[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। अष्टमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मन्थरया पुनः श्रीरामराज्याभिषेकस्य कैकेयीकृतेऽनिष्टकरत्वे प्रतिपादिते कैकेय्या श्रीरामगुणान् वर्णयित्वा तदीयाभिषेकस्य समर्थनं तदनुकुब्जया पुनः श्रीरामराज्यस्य भरताय भयोत्पादकत्वं प्रतिपाद्य कैकेय्या मनसि भेदभावोत्पादनम् - मंथरेने पुन्हा श्रीरामाचा राज्याभिषेक कैकेयीसाठी अनिष्टकारी असे सांगणे. कैकेयीने श्रीरामांचे गुण सांगून त्यांच्या अभिषेकाचे समर्थन करणे तत्पश्चात कुब्जेने पुनः श्रीरामराज्य भरतासाठी भयजनक आहे असे सांगून कैकेयीला भडकावणे -
मन्थरा त्वभ्यसूय्यैनामुत्सृज्याभरणं च तत् ।
उवाचेदं ततो वाक्यं कोपदुःखसमन्विता ॥ १ ॥
हे ऐकून मंथरेने कैकेयीची निंदा करून तिने दिलेले आभूषण उचलून फेकून दिले आणि कोपाने आणि दुःखाने व्याप्त होऊन ती म्हणाली - ॥१॥
हर्षं किमर्थमस्थाने कृतवत्यसि बालिशे ।
शोकसागरमध्यस्थं नात्मानमवबुध्यसे ॥ २ ॥
'राणी ! तू फार मूर्ख (अजाण) आहेस. अहो ! तू हा अवेळी हर्ष कशासाठी प्रकट केलास ? तुला शोकाच्या ठिकाणी प्रसन्नता कशी काय होत आहे ? अग तू शोकाच्या समुद्रात बुडलेली आहेस. तरीही तुला आपल्या या विपन्नावस्थेचा बोध होत नाही ? ॥२॥
मनसा प्रसहामि त्वां देवि दुःखार्दिता सती ।
यच्छोचितव्ये हृष्टासि प्राप्य त्वं व्यसनं महत् ॥ ३ ॥
'देवि ! महान संकटात पडल्यावर जेथे तुला शोक व्हावयास पाहिजे तेथे तुला हर्ष होत आहे. तुझी ही अवस्था पाहून मला मनातल्या मनात फार क्लेश सहन करावे लागत आहेत. मी दुःखाने व्याकुळ होऊन जात आहे. ॥३॥
शोचामि दुर्मतित्वं ते का हि प्राज्ञा प्रहर्षयेत् ।
अरेः सपत्‍नीपुत्रस्य वृद्धिं मृत्योरिवागताम् ॥ ४ ॥
'मला तुझ्या दुर्बुद्धीमुळे अधिक शोक होत आहे. अग ! सवतीचा मुलगा शत्रु असतो. तो सावत्र आई साठी साक्षात मृत्युसमान आहे. भले, त्याच्या अभ्युदयाचा अवसर आलेला पाहून कोणती बुद्धिमान स्त्री आपल्या मनात आनंद मानेल ? ॥४॥
भरतादेव रामस्य राज्यसाधारणाद् भयम् ।
तद् विचिन्त्य विषण्णास्मि भयं भीताद्धि जायते ॥ ५ ॥
हे राज्य भरत आणि राम दोघांसाठी साधारण भोग्यवस्तु आहे. ह्याच्यावर दोघांचा समान अधिकार आहे. म्हणून श्रीरामाला भरतापासूनच भय आहे. हा विचार करून मी विषादात बुडून जात आहे कारण की भयभीतापासूनच भय प्राप्त होत असते अर्थात आज ज्याला भय आहे, तोच राज्य प्राप्त करून घेतल्यावर सबल होऊन जाईल, तेव्हा आपल्या भयाच्या हेतूला उखडून फेकून देईल. ॥५॥
लक्ष्मणो हि महाबाहू रामं सर्वात्मना गतः ।
शत्रुघ्नश्चापि भरतं काकुत्स्थं लक्ष्मणो यथा ॥ ६ ॥
महाबाहु लक्ष्मण संपूर्ण हृदयापासून रामाचा अनुगत आहे. जसा लक्ष्मण काकुस्थाचा (रामाचा) अनुगत आहे तसाच शत्रुघ्नही भरताचे अनुसरण करणारा आहे. ॥६॥
प्रत्यासन्नक्रमेणापि भरतस्यैव भामिनि ।
राज्यक्रमो विसृष्टस्तु तयोस्तावद्यवीयसोः ॥ ७ ॥
भामिनी ! उत्पत्तिच्या क्रमाने श्रीरामाच्या नंतर भरताचाच प्रथम राज्यावर अधिकार होऊ शकतो. (म्हणून भरतापासून भय होणे स्वाभाविक आहे.) लक्ष्मण आणि शत्रुघ्न तर लहान आहेत म्हणून त्यांच्यासाठी राज्यप्राप्तिची संभावना दूर आहे. ॥७॥
विदुषः क्षत्रचारित्रे प्राज्ञस्य प्राप्तकारिणः ।
भयात् प्रवेपे रामस्य चिन्तयन्ती तवात्मजम् ॥ ८ ॥
'श्रीराम समस्त शास्त्रांचे ज्ञाते आहेत. विशेषतः क्षत्रिय चरित्राचे (राजनीतिचे) ते पण्डित आहेत आणि समयोचित कर्तव्याचे पालन करणारे आहेत, म्हणून त्यांचा तुझ्या पुत्राप्रति जे क्रूरता आचरण होईल, त्याचा विचार करून माझा भयाने थरकाप उडतो आहे. ॥८॥
सुभगा किल कौसल्या यस्याः पुत्रोऽभिषेक्ष्यते ।
यौवराज्येन महता श्वः पुष्येण द्विजोत्तमैः ॥ ९ ॥
वास्तविक कौसल्याच सौभाग्यवती आहे, जिच्या पुत्राचा उद्या पुष्यनक्षत्राच्या योगावर ब्राह्मणांच्या द्वारा युवराजाच्या महान पदावर अभिषेक होऊ घातला आहे. ॥९॥
प्राप्तां वसुमतीं प्रीतिं प्रतीतां हतविद्विषम् ।
उपस्थास्यसि कौसल्यां दासीवत् त्वं कृताञ्जलिः ॥ १० ॥
ती भूमण्डलाचे निष्कण्टक राज्य मिळून प्रसन्न होईल कारण की ती राजाची विश्वासपात्र आहे आणि तू दासी प्रमाणे हात जोडून तिच्या सेवेत उपस्थित होशील. ॥१०॥
एवं च त्वं सहास्माभिस्तस्याः प्रेष्या भविष्यसि ।
पुत्रश्च तव रामस्य प्रेष्यत्वं हि गमिष्यति ॥ ११ ॥
याप्रकारे आमच्या बरोबर तूही कौसल्येची दासी बनशील आणि तुझा पुत्र भरत यालाही रामाची गुलामी करावी लागेल. ॥११॥
हृष्टाः खलु भविष्यन्ति रामस्य परमाः स्त्रियः ।
अप्रहृष्टा भविष्यन्ति स्नुषास्ते भरतक्षये ॥ १२ ॥
श्रीरामाच्या अंतःपुरातील परम सुंदर स्त्रिया- सीतादेवी आणि तिच्या सख्या निश्चितच खूप प्रसन्न होतील आणि भरताच्या प्रभुत्वाचा नाश होण्यामुळे तुझ्या सुना शोकमग्न होतील. ॥१२॥
तां दृष्ट्‍वा परमप्रीतां ब्रुवन्तीं मन्थरां ततः ।
रामस्यैव गुणान् देवी कैकेयी प्रशशंस ह ॥ १३ ॥
मंथरेला अत्यंत अप्रसन्नतेमुळे भरकटल्या प्रमाणे बोलतांना पाहून देवी कैकेयीने रामांच्या गुणांची प्रशंसा करीत म्हटले - ॥१३॥
धर्मज्ञो गुणवान् दान्तः कृतज्ञः सत्यवाञ्छुचिः ।
रामो राजसुतो ज्येष्ठो यौवराज्यमतोऽर्हति ॥ १४ ॥
'कुब्जे ! राम धर्माचा ज्ञाता, गुणवान, जितेंद्रिय, कृतज्ञ, सत्यवादी आणि पवित्र असण्याबरोबरच महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आहेत म्हणून युवराज होण्यास योग्य तेच आहेत. ॥१४॥
भ्रातॄन् भृत्यांश्च दीर्घायुः पितृवत् पालयिष्यति ।
संतप्यसे कथं कुब्जे श्रुत्वा रामाभिषेचनम् ॥ १५ ॥
ते दीर्घजीवी होऊन आपल्या भावांचे आणि भृत्यांचे (सेवकांचे) पित्या प्रमाणे पालन करतील. कुब्जे ! त्यांच्या अभिषेकाची गोष्ट ऐकून तू इतकी जळत कां आहेस ? ॥१५॥
भरतश्चापि रामस्य ध्रुवं वर्षशतात् परम् ।
पितृपैतामहं राज्यमवाप्स्यति नरर्षभः ॥ १६ ॥
श्रीरामाच्या राज्यप्राप्तीनंतर शंभर वर्षानी नरश्रेष्ठ भरताला ही निश्चितच आपल्या पित्याचे - पितामहाचे राज्य मिळेल. ॥१६॥
सा त्वमभ्युदये प्राप्ते दह्यमानेव मन्थरे ।
भविष्यति च कल्याणे किमिदं परितप्यसे ॥ १७ ॥
'मंथरे ! अशा अभ्युदय प्राप्तिच्या समयी की जेव्हा भविष्यात कल्याणच -कल्याण दिसून येत आहे, तू या प्रकारे जळत असल्या सारखी संतप्त का होत आहेस ? ॥१७॥
यथा वै भरतो मान्यस्तथा भूयोऽपि राघवः ।
कौसल्यातोऽतिरिक्तं च मम शुश्रूषते बहु ॥ १८ ॥
माझ्यासाठी जसा भरत आदरास पात्र आहे तसाच इतकेच नव्हे तर त्याच्या पेक्षाही अधिक राघव (आदरास पात्र) आहे; कारण की तो कौसल्येहून अधिक माझी फारच सेवा करतो. ॥१८॥
राज्यं यदि हि रामस्य भरतस्यापि तत् तदा ।
मन्यते हि यथाऽऽत्मानं यथा भ्रातॄंस्तु राघवः ॥ १९ ॥
जर रामाला राज्य मिळत असेल तर ते भरतालाच मिळाले आहे असे समज, कारण की राघव आपल्या भावांनाही आपल्या सारखेच समजतो. ॥१९॥
कैकेय्या वचनं श्रुत्वा मन्थरा भृशदुःखिता ।
दीर्घमुष्णं विनिश्वस्य कैकेयीमिदमब्रवीत् ॥ २० ॥
कैकेयीचे हे म्हणणे ऐकून मंथरेला फार दुःख झाले आणि गरम आणि दीर्घ श्वास घेऊन ती कैकेयीला म्हणाली - ॥२०॥
अनर्थदर्शिनी मौर्ख्यान्नात्मानमवबुध्यसे ।
शोकव्यसनविस्तीर्णे मज्जन्ती दुःखसागरे ॥ २१ ॥
'राणी ! तू मूर्खतावश अनर्थालाच अर्थ समजत आहेस. तुला आपल्या स्थितिचा पत्ता नाही. तू दुःखाच्या त्या महासागरात बुडत आहेस जो शोक (इष्टाच्या वियोगाची चिंता) आणि व्यसन (अनिष्टाच्या प्राप्तिचे दुःख) यांच्या योगे महान विस्तारास प्राप्त होत आहे. ॥२१॥
भविता राघवो राजा राघवस्य च यः सुतः ।
राजवंशात्तु भरतः कैकेयी परिहास्यते ॥ २२ ॥
"कैकेयी ! जेव्हा राघव राजा होईल तेव्हा त्याच्यानंतर त्याचा पुत्र जो होईल त्यालाच राज्य मिळेल. भरत तर राज्यपरंपरे पासून विलग होऊन जाईल. ॥२२॥
नहि राज्ञः सुताः सर्वे राज्ये तिष्ठन्ति भामिनि ।
स्थाप्यमानेषु सर्वेषु सुमहाननयो भवेत् ॥ २३ ॥
'भामिनी ! राजाचे सर्व पुत्र राजसिंहासनावर बसत नाहीत. जर सर्वांनाच बसविले गेले तर फार मोठा अनर्थ होईल. ॥२३॥
तस्माज्ज्येष्ठे हि कैकेयि राज्यतन्त्राणि पार्थिवाः ।
स्थापयन्त्यनवद्याङ्‌गि गुणवत्स्वितरेष्वपि ॥ २४ ॥
परमसुंदर कैकेयी ! म्हणूनच राजे लोक राज्यकारभाराचा भार ज्येष्ठ पुत्रांवरच सोपवितात. जर ज्येष्ठ पुत्र गुणवान नसेल तर दुसर्‍या गुणवान पुत्रांवरही राज्य सोपवून देतात. ॥२४॥
असावत्यन्तनिर्भग्नस्तव पुत्रो भविष्यति ।
अनाथवत् सुखेभ्यश्च राजवंशाच्च वत्सले ॥ २५ ॥
'पुत्र वत्सले ! तुझा पुत्र राज्याच्या अधिकारापासून तर बहुतेक दूरच हटविला जाईल, तो अनाथा प्रमाणे समस्त सुखांपासूनही वंचित होऊन जाईल. ॥२५॥
साहं त्वदर्थे सम्प्राप्ता त्वं तु मां नावबुद्ध्यसे ।
सपत्‍निवृद्धौ या मे त्वं प्रदेयं दातुमर्हसि ॥ २६ ॥
म्हणून मी तुझ्या हिताची गोष्ट सुचविण्यासाठीच येथे आले आहे; परंतु तू माझा अभिप्राय तर समजतच नाहीस उलट सवतीचा अभ्युदय ऐकून मला पारितोषिक द्यावयास निघाली आहेस. ॥२६॥
ध्रुवं तु भरतं रामः प्राप्य राज्यमकण्टकम् ।
देशांतरं नाययिता लोकान्तरमथापि वा ॥ २७ ॥
'याद राख, जर रामाला निष्कण्टक राज्य मिळाले तर तो भरताला अवश्यच या देशातून बाहेर हाकलून देईल अथवा परलोकातच पोहोचवू शकतो. ॥२७॥
बाल एव हि मातुल्यं भरतो नायितस्त्वया ।
सन्निकर्षाच्च सौहार्दं जायते स्थावरेष्विव ॥ २८ ॥
लहान वयातच तू भरताला मामाच्या घरी धाडून दिले आहेस. निकट राहण्याने सौहार्द उत्पन्न होत असते. ही गोष्ट स्थावर योनिमध्ये ही दिसून येते. (लता आणि वृक्ष आदि एक दुसर्‍याच्या निकट असतील तर परस्पर आलिंगनात बद्ध होऊन जातात जर भरत येथेच असते तर राजांचे त्यांच्याविषयीचा स्नेहही समान रूपाने वाढला असता. म्हणून त्यांनी भरतांनाही अर्धे राज्य दिले असते). ॥२८॥
भरतानुवशात् सोऽपि शत्रुघ्नस्तत्समं गतः ।
लक्ष्मणो हि यथा रामं तथायं भरतं गतः ॥ २९ ॥
भरताच्या अनुरोधाने शत्रुघ्न ही त्यांच्या बरोबर निघून गेले. (जर ते येथे असते तर भरताचे काम बिघडू शकले नसते कारण की- ) जसे लक्ष्मण रामाचे अनुगामी आहेत त्याच प्रकारे शत्रुघ्न भरताचे अनुसरण करणारे आहेत. ॥२९॥
श्रूयते हि द्रुमः कश्चिच्छेत्तव्यो वनजीवनैः ।
सन्निकर्षादिषीकाभिर्मोचितः परमाद् भयात् ॥ ३० ॥
'असे ऐकले जाते की जंगलातील लाकडे विकून जीविका चालविण्यार्‍या लोकांनी कुठल्या तरी वृक्षाला तोडण्याचा निश्चय केला परंतु तो वृक्ष काटेरी झुडुपांनी घेरलेला होता, म्हणून ते त्याला तोडू शकले नाहीत. या प्रकारे त्या काटेरी झुडुपांनी निकट राहात असल्या कारणाने त्या वृक्षाला महान भयापासून वाचविले. ॥३०॥
गोप्ता हि रामं सौमित्रिर्लक्ष्मणं चापि राघवः ।
अश्विनोरिव सौभ्रात्रं तयोर्लोकेषु विश्रुतम् ॥ ३१ ॥
सौ-मित्र (लक्ष्मण) राघवाचे रक्षण करतात आणि राघव त्यांचे ! त्या दोघांचे उत्तम भ्रातृ-प्रेम दोन्ही अश्विनीकुमारां प्रमाणे तीन्ही लोकत प्रसिद्ध आहे. ॥३१॥
तस्मान्न लक्ष्मणे रामः पापं किञ्चित् करिष्यति ।
रामस्तु भरते पापं कुर्यादेव न संशयः ॥ ३२ ॥
म्हणून राम लक्ष्मणाचे तर किञ्चितही अनिष्ट करणार नाहीत, परंतु भरताचे अनिष्ट केल्याशिवाय ते राहू शकणार नाहीत यात संशय नाही. ॥३२॥
तस्माद् राजगृहादेव वनं गच्छतु राघवः ।
एतद्धि रोचते मह्यं भृशं चापि हितं तव ॥ ३३ ॥
म्हणून राघव महाराजांच्या महालातूनच थेट वनात निघून जातील, मला तर हेच चांगले वाटत आहे आणि यातच तुझे परम हित आहे. ॥३३॥
एवं ते ज्ञातिपक्षस्य श्रेयश्चैव भविष्यति ।
यदि चेद् भरतो धर्मात् पित्र्यं राज्यमवाप्स्यति ॥ ३४ ॥
जर भरत धर्मानुसार आपल्या पित्याचे राज्य प्राप्त करू शकले तर तुझे आणि तुझ्या पक्षातील अन्य सर्व लोकांचेही कल्याण होईल. ॥३४॥
स ते सुखोचितो बालो रामस्य सहजो रिपुः ।
समृद्धार्थस्य नष्टार्थो जीविष्यति कथं वशे ॥ ३५ ॥
सावत्र भाऊ असल्यामुळे जो रामाचा सहज शत्रु आहे, तो सुख भोगण्या योग्य तुझा बालक भरत राज्य आणि धनापासून वञ्चित होऊन राज्य मिळून समृद्धिशाली बनलेल्या रामाच्या वशात पडून (अधीन होऊन) कसा बरे जीवित राहील ? ॥३५॥
अभिद्रुतमिवारण्ये सिंहेन गजयूथपम् ।
प्रच्छाद्यमानं रामेण भरतं त्रातुमर्हसि ॥ ३६ ॥
ज्या प्रमाणे वनात सिंह हत्तींच्या यूथपतिवर आक्रमण करतो आणि तो पळून जाऊन हिंडत राहतो, त्याच प्रकारे राजा राम भरताचा तिरस्कार करेल म्हणून त्या तिरस्कारापासून तू भरताचे रक्षण कर. ॥३६॥
दर्पान्निराकृता पूर्वं त्वया सौभाग्यवत्तया ।
राममाता सपत्‍नी ते कथं वैरं न यापयेत् ॥ ३७ ॥
तू पहिल्याने पतिचे अत्यंत प्रेम प्राप्त झाल्याने घमेंडीत येऊन जिचा अनादर केला होतास तीच तुझी सवत राममाता कौसल्या पुत्राच्या राज्यप्राप्तिने परम सौभाग्य शालिनी झाली आहे, आता ती तुझ्याकडून आपल्या वैराचा बदला का बरे घेणार नाहीस ? ॥३७॥
यदा च रामः पृथिवीमवाप्स्यते
     प्रभूतरत्‍नाकरशैलसंयुताम् ।
तदा गमिष्यस्यशुभं पराभवं
     सहैव दीना भरतेन भामिनि ॥ ३८ ॥
'भामिनी ! ज्यावेळी राम अनेक समुद्र आणि पर्वतांनी युक्त समस्त भूमण्डलाचे राज्य प्राप्त करेल तेव्हा तू आपला पुत्र भरत याच्यासह दीन-हीन होऊन अशुभ पराभवास पात्र बनून जाशील. ॥३८॥
यदा हि रामः पृथिवीमवाप्स्यते
     ध्रुवं प्रणष्टो भरतो भविष्यति ।
अतो हि संचिन्तय राज्यमात्मजे
     परस्य चैवास्य विवासकारणम् ॥ ३९ ॥
'याद राख. ज्यावेळी राम या पृथ्वीवर अधिकार प्राप्त करतील तेव्हा निश्चितच तुझा पुत्र भरत नष्टप्राय होऊन जाईल. म्हणून असा काही उपाय विचाराने शोधून काढ, ज्या योगे तुझ्या पुत्राला तर राज्य मिळेल आणि शत्रुभूत श्रीरामास वनवास प्राप्त होईल'. ॥३९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥ या प्रकारे श्री वाल्मीकी निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्या काण्डाचा आठवा सर्ग पूरा झाला. ॥८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP