श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। द्विपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वसिष्टेन राज्ञो विश्वामित्रस्य सत्काराय मनोवाञ्छितवस्तूनि स्रष्टुं कामधेनुं प्रत्यादेशदानम् - महर्षि वसिष्ठ द्वारा विश्वामित्रांचा सत्कार आणि कामधेनुला अभीष्ट वस्तूंची सृष्टि करण्याचा आदेश -
तं दृष्ट्‍वा परमप्रीतो विश्वामित्रो महाबलः ।
प्रणतो विनयाद् वीरो वसिष्ठं जपतां वरम् ॥ १ ॥
जप करणारांत श्रेष्ठ वसिष्ठांचे दर्शन करून महाबली वीर विश्वामित्र अत्यंत प्रसन्न झाले आणि विनयपूर्वक त्यांनी वसिष्ठांच्या चरणी प्रणाम केला. ॥ १ ॥
स्वागतं तव चेत्युक्तो वसिष्ठेन महात्मना ।
आसनं चास्य भगवान् वसिष्ठो व्यादिदेश ह ॥ २ ॥
तेव्हां वसिष्ठ म्हणाले - "राजन् ! तुमचे स्वागत आहे" असे म्हणून भगवान वसिष्ठांनी त्यांना बसण्यासाठी आसन दिले. ॥ २ ॥
उपविष्टाय च तदा विश्वामित्राय धीमते ।
यथान्यायं मुनिवरः फलमूलमुपाहरत् ॥ ३ ॥
जेव्हां बुद्धिमान विश्वामित्र आसनवर विरजमान झाले तेव्हां मुनिवर वसिष्ठांनी त्यांना विधिपूर्वक फल-मूलाचा उपहार अर्पित केला. ॥ ३ ॥
प्रतिगृह्यतु तां पूजां वसिष्ठाद् राजसत्तमः ।
तपोऽग्निहोत्रशिष्येषु कुशलं पर्यपृच्छत ॥ ४ ॥

विश्वामित्रो महातेजा वनस्पतिगणे तदा ।
सर्वत्र कुशलं प्राह वसिष्ठो राजसत्तमम् ॥ ५ ॥
वसिष्ठांकडून हा आतिथ्य सत्कार ग्रहण करून राजशिरोमणि महातेजस्वी विश्वामित्रांनी त्यांचे तप, अग्निहोत्र, शिष्यवर्ग, आणि लता-वृक्ष आदिंचा कुशल समाचार विचारला. नंतर वसिष्ठांनी सर्व काही सकुशल असल्याचे सांगितले. ॥ ४-५ ॥
सुखोपविष्टं राजानं विश्वामित्रं महातपाः ।
पप्रच्छ जपतां श्रेष्ठो वसिष्ठो ब्रह्मणः सुतः ॥ ६ ॥
तद्‍नंतर जप करणार्‍यांत श्रेष्ठ ब्रह्मकुमार महातपस्वी वसिष्ठांनी तेथे सुखपूर्वक बसलेल्या राजा विश्वामित्रांना या प्रकारे विचारले - ॥ ६ ॥
कच्चित्ते कुशलं राजन् कच्चिद् धर्मेण रञ्जयन् ।
प्रजाः पालयसे वीर राजवृत्तेन धार्मिक ॥ ७ ॥
"राजन् ! तुम्ही सकुशल तर आहांत ना ? धर्मात्मा नरेश ! काय तुम्ही धर्मपूर्वक प्रजेला प्रसन्न ठेऊन राजोचित रीतिने, नीतिने प्रजावर्गाचे पालन करीत आहांत ? ॥ ७ ॥
कच्चित्ते सम्भृता भृत्याः कच्चित् तिष्ठन्ति शासने ।
कच्चित्ते विजिताः सर्वे रिपवो रिपुसूदन ॥ ८ ॥
'शत्रुसूदन ! काय तुम्ही आपल्या भृत्यांचे चांगल्या प्रकारे भरण पोषण केले आहे ना ? काय ते तुमच्या आज्ञेच्या अधीन राहतात ना ? तुम्ही समस्त शत्रुंवर विजय मिळविला आहे ना ? ॥ ८ ॥
कच्चिद् बलेषु कोशेषु मित्रेषु च परंतप ।
कुशलं ते नरव्याघ्र पुत्रपौत्रे तथानघ ॥ ९ ॥
'शत्रुंना संताप देणार्‍या पुरुषसिंह निष्पाप नरेशा ! काय तुझी सेना, कोश, मित्रवर्ग तथा पुत्र-पौत्र आदि सर्व सकुशल आहेत ना ?" ॥ ९ ॥
सर्वत्र कुशलं राजा वसिष्ठं प्रत्युदाहरत् ।
विश्वामित्रो महातेजा वसिष्ठं विनयान्वितम् ॥ १० ॥
तेव्हां महातेजस्वी राजा विश्वामित्रांनी विनयशील महर्षि वसिष्ठांना उत्तर दिले - " हो भगवन् ! माझ्या येथे सर्वत्र कुशल आहे." ॥ १० ॥
कृत्वा तौ सुचिरं कालं धर्मिष्ठौ ताः कथास्तदा ।
मुदा परमया युक्तौ प्रीयेतां तौ परस्परम् ॥ ११ ॥
तत्पश्चात् ते दोघे धर्मात्मा पुरुष अत्यंत प्रसन्नतापूर्वक बराच वेळपर्यंत परस्परांत वार्तालाप करीत राहिले. त्या समयी दोघांना एकमेकाविषयी खूप प्रेम उत्पन्न झाले. ॥ ११ ॥
ततो वसिष्ठो भगवान् कथान्ते रघुनन्दन ।
विश्वामित्रमिदं वाक्यमुवाच प्रहसन्निव ॥ १२ ॥
'रघुनन्दना ! वार्तालाप केल्यानंतर भगवान् वसिष्ठांनी विश्वामित्रास हसत हसत असे म्हटले - ॥ १२ ॥
आतिथ्यं कर्तुमिच्छामि बलस्यास्य महाबल ।
तव चैवाप्रमेयस्य यथार्हं सम्प्रतीच्छ मे ॥ १३ ॥
'महाबली नरेश ! तुमचा प्रभाव असीम आहे. मी तुमचा आणि तुमच्या सेनेचा यथायोग्य अतिथि-सत्कार करू इच्छितो. तुम्ही माझ्या अनुरोधाचा स्वीकार करावा. ॥ १३ ॥
सत्क्रियां हि भवानेतां प्रतीच्छतु मया कृताम् ।
राजंस्त्वमतिथिश्रेष्ठः पूजनीयः प्रयत्‍नतः ॥ १४ ॥
'राजन् ! तुम्ही अतिथिंमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून यत्‍नपूर्वक तुमचा सत्कार करणे माझे कर्तव्य आहे. म्हणून माझ्याकडून केल्या जाणर्‍या या सत्कारास तुम्ही ग्रहण करा.' ॥ १४ ॥
एवमुक्तो वसिष्ठेन विश्वामित्रो महामतिः ।
कृतमित्यब्रवीद् राजा पूजावाक्येन मे त्वया ॥ १५ ॥
वसिष्ठांनी असे म्हटल्यावर महाबुद्धिमान राजा विश्वामित्रांनी म्हटले - "मुने ! आपल्या सत्कारपूर्ण वचनांनीच माझा पूर्ण सत्कार झाला आहे. ॥ १५ ॥
फलमूलेन भगवन् विद्यते यत् तवाश्रमे ।
पाद्येनाचमनीयेन भगवद्दर्शनेन च ॥ १६ ॥
'भगवन् ! आपल्या आश्रमात जे विद्यमान आहे, त्या फल-मूल, पाद्य आणि आचमनीय आदि वस्तुंनी माझा उत्तम प्रकारे आदर सत्कार झाला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले दर्शन झाले आहे त्यानेच मी धन्य झालो आहे. ॥ १६ ॥
सर्वथा च महाप्राज्ञ पूजार्हेण सुपूजितः ।
नमस्तेऽस्तु गमिष्यामि मैत्रेणेक्षस्व चक्षुषा ॥ १७ ॥
'महाज्ञानी महर्षे ! आपण सर्वथा मला पूजनीय आहात. तरीही आपण माझे उत्तम प्रकारे पूजन केले आहे. आपल्याला नमस्कार आहे. आता मी येथून जाईन. आपण कृपापूर्ण दृष्टीने माझ्याकडे पहावे." ॥ १७ ॥
एवं ब्रुवन्तं राजानं वसिष्ठः पुनरेव हि ।
न्यमन्त्रयत धर्मात्मा पुनः पुनरुदारधीः ॥ १८ ॥
असे म्हणणार्‍या राजा विश्वामित्रांस उदारचेता धर्मात्मा वसिष्ठांनी निमंत्रण स्वीकारण्यास वारंवार आग्रह केला. ॥ १८ ॥
बाढमित्येव गाधेयो वसिष्ठं प्रत्युवाच ह ।
यथाप्रियं भगवतस्तथास्तु मुनिपुङ्‌गवः ॥ १९ ॥
तेव्हां गाधिनन्दन विश्वामित्रांनी त्यांना आपण मला पूज्य आहात, आपली जशी रुची असेल, आपल्याला जे प्रिय असेल, तसेच होवो. ॥ १९ ॥
एवमुक्तस्तथा तेन वसिष्ठो जपतां वरः ।
आजुहाव ततः प्रीतः कल्माषीं धूतकल्मषाम् ॥ २० ॥
राजाने असे म्हटल्यावर जप करणार्‍यांत श्रेष्ठ मुनिवर वसिष्ठ फार प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या चितकबर्‍या होम-धेनूला बोलाविले, जिचे पाप धुतले गेले होते. (ती कामधेनु होती.) ॥ २० ॥
एह्येहि शबले क्षिप्रं शृणु चापि वचो मम ।
सबलस्यास्य राजर्षेः कर्तुं व्यवसितोऽस्म्यहम् ।
भोजनेन महार्हेण सत्कारं संविधत्स्व मे ॥ २१ ॥
(तिला बोलावून ऋषिंनी सांगितले) - "शबले ! शीघ्र ये, ये आणि मी सांगतो ते ऐक. मी सेनेसहित या राजर्षिंचा महाराजांना योग्य अशा उत्तम भोजन आदिच्या द्वारा आतिथ्य सत्कार करण्याचा निश्चय केला आहे. तू माझा हा मनोरथ सफल कर. ॥ २१ ॥
यस्य यस्य यथाकामं षड्‌रसेष्वभिपूजितम् ।
तत् सर्वं कामधुग् दिव्ये अभिवर्ष कृते मम ॥ २२ ॥
षड्‍रस भोजनापैकी ज्याला जे जे पसंत असेल, त्याच्यासाठी ते सर्व प्रस्तुत कर. दिव्य कामधेनू ! आज माझ्या आदेशावरून या अतिथिंसाठी अभीष्ट वस्तूंची वृष्टि कर. ॥ २२ ॥
रसेनान्नेन पानेन लेह्यचोष्येण संयुतम् ।
अन्नानां निचयं सर्वं सृजस्व शबले त्वर ॥ २३ ॥
'शबले ! सरस पदार्थ, अन्न, पान, लेह्य आणि चोष्ट्य यांनी युक्त विविध प्रकारच्या अन्नांचे ढीग लाव. सर्व आवश्यक वस्तुंची सृष्टि कर. शीघ्रता कर. विलंब होऊ देऊ नको." ॥ २३ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्विपञ्चाशः सर्गः ॥ ५२ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा बावन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५२ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP