श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥एकचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
दक्षिणदिग्वर्तिस्थानानि वर्णयता सुग्रीवेण तत्र प्रमुखवानरवीराणां प्रेषणम् - सुग्रीवांनी दक्षिण दिशेतील स्थानांचा परिचय देऊन तिकडे प्रमुख वानर वीरांना धाडणे -
ततः प्रस्थाप्य सुग्रीवः तन्महद्वानरं बलम् ।
दक्षिणां प्रेषयामास वानरान् अभिलक्षितान् ॥ १ ॥
याप्रकारे वानरांची फार मोठी सेना पूर्व दिशेकडे प्रस्थापित करून सुग्रीवांनी दक्षिण दिशेकडे अगदी निवडक वानरांना, की ज्यांची उत्तम प्रकारे पारख केली गेली होती, धाडले. ॥१॥
नीलमग्निसुतं चैव हनुमंतं च वानरम् ।
पितामहसुतं चैव जांबवंतं महाबलम् ॥ २ ॥

सुहोत्रं च शरारिं च शरगुल्मं तथैव च ।
गजं गवाक्षं गवयं सुषेणं वृषभं तथा ॥ ३ ॥

मैंदं च द्विविदं चैव सुषेणं गंधमादनम् ।
उल्कामुखमनङ्‌गंा च हुताशनसुतावुभौ ॥ ४ ॥

अङ्‌गादप्रमुखान् वीन्वीरान् वीरः कपिगणेश्वरः ।
वेगविक्रमसंपन्नान् संदिदेश विशेषवित् ॥ ५ ॥
अग्निपुत्र नील, कपिवर हनुमान्, ब्रह्मदेवांचे महाबली पुत्र जांबवान्, सुहोत्र, शरारि, शरगुल्म, गज, गवाक्ष, गवय, सुषेण(प्रथम)(*), वृषभ, मैंदा, द्विविद, सुषेण (द्वितीय), गंधमादन, हुताशनाचे दोन पुत्र उत्कामुख आणि अनंग(असंग) तसेच अंगद आदि आदि प्रधान प्रधान वानरांना जे महान् वेग आणि पराक्रमाने संपन्न होते, विशेषतः वानरराज सुग्रीवांनी दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा दिली. ॥२-५॥
(*- सुषेण दोन होते- एक तारेचा पिता आणि दुसरा त्यांच्याहून भिन्न यूथपति होता.)
तेषामग्रेसरं चैव बृहद्‌बलमथांगदम्म् ।
विधाय हरिवीराणां आदिशद् दक्षिणां दिशम् ॥ ६ ॥
महान् बलशाली अंगदाला त्या समस्त वानर वीरांचा नेता (पुढारी) बनवून त्यांच्यावर दक्षिण दिशेस सीतेचा शोध घेण्याचा भार सोपविला. ॥६॥
ये केचन समुद्देशाः तस्यां दिशि सुदुर्गमाः ।
कपीशः कपिमुख्यानां स तेषां समुदाहरत् ॥ ७ ॥
त्या दिशेमध्ये जी काही स्थाने अत्यंत दुर्गम होती त्यांचाही कपिराज सुग्रीवांनी त्यांना परिचय करून दिला.(**) ॥७॥
सहस्रशिरसं विंध्यं नानाद्रुमलतायुतम् ।
नर्मदां च नदीं दुर्गां महोरगनिषेविताम् ॥ ८ ॥

ततो गोदावरीं रम्यां कृष्णवेणीं महानदीम् ।
वरदां च महाभागां महोरगनिषेविताम्
मेखलानुत्कलां चैव दशार्णनगराण्यपि । ॥ ९ ॥

आब्रवंतीमवंतीं च सर्वमेवानुपश्यत ।
ते म्हणाले- ’वानरांनो ! तुम्ही लोक नाना प्रकारच्या वृक्षांनी आणि लतांनी सुशोभित हजारो शिखरे असलेला विंध्य पर्वत, मोठ मोठ्या नागांनी सेवित रमणीय नर्मदा नदी, सुरम्य गोदावरी, महानदी, कृष्णवेणी, तसेच मोठ मोठ्या नागांनी सेवित महाभागा वरदा आदि नद्यांच्या तटावर आणि मेखल(मेकल) उत्कल तसेच दशार्ण देशाच्या नगरांमध्ये तसेच आब्रवंती आणि अवंतीपुरी मध्येही सर्व जागी सीतेचा शोध करा. ॥८-९ १/२॥
विदर्भानृषिकांश्चैव रम्यान् माहिषकानपि ॥ १० ॥

तथा वंगान् कलिङ्‌गां श्च कौशिकांश्च समंततः । अन्वीक्ष्य दण्डकारण्यं सपर्वतनदीगुहम् ॥ ११ ॥

नदीं गोदावरीं चैव सर्वमेवानुपश्यत ।
तथैवांध्रांश्च पुण्ड्रांश्च चोलान् पाण्ड्यानश्च केरलान् ॥ १२ ॥
’याच प्रकारे विदर्भ, ऋष्टिक, रम्य माहिष्टक देश, वंग(**), कलिंग, तसेच कौसिक आदि देशात सर्व बाजूस देखरेख करून पर्वत, नदी आणि गुहांसहित संपूर्ण दण्डकारण्यात शोध घ्या. तेथे जी गोदावरी नदी आहे तिच्यातही सर्वत्र वारंवार शोधा. त्याचप्रकारे आंध्र, पुण्ड्र, चोल आणि पाण्डय तसेच केरळ आदि देशातही शोधा. ॥१०-१२॥
(**- अन्य पाठानुसार येथे मत्स्य देश समजावयास हवा.)
अयोमुखश्च गंतव्यः पर्वतो धातुमण्डितः ।
विचित्रशिखरः श्रीमान् चित्रपुष्पितकाननः ॥ १३ ॥

सचंदनवनोद्देशो मार्गितव्यो महागिरिः ।
त्यानंतर अनेक धातुंनी अलंकृत अयोमुख(***) (मलय) पर्वतावरही जा, त्याची शिखरे फार विचित्र आहेत. तो शोभाशाली पर्वत फुललेल्या विचित्र काननांनी युक्त आहे. त्याच्या सर्व स्थानांमध्ये सुंदर चंदनाची वने आहेत. त्या महापर्वत मलयावर सीतेचा चांगल्या प्रकारे शोध करा. ॥१३ १/२॥
(***-रामायण तिलकचे लेखक अयोमुखाला मलयपर्वताचे नामांतर मानतात. गोविंदराज यास सह्यपर्वताचा पर्याय समजतात तसेच रामायण शिरोमणी कार अयोमुखाला या दोन्हीहून भिन्न स्वतंत्र पर्वत मानतात. येथे तिलककारांच्या मताचे अनुसरण केले गेले आहे.)
ततस्तामापगां दिव्यां प्रसन्नसलिलाशयाम् ॥ १४ ॥

तत्र द्रक्ष्यथ कावेरीं विहितामप्सरोगणैः ।
’तत्पश्चात स्वच्छ जल असणार्‍या दिव्य नदी कावेरीला पहा, जेथे अप्सरा विहार करतात. ॥१४ १/२॥
तस्यासीनं नगस्याग्रे मलयस्य महौजसम् ॥ १५ ॥

द्रक्ष्यथादित्यसंकाशं अगस्त्यमृषिसत्तमम्
’त्या प्रसिद्ध मलयपर्वताच्या शिखरावर बसलेल्या सूर्यासमान महान् तेजाने संपन्न मुनिश्रेष्ठ अगस्त्यांचे(ऽ*) दर्शन करा. ॥१५ १/२ ॥
(ऽ*- जरी पूर्वी पञ्चवटीच्या उत्तर भागात अगस्त्यांच्या आश्रमाचे वर्णन आले आहे तथापि येथे मलयपर्वतावरही त्यांचा आश्रम होता असे मानले पाहिजे. त्याप्रमाणे वाल्मीकी मुनींचे आश्रम अनेक स्थानांवर होते. त्या प्रकारे यांचेही होते अथवा हे त्याच नावाचे कुणी दुसरे ऋषि होते.)
ततस्तेनाभ्यनुज्ञाताः प्रसन्नेन महात्मना ॥ १६ ॥

ताम्रपर्णीं ग्राहजुष्टां तरिष्यथ महानदीम् ।
’त्यानंतर त्या प्रसन्नचित्त महात्म्यांची आज्ञा घेऊन ग्राहांनी सेवित महानदी ताम्रपर्णीला पार करा. ॥१६ १/२॥
सा चंदनवनैश्चित्रैः प्रच्छन्नद्वीपवारिणी ॥ १७ ॥

कांतेव युवतिः कांतं समुद्रमवगाहते ।
’तिची द्वीपे आणि जल विचित्र चंदनवनांनी आच्छादित आहेत. म्हणून ती सुंदर वस्त्राने विभूषित युवती प्रेयसीप्रमाणे आपल्या प्रियतम समुद्रास मिळते. ॥१७ १/२॥
ततो हेममयं दिव्यं मुक्तामणिविभूषितम् ॥ १८ ॥

युक्तं कवाटं पाण्ड्यानां गता द्रक्ष्यथ वानराः ।
’वानरांनो ! त्याच्या पुढे गेल्यावर तुम्ही लोक पाण्ड्यवंशी राजांच्या नगरद्वारावर (**) लावलेल्या सुवर्णमय कपाटाचे दर्शन कराल, जे मुक्तामण्यांनी विभूषित आणि दिव्य आहे. ॥१८ १/२॥
(**- आधुनिक तंजौर (तंजावर) हे प्राचीन पाण्डयवंशी नरेशांचे नगर आहे. या नगरातही शोध घेण्याचा आदेश सुग्रीव वानरांना देत आहेत)
ततः समुद्रमासाद्य संप्रधार्यार्थनिश्चयम् ॥ १९ ॥

अगस्त्येनांतरे तत्र सागरे विनिवेशितः ।
चित्रनानानगः श्रीमान् महेंद्रः पर्वतोत्तमः ॥ २० ॥

जातरूपमयः श्रीमान् अवगाढो महार्णवम् ।
’तत्पश्चात् समुद्राच्या तटावर जाऊन त्याला पार करण्यासंबंधी आपल्या कर्तव्याचा उत्तम प्रकारे निश्चय करून त्याचे पालन करा. महर्षि अगस्त्यांनी समुद्राच्या आत एक सुंदर सुवर्णमय पर्वताला स्थापित केले आहे, जो महेंद्रगिरि नामाने विख्यात आहे, त्याची शिखरे आणि तेथील वृक्ष विचित्र शोभेने संपन्न आहेत. तो शोभाशाली पर्वत श्रेष्ठ समुद्राच्या आत खूप खोलवर घुसलेला आहे. ॥१९-२० १/२॥
नानाविधैर्नगैः फुलैः लताभिश्चोपशोभितम् ॥ २१ ॥

देवर्षियक्षप्रवरैः अप्सरोभिश्च शोभितम् ।
सिद्धचारणसङ्‌घैवश्च प्रकीर्णं सुमनोरमम् ॥ २२ ॥

तमुपैति सहस्राक्षः सदा पर्वसु पर्वसु ।
’नाना प्रकारचे फुललेले वृक्ष आणि लता त्या पर्वताची शोभा वाढवीत आहेत. देवता, ऋषि, श्रेष्ठ यक्ष आणि अप्सरांच्या उपस्थितिने त्याची शोभा अधिकच वाढते आहे. सिद्ध आणि चारणांचे समुदाय तेथे सर्वबाजूस पसरलेले आहेत. या सर्व कारणामुळे महेंद्र पर्वत मनोरम भासत आहे. सहस्त्र नेत्रधारी इंद्र प्रत्येक पर्वदिवशी त्या पर्वतावर पदार्पण करतात. ॥२१-२२ १/२॥
द्वीपस्तस्यापरे पारे शतयोजनविस्तृतः ॥ २३ ॥

अगम्यो मानुषैर्दीप्तः तं मार्गध्वं समंततः ।
तत्र सर्वात्मना सीता मार्गितव्या विशेषतः ॥ २४ ॥
’त्या समुद्राच्या दुसर्‍या तीरावर एक द्वीप आहे, ज्याचा विस्तार शंभर योजने आहे. तेथे मनुष्य पोहोचू शकत नाही. ते जे दीप्तिशाली द्वीप आहे त्याच्या चारी बाजूस पूर्ण प्रयत्‍न करून तुम्ही विशेष रूपाने सीतेचा शोध घेतला पाहिजे. ॥२३-२४॥
स हि देशस्तु वध्यस्य रावणस्य दुरात्मनः ।
राक्षसाधिपतेर्वासः सहस्राक्षसमद्युतेः ॥ २५ ॥
’तोच देश इंद्रासमान तेजस्वी दुरात्मा राक्षसराज रावणाचे, जो आमचा वध्य आहे, त्याचे निवासस्थान आहे. ॥२५॥
दक्षिणस्य समुद्रस्य मध्ये तस्य तु राक्षसी ।
अङ्‌गाणरकेति विख्याता छायामाक्षिप्य भोजनी ॥ २६ ॥
’त्या दक्षिण समुद्राच्या मध्ये अंगारका नावाने प्रसिद्ध एक राक्षसी राहाते जी छाया पकडून प्राण्यांना खेचून घेते आणि त्यांना खाऊन टाकते. ॥२६॥
एवं निःनंशयान् कृत्वा संशयान्नष्टसंशयाः ।
मृगयध्वं नरेंद्रस्य पत्‍नीमममिततेजसः ॥ २७ ॥
’त्या लंकाद्वीपात जी संदिग्ध स्थाने आहेत, त्या सर्वामध्ये अशा तर्हेने शोध घ्या की तुम्ही त्यांना संदेहरहित समजाल आणि तुमच्या मनांतला संशय (पूर्णपणे) निघून जाईल तेव्हाच तुम्ही लंकाद्वीपालाही ओलांडून पुढे जा आणि अमित तेजस्वी महाराज श्रीरामांच्या पत्‍नीचे अन्वेषण करा. ॥२७॥
तमतिक्रम्य लक्ष्मीवान् समुद्रे शतयोजने ।
गिरिः पुष्पितको नाम सिद्धचारणसेवितः ॥ २८ ॥
’लंकेला ओलांडून पुढे गेल्यावर शंभर योजन विस्तृत समुद्रात एक पुष्पितक नावाचा पर्वत आहे, जो परम शोभेने संपन्न आणि सिद्ध चारणांकडून सेवित आहे. ॥२८॥
चंद्रसूर्यांशुसंकाशः सागरांबुसमाश्रयः ।
भ्राजते विपुलैः शृङ्‌गैःश अंबरं विलिखन्निव ॥ २९ ॥
’तो चंद्रमा आणि सूर्यासमान प्रकाशमान आहे तसेच समुद्राच्या जलांत फार खोलवर घुसलेला आहे, तो आपल्या विस्तृत शिखरांनी आकाशांत रेखा ओढीत असल्यासारखा सुशोभित होत आहे. ॥२९॥
तस्यैकं काञ्चनं शृङ्‌गं सेवते यं दिवाकरः ।
श्वेतं राजतमेकं च सेवते यंनिशाकरः ।
न तं कृतघ्नाः पश्यंति न नृशंसा न नास्तिकाः ॥ ३० ॥
’त्या पर्वताचे एक सुवर्णमय शिखर आहे, ज्याचे प्रतिदिन सूर्यदेव सेवन करीत असतात. त्याच प्रकारे त्याचे एक रजतमय श्वेत शिखर आहे ज्याचे चंद्रमा सेवन करतात. कृतघ्न, नृशंस आणि नास्तिक पुरुष त्या पर्वत शिखरास पाहू शकत नाहीत. ॥३०॥
प्रणम्य शिरसा शैलं तं विमार्गथ वानराः ।
तमतिक्रम्य दुर्धर्षं सूर्यवान्नाम पर्वतः ॥ ३१ ॥
’वानरांनो ! तुम्ही मस्तक नमवून त्या पर्वतास प्रणाम करावा आणि तेथे सर्व बाजूस सीतेस शोधावे. त्या दुर्धर्ष पर्वतास ओलांडून पुढे गेल्यावर सूर्यवान् नामक पर्वत लागेल. ॥३१॥
अध्वना दुर्विगाहेन योजनानि चतुर्दश ।
ततस्तमप्यतिक्रम्य वैद्युतो नाम पर्वतः ॥ ३२ ॥
’तेथे जाण्याचा मार्ग फारच दुर्गम आहे आणि तो पुष्पितकापासून चौदा योजने दूर आहे. सूर्यवानाला ओलांडून जेव्हा तुम्ही लोक पुढे जाल तेव्हा तुम्हांला ’वैद्युत’ नामक पर्वत लागेल. ॥३२॥
सर्वकामफलैर्वृक्षैः सर्वकालमनोहरैः ।
तत्र भुक्त्वा वरार्हाणि मूलानि च फलानि च ॥ ३३ ॥

मधूनि पीत्वा जुष्टानि परं गच्छत वानराः ।
’तेथील वृक्ष संपूर्ण मनोवाञ्छित फलांनी युक्त आणि सर्व ऋतुंमध्ये मनोहर शोभेने संपन्न आहेत. वानरांनो ! त्यांनी सुशोभित वैद्युत पर्वतावर उत्तम फळे-मुळे खाऊन आणि सेवन करण्यायोग्य मधु पिऊन तुम्ही लोक पुढे जा. ॥३३ १/२॥
तत्र नेत्रमनःकांतः कुञ्जरो नाम पर्वतः ॥ ३४ ॥

अगस्त्यभवनं यत्र निर्मितं विश्वकर्मणा ।
’नंतर कुञ्जर नामक पर्वत दिसून येईल जो नेत्रांना आणि मनालाही अत्यंत प्रिय वाटणारा आहे. त्याच्यावर विश्वकर्माने बनविलेले महर्षि अगस्त्यांचे एक सुंदर भवन आहे. ॥३४ १/२॥
तत्र योजनविस्तारं उच्छ्रितं दशयोजनम् ॥ ३५ ॥

शरणं काञ्चनं दिव्यं नानारत्‍नजविभूषितम् ।
कुंजर पर्वतावर वसलेले महर्षि अगस्त्यांचे ते दिव्य भवन सुवर्णमय व नाना प्रकारच्या रत्‍नांनी विभूषित आहे. त्याचा विस्तार एक योजन असून त्याची ऊंची दहा योजने आहे. ॥ ३५ १/२ ॥
तत्र भोगवती नाम सर्पाणामालयः पुरी ॥ ३६ ॥

विशालरथ्या दुर्धर्षा सर्वतः परिरक्षिता ।
रक्षिता पन्नगैर्घोरैः तीक्ष्णदंष्ट्रैर्महाविषैः ॥ ३७ ॥
’त्याच पर्वतावर सर्पांचा निवास असलेली एक नगरी आहे, जिचे नाव भोगावती आहे. (ही पाताळातील भोगावती पुरीहून भिन्न आहे.) ही पूर्ण दुर्जय आहे. तिचे रस्ते खूपच मोठे आणि विस्तृत आहेत. ती सर्व बाजूनी सुरक्षित आहे. तीक्ष्ण दाढा असलेले महाविषारी भयंकर सर्प तिचे रक्षण करतात. ॥३६-३७॥
सर्पराजो महाघोरो यस्यां वसति वासुकिः ।
निर्याय मार्गितव्या च सा च भोगवती पुरी ॥ ३८ ॥
’त्या भोगवतीपुरी मध्ये महाभयंकर सर्पराज वासुकी निवास करतात.(हे योगशक्तीने अनेक रूपे धारण करून दोन्ही भोगवती पुरींमध्ये एकाचवेळी राहू शकतात.) तुम्ही विशेषरूपाने त्या भोगावती पुरीत प्रवेश करून तेथे सीतेचा शोध घेतला पाहिजे. ॥३८॥
तत्र चानंतरोद्देशा ये केचन समावृताः ।
तं च देशमतिक्रम्य महानृषभसंस्थिति: ॥ ३९ ॥
’त्या पुरीमध्ये जी गुप्त आणि व्यवधानरहित स्थाने आहेत, त्या सर्वात सीतेचे अन्वेषण केले पाहिजे. त्या प्रदेशास ओलांडून पुढे गेल्यावर तुम्हाला ऋषभ नामक महान पर्वत लागेल. ॥३९॥
सर्वरत्‍न मयः श्रीमान् ऋषभो नाम पर्वतः ।
गो शीर्षकं पद्मकं च हरिश्यामं च चंदनम् ॥ ४० ॥

दिव्यमुत्पद्यते यत्र तच्चैवाग्निसमप्रभम् ।
न तु तच्चंदनं दृष्ट्‍वा स्प्रष्टव्यं च कदाचन ॥ ४१ ॥
’तो शोभाशाली ऋषभ पर्वत संपूर्ण रत्‍नांनी भरलेला आहे. तेथे गोशीर्षक, पद्मक, हरिश्याम आदि नामे असलेले दिव्य चंदन उत्पन्न होते. तो चंदनवृक्ष अग्नि समान प्रज्वलित होत राहातो. त्या चंदनास पाहिल्यावर तुम्ही कदापिही त्याला स्पर्श करता कामा नये. ॥४०-४१॥
रोहिता नाम गंधर्वा घोरा रक्षंति तद्वनम् ।
तत्र गंधर्वपतयः पञ्च सूर्यसमप्रभाः ॥ ४२ ॥
’कारण की रोहित नामाचे गंधर्व त्या घोर वनाचे रक्षण करतात. तेथे सूर्यासमान कांतिमान् पाच गंधर्व राहातात. ॥४२॥
शैलूषो ग्रामणीः शिक्षः शुको बभ्रुस्तथैव च ।
रविसोमाग्निवपुषां निवासः पुण्यकर्मणाम् ॥ ४३ ॥

अंते पृथिव्या दुर्धर्षाः ततः स्वर्गजितः स्थिताः ।
’त्यांची नावे अशी आहेत - शैलूष, ग्रामणी, शिक्ष(शिग्रु), शुक आणि बभ्रु. त्या ऋषिभाच्या पुढे पृथ्वीच्या अंतिम सीमेवर सूर्य, चंद्रमा तसेच अग्नितुल्य तेजस्वी पुण्यकर्मा पुरुषांचे निवासस्थान आहे. म्हणून तेथे दुर्धर्ष स्वर्गविजयी (स्वर्गाचे अधिकारी) पुरुषच वास करतात. ॥४३ १/२॥
ततः परं न वः सेव्यः पितृलोकः सुदारुणः ॥ ४४ ॥

राजधानी यमस्यैषां कष्टेन तमसाऽऽवृता ।
’त्याच्या पुढे अत्यंत भयानक पितृलोक आहे, तेथे तुम्ही लोकांनी जाता कामा नये. ही भूमि यमराजाची राजधानी आहे, जी कष्टमय अंधकाराने आच्छादित आहे. ॥४४ १/२॥
एतावदेव युष्माभिः वीरा वानरपुंगवाः ।
शक्यं विचेतुं गंतुं वा नातो गतिमातां गतिः ॥ ४५ ॥
’वीर वानरपुंगवांनो ! बस, दक्षिण दिशेला इतक्याच अंतरापर्यंत तुम्हांला जावयाचे आहे आणि शोधावयाचे आहे. त्याच्या पुढे पोहोंचणे असंभव आहे, कारण तिकडे जंगम प्राण्यांची गति नाही. ॥४५॥
सर्वमेतत्समालोक्य यच्चान्यदपि दृश्यते ।
गतिं विदित्वा वैदेह्याः संनिवर्तितुमर्हथ ॥ ४६ ॥
’या सर्व स्थानी उत्तम तर्हेने देखरेख करून आणिक ही जी स्थाने अन्वेषण योग्य दिसून येतील, तेथेही वैदेहीचा पत्ता लावावा, त्यानंतर तुम्ही सर्वांनी परत आले पाहिजे. ॥४६॥
यस्तु मासान्निवृत्तोऽग्रे दृष्टा सीतेति वक्ष्यति ।
मत्तुल्यविभवो भोगैः सुखं स विहरिष्यति ॥ ४७ ॥
’जो एक महिना पूर्ण झाल्यावर सर्वात प्रथम येथे येऊन असे सांगेल की ’मी सीतेचे दर्शन केले आहे’ तो माझ्याप्रमाणे वैभावाने संपन्न होऊन भोग्य पदार्थांचा अनुभव घेत सुखपूर्वक विहार करील. ॥४७॥
ततः प्रियतरो नास्ति मम प्राणाद् विशेषतः ।
कृतापराधो बहुशो मम बंधुर्भविष्यति ॥ ४८ ॥
’त्याच्याहून अधिक प्रिय माझ्यासाठी दुसरा कोणीही असणार नाही. तो माझ्यासाठी प्राणांहून अधिक प्रिय होईल तसेच अनेक वेळा अपराध केलेला असेल तरीही तो माझा बंधु होऊन राहील. ॥४८॥
अमितबलपराक्रमा भवंतो
विपुलगुणेषु कुलेषु च प्रसूताः ।
मनुजपतिसुतां यथा लभध्वं
तदधिगुणं पुरषार्थमारभध्वम् ॥ ४९ ॥
’तुम्हां सर्वांचे बळ आणि पराक्रम असीम आहे. तुम्ही विशेष गुणवान् उत्तम कुळात उत्पन्न झालेले आहात. राजकुमारी सीतेचा ज्या प्रकारे पत्ता लागू शकेल, त्यास अनुरूप उच्च कोटीचा पुरुषार्थ आरंभ करा.’ ॥४९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकचत्वारिंशः सर्गः ॥ ४१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP