|
| संपातेर्वानराणां भयं तेषां मुखाजत् जटायुषो वधं निशम्य संपातेर्दुःखं, स्वमधोऽवरोपयितुं तस्य वानरान् प्रत्यनुनयः - | संपातिपासून वानरांना भय. त्यांच्या मुखाने जटायुच्या वधाची गोष्ट ऐकून संपातिचे दुःखी होणे आणि आपल्याला खाली उतरविण्यासाठी वानरांना अनुरोध करणे - | 
| उपविष्टास्तु ते सर्वे यस्मिन् प्रायं गिरिस्थले । हरयो गृध्रराजश्च तं देशमुपचक्रमे ॥ १ ॥
 
 संपातिर्नाम नाम्ना तु चिरञ्चीवी विहङ्गेमः ।
 भ्राता जटायुषः श्रीमान् प्रख्यातबलपौरुषः ॥ २ ॥
 
 | पर्वताच्या ज्या स्थानावर ते सर्व वानर आमरण उपवासासाठी बसले होते, त्या प्रदेशात चिरंजीवी पक्षी श्रीमान् गृध्रराज संपाति आले. ते जटायुचे बंधु होते आणि आपले बल तसेच पुरुषार्थासाठी सर्वत्र प्रसिद्ध होते. ॥१-२॥ | 
| कंदरादभिनिष्क्रम्य स विंध्यस्य महागिरेः । उपविष्टान् हरीन् दृष्ट्वा हृष्टात्मा गिरमब्रवीत् ॥ ३ ॥
 
 | महागिरि विंध्याच्या कंदरेतून बाहेर येऊन संपातिंनी जेव्हा तेथे बसलेल्या वानरांना पाहिले तेव्हा त्यांचे हृदय हर्षाने फुलून गेले आणि ते या प्रकारे म्हणाले- ॥३॥ | 
| विधिः किल नरं लोके विधानेनानुवर्तते । यथायं विहितो भक्ष्यः चिरान्मह्यामुपागतः ॥ ४ ॥
 
 परं पराणां भक्षिष्ये वानराणां मृतं मृतम् ।
 उवाचेदं वचः पक्षी तान् निरीक्ष्य प्लवंगमान् ॥ ५ ॥
 
 | ’ज्याप्रमाणे लोकांमध्ये पूर्वजन्माच्या कर्मानुसार मनुष्याला त्याच्या क्रियेचे फळ स्वतः प्राप्त होते; त्या प्रकारे आज दीर्घ काळानंतर हे भोजन आपसुकच माझ्यासाठी प्राप्त झाले आहे. निश्चितच हे माझ्या कुठल्या तरी कर्माचे फळ आहे. या वानरांमध्ये जो जो मरत जाईल त्याला मी क्रमशः भक्षण करीत जाईन’ असे त्या पक्ष्याने त्या सर्व वानरांना पाहून म्हटले. ॥४-५॥ | 
| तस्य तद्वचनं श्रुत्वा भक्ष्यलुब्धस्य पक्षिणः । अङ्गेदः परमायस्तो हमुमंतमथाब्रवीत् ॥ ६ ॥
 
 | भोजनावर लुब्ध झालेल्या त्या पक्ष्याचे हे वचन ऐकून अंगदांला फार दुःख झाले. ते हनुमानास म्हणाले- ॥६॥ | 
| पश्य सीतापदेशेन साक्षाद्वैवस्वतो यमः । इमं देशमनुप्राप्तो वानराणां विपत्तये ॥ ७ ॥
 
 | ’पहा, सीतेच्या निमित्त्याने वानरांना संकटात घालण्यासाठी साक्षात् सूर्यपुत्र यम या देशामध्ये येऊन पोहोचले आहेत. ॥७॥ | 
| रामस्य न कृतं कार्यं न कृतम् राजशासनात् । हरिणामियमज्ञाता विपत्तिः सहसाऽऽगता ॥ ८ ॥
 
 | ’आम्ही श्रीरामांचे कार्यही केले नाही आणि राजाच्या आज्ञेचे पालनही केले नाही. या मध्ये एकाएकी वानरांवर ही अज्ञात विपत्ति येऊन कोसळली आहे. ॥८॥ | 
| वैदेह्याः प्रियकामेन कृतं कर्म जटायुषा । गृध्रराजेन यत् तत्र श्रुतं वस्तदशेषतः ॥ ९ ॥
 
 | ’वैदेही सीतेचे प्रिय करण्याच्या इच्छेने गृध्रराज जटायुने जे साहसपूर्ण कार्य केले होते ते सर्व आपण ऐकलेच असेल. ॥९॥ | 
| तथा सर्वाणि भूतानि तिर्यग्योनिगतान्यपि । प्रियं कुर्वंति रामस्य त्यक्त्वा प्राणान् यथा वयम् ॥ १० ॥
 
 | ’समस्त प्राणी, ते पशु-पक्ष्यांच्या योनिमध्ये उत्पन्न झालेले का असेनात, आमच्या प्रमाणे प्राण देऊनही श्रीरामांचे प्रिय कार्य करतात. ॥१०॥ | 
| अन्योन्यमुपकुर्वंति स्नेहकारुण्ययंत्रिताः । तेन तस्योपकारार्थं त्यजतात्मानमात्मना ॥ ११ ॥
 
 | ’शिष्ट पुरुष स्नेह आणि करुणेला वश होऊन एक दुसर्यावर उपकार करतात, म्हणून आपणही श्रीरामांच्या उपकारासाठी स्वतःच आपल्या शरीराचा परित्याग करू या.’ ॥११॥ | 
| प्रियं कृतं हि रामस्य धर्मज्ञेन जटायुषा । राघवार्थे परिश्रांता वयं संत्यक्तजीविताः ॥ १२ ॥
 
 कांताराणि प्रपन्नाः स्म न च पश्याम मैथिलीम् ।
 
 | ’धर्मज्ञ जटायुनेच श्रीरामांचे प्रिय (कार्य) केले आहे. आपण राघवांसाठी आपल्या जीवनाचा मोह सोडून परिश्रम करीत या दुर्गम वनांत आलो, परंतु मैथिली सीतेचे दर्शन करू शकलो नाही. ॥१२ १/२॥ | 
| स सुखी गृध्रराजस्तु रावणेन हतो रणे । मुक्तश्च सुग्रीवभयाद् गतश्च परमां गतिम् ॥ १३ ॥
 
 | ’गृध्रराज जटायुच सुखी आहेत, जे युद्धात रावणाच्या हस्ते मारले जाऊन परमगतीला प्राप्त झाले. ते सुग्रीवाच्या भयापासून मुक्त आहेत. ॥१३॥ | 
| जटायुषो विनाशेन राज्ञो दशरथस्य च । हरणेन च वैदेह्याः संशयं हरयो गताः ॥ १४ ॥
 
 | ’राजा दशरथांचा मृत्यु, जटायुचा विनाश आणि वैदेही सीतेचे अपहरण - या घटनांच्यामुळे यावेळी वानरांचे जीवन संशयात पडले आहे. ॥१४॥ | 
| रामलक्ष्मणयोर्वासं अरण्ये सह सीतया । राघवस्य च बाणेन वालिनश्च तथा वधः ॥ १५ ॥
 
 रामकोपादशेषाणां राक्षसानां तथा वधः ।
 कैकेय्या वरदानेन इदं हि विकृतं कृतम् ॥ १६ ॥
 
 | ’श्रीराम आणि लक्ष्मणांना सीतेसह वनात निवास करावा लागला, राघवाच्या बाणाने वालीचा वध झाला आणि आता श्रीरामांच्या कोपाने समस्त राक्षसांचा संहार होईल- ह्या सर्व वाईट घटना कैकेयीला दिल्या गेलेल्या वरदाना मुळेच उत्पन्न झाल्या आहेत.’ ॥१५-१६॥ | 
| तदसुखमनुकीर्तितं वचो भुवि पतितांश्च निरीक्ष्य वानरान् ।
 भृशचिलतमतिर्महामतिः
 कृपणमुदाहृतवान् स गृध्रराजः ॥ १७ ॥
 
 | वानरांच्या द्वारा वारंवार सांगितल्या गेलेल्या या दुःखमय वचनांना ऐकून आणि त्या सर्वांना पृथ्वीवर पडलेले पाहून परम बुद्धिमान् संपातीचे हृदय अत्यंत क्षुब्ध झाले आणि ते दीनवाणीने बोलण्यास उद्यत झाले. ॥१७॥ | 
| तत्तु श्रुत्वा तदा वाक्यं अङ्ग।दस्य मुखोद्गलतम् । अब्रवीद्वचनं गृध्रः तीक्ष्णतुण्डो महास्वनः ॥ १८ ॥
 
 | अंगदाच्या मुखातून निघालेले ते वचन ऐकून तीक्ष्ण चोच असणार्या त्या गिधाडाने उच्च स्वरात या प्रकारे विचारले- ॥१८॥ | 
| कोयं गिरा घोषयति प्राणैः प्रियतमस्य मे । जटायुषो वधं भ्रातुः कंपयन्निव मे मनः ॥ १९ ॥
 
 | ’हा कोण आहे जो मला प्राणापेक्षाही प्रिय असणार्या जटायुच्या वधाची गोष्ट सांगत आहे. ही ऐकून माझे हृदय जणुकंपित होत आहे. ॥१९॥ | 
| कथमासीज्जनस्थाने युद्धं राक्षसगृध्रयोः । नामधेयमिदं भ्रातुः चिरस्याद्य मया श्रुतम् ॥ २० ॥
 
 | ’जनस्थानात राक्षसाचे गृध्राबरोबर कशाप्रकारे युद्ध झाले होते ? आपल्या भावाचे प्रिय नाव बर्याच दिवसांनंतर माझ्या कानावर पडले आहे. ॥२०॥ | 
| इच्छेयं गिरिदुर्गाच्च भवद्भिरवतारितुम् । यवीयसो गुणज्ञस्य श्लाघनीयस्य विक्रमैः ॥ २१ ॥
 
 अतिदीर्घस्य कालस्य परितुष्टोऽस्मि कीर्तनात् ।
 तदिच्छेयमहं श्रोतुं विनाशं वानरर्षभाः ॥ २२ ॥
 
 | ’जटायु माझ्याहून लहान, गुणज्ञ आणि पराक्रमाच्यामुळे अत्यंत प्रशंसनीय होता. दीर्घकाळानंतर आज त्याचे नाव ऐकून मला फार फार प्रसन्नता वाटली. माझी इच्छा आहे की पर्वताच्या या दुर्गम स्थानातून आपण मला खाली उतरवावे. श्रेष्ठ वानरांनो ! मला आपल्या भावाच्या विनाशाचा वृत्तान्त ऐकण्याची इच्छा आहे. ॥२१-२२॥ | 
| भ्रातुर्जटायुषस्तस्य जनस्थाननिवासिनः । तस्यैव च मम भ्रातुः सखा दशरथः कथम् ॥ २३ ॥
 
 यस्य रामः प्रियः पुत्रो ज्येष्ठो गुरुजनप्रियः ।
 
 | ’माझा बंधु जटायु तर जनस्थानात राहात होता. गुरूजनांचे प्रेमी ज्यांचे ज्येष्ठ आणि प्रिय पुत्र आहेत ते महाराज दशरथ माझ्या भावाचे मित्र कसे झाले ? ॥२३ १/२॥ | 
| सूर्यांशुदग्धपक्षत्वात् न शक्नोमि विसर्पितुम् । इच्छेयं पर्वतादस्मादवतर्तुमरिंदमाः ॥ २४ ॥
 
 | ’शत्रुदमन वीरांनो ! माझे पंख सूर्याच्या किरणांनी जळून गेले आहेत, म्हणून मी उडू शकत नाही, परंतु या पर्वतावरून खाली उतरण्याची इच्छा करत आहे.’ ॥२४॥ | 
| इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे षट्पञ्चाशः सर्गः ॥ ५६ ॥ 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा छपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५६॥ | 
|