[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ षट्षष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
चूडामणिं दृष्ट्‍वा सीतावृत्तमुपलभ्य च श्रीरामस्य सीताकृते विलापः -
चूडामणि पाहून आणि सीतेचा समाचार मिळाल्याने श्रीरामांनी तिच्यासाठी विलाप करणे -
एवमुक्तो हनुमता रामो दशरथात्मजः ।
तं मणिं हृदये कृत्वा रुरोद सहलक्ष्मणः ॥ १ ॥
हनुमानाने असे सांगितल्यावर दशरथनन्दन श्रीराम तो मणि आपल्या हृदयाशी धरून रडू लागले. तेव्हा लक्ष्मणालाही रडू आवरले नाही.॥१॥
तं तु दृष्ट्‍वा मणिश्रेष्ठं राघवः शोककर्शितः ।
नेत्राभ्यामश्रुपूर्णाभ्यां सुग्रीवमिदमब्रवीत् ॥ २ ॥
श्रेष्ठ मणि पाहिल्यावर शोकाने व्याकुल झालेल्य राघवांचे दोन्ही डोळे अश्रूनी भरून आले आणि ते सुग्रीवास म्हणाले—॥२॥
यथैव धेनुः स्रवति स्नेहाद्वत्सस्य वत्सला ।
तथा ममापि हृदयं मणिश्रेष्ठस्य दर्शनात् ॥ ३ ॥
'मित्रा ! ज्याप्रमाणे वत्सल धेनूला आपल्या वत्साच्या प्रेमामुळे पान्हा फुटतो, (तिच्या स्तनान्तून दूध स्त्रवू लागते) त्याप्रमाणे या उत्तम मण्याला पाहून आज माझे हृदयही द्रवीभूत होत आहे. (सीतेच्या स्मरणाने हृदयाला पाझर फुटू लागले आहेत.) ॥३॥
मणिरत्‍नमिदं दत्तं वैदेह्याः श्वशुरेण मे ।
वधूकाले यथा बद्धमधिकं मूर्ध्नि शोभते ॥ ४ ॥
'माझे श्वसुर (सासरे) राजा जनक यांनी विवाहाच्या समयी वैदेहीला हे श्रेष्ठमणिरत्‍न दिले होते. ते तिच्या मस्तकावर आबद्ध होऊन फारच शोभून दिसत होते.॥४॥
अयं हि जलसम्भूतो मणिः प्रवरपूजितः ।
यज्ञे परमतुष्टेन दत्तः शक्रेण धीमता ॥ ५ ॥
'जलामध्ये उत्पन्न झालेले आणि देवतांनाही पूज्य असलेले हे मणिरत्‍न यज्ञामध्ये अतिशय सन्तुष्ट झालेल्या बुद्धिमान इन्द्राने राजा जनकांना दिले होते.॥५॥
इमं दृष्ट्‍वा मणिश्रेष्ठं यथा तातस्य दर्शनम् ।
अद्यास्म्यवगतः सौम्य वैदेहस्य तथा विभोः ॥ ६ ॥
''हे सौम्या ! या मणिरत्‍नाचे दर्शन झाल्याने आज मला जणु माझ्या पूज्य पित्याचे आणि विदेहराज महाराज जनकांचे दर्शन जणु काय घडले आहे असा अनुभव येत आहे.॥६॥
अयं हि शोभते तस्याः प्रियाया मूर्ध्नि मे मणिः ।
अस्याद्य दर्शनेनाहं प्राप्तां तामिव चिन्तये ॥ ७ ॥
हा मणि सदा माझी प्रिया सीता हिच्या सीमान्तभागी शोभत असे. आज ह्माला पाहून असे वाटत आहे की जणु सीताच मला प्राप्त झाली आहे.॥७॥
किमाह सीता वैदेही ब्रूहि सौम्य पुनः पुनः ।
पिपासुमिव तोयेन सिञ्चन्ति वाक्यवारिणा ॥ ८ ॥
''सौम्य पवनकुमारा ! ज्याप्रामाणे बेहोश झालेल्या मनुष्याला त्यांच्या तोंडावर पाणी शिपंडून शुद्धिवर आणले जाते त्याप्रमाणे मूर्च्छित झालेल्या मला वैदेही सीतेने आपल्या वाक्यरूपी जलाचे सिंचन करीत करीत काय काय सांगितले आहे ते तू वारंवार सांग' ॥८॥
इतस्तु किं दुःखतरं यदिमं वारिसम्भवम् ।
मणिं पश्यामि सौमित्रे वैदेहीमागतं विना ॥ ९ ॥
(आता ते लक्ष्मणास म्हणाले—) 'हे सुमित्रानन्दना ! सीता येथे नसतांना हे जलात उत्पन्न झालेले मणिरत्‍न मी पहात आहे याहून अधिक दु:खदायक ते काय असणार आहे ?॥९॥
चिरं जीवति वैदेही यदि मासं धरिष्यति ।
क्षणं सौम्य न जीवेयं विना तामसितेक्षणाम् ॥ १० ॥
(नन्तर ते हनुमानास म्हणाले—)'वीर पवनकुमार ! जर वैदेही एक महिनाभर जिवंत राहील तर ती चिरञ्जीविनीच आहे असे मी समजलो. कारण हे वीरा, मी तर त्या काळेभोर नेत्र असलेल्या सीतेवाचून यापुढे एक क्षणभरही जीवित राहू शकत नाही.॥१०॥
नय मामपि तं देशं यत्र दृष्टा मम प्रिया ।
न तिष्ठेयं क्षणमपि प्रवृत्तिमुपलभ्य च ॥ ११ ॥
जेथे माझी प्रिया तुझ्या दृष्टीस पडली त्या देशात तू मलाही घेऊन चल. तिचा समाचार कळल्यावर आता मी एक क्षणभरही तिच्यावांचून येथे राहू शकणार नाही.॥११॥
कथं सा मम सुश्रोणी भीरुभीरुः सती सदा ।
भयावहानां घोराणां मध्ये तिष्ठति रक्षसाम् ॥ १२ ॥
'हाय ! माझी सती साध्वी सुमध्यमा सीता भित्र्यातली भित्री (अत्यन्त भीरु) आहे. ती त्या घोर रूपधारी भयंकर राक्षसींच्या मध्ये कशी राहात असेल ?॥१२॥
शारदस्तिमिरोन्मुक्तो नूनं चन्द्र इवाम्बुदैः ।
आवृतो वदनं तस्या न विराजति साम्प्रतम् ॥ १३ ॥
'अन्धकारा पासून मुक्त झालेला शरद-ऋतूत चन्द्र मेघानी आच्छादित झाल्यानन्तर प्रकाशत नाही त्याप्रमाणे सांप्रत तिचे मुखही निश्चितच प्रकाशत नसेल. (शोभून दिसत नसेल.)॥१३॥
किमाह सीता हनुमंस्तत्त्वतः कथयाद्य मे ।
एतेन खलु जीविष्ये भेषजेनातुरो यथा ॥ १४ ॥
'हे हनुमान ! तू मला सीता काय म्हणाली ते सर्व खरे खरे सांग. जसे रोगी औषध घेण्यानेच जिवन्त राहातो त्याप्रमाणे मी सीतेच्या सन्देशांस श्रवण करूनच जीवन धारण करीन.॥१४॥
मधुरा मधुरालापा किमाह मम भामिनी ।
मद्विहीना वरारोहा हनुमन् कथयस्व मे ।
दुःखाद् दुःखतरं प्राप्य कथं जीवति जानकी ॥ १५ ॥
'हे हनुमाना ! रूपाने मनोहर, मधुरभाषिणी आणि सुन्दर कटिप्रदेश असणारी माझी प्रियतमा सीता, माझा वियोग झालेली ती जानकी तिने माझ्यासाठी कोणता सन्देश दिला आहे ? वनवासाच्या दु:खाहून अधिक दु:सह दु:ख प्राप्त झाले असूनही ती जिवन्त तरी कशी राहिली आहे ? ॥१५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे षट्षष्टितमः सर्गः ॥ ६६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा पासष्टावा सर्ग पूरा झाला.॥६६॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP