श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ अष्टसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणास्याज्ञया मकराक्षस्य युद्धाय प्रस्थानम् -
रावणाच्या आज्ञेने मकराक्षचे युद्धासाठी प्रस्थान -
निकुम्भं च हतं श्रुत्वा कुम्भं च विनिपातितम् ।
रावणः परमामर्षी प्रजज्वालानलो यथा ॥ १ ॥
निकुंभ आणि कुंभ मारले गेल्याचे ऐकून रावणाला फार क्रोध आला तो आगीप्रमाणे भडकून गेला. ॥१॥
नैर्ऋतः क्रोधशोकाभ्यां द्वाभ्यां तु परिमूर्च्छितः ।
खरपुत्रं विशालाक्षं मकराक्षमचोदयत् ॥ २ ॥
रावणाने क्रोध आणि शोक दोन्हीमुळे व्याकुळ होऊन विशाल नेत्र असलेल्या खरपुत्र मकराक्षाला म्हटले- ॥२॥
गच्छ पुत्र मयाऽऽज्ञप्तो बलेनाभिसमन्वितः ।
राघवं लक्ष्मणं चैव जहि तांश्च वनौकसौ ॥ ३ ॥
पुत्रा ! माझ्या आज्ञेने विशाल सेनेसह जा आणि वानरांसहित त्या दोन्ही भावांचा राघव आणि लक्ष्मणास मारून टाक. ॥३॥
रावणस्य वचः श्रुत्वा शूरमानी खरात्मजः ।
बाढमित्यब्रवीद् धृष्टो मकाराक्षो निशाचरः ॥ ४ ॥

सोऽभिवाद्य दशग्रीवं कृत्वा चापि प्रदक्षिणम् ।
निर्जगाम गृहाच्छुभ्राद् रावणस्याज्ञया बली ॥ ५ ॥
रावणाचे हे वचन ऐकून आपल्याला शूरवीर मानणार्‍या खरपुत्र मकराक्षाने हर्षाने म्हटले - फार चांगले ! नंतर त्या बलवान्‌ वीराने रावणाला प्रणाम करून त्याची परिक्रमा केली आणि त्याची आज्ञा घेऊन तो उज्वळ राजभवनातून निघाला. ॥४-५॥
समीपस्थं बलाध्यक्षं खरपुत्रोऽब्रवीद् वचः ।
रथमानीयतां तूर्णं सैन्यं त्वानीयतां त्वरात् ॥ ६ ॥
जवळच सेनाध्यक्ष उभा होता. खराच्या पुत्राने त्यास म्हटले - सेनापति ! शीघ्र रथ घेऊन या आणि तात्काळ सेनेला ही बोलवा. ॥६॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा बलाध्यक्षो निशाचरः ।
स्यन्दनं च बलं चैव समीपं प्रत्यपादयत् ॥ ७ ॥
मकराक्षाचे वचन ऐकून निशाचर सेनापतिने रथ आणि सेना आणून त्याच्या जवळ उभी केली. ॥७॥
प्रदक्षिणं रथं कृत्वा आरुरोह निशाचरः ।
सूतं संचोदयामास शीघ्रं मे रथमावह ॥ ८ ॥
तेव्हा मकराक्षाने रथास प्रदक्षिणा घातली आणि त्याच्यावर आरूढ होऊन सारथ्याला आदेश दिला - रथाला शीघ्रतापूर्वक घेऊन चल. ॥८॥
अथ तान् राक्षसान् सर्वान् मकराक्षोऽब्रवीदिदम् ।
यूयं सर्वे प्रयुध्यध्वं पुरस्तान्मम राक्षसाः ॥ ९ ॥
यानंतर मकराक्षाने समस्त राक्षसांना सांगितले - निशाचरांनो ! तुम्ही लोक माझ्या पुढे राहून युद्ध करा. ॥९॥
अहं राक्षसराजेन रावणेन महात्मना ।
आज्ञप्तः समरे हन्तुं तावुभौ रामलक्ष्मणौ ॥ १० ॥
मला महामना राक्षसराज रावणाने समरभूमीमध्ये राम आणि लक्ष्मण दोन्ही भावांना मारण्याची आज्ञा दिली आहे. ॥१०॥
अद्य रामं वधिष्यामि लक्ष्मणं च निशाचराः ।
शाखामृगं च सुग्रीवं वानरांश्च शरोत्तमैः ॥ ११ ॥
राक्षसांनो ! आज मी राम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव तसेच दुसर्‍या इतर वानरांचा आपल्या उत्तम तीक्ष्ण बाणांच्या द्वारे वध करीन. ॥११॥
अद्य शूलनिपातैश्च वानराणां महाचमूम् ।
प्रदहिष्यामि सम्प्राप्तां शुष्केन्धनमिवानलः ॥ १२ ॥
ज्याप्रमाणे आग वाळलेल्या लाकडांना जाळून टाकते, त्याच प्रकारे आज मी शूलांच्या मारानी समोर आलेल्या वानरांच्या विशाल वाहिनीला दग्ध करून टाकीन. ॥१२॥
मकराक्षस्य तच्छ्रुत्वा वचनं ते निशाचराः ।
सर्वे नानायुधोपेता बलवन्तः समागताः ॥ १३ ॥
मकराक्षाचे हे वचन ऐकून नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांनी संपन्न ते समस्त बलवान्‌ निशाचर युद्धासाठी सावधान झाले. ॥१३॥
ते कामरूपिणः सर्वे दंष्ट्रिणः पिङ्‌गलेक्षणाः ।
मातङ्‌गा इव नर्दन्तो ध्वस्तकेशा भयावहाः ॥ १४ ॥

परिवार्य महाकाया महाकायं खरात्मजम् ।
अभिजग्मुस्ततो हृष्टाः चालयन्तो वसुन्धराम् ॥ १५ ॥
ते सर्वच्या सर्व इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे आणि क्रूर स्वभावाचे होते. त्यांच्या दाढा मोठ मोठ्‍या आणि डोळे पिंगट वर्णाचे होते. त्यांचे केस सर्वत्र विखुरलेले होते (पिंजारलेले होते) म्हणून ते फार भयानक वाटत होते. हत्तींप्रमाणे चित्कार करत ते विशालकाय निशाचर खराचा पुत्र महाकाय मकराक्षाला चारी बाजूनी घेरून पृथ्वीला कंपित करत मोठ्‍या आनंदाने युद्धभूमीकडे निघाले. ॥१४-१५॥
शङ्‌खभेरीसहस्राणां आहतानां समन्ततः ।
क्ष्वेलितास्फोटितानां च ततः शब्दो महानभूत् ॥ १६ ॥
त्यासमयी चोहो बाजूस हजारो शंखांचा ध्वनी होत होता. हजारो डंके पिटले जात होते. योद्धांच्या गर्जना आणि षड्‍डू ठोकणे यांचा आवाज ही त्यात मिसळला होता. याप्रकारे तेथे फार मोठा कोलाहल माजला होता. ॥१६॥
प्रभ्रष्टोऽथ करात् तस्य प्रतोदः सारथेस्तदा ।
पपात सहसा दैवाद् ध्वजस्तस्य च रक्षसः ॥ १७ ॥
त्यासमयी मकराक्षाच्या सारथ्याच्या हातातून चाबूक सुटून खाली पडला आणि दैववश त्या राक्षसाचा ध्वजही एकाएकी धराशायी झाला. ॥१७॥
तस्य ते रथसंयुक्ता हया विक्रमवर्जिताः ।
चरणैराकुलैर्गत्वा दीनाः सास्रमुखा ययुः ॥ १८ ॥
त्याच्या रथाला जुंपलेले घोडे विक्रमरहित झाले - ते आपल्या नानाप्रकारच्या विचित्र चाली विसरून गेले. प्रथम काही अंतरापर्यंत व्याकुळ अडखळणार्‍या पावलांनी गेले, नंतर ठीक चालू लागले. परंतु आतून ते फार दुःखी होते. त्यांच्या मुखावरून अश्रूंच्या धारा वहात होत्या. ॥१८॥
प्रवाति पवनस्तस्मिन् सपांसुः खरदारुणः ।
निर्याणे तस्य रौद्रस्य मकराक्षस्य दुर्मतेः ॥ १९ ॥
दुष्ट बुद्धिच्या त्या भयंकर राक्षसाच्या - मकराक्षाच्या यात्रेच्या समयी धुळीने भरलेला दारूण आणि प्रचण्ड वारा वाहू लागला होता. ॥१९॥
तानि दृष्ट्‍वा निमित्तानि राक्षसा वीर्यवत्तमाः ।
अचिन्त्य निर्गताः सर्वे यत्र तौ रामलक्ष्मणौ ॥ २० ॥
त्या सर्व अपशकुनांना पाहूनही तो महाबलशाली राक्षस त्यांची काही पर्वा न करता सर्वच्या सर्व ज्या ठिकाणी रामलक्ष्मण विद्यमान होते त्या स्थानी गेला. ॥२०॥
घनगजमहिषाङ्‌गतुल्यवर्णाः
समरमुखेष्वसकृद् गदासिभिन्नाः ।
अहमहमिति युद्धकौशलास्ते
रजनिचराः परिबभ्रमुर्मुहस्ते ॥ २१ ॥
त्या राक्षसांची अंगकांती मेघ, हत्ती आणि रेड्‍यांच्या प्रमाणे काळी होती. ते युद्धाच्या आरंभीच अनेकवेळा गदा आणि तलवारीच्या प्रहाराने घायाळ होऊन चुकले होते. त्यांच्या ठिकाणी युद्धविषयक कौशल्य विद्यमान होते. ते निशाचर प्रथम मी युद्ध करीन, प्रथम मी युद्ध करीन असे वारंवार म्हणत तेथे सर्वत्र फिरू लागले. ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टसप्ततितमः सर्गः ॥ ७८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा अठ्ठ्याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP