[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। । एकोनपञ्चाशः सर्गः । ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
ग्रामाण्यां वार्तां शृण्वतः श्रीरामस्य कोसलसीमानमतिक्रम्य गमनं वेदश्रुतिगोमतीस्यन्दिकाख्याः सरितः समुत्तीर्य्य तस्य सुमन्त्रं प्रति किंचिन्निवेदनम् - ग्रामवासी लोकांचे बोलणे ऐकत श्रीरामांचे कोसलजनपद ओलांडून पुढे जावे, आणि वेदश्रुति, गोमती एवं स्यान्दिका नद्यांना पार करून सुमंत्रांस काही सांगणे -
रामोऽपि रात्रिशेषेण तेनैव महदन्तरम् ।
जगाम पुरुषव्याघ्रः पितुराज्ञामनुस्मरन् ॥ १ ॥
तिकडे पुरूषसिंह श्रीराम ही पित्याच्या आज्ञेचे वारंवार स्मरण करीत असता त्या शेष रात्रीमध्ये खूप दूर निघून गेले. ॥१॥
तथैव गच्छतस्तस्य व्यपायाद् रजनी शिवा ।
उपास्य स शिवां संध्यां विषयानत्यगाहत ॥ २ ॥
या प्रकारे जाता जाता त्यांची ती कल्याणमय रात्रही व्यतीत झाली. सकाळ होताच मङ्‌‍गलमय संध्योपासना करून ते विभिन्न जनपदांना ओलांडून पुढे निघाले. ॥२॥
ग्रामान् विकृष्टसीमान्तान् पुष्पितानि वनानि च ।
पश्यन्नतिययौ शीघ्रं शनैरिव हयोत्तमैः ॥ ३ ॥
ज्यांच्या सीमांच्या जवळची भूमी नांगरली गेली होती त्या ग्रामांना आणि फुलांनी सुशोभित वनांना पहात ते त्या उत्तम घोड्यांच्या द्वारा शीघ्रतापूर्वक पुढे जात राहिले होते तथापि सुंदर दृश्ये पहाण्यात तन्मय झाल्यामुळे त्यांना त्या रथाची गति मंद असल्यासारखी वाटत होती. ॥३॥
श्रुण्वन् वाचो मनुष्याणां ग्रामसंवासवासिनाम् ।
राजानं धिग् दशरथं कामस्य वशमास्थितम् ॥ ४ ॥
मार्गात जी लहान मोठी गावे लागत होती, त्यात निवास करणार्‍या माणसांच्या निम्नां‍कित गोष्टी त्यांच्या कानावर पडत होत्या. 'अहो! कामाला वश झालेल्या राजा दशरथांचा धिक्कार आहे! ॥४॥
हा नृशंसाद्य कैकेयी पापा पापानुबन्धिनी ।
तीक्ष्णा सम्भिन्नमर्यादा तीक्ष्णकर्मणि वर्तते ॥ ५ ॥
'हाय ! हाय ! पापशीला, पापासक्त, क्रूर तसेच धर्ममर्यादेचा त्याग करणार्‍या कैकेयीला तर दयेने स्पर्शही केलेला नाही. ती क्रूर आता निष्ठूर कर्मातच तत्पर झाली आहे. ॥५॥
या पुत्रमीदृशं राज्ञः प्रवासयति धार्मिकम् ।
वनवासे महाप्राज्ञं सानुक्रोशं जितेन्द्रियम् ॥ ६ ॥
'जिने महाराजांप्रमाणे धर्मात्मा, महाज्ञानी, दयाळू आणि जितेन्द्रिय पुत्रास वनवासासाठी घरांतून बाहेर काढले आहे. ॥६॥
कथं नाम महाभागा सीता जनकनन्दिनी ।
सदा सुखेष्वभिरता दुःखान्यनुभविष्यति ॥ ७ ॥
'जनकनंदिनी महाभाग्यवान सीता जी सदा सुखांतच नांदत होती, आता वनवासाचे दुःख कसे भोगू शकेल ? ॥७॥
अहो दशरथो राजा निःस्नेहः स्वसुतं प्रति ।
प्रजानामनघं रामं परित्यक्तुमिहेच्छति ॥ ८ ॥
'अहो ! काय महाराज दशरथ आपल्या पुत्रा प्रति इतके स्नेहहीन झाले आहेत की प्रजेच्या प्रति कुठलाही अपराध न करणार्‍या रामांचा येथे परित्याग करू इच्छित आहेत ?' ॥८॥
एता वाचो मुनष्याणां ग्रामसंवासवासिनाम् ।
शृण्वन्नतिययौ वीरः कोसलान् कोसलेश्वरः ॥ ९ ॥
लहान मोठ्या गावात रहाण्यार्‍या माणसांच्या या गोष्टी ऐकत वीर कोसलपति श्रीराम कोसल जनपदाची सीमा ओलांडून पुढे निघून गेले. ॥९॥
ततो वेदश्रुतिं नाम शिववारिवहां नदीम् ।
उत्तीर्याभिमुखः प्रायादगस्त्याध्युषितां दिशम् ॥ १० ॥
त्यानंतर शीतल आणि सुखद जल वाहणारी वेदश्रुति नामक नदी पार करून श्रीराम अगस्त्य सेवित दक्षिण दिशेकडे जाऊ लागले. ॥१०॥
गत्वा तु सुचिरं कालं ततः शीतवहां नदीम् ।
गोमतीं गोयुतानूपामतरत् सागरङ्‌‍गमाम् ॥ ११ ॥
दीर्घकाळपर्यत प्रवास करून त्यांनी समुद्रगामिनी गोमती नदीला पार केले, जी शीतल जलांचे स्त्रोत वाहवत होती. तिच्या जवळील कुरणांत खूपच गाई विचरत होत्या. ॥११॥
गोमतीं चाप्यतिक्रम्य राघवः शीघ्रगैर्हयैः ।
मयूरहंसाभिरुतां ततार स्यन्दिकां नदीम् ॥ १२ ॥
शीघ्रगामी घोड्यांच्या द्वारा गोमती नदी ओलांडून राघवांनी भोर आणि हंसांच्या कलरवांनी व्याप्त स्यंदिक नामक नदीही पार केली. ॥१२॥
स महीं मनुना राज्ञा दत्तामिक्ष्वाकवे पुरा ।
स्फीतां राष्ट्रावृतां रामो वैदेहीमन्वदर्शयत् ॥ १३ ॥
तेथे जाऊन रामांनी धन-धान्याने संपन्न आणि अनेक अवांतर जनपदाने घेरलेल्या भूमीचे दर्शन सीतेला करविले, जी पूर्वकाळी राजा मनुंनी इक्ष्वाकुला दिली होती. ॥१३॥
सूत इत्येव चाभाष्य सारथिं तमभीक्ष्णशः ।
हंसमत्तस्वरः श्रीमानुवाच पुरुषर्षभः ॥ १४ ॥
नंतर श्रीमान पुरुषोत्तम श्रीरामांनी 'सूत' असे म्हणून सारथ्याला वारंवार संबोधित केले आणि मदमस्त हंसासमान मधुर स्वराने ते याप्रमाणे बोलले- ॥१४॥
कदाहं पुनरागम्य सरय्वाः पुष्पिते वने ।
मृगयां पर्यटिष्यामि मात्रा पित्रा च सङ्‌‍गतः ॥ १५ ॥
'सूत ! मी केव्हा परत येऊन मातापित्यांना भेटेन आणि शरयूच्या पाश्ववर्ती पुष्पित वनामध्ये मृगयेसाठी भ्रमण करीन ? ॥१५॥
नात्यर्थमभिकाङ्‌‍क्षामि मृगयां सरयूवने ।
रतिर्ह्येषातुला लोके राजर्षिगणसम्मता ॥ १६ ॥
'या लोकात वनात जाऊन शिकार खेळणे राजर्षिंच्या क्रीडेसाठी प्रचलित झाले होते. म्हणून मनुपुत्रांच्या द्वारा त्या समयी केली गेलेली ही क्रीडा अन्य धनुर्धरांनाही अभीष्ट झाली. ॥१६॥
राजर्षीणां हि लोकेऽस्मिन् रत्यर्थं मृगया वने ।
काले कृतां तां मनुजैर्धन्विनामभिकाङ्‌क्षिताम् ॥ १७ ॥
'मी शरयूच्या वनात शिकार खेळण्याची, फार अधिक अभिलाषा बाळगत नाही. ही लोकांमध्ये एक प्रकारची अनुपम क्रीडा आहे जी राजर्षिंच्या समुदायास अभिमत आहे. ॥१७॥
स तमध्वानमैक्ष्वाकः सूतं मधुरया गिरा ।
तं तमर्थमभिप्रेत्य ययौ वाक्यमुदीरयन् ॥ १८ ॥
इक्ष्वाकुनंदन श्रीराम विभिन्न विषयांना घेऊन सूतांशी मधुर वाणीने उपयुक्त गोष्टी बोलत त्या मार्गावर पुढे निघून गेले. ॥१८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे एकोनपञ्चाशः सर्गः ॥ ४९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकूणपन्नासावा सर्ग पूरा झाला. ॥४९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP