|
| राक्षसीभिः सीतायाः प्रबोधनम् - 
 | राक्षसींचे सीतेला समजाविणे - | 
| इक्त्युक्त्वा मैथिलीं राजा रावणः शत्रुरावणः । सन्दिश्य च ततः सर्वा राक्षसीर्निर्जगाम ह ॥ १ ॥
 
 | त्यानन्तर शत्रूंमध्ये हाहाःकर करून त्यांना रडविणारा राजा रावण सीतेला या प्रमाणे पूर्वोक्त बोलून तथा सर्व राक्षसींना सीतेला वश करून घेण्याविषयी आदेश देऊन, तेथून निघून गेला. ॥१॥ | 
| निष्क्रान्ते राक्षसेन्द्रे तु पुनरन्तःपुरं गते । राक्षस्यो भीमरूपास्ताः सीतां समभिदुद्रुवुः ॥ २ ॥
 
 | अशोक वाटिकेतून निघून राक्षसराज रावण ज्यावेळी अन्तःपुरात निघून गेला तेव्हा भयानक रूप धारण करणार्या ज्या राक्षसीणी तेथे होत्या त्या सर्व बाजूनी धावून सीतेपाशी आल्या. ॥२॥ | 
| ततः सीतामुपागम्य राक्षस्यः क्रोधमूर्छिताः । परं परुषया वाचा वैदेहीं इदमब्रुवन् । ॥ ३ ॥
 
 | विदेहराजकुमारी सीतेजवळ आल्यावर क्रोधाने व्याप्त झालेल्या त्या राक्षस स्त्रिया अत्यन्त कठोर वाणीने तिला म्हणू लागल्या- ॥३॥ | 
| पौलस्तस्य वरिष्ठस्य रावणस्य महात्मनः । दशग्रीवस्य भार्यात्वं सीते न बहु मन्यसे ॥ ४ ॥
 
 | हे सीते ! पुलस्त्य कुळात उत्पन्न झालेल्या श्रेष्ठ अशा महात्मा दशग्रीवाची भार्या बनणे ही गोष्ट तुला मोठी महत्वाची चांगली वाटत नाही का ? ॥४॥ | 
| ततस्त्वेकजटा नाम राक्षसी वाक्यमब्रवीत् । आमन्त्र्य क्रोधताम्राक्षी सीतां करतलोदरीम् ॥ ५ ॥
 
 | त्यानन्तर क्रोधाने जिचे डोळे लाल बुन्द झाले आहेत अशी एकजटा नावाची राक्षसी, त्या कृशोदरी सीतेला हाक मारून म्हणली- ॥५॥ | 
| प्रजापतीनां षण्णां तु चतुर्थोऽयं प्रजापतिः । मानसो ब्राह्मणः पुत्र पुलस्त्य इति विश्रुतः ॥ ६ ॥
 
 | विदेहकुमारी ! सहा प्रजापतींमध्ये पुलत्स्य हे चौथे आहेत आणि ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. या रूपात त्यांची सर्वत्र ख्याती आहे. ॥६॥ | 
| पुलस्तस्य तु तेजस्वी महर्षिर्मानसः सुतः । नाम्ना स विश्रवा नाम प्रजापतिसमप्रभः ॥ ७ ॥
 
 | पुलत्स्यांचे मानसपुत्र तेजस्वी महर्षी विश्रवा आहेत, तेही प्रजापतीं प्रमाणेच प्रकाशित होत असतात. ॥७॥ | 
| तस्य पुत्रो विशालाक्षि रावणः शत्रुरावणः । तस्य त्वं राक्षसेन्द्रस्य भार्या भवितुमर्हसि ॥ ८ ॥
 
 महोक्तं चारुसर्वाङ्गि वाक्यं किं नानुमन्यसे ।
 
 | हे विशालाक्षी ! शत्रूंना रडविणारा रावण राक्षसराज हा त्यांचा पुत्र आणि सर्व राक्षसांचा राजा आहे. तू त्याची भार्या होणे आवश्यक आहे. हे सर्वांग सुन्दरी ! मी जे काही सांगत आहे, त्यास तू अनुमोदन का देत नाहीस ? ॥८ १/२॥ | 
| ततो हरिजटा नाम राक्षसी वाक्यमब्रवीत् ॥ ९ ॥ 
 विवृत्य नयने कोपान्मार्जारसदृशेक्षणा ।
 येन देवास्त्रयस्त्रिंशद् देवराजश्च निर्जितः ॥ १० ॥
 
 तस्य त्वं राक्षसेन्द्रस्य भार्या भवितुमर्हसि ।
 
 | त्यानन्तर माञ्जरासारखे घारे डोळे असणारी हरिजटा नावाची राक्षसी क्रोधाने डोळे वटारून बोलू लागली- अग ! ज्याने तेहतीस कोटी देवता तथा इन्द्र यांचाही पराभव केला आहे त्या राक्षसराज रावणाची राणी तर तू अवश्य झाली पाहिजेस. ॥९-१० १/२॥ | 
| वीर्योत्सिक्तस्य शूरस्य संग्रामेष्वनिवर्तिनः । बलिनो वीर्ययुक्तस्य भार्या त्वं किं न लिप्ससे ॥ ११ ॥
 
 | त्याला आपल्या पराक्रमाबद्दल गर्व आहे. तो युद्धात कधीही माघार न घेणारा शूरवीर आहे. अशा बल पराक्रम संपन्न पुरुषाची भार्या होणे तुला का आवडत नाही बरे ? ॥११॥ | 
| प्रियां बहुमतां भार्यां त्यक्त्वा राजा महाबलः । सर्वासां च महाभागां त्वामुपैष्यति रावणः ॥ १२ ॥
 
 समृद्धं स्त्रीसहस्रेण नानारत्नोापशोभितम् ।
 अन्तःपुरं तदुत्सृज्य त्वामुपैष्यति रावणः ॥ १३ ॥
 
 | महाबलाढ्य राजा रावण आपली सर्वाधिक प्रिय आणि सन्माननीय भार्या, जी सर्वांची स्वामीनी आहे त्या मन्दोदरीलाही सोडून तुझ्यापाशी येईल, हे तुझे केवढे महाभाग्य आहे. तो हजारो रमणीय स्त्रियांनी आणि अनेक प्रकारच्या रत्नांनी सुशोभित असे अन्तःपुर सोडून तुझ्याजवळ येईल, म्हणून तू त्याची प्रार्थना मान्य केली पाहिजेस. ॥१२-१३॥ | 
| अन्या तु विकटा नाम राक्षसी वाक्यमब्रवीत् । असकृद् भीमवीर्येण नागा गन्धर्वदानवाः ।
 निर्जिताः समरे येन स ते पार्श्वमुपागतः ॥ १४ ॥
 
 तस्य सर्वसमृद्धस्य रावणस्य महात्मनः ।
 किमर्थं राक्षसेन्द्रस्य भार्यात्वं नेच्छसेऽधमे ॥ १५ ॥
 
 | त्यानन्तर विकटा नावाची दुसरी राक्षसी म्हणाली - ज्या अत्यन्त (भयानक) पराक्रमी राक्षसराजाने नाग, गन्धर्व आणि दानवांनाही समरांगणात परास्त केले आहे तोच तुझ्या जवळ आला होता. हे अधम स्त्रिये ! त्या संपूर्ण ऐश्वर्य संपन्न महात्मा राक्षसराज रावणाची भार्या व्हावे अशी इच्छा तुला का बरे होत नाही ? ॥१४-१५॥ | 
| ततस्तां दुर्मुखी नाम राक्षसी वाक्यमब्रवीत् । यस्य सूर्यो न तपति भीतो यस्य च मारुतः ।
 न वाति स्मायतापांगि किं त्वं तस्य न तिष्ठसे ॥ १६ ॥
 
 | नन्तर दुर्मुखी नावाची राक्षसी सीतेला म्हणाली - हे विशाललोचने ! ज्याला भिऊन जाऊन सूर्य प्रकाशत नाही आणि वायुही वहात नाही, त्या रावणाला वश होऊन तू का बरे राहात नाहीस ? ॥१६॥ | 
| पुष्पवृष्टिं च तरवो मुमुचुर्यस्य वै भयात् । शैलाः सुस्रुवुः पानीयं जलदाश्च यदेच्छति ॥ १७ ॥
 
 तस्य नैर्ऋतराजस्य राजराजस्य भामिनि ।
 किं त्वं न कुरुषे बुद्धिं भार्यार्थे रावणस्य हि ॥ १८ ॥
 
 | ज्याच्या भीतीने वृक्ष पुष्पांचा वर्षाव करतात आणि ज्याने इच्छा प्रकट केली असता पर्वत आणि मेघ जलस्त्राव करू लागतात त्या राजाधिराज राक्षसाधिपति रावणाची भार्या होण्याची बुद्धि तुला कशी बरे होत नाही ? ॥१७-१८॥ | 
| साधु ते तत्त्वतो देवि कथितं साधु भामिनि । गृहाण सुस्मिते वाक्यं अन्यथा न भविष्यसि ॥ १९ ॥
 
 | हे देवी ! हे भामिनी ! तुझ्या हिताचा आणि अत्यन्त उकृष्ट उपदेश मी तुला केला आहे. हे सुहास्य वदने ! तू माझ्या हा उपदेश ऐक नाहीतर तुला आपले प्राण गमवावे लागतील. तुझे अस्तित्वच राहाणार नाही. ॥१९॥ | 
| इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे त्रयोविंशः सर्गः ॥ २३ ॥ 
 | याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा तेवीसावा सर्ग पूरा झाला ॥२३॥ | 
|