श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ नवाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विभीषणस्य विलापः श्रीरामेण तस्य प्रबोधनपूर्वकं रावणान्त्येष्टिसंस्कारार्थं तं प्रत्यादेशदानम् -
विभीषणाचा विलाप आणि श्रीरामांनी त्यांना समजावून रावणाच्या अंत्येष्टि संस्कारासाठी आदेश देणे -
भ्रातरं निहतं दृष्ट्‍वा शयानं निर्जितं रणे ।
शोकवेगपरीतात्मा विललाप विभीषणः ।। १ ।।
पराजित झालेल्या भावाला रणभूमीमध्ये मरून पडलेला पाहून विभीषणांचे हृदय शोकावेगाने व्याकुळ होऊन ते विलाप करू लागले - ॥१॥
वीर विक्रान्त विख्यात प्रवीण नयकोविद ।
महार्हशयनोपेत किं शेषे निहतो भुवि ।। २ ।।
हा विख्यात पराक्रमी वीर बंधु दशानना ! हा कार्यकुशल नीतिज्ञा ! तू तर सदा बहुमूल्य अंथरूणावर झोपत होतास, आज याप्रकारे मारला जाऊन भूमिवर का पडला आहेस ? ॥२॥
विक्षिप्य दीर्घौ निश्चेष्टौ भुजावङ्‌गदभूषितौ ।
मुकुटेनापवृत्तेन भास्कराकारवर्चसा ।। ३ ।।
हे वीरा ! तुझ्या या बाजूबंदांनी विभूषित दोन्ही विशाल भुजा निश्चेष्ट होऊन गेल्या आहेत. तू त्यांना पसरून का पडून राहिला आहेस ? तुझ्या मस्तकावरील सूर्यासारखा तेजस्वी मुकुट येथे फेकला जाऊन पडला आहे. ॥३॥
तदिदं वीर सम्प्राप्तं यन्मया पूर्वंमीरितम् ।
काममोहपरीतस्य यत्ते न रुचितं वचः ।। ४ ।।
वीरवर ! आज तुमच्यावर ज्या संकटाविषयी मी तुम्हांला पूर्वीच सूचना दिली होती ते येऊन पडले आहे. परंतु त्या समयी काम आणि मोहाला वश झाल्याने तुम्हाला माझे सांगणे रुचले नाही. ॥४॥
यन्न दर्पात् प्रहस्तो वा नेन्द्रजिन्नापरे जनाः ।
न कुम्भकर्णोऽतिरथो नातिकायो नरान्तकः ।
न स्वयं बहु मन्येथाः तस्योदर्कोऽयमागतः ।। ५ ।।
अहंकारामुळे प्रहस्ताने, इंद्रजिताने, इतर लोकांनी, अतिरथी कुंभकर्णाने, अतिकायाने, नरांतकाने आणि स्वतः तुम्ही ही माझ्या सांगण्याला अधिक महत्व दिले नाहीत, त्याचेच फळ हे समोर आले आहे. ॥५॥
गतः सेतुः सुनीतानां गतो धर्मस्य विग्रहः ।
गतः सत्त्वस्य सङ्‌क्षेपः सुहस्तानां गतिर्गता ।। ६ ।।

आदित्यः पतितो भूमौ मग्नस्तमसि चन्द्रमाः ।
चित्रभानुः प्रशान्तार्चिः व्यवसायो निरुद्यमः ।
अस्मिन्निपतिते वीरे भूमौ शस्त्रभृतां वरे ।। ७ ।।
आज शस्त्रधारींमध्ये श्रेष्ठ हा वीर रावण धराशायी झाल्याने सुंदर नीतिस अनुसरून चालणार्‍या लोकांचा मर्यादा भंग झाला आहेत. धर्माचा मूर्तिमंत विग्रह निघून गेला आहे. सत्त्वा (बला) च्या संग्रहाचे स्थान नष्ट झाले आहे, सुंदर हात चालविणार्‍या वीरांचा आश्रय निघून गेला आहे, सूर्य पृथ्वीवर कोसळून पडला आहे, चंन्द्रमा अंधारात बुडून गेला आहे, प्रज्वलित आग विझून गेली आहे आणि सारा उत्साह निरर्थक ठरला आहे. ॥६-७॥
किं शेषमिह लोकस्य हतवीरस्य सम्प्रति ।
रणे राक्षसशार्दूले प्रसुप्त इव पांसुषु ।। ८ ।।
रणभूमीवरील धूळीत राक्षसशिरोमणी रावण झोपून गेल्याने या लोकाचा आधार आणि बळ समाप्त झाले आहे. आतां येथे काय शिल्लक राहिले आहे ? ॥८॥
धृतिप्रवालः प्रसहाग्र्यपुष्पः
तपोबलः शौर्यनिबद्धमूलः ।
रणे महान् राक्षसराजवृक्षः
सम्मर्दितो राघवमारुतेन ।। ९ ।।
हाय ! धैर्यच ज्याची पाने होती, हट्‍ट हेच सुंदर फूल होते, तपस्या हेच बळ आणि शौर्य हेच मूळ होते त्या राक्षसराज रावणरूपी महान्‌ वृक्षाला आज रणभूमीमध्ये राघवेंद्ररूपी प्रचण्ड वायुने तुडवून टाकले आहे. ॥९॥
तेजोविषाणः कुलवंशवंशः
कोपप्रसादापरगात्रहस्तः ।
इक्ष्वाकुसिंहावगृहीतदेहः
सुप्तः क्षितौ रावणगन्धहस्ती ।। १० ।।
तेज हेच ज्याचे दात होते, वंश पंरपरा हीच पृष्ठभाग होती, क्रोध हीच खालच्या बाजूचे (पाय आदि) अंग होते आणि प्रसाद हाच शुण्ड-दण्ड होता (सोण्ड होती) तो रावणरूपी गंधहत्ती आज इक्ष्वाकुवंशी श्रीरामरूपी सिंहाच्या द्वारे शरीर विदीर्ण केले गेल्याने कायमचा पृथ्वीवर झोपी गेला आहे. ॥१०॥
पराक्रमोत्साहविजृम्भितार्चिः
निश्वासधूमः स्वबलप्रतापः ।
प्रतापवान् संयति राक्षसाग्निः
निर्वापितो रामपयोधरेण ।। ११ ।।
पराक्रम आणि बळ याच ज्याच्या वाढत जाणार्‍या ज्वाळा होत्या. निश्वासच धूम होता आणि आपले बळ हाच प्रताप होता त्या राक्षस रावणरूपी प्रतापी अग्निला या समयी युद्धस्थळी श्रीरामरूपी मेघाने विझविले आहे. ॥११॥
सिंहर्क्षलाङ्‌गूलककुद्विषाणः
पराभिजिद्‌गन्धनगन्धहवाहः ।
रक्षोवृषश्चापलकर्णचक्षुः
क्षितीश्वरव्याघ्रहतोऽवसन्नः ।। १२ ।।
राक्षस सैनिक हेच ज्याचे पुच्छ, ककुद्‍ आणि शिंगे होती, जो शत्रूवर विजय मिळविणारा होता, तसेच पराक्रम आणि उत्साह आदि प्रकट करण्यात जो वायुसमान होता, चपलतारूपी डोळे तसेच कानांनी युक्त तो राक्षसराज रावणरूपी सांड (वळू) महाराज श्रीरामरूपी व्याघ्र द्वारा मारला जाऊन नष्ट झाला आहे. ॥१२॥
वदन्तं हेतुमद्‌वाक्यं परिमृष्टार्थनिश्चयम् ।
रामः शोकसमाविष्टं इत्युवाच विभीषणम् ।। १३ ।।
ज्याच्याकडून अर्थनिश्चय प्रकट होत होता, अशा युक्तिसंगत गोष्टी बोलणार्‍या शोकमग्न विभीषणाला त्या समयी भगवान्‌ श्रीराम म्हणाले - ॥१३॥
नायं विनष्टो निश्चेष्टः समरे चण्डविक्रमः ।
अत्युन्नतमहोत्साहः पतितोऽयमशङ्‌कितः ।। १४ ।।
विभीषणा ! हा रावण समरांगणात असमर्थ होऊन मारला गेलेला नाही, याने पराक्रम प्रकट केला आहे, याचा उत्साह खूप वाढलेला होता. याला मृत्युचे काहीही भय नव्हते. दैवाने हा रणभूमीमध्ये धराशायी झाला आहे. ॥१४॥
नैवं विनष्टाः शोच्यन्ते क्षत्रधर्मव्यवस्थिताः ।
वृद्धिमाशंसमाना ये निपतन्ति रणाजिरे ।। १५ ।।
जे लोक आपल्या अभ्युदयाच्या इच्छेने क्षत्रियधर्मात स्थित होऊन समरांगणात मारले जातात, या प्रकारे नष्ट होणार्‍या लोकांविषयी शोक करता कामा नये. ॥१५॥
येन सेन्द्रास्त्रयो लोकाः त्रासिता युधि धीमता ।
तस्मिन् कालसमायुक्ते न कालः परिशोचितुम् ।। १६ ।।
ज्या बुद्धिमान्‌ वीराने इंद्रासहित तीन्ही लोकांना युद्धामध्ये भयभीत करून ठेवले होते तोच जर या समयी काळाच्या अधीन झाला आहे तर त्याच्यासाठी शोक करण्याचा अवसर नाही आहे. ॥१६॥
नैकान्तविजयो युद्धे भूतपूर्वः कदाचन ।
परैर्वा हन्यते वीरः परान् वा हन्ति संयुगे ।। १७ ।।
युद्धात कुणाला सदा विजयच विजय मिळेल असे पूर्वीही कधी झालेले नाही. वीर पुरूष संग्रामात एक तर शत्रूंच्या द्वारा मारला जातो अथवा स्वतःच शत्रूंना मारून टाकतो. ॥१७॥
इयं हि पूर्वैः सन्दिष्टा गतिः क्षत्रियसम्मता ।
क्षत्रियो निहतः सङ्‌ख्ये न शोच्य इति निश्चय ।। १८ ।।
आज रावणाला जी गति प्राप्त झाली आहे ही पूर्वकाळच्या महापुरूषांच्या द्वारा सांगितली गेलेली उत्तम गति आहे. क्षात्र-वृत्तीचा आश्रय घेणार्‍या वीरांसाठी तर ही फार आदराची गोष्ट आहे. क्षत्रिय वृत्तीने राहाणार्‍या वीर पुरूष जर युद्धात मारला गेला असेल तर तो शोक करण्यायोग्य नाही, हाच शास्त्राचा सिद्धांत आहे. ॥१८॥
तदेवं निश्चयं दृष्ट्‍वा तत्त्वमास्थाय विज्वरः ।
यदिहानन्तरं कार्यं कल्प्यं तदनुचिन्तय ।। १९ ।।
शास्त्राच्या या निश्चयावर विचार करून सात्त्विक बुद्धिचा आश्रय घेऊन तू निश्चिंत होऊन जा आणि आता पुढे जे काही कार्य (प्रेत-संस्कार आदि) करावयाचे आहे त्या संबंधी विचार कर. ॥१९॥
तमुक्तवाक्यं विक्रान्तं राजपुत्रं विभीषणः ।
उवाच शोकसन्तप्तो भ्रातुर्हितमनन्तरम् ।। २० ।।
परम, पराक्रमी राजकुमार श्रीरामांनी असे सांगितल्यावर शोक संतप्त विभीषणाने त्यांना आपल्या भावासाठी हितकर अशी गोष्ट सांगितली. ॥२०॥
योऽयं विमर्देषु अविभग्नपूर्वः
सुरैः समस्तैरपि वासवेन ।
भवन्तमासाद्य रणे विभग्नो
वेलामिवासाद्य यथा समुद्रः ।। २१ ।।
भगवन्‌ ! पूर्वीच्या काळी युद्धांच्या प्रसंगी समस्त देवता तसेच इंद्रानेही ज्याला कधी मागे हटवले नव्हते तोच रावण आज रणभूमीमध्ये आपल्याशी टक्कर देऊन, समुद्र जसा आपल्या तटभूमीपर्यंत जाऊन शांत होतो, त्याप्रमाणे शांत झाला आहे. ॥२१॥
अनेन दत्तानि वनीपकेषु
भुक्ताश्च भोगा निभृताश्च भृत्याः ।
धनानि मित्रेषु समर्पितानि
वैराण्यमित्रेषु च यापितानि ।। २२ ।।
याने याचकांना दान दिले आहे, भोग भोगले आहेत आणि भृत्यांचे (सेवकांचे) पालन पोषण केले आहे. मित्रांना धन अर्पण केले आणि शत्रूशी वैराचा बदला घेतला आहे. ॥२२॥
एषोहिताग्निश्च महातपाश्च
वेदान्तगः कर्मसु चाग्र्यशूरः ।
एतस्य यत् प्रेतगतस्य कृत्यं
तत् कर्तुमिच्छामि तव प्रसादात् ।। २३ ।।
हा रावण अग्निहोत्री, महातपस्वी, वेदांतवेत्ता तसेच यज्ञ-यागादि कर्मांमध्ये श्रेष्ठ शूर - परम कर्मठ होता. आता हा प्रेतभावाला प्राप्त झाला आहे, म्हणून आता मी आपल्या कृपेने याचे प्रेत-कार्य करू इच्छितो. ॥२३॥
स तस्य वाक्यैः करुणैर्महात्मा
सम्बोधितः साधु विभीषणेन ।
आज्ञापयामास नरेन्द्रसूनुः
स्वर्गीयमाधानमदीनसत्त्वः ।। २४ ।।
विभीषणाच्या करूणाजनक वचनांच्या द्वारा उत्तम प्रकारे समजाविले गेल्यावर उदारचेता राजकुमार श्रीरामांनी त्यांना रावणासाठी स्वर्गादि उत्तम लोकांची प्राप्ति करविणारे अंत्येष्टि-कर्म करण्याची आज्ञा दिली. ॥२४॥
मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम् ।
क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव ।। २५ ।।
ते म्हणाले- विभीषणा ! वैर जीवनकालापर्यंतच राहाते. मरणानंतर त्या वैराचाही अंत होऊन जातो. आता आपले प्रयोजन सिद्ध होऊन चुकले आहे. म्हणून याचा आता संस्कार कर. या समयी हा जसा तुझ्या स्नेहाला पात्र आहे त्याचप्रमाणे माझा ही स्नेहभाजन आहे. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे नवाधिकशततमः सर्गः ।। १०९ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेनववा सर्ग पूरा झाला. ॥१०९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP