[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ एकषष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
मधुवनं गत्वा तत्रत्यानां मधूनां फलानां च वानरैर्यथेष्टमुपभोगो वनरक्षकस्य भुवि विकर्षणं च -
वानरांचे मधुवनात जाऊन तेथील मधु आणि फलांचा मनसोक्त उपभोग घेणे आणि वन रक्षकांना फरफटविणे -
ततो जाम्बवतो वाक्यं अगृह्णन्त वनौकसः ।
अङ्‌गदप्रमुखा वीरा हनूमांश्च महाकपिः ॥ १ ॥
त्यानन्तर अंगद आदि सर्व वीर वानर आणि महाकपि हनुमान यांनीही जांबवानाचे म्हणणे मान्याकेले. ॥१॥
प्रीतिमन्तस्ततः सर्वे वायुपुत्रपुरःसराः ।
महेन्द्राग्रात् समुपत्य पुप्लुवुः प्लवगर्षभाः ॥ २ ॥
नन्तर ते सर्व श्रेष्ठ वानर पवनपुत्र हनुमानास पुढे ठेवून मनातल्या मनात प्रसन्नतेचा अनुभव करीत महेन्द्र पर्वताच्या शिखराहून उड्या मारीत मारीत पुढे निघाले. ॥२॥
मेरुमन्दरसङ्‌काशा मत्ता इव महागजाः ।
छादयन्त इवाकाशं महाकाया महाबलाः ॥ ३ ॥
ते मरु पर्वतासमान विशाल देह असलेले आणि मोठ मोठया मदमत्त गजराजाच्याप्रमाणे महाबलाढ्य असलेले वानर जणु आकाशाला आच्छादित करीत जात होतो.॥३॥
सभाज्यमानं भूतैस्तमात्मवन्तं महाबलम् ।
हनूमन्तं महावेगं वहन्त इव दृष्टिभिः ॥ ४ ॥
त्यावेळी सिद्ध आदि भूतगण अत्यन्त वेगवान महाबली बुद्धिमान हनुमानाची वारंवार खूपच प्रशंसा करीत होते आणि त्यावेळी ते आपल्या दृष्टिनी त्याला वाहूनच नेत आहेत की काय, अशा रीतीने ते एकटक त्याच्याकडे पाहू लागले.॥४॥
राघवे चार्थनिर्वृत्तिं कर्तुं च परमं यशः ।
समाधाय समृद्धार्थाः कर्मसिद्धिभिरुन्नताः ॥ ५ ॥

प्रियाख्यानोन्मुखाः सर्वे सर्वे युद्धाभिनन्दिनः ।
सर्वे रामप्रतीकारे निश्चितार्था मनस्विनः ॥ ६ ॥
राघवाच्या कार्याची सिद्धि करण्याचे उत्तम यश मिळाल्यामुळे त्या वानरांचे मनोरथ सफल झाले होते. त्या कार्याची सिद्धि झाल्याने त्यांचा उत्साह वाढलेला होता. ते सर्वजण भगवान श्रीरामाला प्रिय समाचार ऐकविण्यासाठी उत्सुक झाले होते. सर्व युद्धाचे अभिनन्दन करणारे होते. श्रीरामचन्द्रांकडूनच रावणाचा पराभव व्हावा असा सर्वांनी निश्चय केलेला होता, तसेच ते सर्वच्या सर्व मनस्वी वीर होते.॥५-६॥
प्लवमानाः खमाप्लुत्य ततस्ते काननौकसः ।
नन्दनोपममासेदुर्वनं द्रुमलतायुतम् ॥ ७ ॥
आकाशात उड्डाण करीत ते वनवासी वानर शेकडो वृक्षांनी भरलेल्या एका सुन्दर वनात जाऊन पोहोंचले. ते वन नन्दनवनाप्रमाणे मनोहर होते.॥७॥
यत् तत्तन्मधुवनं नाम सुग्रीवस्याभिरक्षितम् ।
अधृष्यं सर्वभूतानां सर्वभूतमनोहरम् ॥ ८ ॥
त्याचे नाव मधुवन होते. सुग्रीवाचे हे वन सर्वथा सुरक्षित होते. समस्त प्राण्यांमध्ये कुणीही त्याची हानी करू शकत नव्हते. ते वन पाहून सर्व प्राण्यांचे मन मोहित होत असे.॥८॥
यद् रक्षति महावीरः सदा दधिमुखः कपिः ।
मातुलः कपिमुख्यस्य सुग्रीवस्य महात्मनः ॥ ९ ॥
कपिश्रेष्ठ महात्मा सुग्रीवाचा मामा महावीर दधिमुख नामक वानर सदा त्या वनाचे रक्षण करीत असे.॥९॥
ते तद् वनमुपागम्य बभूवुः परमोत्कटाः ।
वानरा वानरेन्द्रस्य मनःकान्तं महावनम् ॥ १० ॥
वानरराज सुग्रीवाच्या त्या मनोरम महावनाजवळ पोहोंचतांच ते सर्व वानर तेथील मधु पिण्यासाठी आणि फळे वगैरे खाण्यासाठी अत्यन्त उत्कंठित झाले.॥१०॥
ततस्ते वानरा हृष्टा दृष्ट्‍वा मधुवनं महत् ।
कुमारमभ्ययाचन्त मधूनि मधुपिङ्‌गलाः ॥ ११ ॥
त्या महान मधुवनाला पाहून ते अत्यन्त हर्षित झाले आणि मधुप्रमाणे पिंगट वर्ण असलेल्या त्या वानरांनी मधुपान करण्यास परवानगी देण्याविषयी कुमार अंगदाची प्रार्थना केली.॥११॥
ततः कुमारस्तान् वृद्धाञ्जाम्बवत्प्रमुखान् कपीन् ।
अनुमान्य ददौ तेषां निसर्गं मधुभक्षणे ॥ १२ ॥
त्यावेळी कुमार अंगदाने त्या जांबवान आदि वृद्ध वृद्ध वानरांची अनुमति घेऊन त्या सर्वांना मधुपान करण्याची परवानगी दिली. ॥१२॥
ते निसृष्टाः कुमारेण धीमता वालिसूनुना ।
हरयः समपद्यन्त द्रुमान् मधुकराकुलान् ॥ १३ ॥
बुद्धिमान वालीपुत्र राजकुमार अंगदाची आज्ञा मिळतांच ते वानर मधमाशांनी झुंडींनी भरलेल्या त्या वृक्षांवर चढले.॥१३॥
भक्षयन्तः सुगन्धीनि मूलानि च फलानि च ।
जग्मुः प्रहर्षं ते सर्वे बभूवुश्च मदोत्कटाः ॥ १४ ॥
तेथील सुमधुर फळे मुळे त्यांनी भक्षण केली आणि ते सर्व आनन्दित झाले. आणि सर्वच मदाने उन्मत्त होऊन झाले. ॥१४॥
ततश्चानुमताः सर्वे सुसंहृष्टा वनौकसः ।
मुदिताश्च ततस्ते च प्रनृत्यन्ति ततस्ततः ॥ १५ ॥
युवराजाची अनुमति मिळाल्याने सर्व वानरांना अत्यन्त आनन्द झाला. आणि आनन्दमग्न होऊन ते ठिकठिकाणीं नाचू लागले.॥१५॥
गायन्ति केचित् प्रणमन्ति केचित्
नृत्यन्ति केचित् प्रणमन्ति केचित् ।
पतन्ति केचिद् प्रचरन्ति केचित्
प्लवन्ति केचित् प्रलपन्ति केचित् ॥ १६ ॥
काही जण गाऊ लागले, काही हसू लागले, काही नाचू लागले, काही प्रणाम करू लागले, काही पडू लागले, काही हिंडू लागले, काही उडया मारू लागले, काही बडबड करू लागले. ॥१६॥
परस्परं केचिदुपाश्रयन्ति
परस्परं केचिदतिब्रुवन्ति ।
द्रुमाद् द्रुमं केचिदभिद्रवन्ति
क्षितौ नगाग्रान्निपतन्ति केचित् ॥ १७ ॥
काही एकमेकांकडे जाऊन भेटू लागले, कुणी आपापसात विवाद करू लागले, कुणी या वृक्षावरून त्या वृक्षावर उडया मारू लागले, तर काही वृक्षाग्रावरून, झाडाच्या शेंडयावरून भूमीवर उडया टाकू लागले.॥१७॥
महीतलात् केचिदुदीर्णवेगा
महाद्रुमाग्राण्यभिसम्पतन्ति ।
गायन्तमन्यः प्रहसन्नुपैति
हसन्तमन्यः प्ररुदन्नुपैति ॥ १८ ॥
आणि काही प्रचण्ड वेग असलेले वानर भूतलावरून धांवत जाऊन मोठमोठया वृक्षांच्या शेंडयावर एकदम जाऊन पोहोंचू लागले. कोणी गाऊ लागला की दुसरा हसत हसत त्याच्याकडे जाऊ लागे. तर कुणी हसणाराजवळ मोठमोठयाने रडत रडत जाऊ लागे.॥१८॥
तुदन्तमन्यः प्रणदन्नुपैति ।
समाकुलं तत्कपिसैन्यमासीत्
न चात्र कश्चिन्न बभूव मत्तो
न चात्र कश्चिन्न बभूव दृप्तः ॥ १९ ॥
कोणी दुसर्‍याची खोडी काढू लागे तर दुसरा कुणी त्याच्याजवळ मोठमोठयाने गर्जना करीत येऊन पोहोचे. याप्रकारे ती सारी वानरसेना मदोन्मत्त होऊन त्यास अनुसरून चेष्टा करू लागली. वानरांच्या त्या समुदायात असा कोणीही नव्हता की जो तर्र (उन्मत्त) झाला नाही; आणि कुणीही असा ही नव्हता की जो दर्पाने माजलेला नाही.॥१९॥
ततो वनं तत्परिभक्ष्यमाणं
द्रुमांश्च विध्वंसितपत्रपुष्पान्
समीक्ष्य कोपद् दधिवक्त्रनामा
निवारयामास कपिः कपींस्तान् ॥ २० ॥
त्यानन्तर तेथे जमलेले सर्व वानर सर्वप्रकारे त्या वनातील पदार्थ भक्षण करीत आहेत. आणि वृक्षांवरील पानांचा, फुलांचा त्यानी विध्वंस केला आहे हे पाहून तो दधिमुख वानर रागारागाने त्या वानरांना तसे करण्यापासून परावृत्त करू लागला. ॥२०॥
स तैः प्रवृद्धैः परिभर्त्स्यमानो
वनस्य गोप्ता हरिवृद्धवीरः ।
चकार भूयो मतिमुग्रतेजा
वनस्य रक्षां प्रति वानरेभ्यः ॥ २१ ॥
परन्तु मद चढलेले, नशा चढलेले ते मोठमोठे वानर उलट त्या वनाचे रक्षण करणार्‍या त्या वृद्ध वानरवीरालाच दटावू लागले. त्याची निर्भत्सना करू लागले. तथापि उग्र तेजाने युक्त असलेल्या दधिमुखाने पुन्हा त्या वानरांपासून वनाचे रक्षण करण्याचे मनात आणले. ॥२१॥
उवाच कांश्चित् परुषाण्यभीत-
मसक्तमन्यांश्च तलैर्जवान ।
समेत्य कैश्चित् कलहं चकार
तथैव साम्नोपजगाम कांश्चित् ॥ २२ ॥
काही काही वानरांना त्याने निर्भयपणे कठोर वाणीत सुनावले, काहींना मुळीच उपेक्षा न करतां तो थपडा मारू लागला. बर्‍याच जणांच्या जवळ जाऊन तो बाचाबाची करू लागला. आणि काही जणांशी तो सामोपचाराने बोलू लागला.॥२२॥
स तैर्मदादप्रतिवार्यवेगै-
र्बलाच्च तेन प्रतिवार्यमाणैः ।
प्रधर्षणे त्यक्तभयैः समेत्य
प्रकृष्यते चाप्यनवेक्ष्य दोषम् ॥ २३ ॥
परन्तु मदामुळे ज्यांचा वेग रोखणे अशक्य झाले होते त्या वानरांना जेव्हां दधिमुख बलपूर्वक अडविण्याचा प्रयत्‍न करू लागला तेव्हां ते सर्व मिळून त्याला बलपूर्वक इकडे तिकडे फरफटवू लागले. वनरक्षकावर आक्रमण केल्याने राजदण्ड प्राप्त होईल याचेही त्यांना भान राहिले नाही. (ही गोष्टी त्यांच्या ध्यानात आली नाही.) आणि म्हणून ते सर्व निर्भय होऊन त्याला इकडे तिकडे ओढू लागले.॥२३॥
नखैस्तुदन्तो दशनैर्दशन्त-
स्तलैश्च पादैश्च समापयन्तः ।
मदात् कपिं तं कपयः समन्ता-
न्महावनं निर्विषयं च चक्रुः ॥ २४ ॥
मदाच्या प्रभावामुळे ते वानर कपिवर दधिमुखाला नखांनी ओरबाडू लागले, दातानी चावू लागले. आणि थपडा आणि लाथा मारमारून त्याला अर्धमेला करू लागले. याप्रकारे त्यांनी त्या सर्व विशाल वनातील कोणतीही भोग्य वस्तु शिल्लक ठेविली नाही. (त्याला पूर्ण निर्विषय करून टाकले.)॥२४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकषष्टितमः सर्गः ॥ ६१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा एकसष्टावा सर्ग पूरा झाला.॥६१॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP