श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। सप्तविंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रेण श्रीरामाय दिव्यास्त्राणां दानम् - विश्वामित्रद्वारा श्रीरामास दिव्यास्त्राणां दानम् -
अथ तां रजनीमुष्य विश्वामित्रो महायशाः ।
प्रहस्य राघवं वाक्यमुवाच मधुरस्वरम् ॥ १ ॥
ताटकावनात ती रात्र घालविल्यावर महायशस्वी विश्वामित्र हसत हसत मधुर स्वरात श्रीरामचंद्रांना म्हणाले - ॥ १ ॥
परितुष्टोऽस्मि भद्रं ते राजपुत्र महायशः ।
प्रीत्या परमया युक्तो ददाम्यस्त्राणि सर्वशः ॥ २ ॥
"महायशस्वी राजकुमारा ! तुझे कल्याण असो. ताटकावधामुळे मी तुझ्यावर खूप संतुष्ट झालो आहे. म्हणून अत्यंत प्रसन्नतेने तुला सर्व प्रकारची अस्त्रे देत आहे. ॥ २ ॥
देवासुरगणान् वापि सगन्धर्वोरगान् भुवि ।
यैरमित्रान् प्रसह्याजौ वशीकृत्य जयिष्यसि ॥ ३ ॥
'यांच्या प्रभावाने तू आपल्या शत्रूंना, मग ते देव, असुर, गंधर्व अथवा नाग का असेनात, रणभूमिमधे बलपूर्वक आपल्या अधीन करून घेऊन त्यांच्यावर विजय मिळवू शकशील. ॥ ३ ॥
तानि दिव्यानि भद्रं ते ददाम्यस्त्राणि सर्वशः ।
दण्डचक्रं महद् दिव्यं तव दास्यामि राघव ॥ ४ ॥

धर्मचक्रं ततो वीर कालचक्रं तथैव च ।
विष्णुचक्रं तथात्युग्रमैन्द्रं अस्त्रं तथैव च ॥ ५ ॥
'रघुनंदन ! तुझे कल्याण असो ! आज मी तुला ती सर्व दिव्यास्त्रे देत आहे. वीरा ! मी तुला दिव्य आणि महान् दण्डचक्र, धर्मचक्र, कालचक्र आणि विष्णुचक्र तसेच अत्यंत भयंकर ऐंद्रचक्र देईन. ॥ ४-५ ॥
वज्रमस्त्रं नरश्रेष्ठ शैवं शूलवरं तथा ।
अस्त्रं ब्रह्मशिरश्चैव ऐषीकमपि राघव ॥ ६ ॥

ददामि ते महाबाहो ब्राह्ममस्त्रमनुत्तमम् ।
'नरश्रेष्ठ राघवा ! इंद्राचे वज्रास्त्र, शिवाचा श्रेष्ठ त्रिशूल तसेच ब्रह्मदेवाचे ब्रह्मशिर नामक अस्त्रही देईल. महाबाहो ! याबरोबरच तुला ऐषीकास्त्र आणि परम उत्तम ब्रह्मास्त्रही प्रदान करीत आहे. ॥ ६ १/२ ॥
गदे द्वे चैव काकुत्स्थ मोदकीशिखरी शुभे ॥ ७ ॥

प्रदीप्ते नरशार्दूल प्रयच्छामि नृपात्मज ।
धर्मपाशमहं राम कालपाशं तथैव च ॥ ८ ॥

वारुणं पाशमस्त्रं च ददाम्यहमनुत्तमम् ।
'काकुत्स्थ कुलभूषण ! याशिवाय आणखी दोन अत्यंत उज्ज्वल आणि सुंदर गदाही, ज्यांची नावे मोदकी आणि शिखरी आहेत, मी तुला अर्पण करीत आहे. पुरुषसिंह राजकुमार राम ! धर्मपाश, कालपाश आणि वरुणपाश ही अत्यंत उत्तम अस्त्रे आहेत. तीही मी आज तुला अर्पण करीत आहे. ॥ ७-८ १/२ ॥
अशनी द्वे प्रयच्छामि शुष्कार्द्रे रघुनन्दन ॥ ९ ॥

ददामि चास्त्रं पैनाकमस्त्रं नारायणं तथा ।
'रघुनंदन ! कोरडी आणि ओली, दोन्ही प्रकारची अशनि आणि पिनाक, तसेच नारायणास्रही मी तुला देत आहे. ॥ ९ १/२ ॥
आग्नेयमस्त्रं दयितं शिखरं नाम नामतः ॥ १० ॥

वायव्यं प्रथमं नाम ददामि तव चानघ ।
'अग्निचे प्रिय आग्नेयास्त्र, जे शिखरास्त्र नावानेही प्रसिद्ध आहे, मी तुला अर्पण करीत आहे. हे अनघा ! अस्त्रात प्रधान जे वायव्यास्त्र आहे तेही मी तुला देत आहे. ॥ १० १/२ ॥
अस्त्रं हयशिरो नाम क्रौञ्चमस्त्रं तथैव च ॥ ११ ॥

शक्तिद्वयं च काकुत्स्थ ददामि तव राघव ।
'काकुत्स्थ कुलभूषण राघव ! हयशिरा नामक अस्त्र, क्रौञ्च अस्त्र आणि दोन शक्तिही मी तुला देत आहे. ॥ ११ १/२ ॥
कङ्‍कालं मुसलं घोरं कापालमथ किङ्‌किणीम् ॥ १२ ॥

वधार्थं रक्षसां यानि ददाम्येतानि सर्वशः ।
'कङ्‍काल, घोर, मूसल, कपाल आणि किङ्‌किणी आदि सर्व अस्त्रे, जी राक्षसांच्या वधासाठी उपयोगी पडतात, तीही मी तुला देत आहे. ॥ १२ १/२ ॥
वैद्याधरं महास्त्रं च नन्दनं नाम नामतः ॥ १३ ॥

असिरत्‍नं महाबाहो ददामि नृवरात्मज ।
'महाबाहु राजकुमार ! नंदन नामाने विख्यात विद्याधराचे महान् अस्त्र आणि उत्तम खड्‌ग देखील मी तुला देत आहे. ॥ १३ १/२ ॥
गान्धर्वमस्त्रं दयितं मोहनं नाम नामतः ॥ १४ ॥

प्रस्वापनं प्रशमनं दद्मि सौम्यं च राघव ।
'राघव ! गंधर्वांचे प्रिय सम्मोहन नामक अस्त्र, प्रस्वापन, प्रशमन आणि सौम्य अस्त्रही मी तुला देत आहे. ॥ १४ १/२ ॥
वर्षणं शोषणं चैव संतापनविलापने ॥ १५ ॥

मादनं चैव दुर्धर्षं कन्दर्पदयितं तथा ।
गान्धर्वमस्त्रं दयितं मानवं नाम नामतः ॥ १६ ॥

पैशाचमस्त्रं दयितं मोहनं नाम नामतः ।
प्रतीच्छ नरशार्दूल राजपुत्र महायशः ॥ १७ ॥

'महायशस्वी पुरुषसिंह राजकुमारा ! वर्षण, शोषण, संतापन, विलापन आणि कामदेवाचे प्रिय दुर्जय अस्त्र मादन, गंधर्वांचे प्रिय मानवास्त्र आणि पिशाच्यांचे प्रिय मोहनास्त्र ही सर्व माझ्याकडून ग्रहण कर. ॥ १५-१७ ॥
तामसं नरशार्दूल सौमनं च महाबलम् ।
संवर्तं चैव दुर्धर्षं मौसलं च नृपात्मजः ॥ १८ ॥

सत्यमस्त्रं महाबाहो तथा मायामयं परम् ।
सौरं तेजःप्रभं नाम परतेजोऽपकर्षणम् ॥ १९ ॥
'नरश्रेष्ठ राजपुत्र महाबाहु राम ! तामस, महाबली सौमन, संवर्त, दुर्जय, मौसल, सत्य आणि मायामय उत्तम अस्त्रेही मी तुला अर्पण करीत आहे. सूर्यदेवतेचे तेजःप्रभ नामक अस्त्र, जे शत्रूच्या तेजाचा नाश करणारे आहे, मी तुला अर्पित आहे. ॥ १८-१९ ॥
सोमास्त्रं शिशिरं नाम त्वाष्ट्रमस्त्रं सुदारुणम् ।
दारुणं च भगस्यापि शीतेषुमथ मानवम् ॥ २० ॥
सोमदेवतेचे शिशिर नामक अस्त्र, त्वष्ट्याचे (विश्वकर्मा) अत्यंत दारूण अस्त्र, भगदेवतेचे भयंकर अस्त्र आणि मनुचे शीतेषु नामक अस्त्रही मी तुला देत आहे. ॥ २० ॥
एतान् राम महाबाहो कामरूपान् महाबलान् ।
गृहाण परमोदारान् क्षिप्रमेव नृपात्मज ॥ २१ ॥
महाबाहु, राजकुमार श्रीराम ! ही सर्व अस्त्रे इच्छेनुसार रूप धारण करणारी, महान् बलाने संपन्न आणि परम उदार आहेत. तू शीघ्र यांना ग्रहण कर. ॥ २१ ॥
स्थितस्तु प्राङ्‍मुखो भूत्वा शुचिर्मुनिवरस्तदा ।
ददौ रामाय सुप्रीतो मन्त्रग्राममनुत्तमम् ॥ २२ ॥
असे म्हणून मुनिवर विश्वामित्र त्यावेळी स्नान आदिने शुचिर्भूत होऊन पूर्वाभिमुख बसले आणि अत्यंत प्रसन्नतेने त्यांनी श्रीरामचंद्रास त्या सर्व उत्तम अस्त्रांचा उपदेश केला. ॥ २२ ॥
सर्वसङ्‍ग्रहणं येषां दैवतैरपि दुर्लभम् ।
तान्यस्त्राणि तदा विप्रो राघवाय न्यवेदयत् ॥ २३ ॥
ज्या अस्त्रांचा पूर्ण रूपाने संग्रह करणे देवांनाही दुर्लभ होते त्या सर्वांना विप्रवर विश्वामित्रांनी श्रीरामचंद्रास समर्पित केले. ॥ २३ ॥
जपतस्तु मुनेस्तस्य विश्वामित्रस्य धीमतः ।
उपतस्थुर्महार्हाणि सर्वाण्यस्त्राणि राघवम् ॥ २४ ॥

ऊचुश्च मुदिताः रामं सर्वे प्राञ्जलयस्तदा ।
इमे च परमोदार किङ्‍करास्तव राघव ॥ २५ ॥

यद्यदिच्छसि भद्रं ते तत्सर्वं करवाम वै ।
बुद्धिमान् विश्वामित्रांनी जप करीत जसे आवाहनास सुरुवात केली तशी ती सर्व परम पूज्य दिव्यास्त्रे स्वतः येऊन रामासमोर उपस्थित झाली, आणि अत्यंत हर्षाने युक्त होऊन त्यावेळी श्रीराघवास हात जोडून म्हणू लागली - "परम उदार रघुनंदन ! आपले कल्याण होवो ! आम्ही सर्व आपले किंकर आहोत. आपली आमच्याकडून जी जी सेवा घेण्याची इच्छा असेल ती आम्ही सर्व करण्यास तत्पर राहू." ॥ २४-२५ १/२ ॥
ततो रामः प्रसन्नात्मा तैरित्युक्तो महाबलैः ॥ २६ ॥

प्रतिगृह्य च काकुत्स्थः समालभ्य च पाणिना ।
मानसा मे भविष्यध्वमिति तान्यभ्यचोदयत् ॥ २७ ॥
त्या महान् प्रभावशाली अस्त्रांनी असे म्हटल्यावर श्रीरामचंद्र मनातल्या मनात अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांना ग्रहण करून हाताने स्पर्श करून म्हणाले - "आपण सर्व माझ्या मनांत निवास करा." ॥ २६-२७ ॥
ततः प्रीतमना रामो विश्वामित्रं महामुनिम् ।
अभिवाद्य महातेजा गमनायोपचक्रमे ॥ २८ ॥
त्यानंतर महातेजस्वी श्रीरामांनी प्रसन्नचित्त होऊन महामुनि विश्वामित्रांना प्रणाम केला आणि पुढील यात्रेस आरंभ केला. ॥ २८ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे सप्तविंशः सर्गः ॥ २७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सत्ताविसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २७ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP