श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ त्रयोविंश सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
ताराया विलापः - तारेचा विलाप -
ततः समुपजिघ्रंती कपिराजस्य तन्मुखम् ।
पतिं लोकाच्च्युतं तारा मृतं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
त्यावेळी वानरराजाचे मुख हुंगून लोकविख्यात तारेने रडून आपल्या मृत पतिला याप्रकारे म्हटले- ॥१॥
शेषे त्वं विषमे दुःखमकृत्वा वचनं मम ।
उपलोपचिते वीर सुदुःखे वसुधातले ॥ २ ॥
’वीरा ! दुःखाची गोष्ट आहे की आपण माझे म्हणणे मानले नाहीत आणि आता आपण प्रस्तरांनी पूर्ण, अत्यंत दुःखदायक आणि उंचसखल भूतलावर शयन करीत आहात. ॥२॥
मत्तः प्रियतरा नूनं वानरेंद्र मही तव ।
शेषे हि तां पिरिष्वज्य मां च न प्रतिभाषसे ॥ ३ ॥
’वानरराज ! निश्चितच ही पृथ्वी आपल्याला माझ्यापेक्षा अधिक प्रिय आहे म्हणून तर आपण तिचे आलिंगन करून झोपला आहात आणि माझ्याशी तर बोलत नाही. ॥३॥
सुग्रीवस्य वशं प्राप्तो विधिरेष भवत्यहो ।
सुग्रीव एव विक्रांतो वीर साहसिकप्रिय ॥ ४ ॥
’वीर ! साहसपूर्ण कार्याविषयी प्रेम असणारे वानरराज ! हा श्रीरामरूपी विधाता सुग्रीवास वश झालेला आहे, (- आपल्याला वश नाही) ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, म्हणून आता या राज्यावर सुग्रीवच पराक्रमी राजाच्या रुपात आसीन होईल. ॥४॥
ऋक्षवानरमुख्यास्त्वां बलिनः पर्युपासते ।
एषां विलपितं कृच्छ्रमङ्‌गदस्य च शेचतः ॥ ५ ॥

मम चेमां गिरं श्रुत्वा किं त्वं न प्रतिबुध्यसे ।
’प्राणनाथ ! प्रधान - प्रधान अस्वले आणि वानर, जे आपली महावीराची सेवा करीत राहात असत, या समयी फार दुःखाने विलाप करीत आहेत. मुलगा अंगदही शोकात पडला आहे. त्या वानरांचा दुःखमय विलाप, अंगदाचा शोकोद्गार तसेच माझी ही अनुनय- विनययुक्त वाणी ऐकून आपण जागॄत का होत नाही ? ॥५ १/२॥
इदं तद्वीरशयनं यत्र शेषे हतो युधि ॥ ६ ॥

शायिता निहता यत्र त्वयैव रिपवः पुरा ।
ही तीच वीर-शय्या आहे, ज्यावर पूर्वकालात आपणच बर्‍याचशा शत्रुंना मारून झोपविले होते; परंतु आज स्वतःच युद्धात मारले जाऊन आपण हिच्यावर शयन करीत आहात. ॥६ १/२॥
विशुद्धसत्त्वाभिजन प्रिययुद्ध मम प्रिय ॥ ७ ॥

मामनाथां विहायैकां गतस्त्वमसि मानद ।
’विशुद्ध बलशाली कुलात उत्पन्न युद्धप्रेमी तसेच दुसर्‍यांना मान देणार्‍या माझ्या प्रियतमा ! तुम्ही मला अनाथ एकटी सोडून कोठे निघून गेला आहात ? ॥७ १/२॥
शूराय न प्रदातव्या कन्या खलु विपश्चिता ॥ ८ ॥

शूरभार्यां हतां पश्य सद्यो मां विधवां कृताम् ।
निश्चितच बुद्धिमान् पुरुषांनी आपली कन्या कुणा शूरवीराच्या हातात देता कामा नाही. पहा ना, मी शूरवीराची पत्‍नी होण्यामुळे तात्काळ विधवा बनविली गेली आहे आणि याप्रकारे सर्वथा मारली गेली आहे. ॥८ १/२॥
अवभग्नश्च मे मानो भग्ना मे साश्वती गतिः ॥ ९ ॥

अगाधे च निमग्ना ऽस्मि विपुले शोकसागरे ।
’राजराणी होण्याचा जो माझा अभिमान होता तो भंग झाला आहे. नित्य निरंतर सुख मिळविण्याची माझी आशा नष्ट होऊन गेली आहे. तसेच मी अगाध आणि विशाल शोकसमुद्रात बुडून गेले आहे. ॥९ १/२॥
अश्मसारमयं नूनमिदं मे हृदयं दृढम् ॥ १० ॥

भर्तारं निहतं दृष्ट्‍वा यन्नाद्य शतधा गतम् ।
’निश्चितच हे माझे कठोर हृदय लोखंडाचे बनलेले आहे, म्हणून तर आपला स्वामी मारला गेलेला पाहूनही याचे शेकडो तुकडे होऊन जात नाहीत. ॥१० १/२॥
सुहृच्चै व हि भर्ता च प्रकृत्या मम च प्रियः ॥ ११ ॥

आहवे च पराक्रांतः शूरः पञ्चत्वमागतः ।
’हाय ! जे माझे सुहृद, स्वामी आणि स्वभावतःच प्रिय होतात, तसेच संग्रामात महान् पराक्रम प्रकट करणारे शूरवीर होतात, ते संसारातून निघून गेला आहात. ॥११ १/२॥
पतिहीना तु या नारी कामं भवतु पुत्रिणी ॥ १२ ॥

धनधान्यैः सुपूर्णा ऽपि विधवेत्युच्यते जनैः ।
’पतिहीन नारी भलेही पुत्रवती तसेच धनधान्याने समृद्ध असेल, तरी लोक तिला विधवाच म्हणतात. ॥१२ १/२॥
स्वगात्रप्रभवे वीर शेषे रुधिरमणऽडले ॥ १३ ॥

कृमिरागपरिस्तोमे त्वमात्मशयने यथा ।
’वीरा ! आपल्याच शरीरातून प्रकट झालेल्या रक्तराशित आपण ज्याप्रमाणे प्रथम इंद्रगोप नामक कीड्या प्रमाणे रंग असलेल्या बिछान्याने युक्त आपल्या पलंगावर झोपत होतात. ॥१३ १/२॥
रेणुशोणितसंवीतं गात्रं तव समंततः ॥ १४ ॥

परिरब्धुं न शक्नोमि भुजाभ्यां प्लवगर्षभ ।
’वानरश्रेष्ठ ! आपले सारे शरीर धूळ आणि रक्ताने माखलेले आहे, म्हणून मी आपल्या दोन्ही भुजांनी आपल्याला आलिंगन देऊ शकत नाही. ॥१४ १/२॥
कृतकृत्यो ऽद्य सुग्रीवो वैरे ऽस्मिन्नतिदारुणे ॥ १५ ॥

यस्य रामविमुक्तेन हृतमेकेषुणा भयम् ।
’या अत्यंत भयंकर वैरात आज सुग्रीव कृतकृत्य झाला आहे. रामांनी सोडलेल्या एकाच बाणाने त्याचे सर्व भय हरण केले आहे. ॥१५ १/२॥
शरेण हृदि लग्नेन गात्रसंस्पर्शने तव ॥ १६ ॥

वार्यामि त्वां निरीक्षंती त्वयि पञ्चत्वमागते ।
’आपल्या छातीत जो बाण घुसला आहे, तो मला आपल्या शरीराचे आलिंगन करण्यापासून रोखून धरीत आहे या कारणामुळे आपला मृत्यु झाला असूनही मी गुपचुप पहात राहिले आहे. (आपल्याला हृदयाशी धरू शकत नाही.)’ ॥१६ १/२॥
उद्बबर्ह शरं नीलस्तस्य गात्रगतं तदा ॥ १७ ॥

गिरिगह्वरसंलीनं दीप्तमाशीविषं यथा ।
त्यावेळी नीलाने वालीच्या शरीरात घुसलेला तो बाण बाहेर काढला; जणु पर्वताच्या गुहेत लपलेल्या प्रज्वलित मुखाच्या विषधर सर्पालाच तेथून बाहेर काढले गेले होते. ॥१७ १/२॥
तस्य निष्कृष्यमाणस्य बाणस्य च बभौ द्युतिः ॥ १८ ॥

अस्तमस्तकसंरुद्धो रश्मिर्दिनकरादिव ।
वालीच्या शरीरांतून काढल्या गेलेल्या त्या बाणाची कांति अस्तचलाच्या शिखरावर अवरूद्ध किरणांनी युक्त सूर्याच्या प्रभेप्रमाणे भासत होती. ॥१८ १/२॥
पेतुः क्षतजधारास्तु व्रणेभ्यस्तस्य सर्वशः ॥ १९ ॥

ताम्रगैरिकसंपृक्ता धारा इव धराधरात् ।
बाण काढला गेल्यावर वालीच्या शरीरावरील सर्व घावातून, जखमांतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या; जणु एखाद्या पर्वतापासून लाल गेरूमिश्रित जलाच्या धाराच वहात आहेत. ॥१९ १/२॥
अवकीर्णं विमार्जंती भर्तारं रणरेणुना ॥ २० ॥

आस्रैर्नयनजैः शूरं सिषेचास्त्रसमाहतम् ।
रुधिरोक्षितसर्वाङ्‌गं दृष्ट्‍वा विनिहतं पतिम् ॥ २१ ॥
वालीचे शरीर रणभूमीतील धुळीने भरलेले होते. त्या समयी तारा बाणाने आहत झालेल्या आपल्या शूरवीर स्वामीच्या त्या शरीरास पुसत पुसत त्यांना नेत्रातील अश्रुजलाने शिंपू लागली. ॥२०-२१॥
उवाच तारा पिङ्‌गाक्षं पुत्रमङ्‌गदमङ्‌गना ।
आपल्या मारल्या गेलेल्या पतिच्या सर्व अंगाना रक्ताने भिजलेली पाहून वाली-पत्‍नी तारेने आपल्या पिंगट नेत्र असलेल्या पुत्र अंगद यास म्हटले- ॥२१ १/२॥
अवस्थां पश्चिमां पश्य पितुः पुत्र सुदारुणाम् ॥ २२ ॥

संप्रसक्तस्य वैरस्य गतोऽतः पापकर्मणा ।
’मुला ! पहा ! तुझ्या पित्याची अंतिम अवस्था किती भयंकर आहे. हे या समयी पूर्व पापामुळे प्राप्त झालेल्या वैराच्या पार होऊन चुकले आहेत. ॥२२ १/२॥
बालसूर्योदयतनुं प्रयांतं यमसादनम् ॥ २३ ॥

अभिवादय राजानं पितरं पुत्र मानदम् ।
’वत्सा ! प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे अरुण गौर शरीराचे तुझे पिता राजा वाली आता यमलोकी जाऊन पोहोचले आहेत. ते तुला फार आदर देत होते. तू यांच्या चरणांना प्रणाम कर.’ ॥२३ १/२॥
एवमुक्तः समुत्थाय जग्राह चरणौ पितुः ॥ २४ ॥

भुजाभ्यां पीनवृत्ताभ्यामङ्‌गदो ऽहमिति ब्रुवन् ।
मातेने असे सांगितल्यावर अंगदाने उठून आपल्या मोठ्या आणि गोलाकार भुजांच्या द्वारे पित्याचे दोन्ही पाय पकडले आणि प्रणाम करीत म्हटले- ’पिताश्री ! मी अंगद आहे.’ ॥२४ १/२॥
अभिवादयमानं त्वामङ्‌गदं त्वं यथा पुरा ॥ २५ ॥

दीर्घायुर्भव पुत्रेति किमर्थं नाभिभाषसे ।
तेव्हा परत तारा म्हणू लागली - ’प्राणनाथ ! कुमार अंगद पूर्वीप्रमाणेच आजही आपल्या चरणांना प्रणाम करीत आहे परंतु आपण याला ’मुला ! चिरंजीव हो !’ असे म्हणून आर्शीवाद का देत नाही ?’ ॥२५ १/२॥
अहं पुत्रसहाया त्वामुपासे गतचेतसम् ।
सिंहेन निहतं सद्यो गौः सवत्सेव गोवृषम् ॥ २६ ॥
’ज्याप्रमाणे एखादी गाय आपल्या वासरासहित सिंहाकडून तात्काळ मारल्या गेलेल्या वळूपाशी उभी असते, त्या प्रकारे पुत्रासहित मी प्राणहीन झालेल्या आपल्या सेवेमध्ये बसलेली आहे. ॥२६॥
इष्ट्‍वा संग्रामयज्ञेन रामप्रहरणांभसि ।
अस्मिन्नवभृथे स्नातः कथं पत्‍न्या मया विना ॥ २७ ॥
’आपण युद्धरूपी यज्ञाचे अनुष्ठान करून श्रीरामाच्या बाणरूपी जलाने माझ्याशिवाय - आपल्या पत्‍नीशिवाय एकट्यानेच अवभृथस्नान कसे केलेत ?’ ॥२७॥
या दत्ता देवराजेन तव तुष्टेन संयुगे ।
शातकुंभमयीं मालां तां ते पश्यामि नेह किम् ॥ २८ ॥
’युद्धात आपल्यावर संतुष्ट होऊन देवराज इंद्रांनी आपल्याला जी सोन्याची प्रिय माला देऊन ठेवली होती, ती मी यावेळी आपल्या गळ्यात का पहात नाही आहे ?’ ॥२८॥
राजश्रीर्न जहाति त्वां गतासुमपि मानद ।
सूर्यस्यावर्तमानस्य शैलराजमिव प्रभा ॥ २९ ॥
’दुसर्‍यांना मान देणारे वानरराज ! प्राणहीन झाल्यावरही आपली राज्यलक्ष्मी आपल्याला, ज्याप्रकारे चोहोबाजूस प्रदक्षिणा करणार्‍या सूर्यदेवाची प्रभा गिरीराज मेरू कधी सोडत नाही, त्याप्रमाणेच सोडत नाही आहे. ॥२९॥
न मे वचः पथ्यमिदं त्वया कृतं
न चास्मि शक्ता विनिवारणे तव ।
हता सपुत्रा ऽस्मि हतेन संयुगे
सह त्वया श्रीर्विजहाति मामिह ॥ ३० ॥
’मी आपल्या हिताची गोष्ट सांगितली होती; परंतु आपण ती स्वीकारली नाही. मीही आपल्याला युद्धापासून परावृत्त करण्यास समर्थ होऊ शकले नाही. याचे फळ हे झाले की आपण युद्धात मारले गेलात. आपण मारले गेल्यामुळे मीही आपल्या पुत्रासहित मारली गेले. आता लक्ष्मी आपल्या बरोबरच मला आणि माझ्या पुत्रालाही सोडत आहे. ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे त्रयोविंशः सर्गः ॥ २३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा तेविसावा सर्ग पूरा झाला. ॥२३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP