[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। द्व्यधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतेन भूयः श्रीरामं प्रति राज्यग्रहणायानुरोधं कृत्वा तस्मै पितृनिधनसमाचारस्य निवेदनम् -
भरतांनी पुन्हा श्रीरामांना राज्य ग्रहण करण्याचा अनुरोध करून त्यांना पित्याच्या मृत्यूचा समाचार सांगणे -
रामस्य वचनं श्रुत्वा भरतः प्रत्युवाच ह ।
किं मे धर्माद् विहीनस्य राजधर्मः करिष्यति ॥ १ ॥
श्रीरामांचे ते वचन ऐकून भरताने या प्रकारे उत्तर दिले - ’हे बंधो ! मी राज्याचा अधिकारी नसल्यामुळे त्या राजधर्माच्या अधिकाराच्या रहित आहे, म्हणून माझ्यासाठी हा राजधर्माचा उपदेश काय कामाचा ? ॥ १ ॥
शाश्वतोऽयं सदा धर्मः स्थितोऽस्मासु नरर्षभ ।
ज्येष्ठे पुत्रे स्थिते राजा न कनीयान् भवेन्नृपः ॥ २ ॥
’नरश्रेष्ठ ! आपल्या येथे सदाच ह्या शाश्वत धर्माचे पालन होत आले आहे की ज्येष्ठ पुत्र विद्यमान असताना धाकटा पुत्र राजा होऊ शकत नाही. ॥ २ ॥
स समृद्धां मया सार्धममयोध्यां गच्छ राघव ।
अभिषेचय चात्मानं कुलस्यास्य भवाय नः ॥ ३ ॥
राघव ! म्हणून आपण माझ्याबरोबर समृद्धिशालिनी अयोध्यापुरीला चला आणि आपल्या कुलाच्या अभ्युदयासाठी राजाच्या पदावर आपला अभिषेक करवून घ्या. ॥ ३ ॥
राजानं मानुषं प्राहुर्देवत्वे सम्मतो मम ।
यस्य धर्मार्थसहितं वृत्तमाहुरमानुषम् ॥ ४ ॥
जरी सर्व लोक राजाला मनुष्य म्हणतात तथापि माझ्या मते तो देवत्वावर प्रतिष्टित आहे; कारण की त्याचे धर्म आणि अर्थयुक्त आचरण करायला साधारण मनुष्यासाठी असंभवनीय म्हटले गेले आहे. ॥ ४ ॥
केकयस्थे च मयि तु त्वयि चारण्यमाश्रिते ।
धीमान् स्वर्गं गतो राजा यायजूकः सतां मतः ॥ ५ ॥
मी जेव्हां केकय देशात होतो तेव्हां आपण वनांत निघून आला होतात; तेव्हा अश्वमेध आदि यज्ञांचे कर्ते आणि सत्पुरुषांच्या द्वारा सन्मानित बुद्धिमान् महाराज दशरथ स्वर्गलोकास निघून गेले. ॥ ५ ॥
निष्क्रान्तमात्रे भवति सहसीते सलक्ष्मणे ।
दुःखशोकाभिभूतस्तु राजा त्रिदिवमभ्यगात् ॥ ६ ॥
’सीता आणि लक्ष्मणासह आपण राज्यातून निघून जाताच दुःखशोकाने पीडित झालेले महाराज स्वर्गलोकास निघून गेले. ॥ ६ ॥
उत्तिष्ठ पुरुषव्याघ्र क्रियतामुदकं पितुः ।
अहं चायं च शत्रुघ्नः पूर्वमेव कृतोदकौ ॥ ७ ॥
’पुरुषसिंह ! उठावे आणि पित्याला जलांजली दान करावी. मी आणि हा शत्रुघ्न - दोघेही पहिल्यानेच त्यांच्यासाठी जलांजली देऊन चुकलो आहोत. ॥ ७ ॥
प्रियेण किल दत्तं हि पितृलोकेषु राघव ।
अक्षयं भवतीत्याहुर्भवांश्चैव पितुः प्रियः ॥ ८ ॥
राघव ! असे म्हणतात की प्रियपुत्राने दिलेले जल आदि पितृलोकात अक्षय होत असते आणि आपण पित्याचे परम प्रिय पुत्र आहात. ॥ ८ ॥
त्वामेव शोचंस्तव दर्शनेप्सु-
     स्त्वय्येव सक्तामनिवर्त्य बुद्धिम् ।
त्वया विहीनस्तव शोकरुग्ण-
     स्त्वां संस्मरन्नेव गतः पिता ते ॥ ९ ॥
’आपले पिता आपला वियोग होताच शोकामुळे रुग्ण होऊन गेले आणि आपल्याच शोकात मग्न होऊन गेले, आपल्याला पाहण्याची इच्छा ठेवून, आपल्या ठिकाणीच लागलेल्या बुद्धीला आपल्यापासून न हटविता, आपलेच स्मरण करीत ते स्वर्गास निघून गेले. ॥ ९ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्व्यधिकशततमःसर्गः ॥ १०२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे दोनावा सर्ग पूरा झाला ॥ १०२ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP