[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। पञ्चविंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कौसल्यया श्रीरामस्य वनयात्रायै मंगलकामनापुरःसरं स्वस्तिवाचनकरणं तां प्रणम्य श्रीरामस्य सीताया भवनं प्रति गमनम् - कौसल्येने श्रीरामाच्या वनयात्रेसाठी मंगलकामनापूर्वक स्वस्तिवाचन करणे आणि श्रीरामांनी तिला प्रणाम करून सीतेच्या भवनाकडे जाणे -
सा विनीय तमायासमुपस्पृश्य जलं शुचिः ।
चकार माता रामस्य मङ्‌‍गलानि मनस्विनी ॥ १ ॥
त्यानंतर त्या क्लेशजनक शोकाला मनांतून काढून टाकून श्रीरामाची मनस्विनी माता कौसल्या हिने पवित्र जलाने आचमन केले आणि नंतर ती यात्राकालिक मंगलकृत्यांचे अनुष्ठान करू लागली. ॥१॥
न शक्यसे वारयितुं गच्छेदानीं रघूत्तम ।
शीघ्रं च विनिवर्तस्व वर्तस्व च सतां क्रमे ॥ २ ॥
(त्यानंतर ती आशीर्वाद देतांना म्हणाली-) 'रघुत्तमा ! आता मी तुला अडवू शकत नाही. यावेळी तू जा, सत्पुरुषांच्या मार्गावर स्थिर रहा आणि शीघ्रच वनातून परत ये. ॥२॥
यं पालयसि धर्मं त्वं प्रीत्या च नियमेन च ।
स वै राघवशार्दूल धर्मस्त्वामभिरक्षतु ॥ ३ ॥
'हे राघव शार्दूल ! तू नियमपूर्वक प्रसन्नतेने ज्या धर्माचे पालन करीत आहेस तो धर्मच सर्व बाजूनी तुझे रक्षण करो. ॥३॥
येभ्यः प्रणमसे पुत्र देवेष्वायतनेषु च ।
ते च त्वामभिरक्षन्तु वने सह महर्षिभिः ॥ ४ ॥
'मुला ! देवस्थाने आणि मंदिरात जावून तू ज्यांना प्रणाम करतोस, त्या सर्व देवता महर्षिंच्या सह वनामध्ये तुमचे रक्षण करोत. ॥४॥
यानि दत्तानि तेऽस्त्राणि विश्वामित्रेण धीमता ।
तानि त्वामभिरक्षन्तु गुणैः समुदितं सदा ॥ ५ ॥
'तू सदगुणांनी प्रकाशित आहेस, बुद्धिमान विश्वामित्रांनी तुला जी जी अस्त्रे दिली आहेत ती सर्वच्या सर्व सदा सर्व बाजूंनी तुमचे रक्षण करोत. ॥५॥
पितृशुश्रूषया पुत्र मातृशुश्रूषया तथा ।
सत्येन च महाबाहो चिरं जीवाभिरक्षितः ॥ ६ ॥
महाबाहु पुत्र ! तू पित्याची शुश्रूषा, मातेची सेवा तथा सत्याचा पालनाने सुरक्षित होऊन चिरंजीवी होऊन राहा. ॥६॥
समित्कुशपवित्राणि वेद्यश्चायतनानि च ।
स्थण्डिलानि च विप्राणां शैला वृक्षाः क्षुपा ह्रदाः ।
पतङ्‌‍गाः पन्नगाः सिंहास्त्वां रक्षन्तु नरोत्तम ॥ ७ ॥
'नरश्रेष्ठ ! समिधा, कुशा, पवित्रा, वेदी, मंदिरे, ब्राह्मणांची देवपूजन संबंधी स्थाने, पर्वत, वृक्ष, क्षुप (लहान असणारे वृक्ष), जलाशय, पक्षी, सर्प आणि सिंह वनात तुमचे रक्षण करोत. ॥७॥
स्वस्ति साध्याश्च विश्वे च मरुतश्च महर्षिभिः ।
स्वस्ति धाता विधाता च स्वस्ति पूषा भगोऽर्यमा ॥ ८ ॥
'साध्य, विश्वदेव तथा महर्षिंसह मरुद्‌गण तुमचे रक्षण करोत, धाता आणि विधाता तुमच्यासाठी मंगलकारी होवोत, पूषा , भग आणि अर्यमा तुमचे कल्याण करोत. ॥८॥
लोकपालाश्च ते सर्वे वासवप्रमुखास्तथा ।
ऋतवः षट् च ते सर्वे मासाः संवत्सराः क्षपाः ॥ ९ ॥

दिनानि च मुहूर्ताश्च स्वस्ति कुर्वन्तु ते सदा ।
श्रुतिः स्मृतिश्च धर्मश्च पातु त्वां पुत्र सर्वतः ॥ १० ॥
'ते इन्द्र आदि समस्त लोकपाल, साही ऋतू, सर्व मास (महिने), संवत्सर, रात्रि, दिन आणि मुहूर्त सदा तुमचे मंगल करोत. पुत्रा ! श्रुति, स्मृति आणि धर्मही सर्व बाजूने तुमचे रक्षण करोत. ॥९-१०॥
स्कन्दश्च भगवान् देवः सोमश्च सबृहस्पतिः ।
सप्तर्षयो नारदश्च ते त्वां रक्षन्तु सर्वतः ॥ ११ ॥
'भगवान स्कंददेव, सोम, बृहस्पति, सप्तर्षिगण आणि नारद -हे सर्वही सर्व बाजूने तुमचे रक्षण करोत. ॥११॥
ते चापि सर्वतः सिद्धा दिशश्च सदिगीश्वराः ।
स्तुता मया वने तस्मिन् पांतु त्वां पुत्र नित्यशः ॥ १२ ॥
'मुला ! ते प्रसिद्ध सिद्धगण, दिशा आणि दिक्पाल मी केलेल्या स्तुतिने संतुष्ट होऊन त्या वनात सर्व बाजूने तुमचे रक्षण करोत. ॥१२॥
शैलाः सर्वे समुद्राश्च राजा वरुण एव च ।
द्यौरन्तरिक्षं पृथिवी वायुश्च सचराचरः ॥ १३ ॥

नक्षत्राणि च सर्वाणि ग्रहाश्च सह दैवतैः ।
अहोरात्रे तथा संध्ये पान्तु त्वां वनमाश्रितम् ॥ १४ ॥
'समस्त पर्वत, समुद्र, राजा वरुण, द्युलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, वायु, चराचर प्राणी, समस्त नक्षत्रे, देवतांसहित ग्रह, दिन आणि रात्र तथा दोन्ही संध्याही सर्वच्या सर्व वनात गेल्यावर सदा तुमचे रक्षण करोत. ॥१३-१४॥
ऋतवश्चापि षट् चान्ये मासाः संवत्सरास्तथा ।
कलाश्च काष्ठाश्च तथा तव शर्म दिशन्तु ते ॥ १५ ॥
'सह ऋतू, अन्यान्य मास, संवत्सर, कला आणि काष्ठाही सर्व तुम्हांला कल्याण प्रदान करोत. ॥१५॥
महावनेऽपि चरतो मुनिवेषस्य धीमतः ।
तथा देवाश्च दैत्याश्च भवन्तु सुखदाः सदा ॥ १६ ॥
मुनींचा वेष धारण करून त्या विशाल वनात विचरणार्‍या तुझ्यासारख्या बुद्धिमान पुत्रासाठी समस्त देवता आणि दैत्य सदा सुखदायक होवोत. ॥१६॥
राक्षसानां पिशाचानां रौद्राणां क्रूरकर्मणाम् ।
क्रव्यादानां च सर्वेषां मा भूत् पुत्रक ते भयम् ॥ १७ ॥
मुला ! तुला भयंकर राक्षस, क्रूरकर्मी पिशाच्चे तथा समस्त मांसभक्षी जंतूंच्या पासून कधी भय न व्हावे. ॥१७॥
प्लवगा वृश्चिका दंशा मशकाश्चैव कानने ।
सरीसृपाश्च कीटाश्च मा भूवन् गहने तव ॥ १८ ॥
'वनात जे बेडूक अथवा वानर, विंचू, डास, मच्छर, पर्वतीय सर्प आणि किडे वगैरे असतात, ते त्या गहन वनात तुमच्यासाठी हिंसक न होवोत. ॥१८॥
महाद्विपाश्च सिंहाश्च व्याघ्रा ऋक्षाश्च दंष्ट्रिणः ।
महिषाः शृङ्‌गिणो रौद्रा न ते द्रुह्यन्तु पुत्रक ॥ १९ ॥
'पुत्रा ! मोठ मोठे हत्ती, सिंह, व्याघ्र, अस्वले, दाढा असणारे अन्य जीव, तथा विशाल शिंगे असणारे भयंकर रेडे वनांत तुमच्याशी द्रोह न करोत. ॥१९॥
नृमांसभोजना रौद्रा ये चान्ये सर्वजातयः ।
मा च त्वां हिंसिषुः पुत्र मया सम्पूजितास्त्विह ॥ २० ॥
'वत्सा ! या शिवाय जे सर्व जातिंमध्ये नरमांसभक्षी भयंकर प्राणी आहेत, ते सर्व माझ्या कडून येथे पूजित होऊन वनात तुमची हिंसा न करोत. ॥२०॥
आगमास्ते शिवाः सन्तु सिध्यन्तु च पराक्रमाः ।
सर्वसम्पत्तयो राम स्वस्तिमान् गच्छ पुत्रक ॥ २१ ॥
'पुत्रा ! रामा ! सर्व मार्ग तुमच्या साठी मंगलकारी होवोत. तुमचा पराक्रम सफल होवो तथा तुम्हांला सर्व संपत्ति प्राप्त होवोत. तुम्ही सकुशल यात्रा करा. ॥२१॥
स्वस्ति तेऽस्त्वान्तरिक्षेभ्यः पार्थिवेभ्यः पुनः पुनः ।
सर्वेभ्यश्चैव देवेभ्यो ये च ते परिपन्थिनः ॥ २२ ॥
'तुम्हाला आकशचारी प्राण्यांपासून, भूतलावरील जीव-जंतूंपासून तथा समस्त देवतांपासून तथा जे तुमचे शत्रू आहेत त्यांच्याही पासून सदा कल्याण प्राप्त होत राहो. ॥२२॥
गुरुः सोमश्च सूर्यश्च धनदोऽथ यमस्तथा ।
पान्तु त्वामर्चिता राम दण्डकारण्यवासिनम् ॥ २३ ॥
'श्रीरामा ! शुक्र, सोम, सूर्य, कुबेर तथा यम - हे माझ्याकडून पूजित होऊन दण्डकारण्यात निवास करते समयी सदा तुमचे रक्षण करोत. ॥२३॥
अग्निर्वायुस्तथा धूमो मन्त्राश्चर्षिमुखच्युताः ।
उपस्पर्शनकाले तु पान्तु त्वां रघुनन्दन ॥ २४ ॥
'रघुनंदन ! स्नान आणि आचमन समयी अग्नि, वायु, धूम तथा ऋषिंच्या मुखांतून निघालेले मंत्र तुमचे रक्षण करोत. ॥२४॥
सर्वलोकप्रभुर्ब्रह्मा भूतकर्तृ तथर्षयः ।
ये च शेषाः सुरास्ते त्वां रक्षंतु वनवासिनम् ॥ २५ ॥
'समस्त लोकांचे स्वामी ब्रह्मा, जगताचे कारणभूत परब्रह्म, ऋषिगण तथा त्यांच्या अतिरिक्त ज्या देवता आहेत त्या सर्वच्या सर्व वनवासाच्या समयी तुमचे रक्षण करोत.' ॥२५॥
इति माल्यैः सुरगणान् गन्धैश्चापि यशस्विनी ।
स्तुतिभिश्चानुकूलाभिरानर्चायतलोचना ॥ २६ ॥
असे म्हणून विशाल लोचना यशस्विनी राणी कौसल्येने पुष्पमाला आणि गंध आदि उपचारांनी तथा अनुरूप स्तुतिंच्या द्वारा देवतांचे पूजन केले. ॥२६॥
ज्वलनं समुपादाय ब्राह्मणेन महात्मना ।
हावयामास विधिना राममङ्‌‍गलकारणात् ॥ २७ ॥
तिने श्रीरामाच्या मंगलकामनेने अग्नि आणून एका महात्मा ब्राह्मणाच्या द्वारे त्यामध्ये विधिपूर्वक होम करविला. ॥२७॥
घृतं श्वेतानि माल्यानि समिधश्चैव सर्षपान् ।
उपसम्पादयामास कौसल्या परमाङ्‌‍गना ॥ २८ ॥
श्रेष्ठ नारी महाराणी कौसल्येने तूप, श्वेत पुष्प आणि माला, समिधा तथा मोहर्‍या आदि वस्तू ब्राह्मणाच्या समीप ठेवविल्या. ॥२८॥
उपाध्यायः स विधिना हुत्वा शान्तिमनामयम् ।
हुतहव्यावशेषेण बाह्यं बलिमकल्पयत् ॥ २९ ॥
पुरोहितांनी समस्त उपद्रवांची शान्ति आणि अरोग्याच्या उद्देश्याने विधिपूर्वक अग्निमध्ये होम करून हवनांतून शिल्लक राहिलेल्या हविष्याच्या द्वारे होमाच्या वेदिच्या बाहेर दाही दिशामध्ये इन्द्र आदि लोकपालांसाठी बलि अर्पित केला. ॥२९॥
मधुदध्यक्षतघृतैः स्वस्ति वाच्य द्विजांस्ततः ।
वाचयामास रामस्य वने स्वस्त्ययनक्रियाम् ॥ ३० ॥
तदनंतर स्वास्तिवाचनाच्या उद्देश्याने ब्राह्मणांना मधु, दही, अक्षत आणि घृत अर्पित करून 'वनात श्रीरामाचे सदा मंगल होवो' या कामनेने कौसल्येने त्या सर्वांकडून स्वत्स्ययन संबंधी मंत्रांचा पाठ करविला. ॥३०॥
ततस्तस्मै द्विजेन्द्राय राममाता यशस्विनी ।
दक्षिणां प्रददौ काम्यां राघवं चेदमब्रवीत् ॥ ३१ ॥
यानंतर यशस्विनी राममातेने त्या विप्रवर पुरोहितांना त्यांच्या इच्छेस अनुसरून दक्षिणा दिली आणि राघवास याप्रकारे म्हटले - ॥३१॥
यन्मङ्‌‍गलं सहस्राक्षे सर्वदेवनमस्कृते ।
वृत्रनाशे समभवत् तत् ते भवतु मङ्‌‍गलम् ॥ ३२ ॥
'वृत्रासुराचा नाश करण्याच्या निमित्त सर्व देववंदित सहत्रनेत्रधारी इन्द्राणीला जो मंगलमय आशीर्वाद प्राप्त झाला होता तेच मंगल तुझ्यासाठी होवो. ॥३२॥
यन्मङ्‌‍गलं सुपर्णस्य विनताकल्पयत् पुरा ।
अमृतं प्रार्थयानस्य तत्ते भवतु मङ्‌‍गलम् ॥ ३३ ॥
'पूर्वकाळी विनतादेवीने अमृत आणण्याची इच्छा करणार्‍या आपल्या पुत्रासाठी- गरूडासाठी जे मंगलकृत्य केले होते, तेच मंगल तुलाही प्राप्त होवो. ॥३३॥
अमृतोत्पादने दैत्यान् घ्नतो वज्रधरस्य यत् ।
अदितिर्मङ्‌‍गलं प्रादात् तत् ते भवतु मङ्‌‍गलम् ॥ ३४ ॥
'अमृताच्या उत्पत्ति समयी दैत्यांचा संहार करणार्‍या वज्रधारी इन्द्रासाठी माता अदितिने जो मंगलमय आशीर्वाद दिला होता तेच मंगल तुझ्यासाठीही सुलभ होवो. ॥३४॥
त्रीविक्रमान् प्रक्रमतो विष्णोरतुलतेजसः ।
यदासीन्मङ्‌‍गलं राम तत् ते भवतु मङ्‌‍गलम् ॥ ३५ ॥
'श्रीरामा ! तीन पावलांना वाढविणार्‍या अनुपम तेजस्वी भगवान विष्णुसाठी जी मंगलाशंसा केली गेली होती, तेच मंगल तुझ्यासाठीही प्राप्त होवो. ॥३५॥
ऋषयः सागरा द्वीपा वेदा लोका दिशश्च ते ।
मङ्‌‍गलानि महाबाहो दिशन्तु शुभमङ्‌‍गलम् ॥ ३६ ॥
'महाबाहो ! ऋषि, समुद्र, द्वीप, वेद, समस्त लोक आणि दिशा तुम्हांला मंगलप्रदान करोत. तुमचे सदा शुभ मंगल होवो. ॥३६॥
इति पुत्रस्य शेषाश्च कृत्वा शिरसि भामिनी ।
गन्धैश्चापि समालभ्य राममायतलोचना ॥ ३७ ॥

ओषधीं च सुसिद्धार्थां विशल्यकरणीं शुभाम् ।
चकार रक्षां कौसल्या मन्त्रैरभिजजाप च ॥ ३८ ॥
याप्रकारे आशीर्वाद देऊन विशाललोचना भामिनी कौसल्येने पुत्राच्या मस्तकावर अक्षत ठेवून चंदन आणि कुंकू लावले तथा सर्व मनोरथांची सिद्धि करणारी विशल्यकरणी नामक शुभ औषधी घेऊन रक्षणाच्या उद्देश्याने मंत्र म्हणून ती श्रीरामाच्या हातात बांधली, नंतर तिच्यात उत्कर्ष आणण्यासाठी मंत्राचा जपही केला. ॥३७-३८॥
उवाचापि प्रहृष्टेव सा दुःखवशवर्तिनी ।
वाङ्‌‍मात्रेण न भावेन वाचा संसज्जमानया ॥ ३९ ॥
त्यानंतर दुःखाच्या अधीन झालेल्या कौसल्येने वरून प्रसन्न झाल्याप्रमाणे होऊन मंत्रांचे स्पष्ट उच्चारणही केले. त्या समयी ती केवळ वाणीनेच मंत्रोच्चारण करू शकली, हृदयापासून नाही. (कारण हृदय श्रीरामाच्या वियोगाच्या संभावनेने व्यथित होते म्हणून) ती खेदाने गदगद, अडखळणार्‍या वाणीने मंत्र म्हणत होती. ॥३९॥
आनम्य मूर्ध्नि चाघ्राय परिष्वज्य यशस्विनी ।
अवदत् पुत्रमिष्टार्थो गच्छ राम यथासुखम् ॥ ४० ॥

अरोगं सर्वसिद्धार्थमयोध्यां पुनरागतम् ।
पश्यामि त्वां सुखं वत्स संधितं राजवर्त्मसु ॥ ४१ ॥
त्यानंतर त्यांचे मस्तक किंचित नमवून यशस्विनी मातेने ते हुंगले आणि पुत्राला हृदयाशी धरून ती म्हणाली - 'वत्स राम ! तू सफल मनोरथ होऊन सुखपूर्वक वनात जा. ज्यावेळी पूर्णकाम होऊन रोगरहित सकुशल अयोध्येस परत येशील, त्या समयी तुला राजमार्गावर स्थित पाहून मी सुखी होईन. ॥४०-४१॥
प्रणष्टदुःखसङ्‌‍कल्पा हर्षविद्योतितानना ।
द्रक्ष्यामि त्वां वनात् प्राप्तं पूर्णचन्द्रमिवोदितम् ॥ ४२ ॥
त्या समयी माझे दुःखपूर्ण संकल्प नष्ट होतील, मुखावर हर्षजनित उल्हास पसरेल आणि मी वनात परत आलेल्या तुला पौर्णिमेच्या रात्री उदित झालेल्या पूर्ण चंद्रम्या प्रमाणे पाहीन. ॥४२॥
भद्रासनगतं राम वनवासादिहागतम् ।
द्रक्ष्यामि च पुनस्त्वां तु तीर्णवन्तं पितुर्वचः ॥ ४३ ॥
'रामा ! वनवासांतून येथे येऊन पित्याची प्रतिज्ञा पूर्ण करून जेव्हा तू राजसिंहासनावर बसशील, त्या समयी मी पुन्हा प्रसन्नतापूर्वक तुझे दर्शन करीन. ॥४३॥
मङ्‌‍गलैरुपसम्पन्नो वनवासादिहागतः ।
वध्वाश्च मम नित्यं त्वं कामान् संवर्ध याहि भो ॥ ४४ ॥
'आता जा ! आणि वनवासांतून येथे परत येऊन राजोचित मंगलमय वस्त्र भूषणांनी विभूषित होऊन तू सदा माझी सून सीता हिच्या समस्त कामना पूर्ण करीत राहा. ॥४४॥
मयार्चिता देवगणाः शिवादयो
     महर्षयो भूतगणाः सुरोरगाः ।
अभिप्रयातस्य वनं चिराय ते
     हितानि काङ्‌‍क्षन्तु दिशश्च राघव ॥ ४५ ॥
'हे राघवा ! मी सदा ज्यांचे पूजन आणि सन्मान केला आहे त्या शिव आदि देवता, महर्षि, भूतगण, देवोपम नाग आणि सम्पूर्ण दिशा-ही सर्वच्या सर्व वनात गेल्यावर चिरकालपर्यंत तुझ्या हितसाधनांची कामना करीत राहोत'. ॥४५॥
अतीव चाश्रुप्रतिपूर्णलोचना
     समाप्य च स्वस्त्ययनं यथाविधि ।
प्रदक्षिणं चापि चकार राघवं
     पुनः पुनश्चापि निरीक्ष्य सस्वजे ॥ ४६ ॥
याप्रकारे मातेने नेत्रामध्ये अत्यंत अश्रू भरून विधिपूर्वक ते स्वास्तिवाचन कर्म पूर्ण केले. नंतर राघवाची प्रदक्षिणा केली आणि वारंवार त्यांच्याकडे पाहून त्यांना छातीशी धरले. ॥४६॥
तया हि देव्या च कृतप्रदक्षिणो
     निपीड्य मातुश्चरणौ पुनः पुनः ।
जगाम सीतानिलयं महायशाः
     स राघवः प्रज्वलितस्तया श्रिया ॥ ४७ ॥
देवी कौसल्येने जेव्हा राघवाची प्रदक्षिणा केली तेव्हा महायशस्वी राघवाने वारंवार मातेचे चरणांना दाबून (चेपून) प्रणाम केला आणि मातेच्या मंगलकामनाजनित उत्कृष्ट शोभेने संपन्न होऊन ते सीतेच्या महालाकडे चालू लागले. ॥४७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे पञ्चविंशः सर्गः ॥ २५ ॥
यप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा पञ्चविसावा सर्ग पूरा झाला. ॥२५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP