श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ त्रयोत्रिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सरमया सीतायाः सांत्वनं, रावणमायाया रहस्योद्‌घाटनं श्रीरामागमनसंबंधि प्रियसंवादस्य निवेदनं, तदीयविजयस्य समर्थनं च - सरमेचे सीतेला सांत्वना देणे, रावणाच्या मायेचा भेद उघड करणे, श्रीरामांच्या आगमनाचा प्रिय समाचार ऐकविणे आणि ते विजयी होतील याविषयी विश्वास प्रकट करणे -
सीतां तु मोहितां दृष्ट्‍वा सरमा नाम राक्षसी ।
आससादाथ वैदेहीं प्रियां प्रणयिनी सखीम् ॥ १ ॥
वैदेही सीता मोहात पडली आहे हे पाहून सरमा नावाची राक्षसी, प्रेम करणारी सखी आपल्या प्रिय सखी जवळ येते त्याप्रमाणे सीते जवळ आली. ॥१॥
मोहितां राक्षसेन्द्रेण सीतां परमदुःखिताम् ।
आश्वासयामास तदा सरमा मृदुभाषिणी ॥ २ ॥
राक्षसराजाच्या मायेला वश होऊन सीता मोठ्‍या दु:खात पडली होती. त्या समयी मृदुभाषिणी सरमेने तिचे आपल्या वचनांच्या द्वारे सांत्वन केले. ॥२॥
सा हि तत्र कृता मित्रं सीतया रक्ष्यमाणया ।
रक्षन्ती रावणादिष्टा सानुक्रोशा दृढव्रता ॥ ३ ॥
सरमा रावणाच्या आज्ञेने सीतेचे रक्षण करत होती. तिने आपली रक्षणीया सीता हिच्याशी मैत्री केली होती. ती फार दयाळू आणि दृढ संकल्प होती. ॥३॥
सा ददर्श ततः सीतां सरमा नष्टचेतनाम् ।
उपावृत्योत्थितां ध्वस्तां वडवामिव पांसुषु ॥ ४ ॥
सरमेने सखी सीतेला पाहिले. तिची चेतना जणु नष्ट झालेली होती. ज्याप्रमाणे परिश्रमाने थकलेली घोडी धरतीवरील धुळीत लोळून उभी राहिली असावी त्याप्रकारे सीता पण पृथ्वीवर लोळण घेऊन रडण्याने आणि विलाप करण्यामुळे धूलिधूसरित होत होती. ॥४॥
तां समाश्वासयामास सखी स्नेहेन सुव्रताम् ।
समाश्वसिहि वैदेहि मा भूत्ते मनसो व्यथा ।
उक्ता यद् रावणेन त्वं प्रत्युक्तं च स्वयं त्वया ॥ ५ ॥

सखी स्नेहेन तद्‌ भिरु मया सर्वं प्रतिश्रुतम् ।
लीनया गगने शून्ये भयमुत्सृज्य रावणात् ।
तव हेतोर्विशालाक्षि न हि मे रावणाद् भयम् ॥ ६ ॥
तिने एका सखीच्या स्नेहाने, उत्तम व्रताचे आचरण करणार्‍या सीतेला आश्वासन दिले- वैदेही ! धैर्य धारण कर. तुझ्या मनात व्यथा असता कामा नये. भीरू ! रावणाने तुला जे काही सांगितले आहे आणि तू स्वत: त्याला जे उत्तर दिले आहेस, ते सर्व मी सखीच्या प्रति स्नेह असल्यामुळे ऐकले आहे. विशाल लोचने ! तुझ्यासाठी मी रावणाचे भय सोडून अशोक वाटिकेत शून्य गहन स्थानात लपून राहून सर्व गोष्टी ऐकत होते. मला रावणापासून काही हीभय नाही आहे. ॥५-६॥
स सम्भ्रान्तश्च निष्क्रान्तो यत्कृते राक्षसेश्वरः ।
तत्र मे विदितं सर्वमं अभिनिष्क्रम्य मैथिलि ॥ ७ ॥
मैथिली ! राक्षसराज रावण ज्या कारणाने येथून घाबरून निघून गेला आहे, त्या कारणाचाही मी तेथे जाऊन पूर्णरूपाने पत्ता लावून आले आहे. ॥७॥
न शक्यं सौप्तिकं कर्तुं रामस्य विदितात्मनः ।
वधश्च पुरुषव्याघ्रे तस्मिन् नैवोपपद्यते ॥ ८ ॥
भगवान्‌ श्रीराम आपल्या स्वरूपाला जाणणारे सर्वज्ञ परत्मामा आहेत. ते झोपले असता त्यांचा वध करणे कुणालाही सर्वथा असंभव आहे. पुरूषसिंह श्रीरामांच्या विषयी या तर्‍हेने त्यांचा वध होण्याची गोष्ट युक्तीसंगत वाटत नाही. ॥८॥
न त्वेवं वानरा हन्तुं शक्याः पादपयोधिनः ।
सुरा देवर्षभेणेव रामेण हि सुरक्षिताः ॥ ९ ॥
वानरलोक वृक्षांच्या द्वारा युद्ध करणारे आहेत. त्यांचे याप्रकारे मारले जाणे कदापि संभवनीय नाही, कारण ज्याप्रमाणे देवतागण देवराज इंद्रद्वारा पालित असतात त्याच प्रकारे हे वानरही श्रीरामांच्या द्वारा सुरक्षित आहेत. ॥९॥
दीर्घवृत्तभुजः श्रीमान् महोरस्कः प्रतापवान् ।
धन्वी संहननोपेतो धर्मात्मा भुवि विश्रुतः ॥ १० ॥

विक्रान्तो रक्षिता नित्यं आत्मनश्च परस्य च ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा कुलीनो नयशास्त्रवित् ॥ ११ ॥

हन्ता परबलौघानां अचिन्त्यबलपौरुषः ।
न हतो राघवः श्रीमान् सीते शत्रुनिबर्हणः ॥ १२ ॥
सीते ! श्रीमान्‌ राम गोलाकार मोठ मोठ्‍या भुजांनी सुशोभित रूंद छाती असणारे, प्रतापी, धनुर्धर, सुगठित शरीराने युक्त आणि भूमंडलामध्ये सुविख्यात धर्मात्मा आहेत. त्यांच्यात महान्‌ पराक्रम आहे. ते बंधु लक्ष्मणाच्या सहाय्याने आपले तसेच दुसर्‍यांचेही रक्षण करण्यास समर्थ आहेत. नीतिशास्त्राचे ज्ञाते आणि कुलिन आहेत. त्यांचे बळ आणि पौरूष अचिंत्य आहे. ते शत्रूपक्षाच्या सैन्यसमूहांचा संहार करण्याची शक्ति बाळगून आहेत. शत्रुसूदन राघव कदापि मारले गेलेले नाहीत. ॥१०-१२॥
अयुक्तबुद्धिकृत्येन सर्वभूतविरोधिना ।
इयं प्रयुक्ता रौद्रेण माया मायाविना त्वयि ॥ १३ ॥
रावणाची बुद्धि आणि कर्म दोन्ही वाईट आहेत. तो समस्त प्राण्यांचा विरोधी, क्रूर आणि मायावी आहे. त्याने तुझ्यावर हा मायेचा प्रयोग केला होता. (ते मस्तक आणि धनुष्य मायेच्या द्वारे रचले गेले होते.) ॥१३॥
शोकस्ते विगतः सर्व कल्याणं त्वामुपस्थितम् ।
ध्रुवं त्वां भजते लक्ष्मीः प्रियं ते भवति शृणु ॥ १४ ॥
आता तुझे शोकाचे दिवस निघून गेले आहेत. सर्व प्रकारे कल्याण होण्याचा अवसर उपस्थित झाला आहे. निश्चितच लक्ष्मी तुमचे सेवन करत आहे. तुझे प्रिय कार्य होऊ लागलेले आहे, ते सांगते, तू ऐक. ॥१४॥
उत्तीर्य सागरं रामः सह वानरसेनया ।
संनिविष्टः समुद्रस्य तीरमासाद्य दक्षिणम् ॥ १५ ॥
श्रीरामचंद्र वानरसेनेसह समुद्र ओलांडून या तटावर येत आहेत. त्यांनी सागराच्या दक्षिण तटावर तळ ठोकला आहे. ॥१५॥
दृष्टो मे परिपूर्णार्थः काकुत्स्थः सहलक्ष्मणः ।
स हि तैः सागरान्तस्थैः बस्तिष्ठति रक्षितः ॥ १६ ॥
मी स्वत: लक्ष्मणासहित पूर्णकाम काकुत्स्थांचे दर्शन घेतले आहे. ते समुद्रतटावर उतरलेल्या आपल्या संगठित सेनांच्या द्वारे सर्वथा सुरक्षित आहेत. ॥१६॥
अनेन प्रेषिता ये च राक्षसा लघुविक्रमाः ।
राघवस्तीर्ण इत्येवं प्रवृत्तिस्तैरिहाहृता ॥ १७ ॥
रावणाने जे जे शीघ्रगामी राक्षस धाडले होते, त्या सर्वांनी येथे हाच समाचार आणला आहे की श्रीराघव समुद्रास पार करून येथे आले आहेत. ॥१७॥
स तां श्रुत्वा विशालाक्षि प्रवृत्तिं राक्षसाधिपः ।
एष मंत्रयते सर्वैः सचिवैः सह रावणः ॥ १८ ॥
विशाल लोचने ! हा समाचार ऐकून हा राक्षसराज रावण आपल्या सर्व मंत्र्यांच्या बरोबर गुप्त परामर्श करत आहे. ॥१८॥
इति ब्रुवाणा सरमा राक्षसी सीतया सह ।
सर्वोद्योगेन सैन्यानां शब्दं शुश्राव भैरवम् ॥ १९ ॥
ज्यावेळी राक्षसी सरमा सीतेला या गोष्टी सांगत होती त्याच वेळी तिने युद्धासाठी पूर्णत: उद्योगशील सैनिकांचा भैरवनाद ऐकला. ॥१९॥
दण्डनिर्घातवादिन्याः श्रुत्वा भेर्या महास्वनम् ।
उवाच सरमा सीताण् इदं मधुरभाषिणी ॥ २० ॥
दांड्‍यांच्या आघातांनी वाजविले गेलेल्या वाद्यांचा गंभीर नाद ऐकून मधुरभाषिणी सरमेने सीतेला म्हटले- ॥२०॥
संनाहजननी ह्येषा भैरवा भीरु भेरिका ।
भेरीनादं च गंभीरं शृणु तोयदनिःस्वनम् ॥ २१ ॥
भीरू ! हा भयानक भेरीनाद युद्धासाठीच्या तयारीची सूचना देत आहे. मेघगर्जने समान रणभेरींचा गंभीर घोष तू ही ऐक. ॥२१॥
कल्प्यन्ते मत्तमातङ्‌गा युज्यन्ते रथवाजिनः ।
दृष्यन्ते तुरगारूढाः प्रासहस्ताः सहस्रशः ॥ २२ ॥
मत्त हत्ती सजविले जात आहेत. रथाला घोडे जुंपले जात आहेत, आणि हजारो घोडेस्वार हातात भाले घेतलेले दृष्टिगोचर होत आहेत. ॥२२॥
तत्र तत्र च सन्नद्धाः संपतन्ति सहस्रशः ।
आपूर्यन्ते राजमार्गाः सैन्यैरद्‌भुतदर्शनैः ॥ २३ ॥

वेगवद्‌भिर्नदद्‌भिश्च तोयौघैरिव सागरः ।
जिकडून तिकडून युद्धासाठी संनध्द झालेले हजारो सैनिक धावत येत आहेत. सर्व रस्ते अद्‌भुत वेषात सजलेल्या आणि मोठ्‍या वेगाने गर्जना करणार्‍या सैनिकांनी ज्याप्रमाणे असंख्य जलप्रवाहांनी सागर भरून जातो, त्याप्रमाणे भरून जात आहेत. ॥२३ १/२॥
शस्त्राणां च प्रसन्नानां चर्मणां वर्मणां तथा ॥ २४ ॥

रथवाजिगजानां च राक्षसेंद्रानुयायिनाम् ।
संभ्रमो रक्षसामेष हृशितानां तरस्विनाम् ॥ २५ ॥

प्रभां विसृजतां पश्य नानावर्ण समुत्थिताम्
वनं निर्दहतो घर्मे यथा रूपं विभावसोः ॥ २६ ॥
नाना प्रकारची प्रभा पसरविणार्‍या चमचमणार्‍या अस्त्रशस्त्रांची, ढालींची आणि चिलखतांची (कवचांची) ती चमक तर पहा. राक्षसराज रावणाचे अनुगमन करणारे रथ, घोडे, हत्ती तसेच रोमांचित झालेले वेगवान्‌ राक्षस या सर्वामध्ये या समयी फार मोठी खळबळ उडालेली दिसून येत आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये वनास जाळत असणार्‍या दावानलाचे जसे जाज्वलमान रूप असते तशीच प्रभा या अस्त्रशस्त्रादिंची दिसून येत आहे. ॥२४-२६॥
घण्टानां शृणु निर्घोषं रथानां शृणु निःस्वनम् ।
हयानां हेषमाणानां शृणु तूर्यध्वनिं तथा ॥ २७ ॥
हत्तींच्या (गळ्यांतील) घंटांचा गंभीर घोष ऐका, रथांचा घडघडाट ऐका आणि खिंकाळणार्‍या घोड्‍यांचा आणि निरनिराळ्या प्रकारच्या वाद्यांचा आवाजही ऐका. ॥२७॥
उद्यतायुधहस्तानां राक्षसेन्द्रानुयायिनाम् ।
संभ्रमो रक्षसामेष तुमुलो लोमहर्षणः ॥ २८ ॥

श्रीस्त्वां भजति शोकघ्नी रक्षसां भयमागतम् ।
हातात हत्यारे घेतलेल्या रावणाच्या अनुगामी राक्षसामध्ये यासमयी फार संभ्रम पसरला आहे. यावरून हे जाणून घ्या की यांच्यावर काहीतरी भारी रोमांचकारी भय उपस्थित झाले आहे आणि शोकाचे निवारण करणारी लक्ष्मी तुमच्या सेवेत उपस्थित होत आहे. ॥२८ १/२॥
रामः कमलपत्राक्षो दैत्यानामिव वासवः॥ २९ ॥

विनिर्जित्य जितक्रोधः तमचिन्त्यपराक्रमः ।
रावणं समरे हत्वा भर्ता त्वाधिगमिष्यति ॥ ३० ॥
तुमचे पति कमलनयन श्रीराम क्रोधाला जिंकून चुकले आहेत. त्यांचा पराक्रम अचिंत्य आहे. ते दैत्यांना परास्त करणार्‍या इंद्राप्रमाणे राक्षसांना हरवून समरांगणात रावणाचा वध करून तुम्हांला प्राप्त करून घेतील. ॥२९-३०॥
विक्रमिष्यति रक्षःसु भर्ता ते सहलक्ष्मणः ।
यथा शत्रुषु शत्रुघ्नो विष्णुना सह वासवः ॥ ३१ ॥
ज्याप्रमाणे शत्रुसूदन इंद्राने उपेन्द्राच्या मदतीने शत्रूंच्यावर पराक्रम प्रकट केला होता, त्याप्रकारे तुमचे पतिदेव श्रीराम आपला भाऊ लक्ष्मण याच्या सहयोगाने राक्षसांवर आपल्या बळ-विक्रमाचे प्रदर्शन करतील. ॥३१॥
आगतस्य हि रामस्य क्षिप्रमङ्‌कागतां सतीम् ।
अहं द्रक्ष्यामि सिद्धार्थां त्वां शत्रौ विनिपातिते ॥ ३२ ॥
शत्रूं - रावणाचा संहार झाल्यावर मी शीघ्रच तुमच्या सारख्या सती-साध्वीला येथे आलेल्या श्रीरामांच्या अंकावर आनंदाने बसलेली पाहीन. आता लवकरच तुमचा मनोरथ पूरा होईल. ॥३२॥
अश्रूण्यानन्दजानि त्वं वर्तयिष्यसि जानकि ।
समागम्य परिष्वक्ता तस्योरसि महोरसः ॥ ३३ ॥
जानकी ! विशाल वक्ष:स्थळाने विभूषित श्रीराम भेटल्यावर त्यांच्या छातीशी लागून तू शीघ्रच नेत्रांतून आनंदाश्रू ढाळतील. ॥३३॥
अचिरान्मोक्ष्यते सीते देवि ते जघनं गताम् ।
धृतामेतां बहून् मासान् वेणीं रामो महावलः ॥ ३४ ॥
देवी सीते ! कित्येक महिन्यांपासून तुझ्या केसांची एकच वेणी जटेच्या रूपात परिणत होऊन जी कटिप्रदेशापर्यंत लटकत आहे, तिला महाबली श्रीराम शीघ्रच आपल्या हातांनी सोडतील. ॥३४॥
तस्य दृष्ट्‍वा मुखं देवि पूर्णचन्द्रमिवोदितम् ।
मोक्ष्यसे शोकजं वारि निर्मोकमिव पन्नगी ॥ ३५ ॥
देवी ! ज्याप्रमाणे नागीण कात टाकते, त्याच प्रकारे तूही उदित झालेल्या पूर्णचंद्रासमान आपल्या पतिचे मुदित मुख पाहून शोकाचे अश्रू ढाळणे सोडून देशील. ॥३५॥
रावणं समरे हत्वा न चिरादेव मैथिलि ।
त्वया समग्रः प्रियया सुखार्हो लप्स्यते सुखम् ॥ ३६ ॥
मिथिलेशकुमारी ! मैथिली ! समरांगणात शीघ्रच रावणाचा वध करून सुख भोगण्यास योग्य श्रीराम सफल मनोरथ होऊन तुझ्यासह, आपल्या प्रियतमेसह मनोवांछित सुख प्राप्त करतील. ॥३६॥
सभाजिता त्वं वीर्येण मोदिष्यसि महात्मना ।
सुवर्षेण समायुक्ता यथा सस्येन मेदिनी ॥ ३७ ॥
जशी पृथ्वी उत्तम जलवृष्टिने अभिषिक्त होऊन हिरव्यागर पिकांनी बहरून येते त्याप्रकारे तू महात्मा श्रीरामांकडून सन्मानित होऊन आनंदमग्न होशील. ॥३७॥
गिरिवरमभितो विवर्तमानो
हय इव मण्डलमाशु यः करोति ।
तमिह शरणमभ्युपैहि देवि
दिवसकरं प्रभवो ह्ययं प्रजानाम् ॥ ३८ ॥
देवी ! जे गिरीवर मेरूंच्या चारी बाजूस फिरणार्‍या अश्वाप्रमाणे शीघ्रतापूर्वक मंडलाकार गतिने चालतात, त्या भगवान्‌ सूर्यांचा (जे तुमचे कुलदैवत आहेत) तू येथे आश्रय घे त्यांना शरण जा, कारण की प्रजाजनांचा सुख देणे तसेच त्यांचे दु:ख दूर करण्यास ते समर्थ आहेत. ॥३८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्रयस्त्रिंशः सर्गः ॥ ३३ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा तेहतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP