[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। सप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
दुतैर्भरताय तदीयमातुलमातामहयोः कृत उपहार्यवस्तूनामर्पणं वसिष्ठसंदेशस्य च श्रावणं भरतेन पित्रादीनां कुशलं पृष्ट्‍वा मातामहादनुज्ञामुपहार्यवस्तूनि चोपलभ्य शत्रुघ्नेन सहायोध्यां प्रति प्रस्थानम् -
दूतांनी भरताजवळ त्यांचे मातामह (आजोबा) आणि मामांसाठीच्या भेटीच्या वस्तु अर्पण करणे आणि वसिष्ठांचा संदेश ऐकविणे, भरतांनी पिता आदिंचे कुशल विचारणे आणि आजोबांकडून आज्ञा आणि भेटीच्या वस्तु मिळून शत्रुघ्नसह अयोध्येकडे प्रस्थान करणे -
भरते ब्रुवति स्वप्नं दूतास्ते क्लान्तवाहनाः ।
प्रविश्यासह्यपरिखं रम्यं राजगृहं पुरम् ॥ १ ॥
या प्रकारे भरत जेव्हा आपल्या मित्रांना स्वप्नांचा वृतांत सांगत होते त्याच समयी थकलेली वाहने असलेले ते दूत त्या रमणीय राजगृहात प्रविष्ट झाले ज्यांचे खंदक ओलांड्ण्याचे कष्ट शत्रूंसाठी असह्य होते. ॥ १ ॥
समागम्य तु राज्ञा च राजपुत्रेण चार्चिताः ।
राज्ञः पादौ गृहीत्वा तु तमूचुर्भरतं वचः ॥ २ ॥
नगरात येउन ते दूत केकयदेशाच्या राजांना आणि राजकुमारांना भेटले. लगेच त्या दोघांनीही त्यांचा (दूतांचा) सत्कार केला. नंतर ते भावी राजा भरत यांच्या चरणाला स्पर्श करून त्यांना या प्रकारे बोलले- ॥ २ ॥
पुरोहितस्त्वां कुशलं प्राह सर्वे च मन्त्रिणः ।
त्वरमाणश्च निर्याहि कृत्यमात्ययिकं त्वया ॥ ३ ॥
’कुमार ! पुरोहित आणि समस्त मत्र्यांनी आपल्याला कुशल-मङ्‌‍गल सांगितले आहे. आता आपण येथून लवकर चलावे. अयोध्येत आपल्याला अत्यन्त आवश्यक कार्य आहे. ॥ ३ ॥
इमानि च महार्हाणि वस्त्राण्याभरणानि च ।
प्रतिगृह्य विशालाक्ष मातुलस्य च दापय ॥ ४ ॥
’विशालाक्ष राजकुमार ! ही बहुमूल्य वस्त्रे आणि आभूषणे आपण स्वतःही ग्रहण करावी आणि आपल्या मामांनाही द्यावी. ॥ ४ ॥
अत्र विंशतिकोट्यस्तु नृपतेर्मातुलस्य ते ।
दशकोट्यस्तु सम्पूर्णास्तथैव च नृपात्मज ॥ ५ ॥
’राजकुमार ! येथे जी बहुमूल्य वस्त्रे आणली गेली आहे, त्यापैकी वीस कोटींची (मूल्यांची) सामग्री आपले आजोबा (मातामह) केकय नरेशासाठी आहेत आणि पूर्‍या दहा कोटीच्या किमतीचे सामान आपल्या मामांसाठी आहे. ॥ ५ ॥
प्रतिगृह्य तु तत् सर्वं स्वनुरक्तः सुहृज्जने ।
दूतानुवाच भरतः कामैः सम्प्रतिपूज्य तान् ॥ ६ ॥
त्या सर्व वस्तु घेऊन, मामा आणि सुहृदांच्या ठिकाणी अनुराग ठेवणार्‍या भरतांनी त्यांना भेट दिल्या. त्यानंतर इच्छेस अनुसरून वस्तु देऊन दूतांचा सत्कार केलानंतर त्यांना या प्रकारे म्हटले- ॥ ६ ॥
कच्चित् स कुशली राजा पिता दशरथो मम ।
कच्चिदारोग्यता रामे लक्ष्मणे च महात्मनि ॥ ७ ॥
’माझे वडिल महाराज दशरथ सकुशल तर आहेत ? महात्मा राम आणि लक्ष्मण निरोगी तर आहेत ना ? ॥ ७ ॥
आर्या च धर्मनिरता धर्मज्ञा धर्मवादिनी ।
अरोगा चापि कौसल्या माता रामस्य धीमतः ॥ ८ ॥
’धर्म जाणणारी आणि धर्माचीच चर्चा करणारी बुद्धिमान श्रीरामांची माता धर्मपरायण आर्या कौसल्येला काही रोग अथवा कष्ट तर नाहीत ना ? ॥ ८ ॥
कच्चित् सुमित्रा धर्मज्ञा जननी लक्ष्मणस्य या ।
शत्रुघ्नस्य च वीरस्य अरोगा चापि मध्यमा ॥ ९ ॥
’वीर लक्ष्मणाची आणि शत्रुघ्नांची जननी माझी मधली आई (माता) धर्मन्त सुमित्रा स्वस्थ आणि सुखी आहे ना ? ॥ ९ ॥
आत्मकामा सदा चण्डी क्रोधना प्राज्ञमानिनी ।
अरोगा चापि मे माता कैकेयी किमुवाच ह ॥ १० ॥
’जी सदा आपलाच स्वार्थ सिद्ध करू इच्छिते आणि आपल्या स्वतःला फार बुद्धिमान (बुद्धिमती) समजत असते, त्या उग्र स्वभावाच्या रागीट असलेल्या माझी माता कैकेयीला तर काही कष्ट नाहीत ना ? तिने काय सांगितले आहे ? ॥ १० ॥
एवमुक्तास्तु ते दूता भरतेन महात्मना ।
ऊचुः सम्प्रश्रितं वाक्यमिदं तं भरतं तदा ॥ ११ ॥
महात्मा भरतांनी अशा प्रकारे विचारल्यावर त्या समयी दूतांनी त्यांना विनयपूर्वक असे म्हटले - ॥ ११ ॥
कुशलास्ते नरव्याघ्र येषां कुशलमिच्छसि ।
श्रीश्च त्वां वृणुते पद्मा युज्यतां चापि ते रथः ॥ १२ ॥
’पुरूषसिंह ! आपल्याला ज्यांचे कुशल मंङ्‌‍गल अभिप्रेत आहे ते सकुशल आहेत. हातात कमल घेऊन राहाणारी लक्ष्मी (शोभा) आपले वरण करीत आहे. आता यात्रेसाठी सत्वरच आपला रथ जुंपून तयार होणे आवश्यक आहे’. ॥ १२ ॥
भरतश्चापि तान् दूतानेवमुक्तोऽभ्यभाषत ।
आपृच्छेऽहं महाराजं दूताः संत्वरयन्ति माम् ॥ १३ ॥
त्या दूतांनी असे म्हटल्यावर भरतांनी त्यांना म्हटले - "ठीक आहे. मी महाराजांना विचारतो की ’दूत मला त्वरित अयोध्या चलण्यासाठी सांगत आहेत. आपली काय आज्ञा आहे ?’ ॥ १३ ॥
एवमुक्त्वा तु तान् दूतान् भरतः पार्थिवात्मजः ।
दूतैः सञ्चोदितो वाक्यं मातामहमुवाच ह ॥ १४ ॥
दूतांना असे म्हणून राजकुमार भरत त्यांच्याकडून प्रेरित होऊन आजोबांजवळ जाऊन म्हणाले - ॥ १४।
राजन् पितुर्गमिष्यामि सकाशं दूतचोदितः ।
पुनरप्यहमेष्यामि यदा मे त्वं स्मरिष्यसि ॥ १५ ॥
’राजन ! मी दूतांच्या सांगण्यावरून या समयी वडिलांकडे जात आहे. पुन्हा जेव्हा आपण माझी आठवण कराल तेव्हा मी येथे येईन.’ ॥ १५ ॥
भरतेनैवमुक्तस्तु नृपो मातामहस्तदा ।
तमुवाच शुभं वाक्यं शिरस्याघ्राय राघवम् ॥ १६ ॥
भरतांनी असे म्हटल्यावर आजोबा केकय नरेशांनी त्या समयी (राघव) भरताचे मस्तक हुंगून हे शुभ वचन बोलले - ॥ १६ ॥
गच्छ तातानुजाने त्वां कैकेयी सुप्रजास्त्वया ।
मातरं कुशलं ब्रूयाः पितरं च परंतप ॥ १७ ॥
’तात ! जा मी तुला आज्ञा देत आहे. तुला प्राप्त करून कैकेयी उत्तम संतान असणारी झाली आहे. परंतप (शत्रूंना ताप देणार्‍या वीरा)! तू आपली माता आणि पिता यांना येथील कुशल समाचार सांग. ॥ १७ ॥
पुरोहितं च कुशलं ये चान्ये द्विजसत्तमाः ।
तौ च तात महेष्वासौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८ ॥
’तात ! आपले पुरोहित तसेच अन्य जे श्रेष्ठ ब्राह्मण असतील त्यांना ही माझे कुशल-मङ्‌‍गल सांग. त्या महाधनुर्धर दोघा भावांना राम आणि लक्ष्मणांना ही येथील कुशल -समाचार ऐकवा.’ ॥ १८ ॥
तस्मै हस्त्युत्तमांश्चित्रान् कम्बलानजिनानि च ।
सत्कृत्य कैकेयो राजा भरताय ददौ धनं ॥ १९ ॥
असे म्हणून केकय नरेशांनी भरतांचा सत्कार करून त्यांस अनेक उत्तम हत्ती, विचित्र गालिचे, मृगचर्म आणि बरेचसे धन दिले. ॥ १९ ॥
अंतःपुरेऽतिसंवृद्धान् व्याघ्रवीर्यबलोपमान् ।
दंष्ट्रायुक्तान् महाकायाञ्शुनश्चोपायनं ददौ ॥ २० ॥
जे अन्तःपुरात पाळून पोसून वाढविलेले होते, बल आणि पराक्रमात वाघांसारखे होते, ज्यांचा मोठ्मोठ्या दाढा होत्या आणि विशाल शरीर होते असे बरेचसे कुत्रे ही केकय नरेशांनी भरतास भेट म्हणून दिले. ॥ २० ॥
रुक्मनिष्कसहस्रे द्वे षोडशाश्वशतानि च ।
सत्कृत्य कैकयीपुत्रं केकयो धनमादिशत् ॥ २१ ॥
दोन हजार सोन्याच्या मोहोरा आणि सोळाशे घोडे ही दिले. या प्रकारे केकय नरेशांनी कैकेयीकुमार भरताला सत्कारपूर्वक बरेचसे धन दिले. ॥ २१ ॥
तदामात्यानभिप्रेतान् विश्वास्यांश्च गुणान्वितान् ।
ददावश्वपतिः शीघ्रं भरतायानुयायिनः ॥ २२ ॥
त्यासमयी केकयनरेश अश्वपतिनी आपल्या अभीष्ट, विश्वासपात्र आणि गुणवान मन्त्र्यांना भरताबरोबर जाण्यासाठी त्वरित आज्ञा दिली. ॥ २१ ॥
ऐरावतानैन्द्रशिरान् नागान् वै प्रियदर्शनान् ।
खराञ्शीघ्रान् सुसंयुक्तान् मातुलोऽस्मै धनं ददौ ॥ २३ ॥
भरताच्या मामांनी त्यांना भेट म्हणून द्यावयास फळाच्या रूपाने इरावान पर्वत आणि इन्द्रशिर नामक स्थानाच्या आसपास उत्पन्न होणारे बरेचसे सुंदर सुंदर हत्ती आणि वेगाने चालणारी सुशिक्षित खेचरे दिली. ॥ २३ ॥
स दत्तं केकयेन्द्रेण धनं तन्नाभ्यनन्दत ।
भरतः केकयीपुत्रो गमनत्वरया तदा ॥ २४ ॥
त्या समयी जाण्याची घाई असल्याने कैकयीपुत्र भरतांनी केकयराजांनी दिलेल्या त्या धनाचे अभिनन्दन केले नाही. ॥ २४ ॥
बभूव ह्यस्य हृदये चिन्ता सुमहती तदा ।
त्वरया चापि दूतानां स्वप्नस्यापि च दर्शनात् ॥ २५ ॥
त्या वेळी त्यांचा हृदयात अत्यंत चिंता उत्पन्न झालेली होती. यांस कारणे होती. एक तर दूत तेथून निघण्याची फार घाई करीत होते, आणि दुसरे त्यांनी दुःस्वप्नेही पाहिलेली होती. ॥ २५ ॥
स स्ववेश्माभ्यतिक्रम्य नरनागाश्वसंकुलम् ।
प्रपेदे सुमहच्छ्रीमान् राजमार्गमनुत्तमम् ॥ २६ ॥
ते यात्रेची तयारी करण्यासाठी आपल्या निवासस्थानी गेले . नंतर तेथून निघून माणसे, हत्ती आणि घोड्यानी भरलेल्या परम उत्तम राजमार्गावर गेले, त्या समयी भरतांजवळ फार मोठी संपत्ती गोळा झाली होती. ॥ २६ ॥
अभ्यतीत्य ततोऽपश्यदन्तःपुरमनुत्तमम् ।
ततस्तद् भरतः श्रीमानाविवेशानिवारितः ॥ २७ ॥
’रस्ता पार करून श्रीमान भरतांनी राजभवनातील उत्तम अन्तःपुराचे दर्शन केले आणि त्यात ते सरळ बेधडक घुसले (त्यांना कुणी अडविले नाही). ॥ २७ ॥
स मातामहमापृच्छ्य मातुलं च युधाजितम् ।
रथमारुह्य भरतः शत्रुघ्नसहितो ययौ ॥ २८ ॥
तेथे आजोबा, आजी मामा युधाजीत आणि मामी यांचा निरोप घेऊन ते शत्रुघ्नासहित रथावर स्वार झाले आणि भरतांनी यात्रेला आरम्भ केला. ॥ २८ ॥
रथान् मण्डलचक्रांश्च योजयित्वा परः शतम् ।
उष्ट्रगोऽश्वखरैर्भृत्या भरतं यान्तमन्वयुः ॥ २९ ॥
गोलाकार चाके असलेल्या शंभाराहून ही अधिक रथांना ऊंट, बैल, घोडे आणि खेचरे जुंपून सेवकांनी जाणार्‍या भरताचे अनुसरण केले. ॥ २९ ॥
बलेन गुप्तो भरतो महात्मा
     सहार्यकस्यात्मसमैरमात्यैः ।
आदाय शत्रुघ्नमपेतशत्रु-
     र्गृहाद् ययौ सिद्ध इवेन्द्रलोकात् ॥ ३० ॥
जणु कुणी सिद्ध पुरूष इन्द्रलोकातून दुसर्‍या कुठल्या तरी स्थानाकडे जाण्यासाठी प्रस्थान करतो त्याप्रमाणे शत्रूरहित भरत आपल्या आणि मामाच्या सेवेद्वारा सुरक्षित होऊन शत्रुघ्नाला आपल्याबरोबर रथावर घेऊन, आजोबांच्या स्वतः समानच माननीय मन्त्रांच्या बरोबर मामांच्या घरातून निघाले. ॥ ३० ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्ततितमः सर्गः ॥ ७० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकी निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा सत्तरावा सर्ग पूरा झाला ॥ ७० ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP