श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। त्रयोदशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राज्ञो वसिष्ठं प्रति यज्ञसमारम्भायानुरोधस्तेन तदर्थं सेवकानां नियुक्ती राज्ञामामन्त्रणाय तस्य सुमन्त्रं प्रत्यादेशः समागतनरेशानां सत्कारः सपत्‍नीकेन राज्ञा यज्ञदीक्षाया ग्रहणं च - दशरथ राजाचा वसिष्ठांना यज्ञाच्या तयारीसाठी अनुरोध, वसिष्ठद्वारा त्यासाठी सेवकांची नियुक्ति आणि सुमंत्रास इतर राजांना आमंत्रण संबंधी आदेश, समागत राजांचा सत्कार आणि पत्‍नींसह यज्ञाची दीक्षा घेणे -
पुनः प्राप्ते वसन्ते तु पूर्णः संवत्सरोऽभवत् ।
प्रसवार्थं गतो यष्टुं हयमेधेन वीर्यवान् ॥ १ ॥
वर्तमान वसंत ऋतु संपल्यावर ज्यावेळी दुसरा वसंत ऋतु आला, तो पर्यंत एक वर्षाचा काळ पूर्ण झाला होता. त्यावेळी शक्तिशाली राजा दशरथ संतानासाठी अश्वमेध यज्ञाची दीक्षा घेण्याच्या निमित्ताने वसिष्ठांच्या समीप आले. ॥ १ ॥
अभिवाद्य वसिष्ठं च न्यायतः प्रतिपूज्य च ।
अब्रवीत् प्रश्रितं वाक्यं प्रसवार्थं द्विजोत्तमम् ॥ २ ॥
वसिष्ठांना प्रणाम करून राजांनी न्यायतः त्यांचे पूजन केले आणि पुत्रप्राप्तिचे उद्दीश्य ठेवून त्या द्विजश्रेष्ठ मुनिंना उद्देशून याप्रमाणे विनययुक्त वचन बोलले. ॥ २ ॥
यज्ञो मे क्रियतां ब्रह्मन् यथोक्तं मुनिपुङ्‍गव ।
यथा न विघ्नाः क्रियते यज्ञाङ्‍गेषु विधीयताम् ॥ ३ ॥
"ब्रह्मन् ! मुनिप्रवर ! आपण शास्त्रविधिस अनुसरून माझा यज्ञ करवावा आणि यज्ञाच्या अंगभूत अश्व संचारण आदिमध्ये ब्रह्मराक्षसादि ज्याप्रकारे विघ्न आणुं शकणार नाहीत असा उपाय करवावा. ॥ ३ ॥
भवान् स्निग्धः सुहृन्मह्यं गुरुश्च परमो महान् ।
वोढव्यो भवता चैव भारो यज्ञस्य चोद्यतः ॥ ४ ॥
'आपला माझ्यावर विशेष स्नेह आहे. आपणे माझे सुहृद - अकारण हितैषी, गुरू आणि परम महान आहात. हा जो यज्ञाचा भार उपस्थित झाला आहे त्याला आपण वहन करून शकता." ॥ ४ ॥
तथेति च स राजानमब्रवीद् द्विजसत्तमः ।
करिष्ये सर्वमेवैतद् भवता यत्समर्थितम् ॥ ५ ॥
तेव्हां 'अति उत्तम' असे म्हणून विप्रवर वसिष्ठमुनि राजाला म्हणाले - "नरेश्वर ! तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते सर्व मी करीन." ॥ ५ ॥
ततोऽब्रवीद् द्विजान् वृद्धान् यज्ञकर्मसुनिष्ठितान् ।
स्थापत्ये निष्ठितांश्चैव वृद्धान् परमधार्मिकान् ॥ ६ ॥

कर्मान्तिकाञ्शिल्पकरान् वर्धकीन् खनकानपि ।
गणकाञ्शिल्पिनश्चैव तथैव नटनर्तकान् ॥ ७ ॥

तथा शुचीञ्शास्त्रविदः पुरुषान् सुबहुश्रुतान् ।
यज्ञकर्म समीहन्तां भवन्तो राजशासनात् ॥ ८ ॥
तदनंतर वसिष्ठांनी यज्ञसंबंधी कर्मांत निपुण आणि यज्ञविषयक शिल्पकर्मात कुशल, परम धर्मात्मा, वृद्ध ब्राह्मण, यज्ञकर्म समाप्त होईपर्यंत त्यांची सेवा करणारे सेवक, शिल्पकार, सुतार, जमीन खणणारे, ज्योतिषी, इतर कारागीर, नट्या, नर्तकी, विशुद्ध शास्त्रवेत्ते, आणि बहुश्रुत पुरुषांना बोलावून त्यांना सांगितले - "तुम्ही लोक महाराजांच्या आज्ञेने यज्ञकर्मासाठी आवश्यक प्रबंध करा. ॥ ६-८ ॥
इष्टका बहुसाहस्रीः शीघ्रमानीयतामिति ।
उपकार्याः क्रियन्तां च राज्ञां बहुगुणान्विताः ॥ ९ ॥
'शीघ्र काही हजार विटा आणल्या जावोत. राजे लोकांना राहण्यासाठी त्यांच्या योग्य अन्नपान आदि अनेक उपकरणांनी युक्त बरेचसे महाल बनविले जावोत. ॥ ९ ॥
ब्राह्मणावसथाश्चैव कर्तव्याः शतशः शुभाः ।
भक्ष्यान्नपानैर्बहुभिः समुपेताः सुनिष्ठिताः ॥ १० ॥
ब्राह्मणांना राहण्यासाठी शेकडो सुंदर घरे बनविली जावीत. ती सर्व घरे अनेक भोजनीय अन्नपानादि उपकरणांनी युक्त आणि वादळ, पाऊस आदिंचे निवारण करण्यास समर्थ असावीत. ॥ १० ॥
तथा पौरजनस्यापि कर्त्तव्याश्च सुविस्तराः ।
आगतानां सुदुराश्च पार्थिवानां पृथक् पृथक् ॥ ११ ॥
'अशाच प्रकारे पुरवासी लोकांसाठीही विस्तृत घरे बनविली पाहिजेत. दुरून आलेल्या भूपालांसाठीही पृथक् पृथक् महाल बनविले जावेत. ॥ ११ ॥
वाजिवारणशालाश्च तथा शय्यागृहाणि च ।
भटानां महदावासा वैदेशिकनिवासिनाम् ॥ १२ ॥
'घोडे आणि हत्ती यांच्यासाठीही शाला बनविल्या जाव्यात. साधारण लोकांना झोपण्यासाठीही घरांची व्यवस्था व्हावी. सैनिकांसाठी मोठमोठ्या छावण्या बनविल्या जाव्यात. ॥ १२ ॥
आवासा बहुभक्ष्या वै सर्वकामैरुपस्थिताः ।
तथा पौरजनस्यापि जनस्य बहुशोभनम् ॥ १३ ॥

दातव्यमन्नं विधिवत् सत्कृत्य न तु लीलया ।
'जी घरे बनविली जातील त्यात खाण्यापिण्याची भरपूर सामग्री संचीत असावी. त्यात सर्व मनोवांछित पदार्थ सुलभ असावे, आणि नगरवासी यांना अत्यंत स्वादिष्ट भोजन दिले पाहिजे. तेही विधिवत् सत्कारपूर्वक दिले जावे, अवहेलना करून नव्हे. ॥ १३ १/२ ॥
सर्वे वर्णा यथा पूजां प्राप्नुवन्ति सुसत्कृताः ॥ १४ ॥

न चावज्ञा प्रयोक्तव्या कामक्रोधवशादपि ।
'अशी व्यवस्था व्हावयास हवी की ज्यायोगे सर्व वर्णांचे लोक उत्तम प्रकारे सत्कृत होऊन सन्मान प्राप्त करतील. काम आणि क्रोधाच्या वशीभूत होऊन कुणाचाही अनादर होता कामा नये. ॥ १४ १/२ ॥
यज्ञकर्मसु ये व्यग्राः पुरुषाः शिल्पिनस्तथा ॥ १५ ॥

तेषामपि विशेषेण पूजा कार्या यथाक्रमम् ।
'जे शिल्पी मनुष्य यज्ञकर्माच्या आवश्यक तयारीत गुंतलेले असतील त्यांचा तर लहान मोठ्याची दखल घेऊन विशेष रूपाने समादर केला पाहिजे. ॥ १५ १/२ ॥
ये स्युः संपूजिताः सर्वे वसुभिर्भोजनेन च ॥ १६ ॥

यथा सर्वं सुविहितं न किञ्चित् परिहीयते ।
तथा भवन्तः कुर्वन्तु प्रीतिस्निग्धेन चेतसा ॥ १७ ॥
'जे सेवक अथवा कारागीर धन आणि भोजन आदिच्या द्वारा सन्मानित केले जातात ते सर्व परिश्रमपूर्वक कार्य करतात. त्यांच्याकडून केले गेलेले सर्व काम उत्तम रीतीने संपन्न असते. त्यांचे कुठलेही काम बिघडत नाही. म्हणून तुम्ही सर्व लोक प्रसन्नचित्त होऊन याप्रमाणेच करावे." ॥ १६-१७ ॥
ततः सर्वे समागम्य वसिष्ठमिदमब्रुवन् ।
यथेष्टं तत् सुविहितं न किञ्चित् परिहीयते ॥ १८ ॥

यथोक्तं तत् करिष्यामो न किञ्चित् परिहास्यते ।
तेव्हां ते सर्व लोक वसिष्ठांना म्हणाले - "आपल्याला जसे अभीष्ट आहे त्यास अनुसरूनच सर्व प्रकारे उत्तम व्यवस्था केली जाईल. कुठलेही काम बिघडू शकणार नाही. आपण जसे सांगितले आहे, आम्ही अगदी तसेच करू. त्यात काही त्रुटी येऊ दिली जाणार नाही." ॥ १८ १/२ ॥
ततः सुमन्त्रमाहूय वसिष्ठो वाक्यमब्रवीत् ॥ १९ ॥

निमन्त्रयस्व नृपतीन् पृथिव्यां ये च धार्मिकाः ।
ब्राह्मणान् क्षत्रियान् वैश्याञ्शूद्रांश्चैव सहस्रशः ॥ २० ॥
तदनंतर वसिष्ठांनी सुमंत्रास बोलावून म्हटले - "या पृथ्वीवर जो जो धार्मिक राजा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि हजारो शूद्र आहेत त्या सर्वांना या यज्ञात येण्यासाठी निमंत्रित करा. ॥ २० ॥
समानयस्व सत्कृत्य सर्वदेशेषु मानवान् ।
मिथिलाधिपतिं शूरं जनकं सत्यवादिनम् ॥ २१ ॥

तमानय महाभागं स्वयमेव सुसत्कृतम् ।
पूर्वं सम्बन्धिनं ज्ञात्वा ततः पूर्वं ब्रवीमि ते ॥ २२ ॥
'सर्व देशातील सज्जन लोकांना सत्कारपूर्वक येथे घेऊन या. मिथिलेचे स्वामी शूरवीर महाभाग जनक सत्यवादी नरेश आहेत. त्यांना आपले जुने संबंधी जाणून तुम्ही स्वयं जाऊन मोठ्या आदर सत्काराने येथे घेऊन या. म्हणून प्रथमच तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. ॥ २१-२२ ॥
तथा काशीपतिं स्निग्धं सततं प्रियवादिनम् ।
सद्‌वृत्तं देवसंकाशं स्वयमेवानयस्व ह ॥ २३ ॥
'याच प्रकारचे काशीचे राजा आपले स्नेही, मित्र आहेत आणि सदा प्रिय वचन बोलणारे आहेत. ते सदाचारी आणि देवतांप्रमाणे तेजस्वी आहेत. म्हणून त्यांनाही स्वतःच जाऊन घेऊन या. ॥ २३ ॥
तथा केकयराजानं वृद्धं परमधार्मिकम् ।
श्वशुरं राजसिंहस्य सपुत्रं तमिहानय ॥ २४ ॥
'केकय देशाचे वृद्ध राजे धर्मात्मा आहेत. ते राजसिंह महाराज दशरथांचे श्वशुर आहेत. म्हणून त्यांनाही पुत्रांसहित येथे घेऊन या. ॥ २४ ॥
अङ्‌गेश्वरं महेष्वासं रोमपादं सुसत्कृतम् ।
वयस्यं राजसिंहस्य सपुत्रं तमिहानय ॥ २५ ॥
'अंगदेशाचे स्वामी, महाधनुर्धर राजा रोमपाद आपल्या महाराजांचे मित्र आहेत म्हणून त्यांनाही पुत्रांसहित सत्कारपूर्वक येथे घेऊन या. ॥ २५ ॥
तथा कोसलराजानं भानुमन्तं सुसत्कृतम् ।
मगधाधिपतिं शूरं सर्वशास्त्रविशारदम् ॥ २६ ॥

प्राप्तिज्ञं परमोदारं सत्कृतं पुरुषर्षभम् ।
'कोशलराज भानुमान् यांसही सत्कारपूर्वक घेऊन या. मगध देशाचा राजा, जो शूरवीर, सर्वशास्त्र विशारद, परम उदार आणि पुरुषात श्रेष्ठ आहे, त्यास स्वतः जाऊन सत्कारपूर्वक बोलावून आणा. ॥ २६ १/२ ॥
राज्ञः शासनमादाय चोदयस्व नृपर्षभान् ।
प्राचीनान् सिन्धुसौवीरान् सौराष्ट्रेयांश्च पार्थिवान् ॥ २७ ॥
'महाराजांची आज्ञा घेऊन तुम्ही पूर्वदेशाच्या श्रेष्ठ नरेशांना आणि सिन्धु-सौवीर आणि सुराष्ट्र देशाच्या भूपालांना येथे येण्यासाठी निमंत्रण द्या. ॥ २७ ॥
दाक्षिणात्यान् नरेन्द्रांश्च समस्तानानयस्व ह ।
सन्ति स्निग्धाश्च ये चान्ये राजानः पृथिवीतले ॥ २८ ॥

तानानय यथा क्षिप्रं सानुगान् सहबान्धवान् ।
एतान् दुतैर्महाभागैरानयस्व नृपाज्ञया ॥ २९ ॥
'दक्षिण भारताच्या समस्त नरेशांनाही आमंत्रित करा. या भूतलवर आणखी कोठे जे जे नरेश महाराजांच्या प्रति स्नेह बाळगतात, त्या सर्वांना सेवक व सगे-सोयरे यांसह यथासंभव शीघ्र बोलवा. महाराजांच्या आज्ञेने भाग्यवान् दूतांच्या द्वारा या सर्वांकडे आमंत्रण पाठवा." ॥ २८-२९ ॥
वसिष्ठवाक्यं तच्छ्रुत्वा सुमन्त्रस्त्वरितं तदा ।
व्यादिशत् पुरुषांस्तत्र राज्ञामानयने शुभान् ॥ ३० ॥
वसिष्ठांचे हे वचन ऐकून सुमंत्राने ताबडतोब योग्य पुरुषांना राजे लोकांना निमंत्रित करण्यासाठी जाण्याचे आदेश दिले. ॥ ३० ॥
स्वयमेव हि धर्मात्मा प्रयातो मुनिशासनात् ।
सुमंत्रस्त्वरितो भूत्वा समानेतुं महामतिः ॥ ३१ ॥
परम बुद्धिमान धर्मात्मा सुमंत्र वसिष्ठ मुनिंच्या आज्ञेने खास खास राजांना बोलावून आणण्यासाठी स्वतःच गेले. ॥ ३१ ॥
ते च कर्मान्तिकाः सर्वे वसिष्ठाय महर्षये ।
सर्वं निवेदयन्ति स्म यज्ञे यदुपकल्पितम् ॥ ३२ ॥
यज्ञकर्माच्या व्यवस्थेसाठी जे सेवक नियुक्त केले गेले होते, त्या सर्वांनी येऊन त्या वेळेपर्यंत यज्ञसंबंधी जे जे कार्य संपन्न झाले होते त्या सर्वांची सूचना महर्षि वसिष्ठांना दिली. ॥ ३२ ॥
ततः प्रीतो द्विजश्रेष्ठस्तान् सर्वान् मुनिरब्रवीत् ।
अवज्ञया न दातव्यं कस्यचिल्लीलयापि वा ॥ ३३ ॥
अवज्ञया कृतं हन्याद् दातारं नात्र संशयः ।
हे ऐकून द्विजश्रेष्ठ मुनि अत्यंत प्रसन्न झाले आणि त्या सर्वांना म्हणाले - "भद्र पुरुषांनो ! ज्याला जे काही द्यावयाचे असेल ते देतांना अवहेलना वा अनादर होत नाही याची कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे. कारण अनादरपूर्वक दिलेले दान दात्याला नष्ट करते यात संशय नाही. ॥ ३३ १/२ ॥
ततः कैश्चिदहोरात्रैरुपयाता महीक्षितः ॥ ३४ ॥

बहूनि रत्‍नान्यादाय राज्ञो दशरथस्य हि ।
त्यानंतर काही दिवसांत राजे लोक महाराजांसाठी अनेक रत्‍नांची भेट घेऊन आले. ॥ ३४ १/२ ॥
ततो वसिष्ठः सुप्रीतो राजानमिदमब्रवीत् ॥ ३५ ॥

उपयाता नरव्याघ्र राजानस्तव शासनात् ।
मयापि सत्कृताः सर्वे यथार्हं राजसत्तम ॥ ३६ ॥
हे सर्व पाहून वसिष्ठांना प्रसन्नता वाटली. त्यांनी राजास म्हटले - "पुरुषसिंह, त्या सर्वांचा यथायोग्य सत्कार केला आहे." ॥ ३५-३६ ॥
यज्ञियं च कृतं सर्वं पुरुषैः सुसमाहितैः ।
निर्यातु च भवान् यष्टुं यज्ञायतनमन्तिकात् ॥ ३७ ॥
आपल्या कार्यकर्त्यांनी पूर्णतः सावध राहून यज्ञासाठी सर्व तयारी केली आहे. आता तुम्हीही यज्ञ करण्यासाठी यज्ञमंडपात चला. ॥ ३७ ॥
सर्वकामैरुपहृतैरुपेतं वै समन्ततः ।
द्रष्टुमर्हसि राजेन्द्र मनसेव विनिर्मितम् ॥ ३८ ॥
'राजेन्द्र ! यज्ञमंडपात सर्व बाजून सर्व वांछनीय वस्तु एकत्रित केल्या गेल्या आहेत. आपण स्वतः येऊन पहावे. हा यज्ञ मंडप इतका शीघ्र तयार केला गेला आहे, जणूं मनाच्या संकल्पाने हा बनला आहे कीं काय ? ॥ ३८ ॥
तथा वसिष्ठवचनातद्‌ऋष्यशृङ्‍गस्य चोभयोः ।
दिवसे शुभनक्षत्रे निर्यातो जगतीपतिः ॥ ३९ ॥
मुनिवर वसिष्ठ आणि ऋष्यशृंग दोघांच्या आदेशावरून शुभ नक्षत्रे असलेल्या दिवशी राजा दशरथ यज्ञासाठी राजभवनातून निघाले. ॥ ३९ ॥
ततो वसिष्ठप्रमुखाः सर्व एव द्विजोत्तमाः ।
ऋष्यशृङ्‍गं पुरस्कृत्य यज्ञकर्मारभंस्तदा ॥ ४० ॥

यज्ञवाटं गताः सर्वे यथाशास्त्रं यथाविधि ।
श्रीमांश्च सह पत्‍निभी राजा दीक्षामुपाविशत् ॥ ४१ ॥
तत्पश्चात् वसिष्ठ आदि सर्व श्रेष्ठ द्विजांनी यज्ञमंडपात जाऊन ऋष्यशृंगास पुढे करून शास्त्रोक्त विधीस अनुसरून यज्ञकर्माचा आरंभ केला. पत्‍नींच्या सहित श्रीमान अवध नरेशाने यज्ञाची दीक्षा घेतली. ॥ ४०-४१ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे त्रयोदशः सर्गः ॥ १३ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा तेरावा सर्ग समाप्त झाला. ॥ १३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP