः ॥ ८ ॥
महाबली नरश्रेष्ठ श्रीरामांनी सेवकांसहित महामनस्वी भूपालांना राहाण्यासाठी बहुमूल्य निवासस्थाने (राहुट्‍या) दिली. ॥८॥
एवं सुविहितो यज्ञो अश्वमेधो ह्यवर्तत ।
लक्ष्मणेन सुगुप्ता सा हयचर्या प्रवर्तत ॥ ९ ॥
याप्रकारे अत्यंत सुंदर प्रकारे अश्वमेध यज्ञाचे कार्य प्रारंभ झाले आणि लक्ष्मणांच्या संरक्षणात राहून घोड्‍याने भूमण्डलात भ्रमण करण्याचे कार्यही चांगल्या रीतीने संपन्न झाले. ॥९॥
ईदृशं राजसिंहस्य यज्ञप्रवरमुत्तमम् ।
नान्यः शब्दोऽभवत्तत्र हयमेधे महात्मनः ॥ १० ॥

छन्दतो देहि देहीति यावत् तुष्यन्ति याचकाः ।
तावत् सर्वाणि दत्तानि क्रतुमुख्ये महात्मनः ॥ ११ ॥

विविधानि च गौडानि खाण्डवानि तथैव च ।
राजांमध्ये सिंहासमान पराक्रमी महात्मा श्रीरघुनाथांचा तो श्रेष्ठ यज्ञ याप्रकारे उत्तम विधिने होऊ लागला. या अश्वमेध यज्ञात केवळ एकाच गोष्टीची चर्चा सर्वत्र ऐकू येत होती - जो पर्यंत याचक संतुष्ट होत नाहीत तो पर्यंत त्यांच्या इच्छेनुसार सर्व वस्तु देत जा (दिल्या जाव्या) याशिवाय दुसरी गोष्टच ऐकू येत नव्हती. याप्रकारे महात्मा श्रीरामांच्या श्रेष्ठ यज्ञात नाना प्रकारचे गुळाचे बनविलेले खाद्य पदार्थ आणि खाण्डव आदि जोपर्यंत मिळणारे पूर्णतः संतुष्ट होऊन पुरे ! बस असे म्हणत तोपर्यंत निरंतर दिले जात होते. ॥१०-११ १/२॥
न निस्सृतं भतत्योष्ठाद् वचनं यावदर्थिनाम् ॥ १२ ॥

तावद् वानररक्षोभिः दत्तमेवाभ्यदृश्यत ।
जोपर्यंत याचकांच्या मनातील गोष्ट ओठातून बाहेर निघत नव्हती तो पर्यंतच राक्षस आणि वानर त्यांना त्यांच्या अभीष्ट वस्तु देतच राहिले होते. ही गोष्ट सर्वांनी पाहिली. ॥१२ १/२॥
न कश्चिन्मलिनो वापि दीनो वाऽप्यथवा कृशः ॥ १३ ॥

तस्मिन् यज्ञवरे राज्ञो हृष्टपुष्टजनावृते ।
राजा रामाच्या त्या श्रेष्ठ यज्ञात ह्रष्ट-पुष्ट माणसे भरलेली होती. तेथे कोणी ही मलिन, दीन अथवा दुर्बळ दिसून येत नव्हता. ॥१३ १/२॥
ये च तत्र महात्मानो मुनयश्चिरजीविनः ॥ १४ ॥

नास्मरंस्तादृशं यज्ञं दानौघसमलंकृतम् ।
त्या यज्ञात जे चिरजीवी महात्मा मुनि आलेले होते, त्यांना अशा कुठल्याही यज्ञाचे स्मरण नव्हते ज्यात दानाची गर्दी उसळलेली असेल. तो यज्ञ दानराशीने पूर्णतः अलंकृत दिसून येत होता. ॥१४ १/२॥
यः कृत्यवान् सुवर्णेन सुवर्णं लभते स्म सः ॥ १५ ॥

वित्तार्थी लभते वित्तं रत्‍नाृर्थी रत्‍न>मेव च ।
ज्याला सुवर्णाची आवश्यकता होती, त्याला सुवर्ण मिळत होते; धनाची इच्छा करणारांना धन मिळत होते आणि रत्‍नांची इच्छा असणारांना रत्‍ने मिळत होती. ॥१५ १/२॥
हिरण्यानां सुवर्णानां रत्‍नाैनामथ वाससाम् ॥ १६ ॥

अनिशं दीयमानानां राशिः समुपदृश्यते ।
तेथे निरंतर दिल्या जाणार्‍या चांदी, सोने, रत्‍न आणि वस्त्रांचे ढीग लागलेले दिसून येत होते. ॥१६ १/२॥
न शक्रस्य न सोमस्य यमस्य वरुणस्य वा ॥ १७ ॥

ईदृशो दृष्टपूर्वो न एवमूचुस्तपोधनाः ।
तेथे आलेले तपस्वी मुनि म्हणत होते की असा यज्ञ पूर्वीही कधी इंद्र, चंद्र, यम आणि वरुणाच्या येथेही पाहिला गेलेला नाही. ॥१७ १/२॥
सर्वत्र वानरास्तस्थुः सर्वत्रैव च राक्षसाः ॥ १८ ॥

वासोधनान् अकामेभ्यः पूर्णहस्ता ददुर्भृशम् ।
समस्त वानर सर्वत्र हातात दानाची सामग्री घेऊन उभे राहात होते आणि वस्त्रे, धन तसेच अन्नाची इच्छा बाळगणार्‍या याचकांना अधिकात अधिक देत होते. ॥१८ १/२॥
ईदृशो राजसिंहस्य यज्ञः सर्वगुणान्वितः ।
संवत्सरमथो साग्रं वर्तते न च हीयते ॥ १९ ॥
राजसिंह भगवान्‌ श्रीरामांचा असा सर्वगुण संपन्न यज्ञ एक वर्षाहून अधिक वेळपर्यंत चालू राहिला होता. त्यात केव्हांही कोठेही कुठल्याही गोष्टीची कमतरता झाली नाही. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे द्विनवतितमः सर्गः ॥ ९२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा ब्याण्णनवावा सर्ग पूरा झाला. ॥९२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP