श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। सप्तपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रस्य तपःकरणं, त्रिशङ्को स्वीयं यज्ञं कारयितुं वसिष्ठं प्रति प्रार्थना, तेन प्रत्याख्यातेन राजा गुरुपुत्राणां संनिधिमुपेत्य स्वाभिप्रायस्य निवेदनम् - विश्वामित्रांची तपस्या, राजा त्रिशङ्‍कुने आपला यज्ञ करण्यासाठी प्रथम वसिष्ठांची प्रार्थना करणे आणि त्यांनी नाकारल्यावर त्यांच्या पुत्रांना शरण जाणे -
ततः संतप्तहृदयः स्मरन्निग्रहमात्मनः ।
विनिःश्वस्य विनिःश्वस्य कृतवैरो महात्मना ॥ १ ॥

स दक्षिणां दिशं गत्वा महिष्या सह राघव ।
तताप परमं घोरं विश्वामित्रो महातपाः ॥ २ ॥
'हे राघवा ! त्यानंतर विश्वामित्र आपल्या पराभवाची आठवण करून मनातल्या मनांत संतप्त होऊ लागले. महात्मा वसिष्ठांच्या बरोबर वैर साधून महातपस्वी विश्वामित्र वारंवार दीर्घ श्वास घेत आपल्या राण्यांच्या बरोबर दक्षिण दिशेला जाऊन अत्यंत उत्कृष्ट आणि भयंकर तपस्या करू लागले. ॥ १-२ ॥
फलमूलाशनो दान्तश्चचार परमं तपः ।
अथास्य जज्ञिरे पुत्राः सत्यधर्मपरायणाः ॥ ३ ॥

हविष्पन्दो मधुष्पन्दो दृढनेत्रो महारथः ।
तेथे मन आणि इंद्रियांना वश करून ते फल-मूलांचा आहार करीत उत्तम तपस्येत मग्न झाले. त्यांना हविष्पंद, मधुष्पंद, दृढनेत्र आणि महारथ नामक चार पुत्र उत्पन्न झाले जे सत्य आणि धर्मात तत्पर राहणारे होते. ॥ ३ १/२ ॥
पूर्णे वर्षसहस्रे तु ब्रह्मा लोकपितामहः ॥ ४ ॥

अब्रवीन्मधुरं वाक्यं विश्वामित्रं तपोधनम् ।
जिता राजर्षिलोकास्ते तपसा कुशिकात्मज ॥ ५ ॥

अनेन तपसा त्वां हि राजर्षिरिति विद्महे ।
एक हजार वर्षे पूर्ण झाल्यवर लोकपितामह ब्रह्मदेवांनी तपोधन विश्वामित्रांना दर्शन देऊन मधुर वाणीने म्हटले - ' कुशिकनन्दन ! तुम्ही तपस्येच्या द्वारे समस्त राजर्षिंवर विजय मिळविला आहे. या तपस्येच्या प्रभावाने आम्ही तुम्हाला खरे राजर्षि समजत आहोत.' ॥ ४-५ १/२ ॥
एवमुक्त्वा महातेजा जगाम सह दैवतैः ॥ ६ ॥

त्रिविष्टपं ब्रह्मलोकं लोकानां परमेश्वरः ।
असे म्हणून संपूर्ण लोकांचे स्वामी ब्रह्मदेव देवतांच्यासह स्वर्गलोकावरून ब्रह्मलोकास निघून गेले. ॥ ६ १/२ ॥
विश्वामित्रोऽपि तच्छ्रुत्वा ह्रिया किञ्चिदवाङ्‍मुखः ॥ ७ ॥

दुःखेन महताविष्टः समन्युरिदमब्रवीत् ।
तपश्च सुमहत् तप्तं राजर्षिरिति मां विदुः ॥ ८ ॥
त्यांचे बोलणे ऐकून विश्वामित्रांचे मुख लज्जेने काहीसे झुकले. ते अत्यंत दुःखाने व्यथित होऊन दीनतापूर्वक मनांतल्या मनांत असे म्हणू लागले - 'अहो ! इतके मोठे तप केले तरीही ऋषिंच्या सहित सर्व देवता मला राजर्षि समजत आहेत. असे वाटते आहे की या तपस्येचे काही फळ मिळालेच नाही.' ॥ ७-८ ॥
देवाः सर्षिगणाः सर्वे नास्ति मन्ये तपः फलम् ।
एवं निश्चित्य मनसा भूय एव महातपाः ॥ ९ ॥

तपश्चचार धर्मात्मा काकुत्स्थ परमात्मवान् ।
'श्रीराम ! मनात असा विचार करून आपल्या मनाला ताब्यात ठेवणार्‍या महातपस्वी धर्मात्मा विश्वामित्रांनी पुनः भारी तपस्या करण्यास सुरुवात केली. ॥ ९ १/२ ॥
एतस्मिन्नेव काले तु सत्यवादी जितेन्द्रियः ॥ १० ॥

त्रिशङ्‍कुरिति विख्यात इक्ष्वाकुकुलवर्धनः ।
त्याचवेळी इक्ष्वाकु कुलाची कीर्ति वाढविणारे एक सत्यवादी आणि जितेंद्रिय राजे राज्य करीत होते. त्यांचे नाव होते त्रिशङ्‍कु. ॥ १० १/२ ॥
तस्य बुद्धिः समुत्पन्ना यजेयमिति राघव ॥ ११ ॥

गच्छेयं सशरीरेण देवतानां परां गतिम् ।
रघुनन्दना ! त्यांच्या मनात असा विचार आला की ' मी असा एखादा यज्ञ करीन की ज्यायोगे आपल्या या शरीरासहच देवतांची परमगति स्वर्गलोकास जाऊन पोहोंचेन. ॥ ११ १/२ ॥
वसिष्ठं स समाहूय कथयामास चिन्तितम् ॥ १२ ॥

अशक्यमिति चाप्युक्तो वसिष्ठेन महात्मना ।
तेव्हां त्यांनी वसिष्ठांना बोलावून आपला हा विचार त्यांना ऐकविला. महात्मा वसिष्ठांनी त्यांना असे निर्भेळ उत्तर दिले की 'असे होणे असंभव आहे.' ॥ १२ १/२ ॥
प्रत्याख्यातो वसिष्ठेन स ययौ दक्षिणां दिशम् ॥ १३ ॥

ततस्तत्कर्म सिद्ध्यर्थं पुत्रांस्तस्य गतो नृपः ।
जेव्हां वसिष्ठांनी असे निर्भेळ उत्तर दिले तेव्हां ते राजे कर्मसिद्धि साठी दक्षिण दिशेला त्यांच्या पुत्रांजवळ गेले. ॥ १३ १/२ ॥
वासिष्ठा दीर्घतपसस्तपो यत्र हि तेपिरे ॥ १४ ॥

त्रिशङ्‍कुस्तु महातेजाः शतं परमभास्वरम् ।
वसिष्ठपुत्रान् ददृशे तप्यमानान् मनस्विनः ॥ १५ ॥
वसिष्ठांचे पुत्र जेथे दीर्घकाळपर्यंत तपस्येत प्रवृत्त होऊन तप करीत होते; त्या स्थानी पोहोचून महातेजस्वी त्रिशङ्‍कुने पाहिले की मनास वश करणारे ते शंभर परमतेजस्वी वसिष्ठकुमार तपस्येत संलग्न आहेत. ॥ १४-१५ ॥
सोऽभिगम्य महात्मानः सर्वानेव गुरोः सुतान् ।
अभिवाद्यानुपूर्वेण ह्रिया किञ्चिदवाङ्‍मुखः ॥ १६ ॥
त्या सर्व गुरुपुत्रांजवळ जाऊन त्यांनी क्रमशः त्यांना प्रणाम केला. आणि विनयाने आपले मुख थोडे खाली झुकवून हात जोडून त्या सर्व महात्म्यांना म्हटले - ॥ १६ ॥
अब्रवीत् स महात्मानः सर्वानेव कृताञ्जलिः ।
शरणं वः प्रपन्नोऽहं शरण्याञ्शरणं गतः ॥ १७ ॥

प्रत्याख्यातो हि भद्रं वो वसिष्ठेन महात्मना ।
यष्टुकामो महायज्ञं तदनुज्ञातुमर्हथ ॥ १८ ॥
'गुरुपुत्रांनो ! आपण शरणागत वत्सल आहात. मी आपल्या सर्वांना शरण आलो आहे. आपले कल्याण होवो ! महात्मा वसिष्ठांनी माझा यज्ञ करणे नाकारले आहे. मी एक महान यज्ञ करू इच्छितो. आपण त्यासाठी आज्ञा द्यावी. ॥ १७-१८ ॥
गुरुपुत्रानहं सर्वान् नमस्कृत्य प्रसादये ।
शिरसा प्रणतो याचे ब्राह्मणांस्पसि स्थितान् ॥ १९ ॥

ते मां भवन्तः सिद्ध्यर्थं याजयन्तु समाहिताः ।
सशरीरो यथाहं वै देवलोकमवाप्नुयाम् ॥ २० ॥
'मी समस्त गुरुपुत्रांना नमस्कार करून प्रसन्न करू इच्छितो. आपण तपस्येत संलग्न राहणारे ब्राह्मण आहात. मी आपल्या चरणी मस्तक ठेवून ही याचना करीत आहे की आपण सर्व एकाग्रचित्त होऊन माझ्याकडून अभीष्ट सिद्धिसाठी असा एखादा यज्ञ करवावा की ज्यायोगे मी या शरीरासहच देवलोकात जाऊ शकेन. ॥ १९-२० ॥
प्रत्याख्यातो वसिष्ठेन गतिमन्यां तपोधनाः ।
गुरुपुत्रानृते सर्वान् नाहं पश्यामि काञ्चन ॥ २१ ॥
'तपोधनांनो ! महात्मा वसिष्ठांनी अस्वीकार केल्यानंतर मला आता माझ्या स्वतःसाठी समस्त गुरुपुत्रांना शरण जाण्याखेरीज दुसरी कोणती गति दिसत नाही. ॥ २१ ॥
इक्ष्वाकूणां हि सर्वेषां पुरोधाः परमा गतिः ।
तस्मादनन्तरं सर्वे भवन्तो दैवतं मम ॥ २२ ॥
समस्त इक्ष्वाकु वंशासाठी पुरोहित वसिष्ठ हीच परमगति आहे. त्याच्या नंतर आपण सर्वच माझे परम दैवत आहात. ॥ २२ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे सप्तपञ्चाशः सर्गः ॥ ५७ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सत्तावन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५७ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP