|
| पञ्चवटीमार्गे जटायुषो दर्शनं तस्य श्रीरामं प्रति स्वस्य विस्तरेण परिचयदानम् - 
 | पञ्चवटी मार्गात जटायुची भेट आणि श्रीरामांना (त्यांनी) आपला विस्तृत परिचय देणे - | 
| अथ पञ्चवटीं गच्छन्नन्तरा रघुनन्दनः । आससाद महाकायं गृध्रं भीमपराक्रमम् ॥ १ ॥
 
 | पञ्चवटीला जाते समयी वाटेत श्री रघुनंदन श्रीरामांना एक विशालकाय गृध्र भेटला, जो भयंकर पराक्रम प्रकट करणारा होता. ॥१॥ | 
| तं दृष्ट्वा तौ महाभागौ वटस्थं रामलक्ष्मणौ । मेनाते राक्षसं पक्षिं ब्रुवाणौ को भवानिति ॥ २ ॥
 
 | वनात बसलेल्या त्या विशाल पक्ष्याला पाहून श्रीराम आणि लक्ष्मण त्याला राक्षसच समजले आणि त्यांनी विचारले- ’आपण कोण आहात ?’ ॥२॥ | 
| स तौ मधुरया वाचा सौम्यया प्रीणयन्निव । उवाच वत्स मां विद्धि वयस्यं पितुरात्मनः ॥ ३ ॥
 
 | तेव्हा त्या पक्ष्याने अत्यंत मधुर आणि कोमल वाणी मध्ये त्यांना प्रसन्न करीत म्हटले - ’मुला ! मला आपल्या पित्याचा मित्र समज.’ ॥३॥ | 
| स तं पितृसखं मत्वा पूजयामास राघवः । स तस्य कुलमव्यग्रमथ पप्रच्छ नाम च ॥ ४ ॥
 
 | पित्याचा मित्र जाणून राघवांनी गृध्राचा आदर केला आणि शांतभावाने त्याचे कुल आणि नाम विचारले - ॥४॥ | 
| रामस्य वचनं श्रुत्वा कुलमात्मानमेव च । आचचक्षे द्विजस्तस्मै सर्वभूतसमुद्भवम् ॥ ५ ॥
 
 | श्रीरामांचा हा प्रश्न ऐकून त्या पक्ष्याने त्यांना आपल्या कुलाचा आणि नामाचा परिचय देत समस्त प्राण्यांच्या उत्पत्तिचा क्रमच सांगण्यास आरंभ केला. ॥५॥ | 
| पूर्वकाले महाबाहो ये प्रजापतयोऽभवन् । तान् मे निगदतः सर्वानादितः शृणु राघव ॥ ६ ॥
 
 | ’महाबाहु रघुनंदन ! (राघव !) पूर्वकालांत जे जे प्रजापति होऊन गेले आहेत त्या सर्वांचे सुरूवातीपासून वर्णन करतो ऐका. ॥६॥ | 
| कर्दमः प्रथमस्तेषां विकृतस्तदनन्तरम् । शेषश्च संश्रयश्चैव बहुपुत्रश्च वीर्यवान् ॥ ७ ॥
 
 | ’त्या प्रजापतिमध्ये सर्वात प्रथम कर्दम झाले. त्यानंतर दुसर्या प्रजापतीचे नाम विकृत होते. तीसरे शेष, चौथे संश्रय आणि पाचवे प्रजापति पराक्रमी बहुपुत्र झाले. ॥७॥ | 
| स्थाणुर्मरीचिरत्रिश्च क्रुतश्चैव महाबलः । पुलस्त्यश्चाङ्गिराश्चैव प्रचेताः पुलहस्तथा ॥ ८ ॥
 
 | ’सहावे स्थाणु, सातवे मरीचि, आठवे अत्रि, नववे महान शक्तिशाली क्रतु, दहावे पुलस्त्य, अकरावे अङ्गिरा, बारावे प्रचेता (वरूण) आणि तेरावे प्रजापति पुलह झाले.’ ॥८॥ | 
| दक्षो विवस्वानपरोऽरिष्टनेमिश्च राघव । कश्यपश्च महातेजास्तेषामासीच्च पश्चिमः ॥ ९ ॥
 
 | ’चौदावे दक्ष, पंधरावे विवस्वान, सोळावे अरिष्टनेमी, आणि सतरावे प्रजापति महातेजस्वी कश्यप झाले. राघवा ! हे कश्यप अंतिम प्रजापति म्हटले गेले आहेत. ॥९॥ | 
| प्रजापतेस्तु दक्षस्य बभूवुरिति विश्रुताः । षष्टिर्दुहितरो राम यशस्विन्यो महायशः ॥ १० ॥
 
 | ’महातेजस्वी श्रीरामा ! प्रजापति दक्षाच्या साठ यशस्विनी कन्या झाल्या; ज्या खूप विख्यात होत्या. ॥१०॥ | 
| कश्यपः प्रतिजग्राह तासामष्टौ सुमध्यमाः । अदितिं च दितिं चैव दनूमपि च कालकाम् ॥ ११ ॥
 
 ताम्रां क्रोधवशां चैव मनुं चाप्यनलामपि ।
 
 | त्यातील आठ(*) सुंदर कन्यांचे प्रजापति कश्यपांनी पत्नींच्या रूपाने ग्रहण केले. ज्यांची नामे या प्रकारे आहेत - अदिति, दिति, दनु, कालका, ताम्रा, क्रोधवशा, मनु आणि अनला. ॥११ १/२॥ 
 | 
| तास्तु कन्यास्ततः प्रीतः कश्यपः पुनरब्रवीत् ॥ १२ ॥ 
 पुत्रांस्त्रैलोक्यभर्तॄन् वै जनयिष्यथ मत्समान् ।
 
 | त्यानंतर त्या कन्यांच्या वर प्रसन्न होऊन कश्यपांनी त्यांना म्हटले - ’देवींनो ! तुम्ही अशा पुत्रांना जन्म द्याल जे तीन्ही लोकांचे भरण-पोषण करण्यास समर्थ आणि माझ्या सारखे तेजस्वी होतील.’ ॥१२ १/२॥ | 
| अदितिस्तन्मना राम दितिश्च दनुरेव च ॥ १३ ॥ 
 कालका च महाबाहो शेषास्त्वमनसोऽभवन् ।
 
 | ’महाबाहु श्रीरामा ! यांच्यापैकी अदिति, दिति, दनु आणि कालका या चौघींनी कश्यपांनी सांगितलेली गोष्ट मनाने ग्रहण केली, परंतु शेष स्त्रियांनी तिकडे मन लावले नाही (मनाने ती ग्रहण केली नाही) त्यांच्या मनात तसा मनोरथ उत्पन्न झाला नाही. ॥१३ १/२॥ | 
| अदित्यां जज्ञिरे देवास्त्रयस्त्रिंशदरिंदम ॥ १४ ॥ 
 आदित्या वसवो रुद्रा अश्विनौ च परंतप ।
 
 | ’परंतप, (शत्रुंचे दमन करणार्या ) श्रीरामा ! अदितिच्या गर्भापासून तेहेतीस देवता उत्पन्न झाल्या- बारा आदित्य, आठ वसु, अकरा रूद्र आणि दोन अश्विनीकुमार. परंतप ! श्रीराम ! याच तेहतीस देवता आहेत. ॥१४ १/२॥ | 
| दितिस्त्वजनयत् पुत्रान् दैत्यांस्तात यशस्विनः ॥ १५ ॥ 
 तेषामियं वसुमती पुरासीत् सवनार्णवा ।
 
 | ’तात ! दितिने दैत्य नामाने प्रसिद्ध यशस्वी पुत्रांना जन्म दिला. पूर्वकाली वने आणि समुद्रांसहित सारी पृथ्वी त्यांच्या अधिकारात होती. ॥१५ १/२॥ | 
| दनुस्त्वजनयत् पुत्रमश्वग्रीवमरिंदम ॥ १६ ॥ 
 नरकं कालकं चैव कालकापि व्यजायत ।
 
 | ’शत्रुदमन ! दनुने अश्वग्रीव नामक पुत्रांना उत्पन्न केले आणि कालकाने नरक आणि कालक नामक दोन पुत्रांना जन्म दिला. ॥१६ १/२॥ | 
| क्रौञ्चीं भासीं तथा श्येनीं धृतराष्ट्रीं तथा शुकीम् ॥ १७ ॥ 
 ताम्रा तु सुषुवे कन्याः पञ्चैता लोकविश्रुताः ।
 
 | ’ताम्राने क्रौंची, भासी, श्येनी, धृतराष्ट्री, तसेच शुकी - या पाच विश्वविख्यात कन्यांना उत्पन्न केले. ॥१७ १/२॥ | 
| उलूकाञ्जनयत् क्रौञ्ची भासी भासान् व्यजायत ॥ १८ ॥ 
 श्येनी श्येनांश्च गृध्रांश्च व्यजायत सुतेजसः ।
 धृतराष्ट्री तु हंसांश्च कलहंसांश्च सर्वशः ॥ १९ ॥
 
 | ’यापैकीं क्रौंञ्चीने घुबडांना, भासीने भास नामक पक्ष्यांना, श्येनीने परम तेजस्वी श्येनांना (बाजांना) आणि गिधाडांना, तसेच धृतराष्ट्रीने सर्व प्रकारच्या हंसाना आणि कलहंसाना जन्म दिला. ॥१८-१९॥ | 
| चक्रवाकांश्च भद्रं ते विजज्ञे सापि भामिनी । शुकी नतां विजज्ञे तु नतायां विनता सुता ॥ २० ॥
 
 | ’श्रीरामा ! आपले कल्याण होवो ! त्याच भामिनी धृतराष्ट्रीने चक्रवाक नामक पक्ष्यांनाही उत्पन्न केले. ताम्राची सर्वात कनिष्ठ कन्या शुकीने नता नावाच्या कन्येला जन्म दिला. नतापासून विनता नावाची कन्या उत्पन्न झाली. ॥२०॥ | 
| दश क्रोधवशा राम विजज्ञेऽप्यात्मसम्भवाः । मृगीं च मगमन्दां च हरिं भद्रमदामपि ॥ २१ ॥
 
 मातङ्गीमथ शार्दूलीं श्वेतां च सुरभिं तथा ।
 सर्वलक्षणसंपन्नां सुरसां कद्रुकामपि ॥ २२ ॥
 
 | ’श्रीरामा ! क्रोधवशाने आपल्या पोटातून दहा कन्यांना जन्म दिला. ज्यांची नामे आहेत- मृगी, मृगमंदा, हरी, भद्रमदा, मातङ्गी, शार्दूली, श्वेता, सुरभी, व सर्वलक्षणांनी संपन्न अशा सुरसा आणि कद्रुका. ॥२१-२२॥ | 
| अपत्यं तु मृगाः सर्वे मृग्या नरवरोत्तम । ऋक्षाश्च मृगमन्दायाः सृमराश्चमरास्तथा ॥ २३ ॥
 
 | ’नरेशांमध्ये श्रेष्ठ श्रीरामा ! मृगीचे संतान सारे मृग आहेत आणि मृगमंदाचे ऋक्ष, सृमर आणि चमर (आहेत) ॥२३॥ | 
| ततस्त्विरावतीं नाम जज्ञे भद्रमदा सुताम् । तस्यास्त्वैरावतः पुत्रो लोकनाथो महागजः ॥ २४ ॥
 
 | ’भद्रमदाने इरावती नामक कन्येला जन्म दिला, जिचा पुत्र आहे ऐरावत नामक महान गजराज, जो समस्त लोकांचा अभीष्ट आहे. ॥२४॥ | 
| हर्याश्च हरयोऽपत्यं वानराश्च तपस्विनः । गोलाङ्गूलाश्च शार्दूली व्याघ्रांश्चाजनयत् सुतान् ॥ २५ ॥
 
 | ’हरीचे संतान हरि (सिंह) तसेच तपस्वी (विचारशील) वानर तसेच गोलांगूल (लंगूर) आहेत. क्रोधवशाची पुत्री (कन्या) शार्दूलीने व्याघ्र नामक पुत्र उत्पन्न केले. ॥२५॥ | 
| मातङग्यास्त्वथ मातङ्गा अपत्यं मनुजर्षभ । दिशागजं तु काकुत्स्थ श्वेता व्यजनयत् सुतान् ॥ २६ ॥
 
 | ’नरश्रेष्ठ ! मातङ्गीचे संतान मातङ्ग (हत्ती) आहेत. काकुत्स्थ ! श्वेताने आपल्या पुत्राच्या रूपात एका दिग्गजाला जन्म दिला. ॥२६॥ | 
| ततो दुहितरौ राम सुरभिर्द्वे व्यजायत । रोहिणीं नाम भद्रं ते गन्धर्वीं च यशस्विनीम् ॥ २७ ॥
 
 | ’श्रीराम ! आपले भले होवो. क्रोधवशाची पुत्री सुरभी देवीने दोन कन्यांना उत्पन्न केले- रोहिणी आणि यशस्विनी गंधर्वी.’ ॥२७॥ | 
| रोहिण्यजनयद् गावो गन्धर्वी वाजिनः सुतान् । सुरसाजनयन्नागान् राम कद्रूश्च पन्नगान् ॥ २८ ॥
 
 | ’रोहिणीने गाईंना जन्म दिला. आणि गंधर्वीने घोड्यांनाच पुत्ररूपाने प्रकट केले. श्रीराम ! सुरसेने नागांना आणि कद्रूने पन्नगांना जन्म दिला.’ ॥२८॥ | 
| मनुर्मनुष्याञ्जनयत् कश्यपस्य महात्मनः । ब्राह्मणान् क्षत्रियान् वैश्याञ्शूद्रांश्च मनुजर्षभ ॥ २९ ॥
 
 | ’नरश्रेष्ठ ! महात्मा कश्यपाची पत्नी मनुने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तथा शूद्र जातीच्या मनुष्यांना जन्म दिला. ॥२९॥ | 
| मुखतो ब्राह्मणा जाता उरसः क्षत्रियास्तथा । उरुभ्यां जज्ञिरे वैश्याः पद्भ्यां शूद्रा इति श्रुतिः ॥ ३० ॥
 
 | ’मुखापांसून ब्राह्मण उत्पन्न झाले आणि हृदयापासून क्षत्रिय ! दोन्ही उरूंपासून (मांड्यापासून) वैश्यांचा जन्म झाला आणि दोन्ही पायांपासून शूद्रांचा जन्म - अशी प्रसिद्धि आहे. ॥३०॥ | 
| सर्वान् पुण्यफलान् वृक्षाननलापि व्यजायत । विनता च शुकीपौत्री कद्रूश्च सुरसास्वसा ॥ ३१ ॥
 
 | ’(कश्यपपत्नी) अनलाने पवित्र फळवाल्या समस्त वृक्षांना जन्म दिला. कश्यपपत्नी ताम्राची कन्या जी शुकी होती, तिची पौत्री (नात) विनता होती तसेच कद्रू सुरसेची बहीण (एवं क्रोधवशेची कन्या) म्हटली गेली. ॥३१॥ | 
| कद्रूर्नागसहस्रं तुस्यं विजज्ञे धरणीधरान् । द्वौ पुत्रौ विनतायास्तु गरुडोऽरुण एव च ॥ ३२ ॥
 
 | ’यापैकी कद्रूने एक सहस्त्र नागांना उत्पन्न केले जे या पृथ्वीला धारण करणारे आहेत तसेच विनताला दोन पुत्र झाले- गरूड आणि अरूण. ॥३२॥ | 
| तस्माज्जातोऽहमरुणात् सम्पातिश्च ममाग्रजः । जटायुरिति मां विद्धि श्येनीपुत्रमरिंदम ॥ ३३ ॥
 
 | ’त्याच विनतानंदन अरूणापासून मी तसेच माझा मोठा भाऊ संपाति उत्पन्न झालो. शत्रुदमन रघुवीर ! आपण माझे नाव जटायु समजा, मी श्येनीचा पुत्र आहे. (ताम्राची कन्या जी श्येनी सांगितली गेली आहे तिच्या परंपरेत उत्पन्न झालेली एक श्येनी माझी माता झाली.) ॥३३॥ | 
| सोऽहं वाससहायस्ते भविष्यामि यदीच्छसि । इदं दुर्गं हि कान्तारं मृगराक्षससेवितम् ।
 सीतां च तात रक्षिष्ये त्वयि याते सलक्ष्मणे ॥ ३४ ॥
 
 | ’तात ! जर आपली इच्छा असेल तर मी आपल्या निवासात सहाय्यक होईन. हे दुर्गम वन मृगांनी आणि राक्षसांनी सेवित आहे. लक्ष्मणासहित जर आपण आपल्या पर्णशालेतून कधी बाहेर निघून गेलात तर त्या अवसरी मी देवी सीतेचे रक्षण करीन.’ ॥३४॥ | 
| जटायुषं तं प्रतिपूज्य राघवो मुदा परिष्वज्य च सन्नतोऽभवत् ।
 पितुर्हि शुश्राव सखित्वमात्मवा-
 ञ्जटायुषा सङ्कथितं पुनः पुनः ॥ ३५ ॥
 
 | हे ऐकून श्रीरामचंद्रांनी जटायुचा मोठा सन्मान केला आणि प्रसन्नतापूर्वक त्यांना प्रेमाने आलिंगन देऊन ते त्यांच्या समोर नतमस्तक झाले. नंतर पित्याच्या बरोबर जशी त्यांची मित्रता झाली होती तो प्रसङ्ग मनस्वी श्रीरामांनी जटायुच्या मुखाने वारंवार ऐकला. ॥३५॥ | 
| स तत्र सीतां परिदाय मैथिलीं सहैव तेनातिबलेन पक्षिणा ।
 जगाम तां पञ्चवटीं सलक्ष्मणो
 रिपून् दिधक्षञ्शलभानिवानलः ॥ ३६ ॥
 
 | तत्पश्चात ते मैथिली सीतेला त्यांच्या संरक्षणात सोंपवून लक्ष्मण आणि त्या अत्यंत बलशाली पक्षी जटायुच्या सहच पञ्चवटीकडे निघाले. श्रीरामचंद्र मुनिद्रोही राक्षसांना शत्रु समजून त्यांना आग ज्या प्रमाणे पतङ्गांना दग्ध करून टाकते त्याप्रमाणेच दग्ध करू इच्छित होते. ॥३६॥ | 
| इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥ 
 | या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा चौदावा सर्ग पूरा झाला. ॥१४॥ | 
|