4
श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्रिसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
स्वीयं मृतं बालकं उपादाय राजद्वारि समागत्य कस्यचिद् ब्राह्मणस्य विलापः -
एका ब्राह्मणाने आपल्या मेलेल्या बालकाला राजद्वारावर आणणे तसेच राजाला दोषी ठरवून विलाप करणे -
प्रस्थाप्य तु स शत्रुघ्नं भ्रातृभ्यां सह राघवः ।
प्रमुमोद सुखी राज्यं धर्मेण परिपालयन् ॥ १ ॥
शत्रुघ्नांना त्यांच्या पुरीला धाडून देऊन भगवान्‌ श्रीराम, भरत आणि लक्ष्मण दोन्ही भावांसह धर्मपूर्वक राज्याचे पालन करीत मोठ्‍या सुखाने आणि आनंदात राहू लागले. ॥१॥
ततः कतिपयाहःसु वृद्धो जानपदो द्विजः ।
मृतं बालमुपादाय राजद्वारमुपागमत् ॥ २ ॥
त्यानंतर काही दिवसानंतर त्या जनपदात राहाणारा एक वृद्ध ब्राह्मण आपल्या मृत बालकाचे शव घेऊन राजद्वारावर आला. ॥२॥
रुदन् बहुविधा वाचः स्नेहदुःखसमन्वितः ।
असकृत् पुत्रपुत्रेति वाक्यमेतदुवाच ह ॥ ३ ॥
तो स्नेह आणि दुःखाने व्याकुळ होऊन नाना प्रकारच्या गोष्टी बोलत रडत होता आणि वारंवार मुला ! मुलाचा उच्चार करीत विलाप करत होता. ॥३॥
किं नु मे दुष्कृतं कर्म पुरा देहान्तरे कृतम् ।
यदहं पुत्रमेकं त्वां पश्यामि निधनं गतम् ॥ ४ ॥
हाय ! मी पूर्वजन्मात असे कोठले पाप केले होते की ज्यामुळे आज या डोळ्यांनी मी आपल्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यु पहात आहे. ॥४॥
अप्राप्तयौवनं बालं पञ्चवर्षसहस्रकम् ।
अकाले कालमापन्नं मम दुःखाय पुत्रक ॥ ५ ॥
मुला ! अद्याप तर तू बालकच होतास. तरूणही झाला नाहीस. केवळ पाच हजार(**) दिवसाचे (तेरा वर्षे, दहा महिने, वीस दिवस) तुझे आयुष्य होते. तरीही मला दुःख देण्यासाठी अकालीच तू मृत्युमुखात निघून गेलास. ॥५॥
(** - मूळात जो पञ्चवर्ष सहस्त्रकम्‌ पद आले आहे. यात वर्ष शब्दाचा अर्थ दिन समजला पाहिजे. जसे सहस्त्र संवत्सर सत्रमुपासीत्‌ इत्यादि विधि वाक्यात सवंत्सर शब्द दिवसाचा वाचक मानला गेला आहे.)
अल्पैरहोभिर्निधनं गमिष्यामि न संशयः ।
अहं च जननी चैव तव शोकेन पुत्रक ॥ ६ ॥
वत्सा ! तुझ्या शोकाने मी आणि तुझी माता - दोघेही थोड्‍याच दिवसात मरून जाऊ, यात संशय नाही. ॥६॥
न स्मराम्यनृतं ह्युक्तं न च हिंसां स्मराम्यहम् ।
सर्वेषां प्राणिनां पापं न स्मरामि कदाचन ॥ ७ ॥
मला आठवत नाही की मी कधी खोटी गोष्ट मुखांतून काढली आहे. कुणाची हिंसा केली असेल अथवा समस्त प्राण्यांमध्ये कुणालाही कधी कष्ट पोहोचविले आहेत. ॥७॥
केनाद्य दुष्कृतेनायं बाल एव ममात्मजः ।
अकृत्वा पितृकार्याणि गतो वैवस्वतक्षयम् ॥ ८ ॥
मग आज कुठल्या पापाने माझा हा मुलगा पितृकर्म न करतांच या बाल्यावस्थेतच यमराजांच्या घरी निघून गेला. ॥८॥
नेदृशं दृष्टपूर्वं मे श्रुतं वा घोरदर्शनम् ।
मृत्युरप्राप्तकालानां रामस्य विषये यथा ॥ ९ ॥
श्रीरामांच्या राज्यात तर अकाल-मृत्युची अशी भयंकर घटना ना पूर्वी कधी पाहिली गेली होती आणि ना ऐकण्यातही आली होती. ॥९॥
रामस्य दुष्कृतं किञ्चिद् महदस्ति न संशयः ।
यथा हि विषयस्थानां बालानां मृत्युरागतः ॥ १० ॥
निःसंदेह श्रीरामांचेच कुठले तरी महान्‌ दुष्कर्म आहे ज्यायोगे त्यांच्या राज्यात राहणार्‍या बालकांचा मृत्यु होऊ लागला आहे. ॥१०॥
नह्यन्यविषयस्थानां बालानां मृत्युतो भयम् ।
त्वं राजञ्जीवयस्वैनं बालं मृत्युवशं गतम् ॥ ११ ॥

राजद्वारि मरिष्यामि पत्‍न्या् सार्धमनाथवत् ।
ब्रह्महत्यां ततो राम समुपेत्य सुखी भव ॥ १२ ॥
दुसर्‍या राज्यात राहणार्‍या बालकांना मृत्युचे भय नाही आहे; म्हणून राजन्‌ ! मृत्युच्या अधीन झालेल्या या बालकास जिवंत करावे नाहींतर मी आपल्या स्त्रीसह या राजद्वारावर अनाथाप्रमाणे प्राण देईन. श्रीरामा ! मग ब्रह्महत्येचा पाप घेऊन तू सुखी हो. ॥११-१२॥
भ्रातृभिः सहितो राजन् दीर्घमायुरवाप्स्यसि ।
उषिताः स्म सुखं राज्ये तवास्मिन् सुमहाबल ॥ १३ ॥
महाबली नरेश ! आम्ही तुझ्या राज्यात अत्यंत सुखाने राहिलो आहोत. म्हणून तू आपल्या भावांसह दीर्घजीवी होशील. ॥१३॥
इदं तु पतितं तस्मात् तव राम वशे स्थितान् ।
कालस्य वशमापन्नाः स्वल्पं हि नहि नः सुखम् ॥ १४ ॥
श्रीरामा ! तुझ्या अधीन राहाणार्‍या आम्हां लोकांवर हे बालक मरणरूपी दुःखी एकाएकी येऊन पडले आहे, ज्यामुळे आम्ही स्वतःही काळाच्या अधीन झालो आहोत, म्हणून तुझ्या या राज्यात आम्हांला थोडेसे सुद्धा सुख मिळालेले नाही. ॥१४॥
सम्प्रत्यनाथो विषय इक्ष्वाकूणां महात्मनाम् ।
रामं नाथमिहासाद्य बालान्तकरणं ध्रुवम् ॥ १५ ॥
महात्मा इक्ष्वाकुवंशी नरेशांचे हे राज्य आता अनाथ झाले आहे. श्रीरामांना स्वामींच्या रूपात प्राप्त करून येथे बालकांचा मृत्यु अटळ आहे. ॥१५॥
राजदोषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः ।
असद्‌वृत्ते हि तु नृपतौ अकाले म्रियते जनः ॥ १६ ॥
राजाच्या दोषाने जेव्हा प्रजेचे विधिवत्‌ पालन होत नाही, तेव्हा प्रजावर्गाला अशा विपत्तिंचा सामना करावा लागत आहे. राजा दुराचारी होण्यानेही प्रजेचा अकाल मृत्यु होतो. ॥१६॥
यद्वा पुरेष्वयुक्तानि जना जनपदेषु च ।
कुर्वते न च रक्षाऽस्ति तदा कालकृतं भयम् ॥ १७ ॥
अथवा नगरात तसेच जनपदात राहाणारे लोक जेव्हा अनुचित कर्म-पापाचार करतात आणि तेथे रक्षणाची काही व्यवस्था असत नाही, त्यांना अनुचित कर्म करण्यापासून अडविणारा काही उपाय केला जात नाही, तेव्हा देशातील प्रजेमध्ये अकाल-मृत्युचे भय प्राप्त होते. ॥१७॥
सुव्यक्तं राजदोषो हि भविष्यति न संशयः ।
पुरे जनपदे चापि तथा बालवधो ह्ययम् ॥ १८ ॥
म्हणून हे स्पष्ट आहे की नगर अथवा राज्यात कोठे तरी राजाकडूनच काही अपराध झालेला आहे. म्हणून याप्रकारे बालकाचा मृत्यु झाला आहे यात संशय नाही. ॥१८॥
एवं बहुविधैर्वाक्यैः उपरुध्य मुहुर्मुहुः ।
राजानं दुःखसन्तप्तः सुतं तमुपगूहति ॥ १९ ॥
याप्रकारे अनेक प्रकारच्या वाक्यांनी त्याने वारंवार राजाच्या समोर आपले दुःख निवेदन केले आणि वारंवार शोकाने संतप्त होऊन तो आपल्या पुत्राला उचलून हृदयाशी लावत राहिला. ॥१९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्रिसप्ततितमः सर्गः ॥ ७३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील उत्तरकाण्डाचा त्र्याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP