|
| शुकेन सुग्रीवसचिवानां मैन्दद्विविदयोर्हनुमतः श्रीरामस्य लक्ष्मणस्य विभीषणस्य सुग्रीवस्य च परिचयं दत्त्वा वानरसैन्यसंख्याया निरूपणं च - | शुकाच्या द्वारा सुग्रीवांचे मंत्र्यांचा, मैंद आणि द्विविदाचा, हनुमानाचा, श्रीराम, लक्ष्मण, विभीषण आणि सुग्रीवाचा परिचय देऊन वानरसेनेच्या संख्येचे निरूपण करणे - | 
| सारणस्य वचः श्रुत्वा रावणं राक्षसाधिपम् । बलमादिश्य तत्सर्वं शुको वाक्यमथाब्रवीत् ॥ १ ॥
 
 | त्या सार्या वानरीसेनेचा परिचय देऊन सारण जेव्हा गप्प झाला तेव्हा त्याचे वचन  ऐकून शुकाने राक्षसराज रावणास म्हटले- ॥१॥ | 
| स्थितान् पश्यसि यानेतान् मत्तानिव महाद्विपान् । न्यग्रोधानिव गाङ्गेयान् सालान् हैमवतानिव ॥ २ ॥
 
 एते दुष्प्रसहा राजन् बलिनः कामरूपिणः ।
 दैत्यदानवसंकाशा युद्धे देवपराक्रमाः ॥ ३ ॥
 
 | राजन् ! ज्यांना आपण मत्त महाराजाप्रमाणे तेथे उभे असलेले पहात आहा, जे गंगातटावरील वटवृक्षाप्रमाणे आणि हिमालयातील सालवृक्षांप्रमाणे भासत आहेत, त्यांचा वेग दु:सह आहे हे इच्छेनुसार रूप धारण करणारे आणि बलवान् आहेत. दैत्य आणि दानवांप्रमाणे शक्तिशाली तसेच युद्धात देवतांसमान पराक्रम प्रकट करणारे आहेत. ॥२-३॥ | 
| एषां कोटिसहस्राणि नव पञ्च च सप्त च । तथा शंकुसहस्राणि तथा वृन्दशतानि च ॥ ४ ॥
 
 एते सुग्रीवसचिवाः किष्किन्धानिलयाः सदा ।
 हरयो देवगंधर्वैः उत्पन्नाः कामरूपिणः ॥ ५ ॥
 
 | यांची संख्या एकवीस कोटी सहस्त्र, सहस्त्र शंकु आणि शंभर वृन्द आहे (**). हे सर्वच्या सर्व वानर सदा किष्किंधेमध्ये राहाणार्या सुग्रीवाचे मंत्री आहेत. यांची उत्पत्ति देवता आणि गंधर्वापासून झाली आहे. हे सर्व इच्छेप्रमाणे रूप धारण करण्यास समर्थ आहेत. ॥४-५॥ 
 | 
| यौ तौ पश्यसि तिष्ठन्तौ कुमारौ देवरूपिणौ । मैन्दश्च द्विविदश्चैव ताभ्यां नास्ति समो युधि ॥ ६ ॥
 
 ब्रह्मणा समनुज्ञातौ अमृतप्राशिनावुभौ ।
 आशंसेते युथा लङ्कां एतौ मर्दितुमोजसा ॥ ७ ॥
 
 | राजन् ! आपण या वानरांमध्ये देवताप्रमाणे रूप असणार्या ज्या दोन वानरांना पहात आहा त्यांची नावे मैंद आणि द्विविद आहेत. युद्धात यांची बरोबरी करणारे कोणी नाही आहे. ब्रह्मदेवांच्या आज्ञेने यांनी दोघांनी अमृतपान केलेले आहे. हे दोन्ही वीर आपल्या बल-पराक्रमाने लंकेला चिरडून टाकण्याची इच्छा करीत आहेत. ॥६-७॥ | 
| यं तु पश्यसि तिष्ठन्तं प्रभिन्नमिव कुञ्जरम् । यो बलात् क्षोभयेत् क्रुद्धः समुद्रमपि वानरः ॥ ८ ॥
 
 एषोऽभिगन्ता लङ्काया वैदेह्यास्तव च प्रभो ।
 एनं पश्य पुरा दृष्टं वानरं पुनरागतम् ॥ ९ ॥
 
 ज्येष्ठः केसरिणः पुत्रो वातात्मज इति श्रुतः ।
 हनुमानिति विख्यातो लंघितो येन सागरः ॥ १० ॥
 
 | इकडे ज्याला आपण मदाची धारा वहावणार्या मत्त हत्तीप्रमाणे उभा असलेला पहात आहा, जो वानर कुपित झाला असता समुद्रालाही विक्षुब्ध करू शकतो, जो लंकेत आपल्यापाशी आला होता आणि वैदेही सीतेला भेटून गेला होता, त्याला पहा. प्रथम पाहिलेला हा वानर परत आला आहे. हा केसरीचा ज्येष्ठ पुत्र आहे. पवनपुत्र या नावाने विख्यात आहे. त्याला लोक हनुमान् म्हणतात. याने पूर्वी समुद्र ओलांडला होता. ॥८-१०॥ | 
| कामरूपो हरिश्रेष्ठो बलरूपसमन्वितः । अनिवार्यगतिश्चैव यथा सततगः प्रभुः ॥ ११ ॥
 
 | बळ आणि रूपाने संपन्न हा श्रेष्ठ वानर आपल्या इच्छेनुसार रूप धारण करू शकतो. याची गति कुठे कुंठीत होत नाही. हा वायुसमान सर्वत्र जाऊ शकतो. ॥११॥ | 
| उद्यन्तं भास्करं दृष्ट्वा बालः किल बुभुक्षितः । त्रियोजनसहस्रं तु अध्वानमवतीर्य हि ॥ १२ ॥
 
 आदित्यमाहरिष्यामि न मे क्षुत् प्रतियास्यति ।
 इति निशिचित्य मनसा पुप्लुवे बलदर्पितः ॥ १३ ॥
 
 | जेव्हा हा बालक होता त्या वेळची गोष्ट आहे, एक दिवस याला खूप भूक लागली होती, त्या समयी उगवत्या सूर्याला पाहून हा तीन हजार योजने उंच उडाला होता. त्या समयी मनातल्या मनातच हा निश्चय करून की येथील फळे आदिंनी माझी भूक शमणार नाही, म्हणून सूर्याला (जे आकाशातील दिव्य फळ आहे) मी घेऊन जाईन हा बळाभिमानी वानर वर उडाला होता. ॥१२-१३॥ | 
| अनाधृष्यतमं देवं अपि देवर्षिदानवैः । अनासाद्यैव पतितो भास्करोदयने गिरौ ॥ १४ ॥
 
 | देवर्षि आणि राक्षसही ज्याला परास्त करू शकत नाहीत त्या सूर्यदेवापर्यंत न पोहोचता हा वानर उदयगिरीवरच कोसळला. ॥१४॥ | 
| पतितस्य कपेरस्य हनुरेका शिलातले । किञ्चिद्भिन्ना दृढहनुः हनूमानेष तेन वै ॥ १५ ॥
 
 | तेथील शिलाखंडावर पडल्यामुळे या वानराची एक हनुवटी थोडीशी फाटली आणि त्याच बरोबर अत्यंत दृढ झाली म्हणून हा हनुमान् नावाने प्रसिद्ध झाला. ॥१५॥ | 
| सत्यमागमयोगेन ममैष विदितो हरिः । नास्य शक्यं बलं रूपं प्रभावो वानुभाषितुम् ॥ १६ ॥
 
 एष आशंसते लङ्कां एको मथितुमोजसा ।
 येन जाज्वल्यतेऽसौ वै धूमकेतुस्तवाद्य वै ।
 लंकायां निहितश्चापि कथं विस्मरसे कपिम् ॥ १७ ॥
 
 | विश्वसनीय व्यक्तींच्या संपर्काने मी या वानराचा वृत्तांत ठीक ठीक जाणून घेतला आहे. याचे बळ, रूप आणि प्रभाव यांचे पूर्ण रूपाने वर्णन करणे कुणालाही असंभवनीय आहे. हा एकटाच सार्या लंकेला चिरडून टाकू इच्छितो. ज्याला आपण लंकेत रोखून धरले होते. अग्निला ज्याने आपल्या पुच्छाद्वारे प्रज्वलित करून सारी लंका जाळून टाकली होती, त्या वानराला आपण कसे विसरता आहा ? ॥१६-१७॥ | 
| यश्चैषोऽनन्तरः शूरः श्यामः पद्मनिभेक्षणः । इक्ष्वाकूणामतिरथो लोके विश्रुतपौरुषः ॥ १८ ॥
 
 | हनुमानांच्या जवळच जे कमळासारखे नेत्र असणारे श्याम वर्णाचे शूरवीर विराजत आहेत, ते इक्ष्वाकुवंशाचे अतिरथी आहेत. यांचे पौरूष संपूर्ण लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. ॥१८॥ | 
| यस्मिन् न चलते धर्मो यो धर्मं नातिवर्तते । यो ब्राह्ममस्त्रं वेदांश्च वेद वेदविदां वरः ॥ १९ ॥
 
 | यांच्या पासून धर्म कधी वेगळा होत नाही. ते धर्माचे कधी उल्लंघन करत नाहीत तसेच ब्रह्मास्त्र आणि वेद दोन्हींचे हे ज्ञाते आहेत व वेदवेत्त्यांमध्ये यांचे स्थान फार उच्च आहे. ॥१९॥ | 
| यो भिन्द्याद् गगनं बाणैः मेदिनीं वापि दारयेत् । यस्य मृत्योरिव क्रोधः शक्रस्येव पराक्रमः ॥ २० ॥
 
 | हे आपल्या बाणांनी आकाशाचेही भेदन करू शकतात. पृथ्वीलाही विदीर्ण करण्याची यांची क्षमता आहे. यांचा क्रोध मृत्युसमान आणि पराक्रम इंद्रतुल्य आहे. ॥२०॥ | 
| यस्य भार्या जनस्थानात् सीता चापि हृता त्वया । स एष रामस्त्वां राजन् योद्धुं  समभिवर्तते ॥ २१ ॥
 
 | राजन् ! ज्यांची भार्या सीता हिला आपण जनस्थानातून हिरावून आणले आहे, तेच हे श्रीराम आपल्याशी युद्ध करण्यसाठी समोर येऊन उभे आहेत. ॥२१॥ | 
| यस्यैष दक्षिणे पार्श्वे शुद्धजाम्बूनदप्रभः । विशालवक्षास्ताम्राक्षो नीलकुञ्चितमूर्धजः ॥ २२ ॥
 
 एषो हि लक्ष्मणो नाम भ्रातुः प्रियहिते रतः ।
 नये युद्धे च कुशलः सर्वशस्त्रभृतां वरः ॥ २३ ॥
 
 | त्यांच्या उजव्या भागी जे हे सुर्वणासमान कांतिमान्, विशाल वक्ष:स्थळाने सुशोभित, किंचित लाल नेत्र असणारे तसेच मस्तकावर काळे कुरळे केस धारण करणारे आहेत यांचे नाव लक्ष्मण आहे. हे आपल्या भावाचे प्रिय आणि हित करण्यात लागलेले असतात, राजनीति आणि युद्धात कुशल आहेत तसेच संपूर्ण शस्त्रधारी लोकात श्रेष्ठ आहेत. ॥२२-२३॥ | 
| अमर्षी दुर्जयो जेता विक्रान्तो बुद्धिमान् बली । रामस्य दक्षिणो बाहुः नित्यं प्राणो बहिश्चरः ॥ २४ ॥
 
 | हे अमर्षशील, दुर्जय, विजयी, पराक्रमी, शत्रूंना पराजित करणारे, तसेच बलवान् आहेत. लक्ष्मण सदाच रामांचा उजवा हात आणि बाहेर विचरणारा प्राण आहेत. ॥२४॥ | 
| न ह्येष राघवस्यार्थे जीवितं परिरक्षति । एषैवाशंसते युद्धे निहन्तुं सर्वराक्षसान् ॥ २५ ॥
 
 | यांना राघवांसाठी आपल्या प्राणांचे रक्षण करण्याचेही ध्यान रहात नाही. हे एकटेच युद्धात संपूर्ण राक्षसांचा संहार करून टाकण्याची इच्छा बाळगत आहेत. ॥२५॥ | 
| यस्तु सव्यमसौ पक्षं रामस्याश्रित्य तिष्ठति । रक्षो गणपरिक्षिप्तो राजा ह्येष विभीषणः ॥ २६ ॥
 
 श्रीमता राजराजेन लङ्कायामभिषेचितः ।
 त्वामेव प्रतिसंरब्धो युद्धायैषोऽभिवर्तते ॥ २७ ॥
 
 | श्रीरामचंद्रांच्या डाव्या बाजूस जे राक्षसांनी घेरलेले उभे आहेत हे राजा विभीषण आहेत. राजाधिराज श्रीरामांनी यांना लंकेच्या राज्यावर अभिषिक्त केलेले आहे. आता हे आपल्यावर कुपित होऊन युद्धासाठी समोर आलेले आहेत. ॥२६-२७॥ | 
| यं तु पश्यसि तिष्ठन्तं मध्ये गिरिमिवाचलम् । सर्वशाखामृगेन्द्राणां भर्तारममितौजसम् ॥ २८ ॥
 
 | ज्यांना आपण सर्व वानरांच्या मध्ये पर्वतासमान अविचल भावाने उभे असलेले पहात आहात, ते समस्त वानरांचे स्वामी अमित तेजस्वी सुग्रीव आहेत. ॥२८॥ | 
| तेजसा यशसा बुद्ध्या बलेनाभिजनेन च । यः कपीनतिबभ्राज हिमवानिव पर्वतः ॥ २९ ॥
 
 | जसा हिमालय सर्व पर्वतात श्रेष्ठ आहे त्याच प्रकारे ते तेज, यश, बुद्धि, बळ आणि कुलाच्या दृष्टीने समस्त वानरांमध्ये सर्वोपरि विराजमान आहेत. ॥२९॥ | 
| किष्किन्धां यः समध्यास्ते गुहां सगहनद्रुमाम् । दुर्गां पर्वतदुर्गम्यां प्रधानैः सह यूथपैः ॥ ३० ॥
 
 | हे गहन वृक्षांनी युक्त किष्किंधा नामक दुर्गम गुफेमध्ये निवास करतात. पर्वतांमुळे तिच्यात प्रवेश करणे अत्यंत कठीण आहे. यांच्या बरोबर तेथे प्रधान प्रधान यूथपतिही राहातात. ॥३०॥ | 
| यस्यैषा काञ्चनी माला शोभते शतपुष्करा । कान्ता देवमनुष्याणां यस्यां लक्ष्मीः प्रतिष्ठिता ॥ ३१ ॥
 
 | यांच्या गळ्यात जी शंभर कमळांची सुवर्णमयी माळा सुशोभित आहे, तिच्यात सदा लक्ष्मीदेवीचा निवास आहे. तिला प्राप्त करण्याची इच्छा देवता आणि मनुष्यही करतात. ॥३१॥ | 
| एतां च मालां तारां च कपिराज्यं च शाश्वतम् । सुग्रीवो वालिनं हत्वा रामेण प्रतिपादितः ॥ ३२ ॥
 
 | भगवान् श्रीरामांनी वालीला मारून ही माळा, तारा आणि वानरांचे राज्य - या सर्व वस्तु सुग्रीवांना समर्पित केल्या आहेत. ॥३२॥ | 
| शतं शतसहस्राणां कोटिमाहुर्मनीषिणः । शतं कोटिसहस्राणां शंकुरित्यभिधीयते ॥ ३३ ॥
 
 | मनीषी पुरुष शंभर लाखाच्या संख्येला एक कोटी म्हणतात आणि शंभर सहस्त्र कोटी (एक नील)ला एक शंकु म्हटले जाते. ॥३३॥ | 
| शतं शंकुसहस्राणां महाशंकु इति स्मृतः । महाशंकुसहस्राणां शतं वृन्दमिहोच्यते ॥ ३४ ॥
 
 | एक लाख शंकुला महाशंकु नाम दिले गेले आहे. एक लाख महाशंकुना वृन्द म्हटले जाते. ॥३४॥ | 
| शतं वृन्दसहस्राणां महावृन्दमिति स्मृतम् । महावृन्दसहस्राणां शतं पद्ममिहोच्यते ॥ ३५ ॥
 
 | एक लाख वृन्दाचे नाव महावृन्द आहे. एक लाख महावृन्दांना पद्म म्हणतात. ॥३५॥ | 
| शतं पद्मसहस्राणां महापद्ममिति स्मृतम् । महापद्म सहस्राणां शतं खर्वमिहोच्यते ॥ ३६ ॥
 
 | एक लाख पद्मांना महापद्म मानले गेले आहे. एक लाख महापद्मांना खर्व म्हणतात. ॥३६॥ | 
| शतं खर्वसहस्राणां महाखर्वमिति स्मृतम् । महाखर्वसहस्राणां समुद्रमभिधीयते ।
 शतं समुद्रसाहस्र अमोघ इत्यभिधीयते ॥ ३७ ॥
 
 | एक लाख खर्वांचा महाखर्व होतो. एक सहस्त्र महाखर्वांना समुद्र म्हणतात. एक लाख समुद्रांना ओघ म्हणतात आणि एक लाख ओघांना महौघ संज्ञा आहे. ॥३७ १/२॥ | 
| शतमोघसहस्राणां महौघ इति विश्रुतः । एवं कोटिसहस्रेण शंकूनां च शतेन च ।
 महाशंकुसहस्रेण तथा वृन्दशतेन च ॥ ३८ ॥
 
 महावृन्दसहस्रेण तथा पद्मशतेन च ।
 महापद्मसहस्रेण तथा खर्वशतेन च ॥ ३९ ॥
 
 समुद्रेण च तेनैव महौघेन तथैव च ।
 एष कोटिमहौघेन समुद्रसदृशेन च ॥ ४० ॥
 
 विभीषणेन वीरेण सचिवै  परिवारितः ।
 सुग्रीवो वानरेन्द्रस्त्वां युद्धार्थं अनुवर्तते ।
 महाबलवृतो नित्यं महाबलपराक्रमः ॥ ४१ ॥
 
 | याप्रकारे सहस्त्र कोटी, शंभर शंकु, सहस्त्र महाशंकु, शंभर वृन्द, सहस्त्र महावृन्द, शंभर पद्म, सहस्त्र महापद्म, शंभर खर्व, शंभर समुद्र, शंभर महौघ तसेच समुद्र सदृश्य (शंभर) कोटी महौघ सैनिकांनी , वीर विभीषणांनी, तसेच आपल्या सचिवांनी घेरलेले वानरराज सुग्रीव आपल्याला युद्धासाठी आव्हान देत समोर येत आहेत. विशाल सेनेने घेरलेले सुग्रीव महान् बळ आणि पराक्रमाने संपन्न आहेत. ॥३८-४१॥ | 
| इमां महाराज समीक्ष्य वाहिनीं उपस्थितां प्रज्वलितग्रहोपमाम् ।
 ततः प्रयत्नःम परमो विधीयतां
 यथा जयः स्यान्न परैः पराभवः ॥ ४२ ॥
 
 | महाराज ! ही सेना एका प्रकाशमान् ग्रहासारखी आहे. हिला उपस्थित पाहून आपण असा काही उपाय करावा की ज्यायोगे आपला विजय होईल आणि शत्रूंच्या समोर आपल्याला खाली मान घालावी लागणार नाही. ॥४२॥ | 
| इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टाविंशः सर्गः ॥ २८ ॥ | याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा अठ्ठाविसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२८॥ | 
|