श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ सप्तपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वसिष्ठकर्तृकं नूतनदेहधारणं निमेः प्राणिनां नयनेषु निवासश्च -
वसिष्ठांचे नूतन शरीर धारण आणि निमिचा प्राण्यांच्या नयनात निवास -
तां श्रुत्वा दिव्यसंकाशां कथामद्‌भुतदर्शनाम् ।
लक्ष्मणः परमप्रीतो राघवं वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
ती दिव्य आणि अद्‌भुत कथा ऐकून लक्ष्मणांना फार प्रसन्नता वाटली. ते राघवांना म्हणाले - ॥१॥
निक्षिप्तदेहौ काकुत्स्थ कथं तौ द्विजपार्थिवौ ।
पुनर्देहेन संयोगं जग्मुर्देवसम्मतौ ॥ २ ॥
काकुत्स्थ ! ते ब्रह्मर्षि वसिष्ठ तसेच राजर्षि निमि जे देवतांच्या द्वारा सन्मानित होते, आपापल्या शरीराला सोडून नंतर नूतन शरीराशी कुठल्याप्रकारे संयुक्त झाले ? ॥२॥
तस्य तद् भाषितं श्रुत्वा रामः सत्यपराक्रमः ।
तां कथां कथयामास वसिष्ठस्य महात्मनः ॥ ३ ॥
त्यांचा हा प्रश्न ऐकून सत्यपराक्रमी श्रीरामांनी महात्मा वसिष्ठांच्या शरीर-ग्रहणाशी संबंध असणारी ती कथा पुन्हा सांगण्यास आरंभ केला. ॥३॥
यस्तु कुम्भो रघुश्रेष्ठ तेजःपूर्णो महात्मनोः ।
तस्मिंस्तेजोमयौ विप्रौ सम्भूतावृषिसत्तमौ ॥ ४ ॥
रघुश्रेष्ठ ! महामना मित्र आणि वरुण देवतेचे तेज (वीर्य) यांनी युक्त जो तो प्रसिद्ध कुम्भ होता, त्यातून दोन तेजस्वी ब्राह्मण प्रकट झाले. ते दोघेही ऋषिंच्या मध्ये श्रेष्ठ होते. ॥४॥
पूर्वं समभवत् तत्र ह्यगस्त्यो भगवान् ऋषिः ।
नाहं सुतस्तवेत्युक्त्वा मित्रं तस्मादपाक्रमत् ॥ ५ ॥
प्रथम त्या घटातून महर्षि भगवान्‌ अगस्त्य उत्पन्न झाले. आणि मित्राला मी आपला पुत्र नाही आहे असे सांगून तेथून निघून गेले. ॥५॥
तद्धि तेजस्तु मित्रस्य उर्वस्याः पूर्वमाहितम् ।
तस्मिन् समभवत् कुम्भे तत्तेजो यत्र वारुणम् ॥ ६ ॥
ते मित्राचे तेज होते जे उर्वशीच्या निमित्ताने प्रथमच त्या कुम्भात स्थापित केले गेले होते. त्यानंतर त्या कुम्भात वरुणदेवतेचे तेजही सम्मिलित झालेले होते. ॥६॥
कस्यचित् त्वथ कालस्य मित्रावरुणसम्भवः ।
वसिष्ठस्तेजसा युक्तो जज्ञे इक्ष्वाकुदैवतम् ॥ ७ ॥
त्यानंतर काही काळानंतर मित्रावरुणाच्या त्या वीर्यापासून तेजस्वी वसिष्ठ मुनिंचा प्रादुर्भाव झाला. जे इक्ष्वाकु कुलाची देवता (गुरु अथवा पुरोहित) झाले. ॥७॥
तमिक्ष्वाकुर्महातेजा जातमात्रमनिन्दितम् ।
वव्रे पुरोधसं सौम्य वंशस्यास्य हिताय नः ॥ ८ ॥
सौम्य लक्ष्मण ! महातेजस्वी राजा इक्ष्वाकुंनी तेथे जन्म ग्रहण करताच त्या अनिंद्य मुनि वसिष्ठांना आपल्या या कुळाच्या हितासाठी पुरोहित पदावर वरण करून घेतले. ॥८॥
एवं त्वपूर्वदेहस्य वसिष्ठस्य महात्मनः ।
कथितो निर्गमः सौम्य निमेः शृणु यथाऽभवत् ॥ ९ ॥
सौम्य ! या प्रकारे नूतन शरीराने युक्त वसिष्ठमुनिंच्या उत्पत्तिचा प्रकार सांगितला गेला. आता निमिचा जसा वृत्तांत आहे, तो ऐका. ॥९॥
दृष्ट्‍वा विदेहं राजानं ऋषयः सर्व एव ते ।
तं च ते योजयामासुः यज्ञदीक्षां मनीषिणः ॥ १० ॥
राजा निमिला देहापासून पृथक्‌ झालेला पाहून त्या सर्व मनीषी ऋषिनी स्वयंही यज्ञाची दीक्षा ग्रहण करून तो यज्ञ पूरा केला. ॥१०॥
तं च देहं नरेन्द्रस्य रक्षन्ति स्म द्विजोत्तमाः ।
गन्धैर्माल्यैश्च वस्त्रैश्च पौरभृत्यसमन्विताः ॥ ११ ॥
त्या श्रेष्ठ ब्रह्मर्षिंनी पुरवासी आणि सेवकांच्या बरोबर राहून गंध, पुष्प आणि वस्त्रांसहित राजा निमिच्या त्या शरीराला तेलाच्या कढई आदि मध्ये सुरक्षित ठेवले. ॥११॥
ततो यज्ञे समाप्ते तु भृगुस्तत्रेदमब्रवीत् ।
आनयिष्यामि ते चेतः तुष्टोऽस्मि तव पार्थिव ॥ १२ ॥
त्यानंतर जेव्हा यज्ञ समाप्त झाला तेव्हा तेथे भृगुनी म्हटले - राजन्‌ ! (राजाच्या शरीराच्या अभिमानी जीवात्मन्‌ !) मी तुझ्यावर फार संतुष्ट आहे; म्हणून जर तुम्ही इच्छित असाल तर तुमच्या जीव-चैतन्याला मी पुन्हा या शरीरात आणून देईन. ॥१२॥
सुप्रीताश्च सुराः सर्वे निमेश्चेतस्तदाब्रुवन् ।
वरं वरय राजर्षे क्व ते चेतो निरूप्यताम् ॥ १३ ॥
भृगुच्या बरोबरच अन्य सर्व देवतांनीही अत्यंत प्रसन्न होऊन निमिच्या जीवात्म्यास म्हटले - राजर्षे ! वर मागा ! तुमच्या जीव चैतन्याला कोठे स्थापित केले जावे. ॥१३॥
एवमुक्तः सुरैः सर्वैःन् निमेश्चेतस्तदाब्रवीत् ।
नेत्रेषु सर्वभूतानां वसेयं सुरसत्तमाः ॥ १४ ॥
समस्त देवतांनी असे म्हटल्यावर निमिच्या जीवात्म्याने त्यासमयी त्यांना सांगितले - सुरश्रेष्ठ ! मी समस्त प्राण्यांच्या नेत्रांमध्ये निवास करू इच्छितो. ॥१४॥
बाढमित्येव विबुधा निमेश्चेतस्तदाऽब्रुवन् ।
नेत्रेषु सर्वभूतानां वायुभूतश्चरिष्यसि ॥ १५ ॥
तेव्हा देवतांनी निमिच्या जीवात्म्याला म्हटले -फार चांगले, तुम्ही वायुरूप होऊन समस्त प्राण्यांच्या नेत्रांमध्ये विचरत राहाल. ॥१५॥
त्वत्कृते च निमिष्यन्ति चक्षूंषि पृथिवीपते ।
वायुभूतेन चरता विश्रमार्थं मुहुर्मुहुः ॥ १६ ॥
पृथ्वीनाथ ! वायुरूपाने विचरत असता आपल्या संबंधाने जो थकवा येईल, त्याचे निवारण करून विश्राम मिळविण्यासाठी प्राण्यांचे नेत्र वारंवार बंद होत राहातील. ॥१६॥
एवमुक्त्वा तु विबुधाः सर्वे जग्मुर्यथागतम् ।
ऋषयोऽपि महात्मानो निमेर्देहं समाहरन् ॥ १७ ॥

अरणिं तत्र निक्षिप्य मथनं चक्रुरोजसा ।
असे म्हणून सर्व देवता जशा आल्या होत्या तशा निघून गेल्या. नंतर महात्मा ऋषिंनी निमिच्या शरीराला पकडले आणि त्याच्यावर अरणि ठेवून त्याला बलपूर्वक मथावयास (घुसळण्यास) आरंभ केला. ॥१७ १/२॥
मन्त्रहोमैर्महात्मानः पुत्रहेतोर्निमेस्तदा ॥ १८ ॥

अरण्यां मथ्यमानायां प्रादुर्भूतो महातपाः ।
मथनान्मिथिरित्याहुः जननाज्जनकोऽभवत् ।
यस्माद् विदेहात् सम्भूतो वैदेहस्तु ततः स्मृतः ॥ १९ ॥

एवं विदेहराजश्च जनकः पूर्वकोऽभवत् ।
मिथिर्नाम महातेजाः तेनायं मैथिलोऽभवत् ॥ २० ॥
पूर्ववत्‌ मंत्रोच्चारणपूर्वक होम करत असणार्‍या त्या महात्म्यांनी जेव्हा निमिच्या पुत्राच्या उत्पत्तिसाठी अरणि-मंथन आरंभ केले, तेव्हा त्या मंथनाने महातपस्वी मिथि उत्पन्न झाले. या अद्‌भुत जन्माचा हेतु होण्यामुळे जे जनक म्हणविले गेले तसेच विदेहापासून (जीवरहित शरीरापासून) प्रकट होण्यामुळे त्यांना वैदेहही म्हटले गेले. याप्रकारे पहिल्या विदेहराज जनकांचे नाव महातेजस्वी मिथि झाले, ज्यामुळे हा जनकवंश मैथिल म्हटला गेला. ॥१८-२०॥
इति सर्वमशेषतो मया
कथितं सम्भवकारणं तु सौम्य ।
नृपपुंगवशापजं द्विजस्य
द्विजशापाच्च यदद्‌भुतं नृपस्य ॥ २१ ॥
सौम्य लक्ष्मणा ! राजांमध्ये श्रेष्ठ निमिच्या शापाने ब्राह्मण वसिष्ठांचा आणि ब्राह्मण वसिष्ठांच्या शापाने राजा निमिचा जो अद्‌भुत जन्म घटित झाला, त्याचे सर्व कारण मी तुला ऐकविले आहे. ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तपञ्चाशः सर्गः ॥ ५७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा सत्तावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP